✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमचा आवडता भयपट कोणता ?

ग
गणपा यांनी
Sat, 10/16/2010 - 16:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33015 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

हे सही आहे. हा बघितला पाहिजे.

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:12 नवीन
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

हे सही आहे. हा बघितला पाहिजे.

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:12 नवीन
हे सही आहे. हा बघितला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

खोली क्रमांक १४०८

इन्द्र्राज पवार
Mon, 10/18/2010 - 12:14 नवीन
"......तिथे एक पत्रकार हट्टाने राहायला जातो ...." श्री.जोगळेकरांनी ओळख करून दिलेला "१४०८" (स्टीफन किंगच्या कथेवर आधारित...) हा चित्रपट मी पाहिलेला आहे आणि खरोखरीच एक चांगला भयपट पाहिल्याचे समाधान नक्की मिळते. पण ते वर म्हणतात तसे तो पत्रकार हट्टाने त्या हॉटेलमध्ये राहायला जात नसून तो (एनस्लिन) 'भयकथा' लिहिणाराच लेखक असतो आणि ज्या ज्या गावी 'भूतानी झपाटलेले घर, इन, हॉटेल, हॉस्टेल' अशा आख्यायिकेचे ठिकाण असते तिथला अनुभव खरा की खोटा हे पाहण्याची त्याला सदैव उत्सुकता असते. बर्‍याच ठिकाणी त्याच्या पदरी निराशाच पडत असते, कारण अफवा/अंधश्रध्देमुळे पसरलेला गैरसमज. रूम नंबर १४०८ मात्र त्याचा घामटा काढते, हे सत्य. इन्द्रा
  • Log in or register to post comments

1408

nanaba
Wed, 07/13/2016 - 14:04 नवीन
aapalihi vaat lagate :) Other ch Marathi translation karayacha prayatna kelela.. pan jamala nahi neet :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

द मिस्ट हाय टेन्शन (२००३)

सुहास..
Mon, 10/18/2010 - 13:56 नवीन
द मिस्ट हाय टेन्शन (२००३)
  • Log in or register to post comments

हाऊस ऑफ वॅक्स

satish kulkarni
Mon, 10/18/2010 - 14:08 नवीन
हा पण मस्त आहे,...
  • Log in or register to post comments

मी भयपट तसे कमीच बघितलेत.

जागु
Mon, 10/18/2010 - 14:47 नवीन
मी भयपट तसे कमीच बघितलेत. आता त्यातला कोणता आवडला हे सांगण कठीण आहे.
  • Log in or register to post comments

छान धागा

ऋषिकेश
Mon, 10/18/2010 - 16:37 नवीन
भयपटही (खरतर कोणतेही चित्रपट) मला खूप आवडतात.. बरेचसे वर आले आहेत. एकाची भर घालतो. नाईट श्यामलन चा "व्हिलेज" अगदी फार भितीदायक भयपट नसला तरी एक वेगळाच चित्रपट आहे. सुरवातीला भिती आणि नंतर आपल्या रहाणीमानावर विचार करायला लावणारा
  • Log in or register to post comments

silence of the lambs

प्राजक्ता पवार
Mon, 10/18/2010 - 16:43 नवीन
हा माझा आवडता भयपट. पण या लेखामुळे बरेच नविन कळले.
  • Log in or register to post comments

The Ring ........

utkarsh shah
Mon, 10/18/2010 - 17:26 नवीन
The Ring मस्त आहे........ पहाच एकदा. जाम टरकते........
  • Log in or register to post comments

राम गोपाल वर्मा निर्माणित आणि

मृत्युन्जय
Mon, 10/18/2010 - 17:30 नवीन
राम गोपाल वर्मा निर्माणित आणि तुषार कपूर, अंतरा माळी अभिनीत (??) गायब हा खचितच मी बघितलेला सर्वात भितीदायक चित्रपट आहे. या चित्रपटानंतर मी राम गोपाल वर्मा संबंधीत एकही चित्रपट पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. जवळजवळ संपुर्ण वेळ मी देवाची प्रार्थना करत होतो (१० मित्रांची तिकीटं मी काढली होती आणि पैसे ते नंतर देणार होते. साधारण अर्ध्या तासात मला कळून चुकले की त्यांच्याकडुन अश्या पिक्चरचे पैसे काढणे अवघड आहे. त्यामुळे देवाचा धावा सुरु केला)
  • Log in or register to post comments

:))

निओ
Fri, 07/08/2016 - 22:58 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हॉरर चित्रपट खुप बघितलेत. पण

सूर्य
Mon, 10/18/2010 - 18:07 नवीन
हॉरर चित्रपट खुप बघितलेत. पण फार कमी चित्रपट खरोखरच घाबरवतात. हॉलिवूड हॉररपट म्हणजे आजकाल किळसवाणा प्रकार असतो. तरी मला आवडलेले चित्रपट म्हणजे, रिंग, ओमेन आणि द आदर्स. - सूर्य.
  • Log in or register to post comments

द रिंग आणी ग्रज आवडले. भयपट

नगरीनिरंजन
Tue, 10/19/2010 - 16:14 नवीन
द रिंग आणी ग्रज आवडले. भयपट आहे हे आधीच माहिती असेल तर अजिबात भीती वाटत नाही. हे दोन्ही चित्रपट काहीही माहिती नसताना टीव्हीवर पाहिले त्यामुळे थोडीतरी भीती वाटली. इव्हील डेड सारखे चित्रपट पाहून भीतीपेक्षा किळस जास्त येते. हिंदीमध्ये रात नावाचा चित्रपट बरा होता.
  • Log in or register to post comments

कर्स ऑफ चकी , डॉन ऑफ द डेड ,

nishapari
Fri, 07/08/2016 - 13:39 नवीन
कर्स ऑफ चकी , डॉन ऑफ द डेड , डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क , हाईड अँड सिक , इंटरव्यू विथ द व्हॅम्पायर , इट , मामा , ऑक्युलस , पेट सिमेटरी , रोजमेरीज बेबी , द बाबाडुक , द कॉन्जुरीन्ग , द शाईंनिंग , द अनबॉर्न , द वुमन इन ब्लॅक .... हे काही हॉरर चित्रपट पाहिले आहेत . पण यातला कोणताच चित्रपट फारसा घाबरवू शकला नाही . हॉन्टेड या हिंदी चित्रपटातील काही प्रसंगांनी मात्र खरोखरच घाबरवलं . सगळ्यात जास्त भीती ( अनेक रात्री ) वाटली ती नारायण धारप यांची लुचाई ही कादंबरी वाचून . आजही लुचाईच्या कथानकाची आठवण जरी झाली तरी मी लगेच दुसऱ्या कुठल्यातरी विचारात मन गुंतवते नाहीतर रात्रीच्या झोपेचं खोबरं निश्चित . स्टीफन किंगची पुस्तकं वाचण्याची फार इच्छा आहे पण त्यातलं इंग्रजी झेपत नाही ... जड वाटतं .
  • Log in or register to post comments

’पेट सिमेट्री’

अजिंक्य विश्वास
Tue, 07/12/2016 - 22:47 नवीन
स्टीफन किंगच्या ’पेट सिमेट्री’ चे मराठीकरण केलेली कादंबरी. पेट सिमेट्री वर २ टी.व्ही. मूव्ही आले आहेत. एकदा नक्की पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari

काय नाव आहे मराठी कादंबरीचं ?

nishapari
Fri, 07/15/2016 - 10:34 नवीन
काय नाव आहे मराठी कादंबरीचं ? लेखक कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

लुचाई-नारायण धारप

अजिंक्य विश्वास
Sun, 07/17/2016 - 10:32 नवीन
लुचाई- नारायण धारप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari

लुचाईं सालेम्स लॉटचं स्वैर

nishapari
Sun, 07/17/2016 - 12:23 नवीन
लुचाईं सालेम्स लॉटचं स्वैर रूपांतर आहे ... पेट सिमेट्रीचं नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

Sorry

अजिंक्य विश्वास
Tue, 07/19/2016 - 22:15 नवीन
Sorry. My bad. Pet symmetry cha subject vegala aahe. Navane confuse zalo. But Salem's lot aani pet symmetry hya 2 books var movies aale aahet
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari

आफ्टर डार्क फील्मस

सुंड्या
Fri, 07/08/2016 - 19:34 नवीन
मंडळी आफ्टर डार्क हॉररफेस्ट मधल्या मुव्हीज पण बघा की.....मी एक दाेन बघीतल्या (ड्रेड, द ग्रेवडांसर्स, कील थेअरी इ.) पण 'लेक मुंगो' आवडला... संपुर्ण सीरीज उतरवण्याची इच्छा अपुरी राहुन गेलेला -सुंड्या
  • Log in or register to post comments

सायको ला तोड नाही!

बोका-ए-आझम
Sat, 07/09/2016 - 18:51 नवीन
सायलेन्स आॅफ द लँब्ज हाही अप्रतिम. बाकी हिचकाॅकचाच बर्ड्स, थर्टीनाईन स्टेप्स, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट आणि व्हर्टिगो हे पण जबरदस्त आहेत. मायकेल केन आणि सर लाॅरेन्स आॅलिव्हिए यांचा स्ल्यूथ पण भारी. त्यावर आधारित कलम ३०२ हे मराठी नाटकपण अफाट होतं.
  • Log in or register to post comments

स्ल्यूथ माझा ऑल टाईम फेव्हरिट मूव्ही आहे.

अजिंक्य विश्वास
Tue, 07/12/2016 - 22:45 नवीन
स्ल्यूथ माझा ऑल टाईम फेव्हरिट मूव्ही आहे. त्याचा रिमेक पण आला होता. मायकल केन ला लॉरेन्स ऑलिव्हीए चा रोल देऊन. पण जुन्या स्ल्यूथची मजाच और आहे. त्या मूव्हीची एक खासियत आहे. तो पाहिल्याशिवाय कळणार नाही. आणि दोघांनाही ऑस्कर नॉमिनेशन होते, तेही बेस्ट अ‍ॅक्टर इन्‌ लिडिंग रोलसाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जुने कृष्ण धवल

तिमा
Sat, 07/09/2016 - 19:40 नवीन
जुन्या कृष्ण धवल चित्रपटांत खूप चांगले भयपट येऊन गेले. त्यातील 'द बिस्ट विथ फाइव्ह फिंगर्स' हा जरुर बघण्यासारखा आहे. टोरेंट वरुन उतरवता येतो. प्रत्यक्षांत भूत नसूनही खिळवून ठेवणारा आहे.
  • Log in or register to post comments

अलवणी

मेघनाद
Sat, 07/09/2016 - 20:04 नवीन
चित्रपट नाही पण "अलवणी" नावाचं अनिकेत समुद्र ह्यांनी लिहिलेलं पुस्तक जरूर वाचून बघा, अतिशय मस्त भयकथा लिहिली आहे. ह्या कथेवर नक्कीच एखादा उत्तम भयपट बनू शकतो. पुस्तक जालावर पीडीफ स्वरूपात उपलब्ध आहे, फुकटात!
  • Log in or register to post comments

+11111

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/09/2016 - 20:08 नवीन
पिच्चर तर जास्त नाही पण कथा आवडतात, गानू आज्जींची अंगाई वाचून दरवाजा झालेला आमचा! बाहेर धोधो पाऊस सुरु असताना लाईन गेलेली असताना वाचत होतो, घरा बाहेर असलेली केळीची पाने जेव्हा वाऱ्याने खिडकीच्या तावदानावर घसपटली तेव्हा जीवाच्या आकांताने केकटलो होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघनाद

चांगला रेफ़रन्स दिलात

एक एकटा एकटाच
Sat, 07/09/2016 - 20:09 नवीन
अनिकेत समुद्रे ह्यांची ही कथा मस्त होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघनाद

कुणी काहीही म्हणा

एक एकटा एकटाच
Sat, 07/09/2016 - 20:07 नवीन
कुणी काहीही म्हणा पण रामगोपाल वर्मा चा "रात" मस्त होता. Camera work अतिशय उत्कृष्ठ होतं. रेवतीची acting आणि ओमपुरीची नजर .......खल्लास
  • Log in or register to post comments

हो, रेवती डेंजर च.

धनंजय माने
Sat, 07/09/2016 - 20:14 नवीन
हो, रेवती डेंजर च. (अवांतर- रामगोपाल वर्मा ला सध्या मानसोपचाराची गरज वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच

the ghost and darkness!

अनिता
Sun, 07/10/2016 - 03:02 नवीन
the ghost and darkness
  • Log in or register to post comments

हॉरर चित्रपट मी मला कितीही

गौतमी
Mon, 07/11/2016 - 15:21 नवीन
हॉरर चित्रपट मी मला कितीही भिती वाटली तरी बघतेच. (अगदी डोळे बंद करुन सुद्धा) 'हा खेळ सावल्यांचा' चित्रपट मी अगदी लहान अस्ताना पाहीला होता.... दुसरी-तिसरीत असताना.. त्यामुळे जास्त काही घाबरले नाही पण नारळच्या झाडाची भिती वाटायला लागली होती नंतर खुप दिवस. त्यानंतर 'तात्या विंचु' चा चित्रपट पाहुन बाहुल्यांनी खेळायचंच सोडुन दिलं होत मी. (असं वाटायचं हा बाहुला/बाहुली पण त्याच्यासारखचं चालायला लागली तर, मला पण तसच म्हणाली तर, "माझा आत्मा तुझ्यात, आणि तुझा आत्मा बाहेर... ओम फट्ट स्वाहा.. हा" त्यानंतर 'आहट', 'द झी हॉरर शो', मानो या ना मानो'(हिचं सुत्रसंचालन इरफान खान करायचा... इकदम खत्री होती हि मालिका पण) अप्पा जोगळेकरांनी उल्लेख केलेले 'राँग टर्न' आणि 'हिल हॅव आईज' चा पहिला भाग पाहिलाय आणि दुसरा भाग बघायची हिम्मतच नाही झाली. ( मला ही किळस वाट्ली हे चित्रपट बघताना... २ दिवस जेवलेच नाही, इतकं भयाण आनि भकास आणि त्यापेक्शा जास्त किळसवाणं दाखवलं आहे त्यात.) '१४०८' हा चित्रपट बघुन फारशी भिती नाही वाटली. "अलवणी" हि कथा मात्र जाम भारी आहे. अनिकेत यांच्या ब्लॉग वर वाचली आहे.
  • Log in or register to post comments

13B (हिंदी) , डरना मना है

मराठी कथालेखक
Mon, 07/11/2016 - 19:38 नवीन
13B (हिंदी) , डरना मना है
  • Log in or register to post comments

एक थी डायन पण चांगला वाटलेला

मराठी कथालेखक
Mon, 07/11/2016 - 19:39 नवीन
एक थी डायन पण चांगला वाटलेला
  • Log in or register to post comments

द स्केलेटन की

सिरुसेरि
Tue, 07/12/2016 - 15:34 नवीन
द स्केलेटन की , नीलकमल , अर्धांगी
  • Log in or register to post comments

कोणी डेड-एन्ड हा मूव्ही पाहिला आहे का?

अजिंक्य विश्वास
Tue, 07/12/2016 - 22:37 नवीन
कोणी डेड-एन्ड हा मूव्ही पाहिला आहे का? Dead End (2003) Christmas Eve. On his way to his in-laws with his family, Frank Harrington decides to try a shortcut, for the first time in 20 years. It turns out to be the biggest mistake of his life. http://www.imdb.com/title/tt0308152/?ref_=fn_al_tt_1 आणि ’द अदर्स’ ची एक गावठी कॉपी बघण्यात आली होती. मनिषा कोईराला, संजय कपूर (’हा कोण?’ म्हणून विचारू नका ), आणि हेलन. बाकी काही बोलायलाच नको. टीम बर्टनचा ’बीटलज्यूस’ कोणी पाहिला आहे का? तो असल्या जॉनर मध्ये माहिर आहे. बाकी जॉन कारपेंटरचे भयपट पाहण्यासारखे असतात.
  • Log in or register to post comments

जबर धागा व इन्द्राज पवारांचे सुरेख प्रतिसाद

मारवा
Wed, 07/13/2016 - 12:57 नवीन
इन्द्राज पवारांनी लिहीणं का थांबवल ? ते दुसरीकडे कुठे सक्रीय आहेत का ? मला त्यांचे लेखन प्रतिसाद फार आवडतात.
  • Log in or register to post comments

हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे

अविनाशकुलकर्णी
Wed, 07/13/2016 - 19:14 नवीन
Image removed. हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो... हॉलिवुदचे भयपट आपण पहात असालच..साधारण साचा एकच असतो..भयानक चेहे-याची भुते..ड्राकुला..आदी अमानवी व्यक्तिरेखा.....भयाण हवेल्या त्यात नायक रहायला जाणे तिथे आधीच एक आत्मा असणे मग अशक्य घटनांची साखळी आदी.. या सर्वाना छेद देणारा एक "Midnight Cabaret" हा सिनेमा पहाण्यात आला.. एक नाटक कंपनी..त्यात एक कुमारीकेचे पात्र...तिचा वापर करुन एका "सैतान पुत्रास" जन्म देण्याचा प्ल्यान..असे साधारण कथानक आहे..नाटकातल्य घटना त्या मुलिच्या जीवनात घडु लागतात..खरे काय अन आभास काय यात तिचा उडालेला गोंधळ..असे साधारण कथानक आहे... २ तास सिनेमा तुम्हाला खिळवुन ठेवतो... हॉलिवुडचे काही सिनेमे बघणे म्हणजे निखळ आनंद असतो
  • Log in or register to post comments

अनफ्रेन्डेड

एनिग्मा
Mon, 07/18/2016 - 22:35 नवीन
अनफ्रेन्डेड, काही दिवसानपुर्विच हा सिनेमा पाहिला. सम्पुर्न सिनेमा स्काइप वर आहे. वेगळी सन्कल्पना होती.
  • Log in or register to post comments

हाऊस ऑफ वॅक्स!

स्पार्टाकस
Tue, 07/19/2016 - 01:10 नवीन
अफलातून भितीदायक सिनेमाचा एक अनुभव म्हणजे हाऊस ऑफ वॅक्स! या सिनेमात जो व्हिलन आहे तो जिवंत माणसांवर उकळतं मेण ओतून त्यांचे पुतळे बनवत असतो! संपूर्ण सिनेमात एकदाच त्याचा चेहरा दिसतो पण तो झोप उडवून जातो! अवांतरः शाहरुख्/सलमान्/सैफ अली खानचा कोणताही सिनेमा (अपवादः स्वदेस आणि चक दे, ओमकारा) हे कोणत्याही भयपटाच्या तोडीसतोड नाहीत काय?
  • Log in or register to post comments

अहल्या...

स्नेहश्री
Tue, 07/19/2016 - 09:51 नवीन
अहल्या...
  • Log in or register to post comments

भयपट व गम्तीशीर अनुभव

चौकटराजा
गुरुवार, 07/21/2016 - 09:18 नवीन
पुण्यातील राहुल थिएटर ला एक्झोरसिस्ट हा सिनेमा पहायला गेलो. त्यात एक पंधरा वर्षाच्या मुलीला भूत लागते. फादर ना बोलावणे जाते. फार " तू कोण आहेस..? असा प्रश्न भुताला करतात. मुलगी उत्तर देण्याच्या बदल्यात फादरच्या अंंगावर हिरवे काळे ओकते तेंव्हा अंधारातून एक प्रेक्षक जोरात ओरडला " अरे आळूची भाजी रे ..... !" त्याबरोबर भय पटाला आलेले सर्व प्रेक्षक हास्यरसात डूबून निघाले.
  • Log in or register to post comments

हॉरर स्टोरीने (२०१३) सुध्दा

सचिन७३८
Mon, 09/05/2016 - 14:33 नवीन
हॉरर स्टोरीने (२०१३) सुध्दा खिळवून ठेवले.
  • Log in or register to post comments

एव्हिल डेड १ पूर्वीचा आणि द कंजुरिंग १ आजकालचा

चेतन पडियार
Tue, 09/06/2016 - 15:05 नवीन
एव्हिल डेड १ बद्दल बोलावं तितकं कमी इतका भारी आई भयानक मूवी होता. भूत दिसणार असं वाटलं की पांघरूण ओढून घ्यावं लागतं होतं. नवीन काळात द कंजुरिंग १ पण सॉलिड भयानक आहे. बाकी व्ही सी आर ची गोष्ट इकडे पण लागू. फक्त भयपटासाठी नाही... पण इतर सिनेमांसाठी सुद्धा.. इतर म्हणजे बालक पालक मध्ये दाखवलं आहे ना.. सेम! ;)
  • Log in or register to post comments

भयपट पेक्षा रहस्य पट चांगले

bhavana kale
Tue, 09/06/2016 - 15:21 नवीन
भयपट पेक्षा रहस्य पट चांगले वाटतात.. बाकी भयपट बघू शकतो पण मन खाली घालून...
  • Log in or register to post comments

शकतो?

कपिलमुनी
Tue, 09/06/2016 - 15:35 नवीन
भावना'ओंको समझो ! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: bhavana kale

मुनिवर!!!

क्षमस्व
Tue, 09/06/2016 - 17:14 नवीन
मुनिवर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पेट सिमेटरी - झेल्डा चा सीन .

nishapari
गुरुवार, 09/29/2016 - 22:48 नवीन
पेट सिमेटरी - झेल्डा चा सीन . हार्ट अटॅक येता येता राहिला . :(
  • Log in or register to post comments

डोन्ट ब्रीद..

हर्मायनी
Mon, 10/03/2016 - 14:11 नवीन
काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट.. भयपट म्हणता नाही येणार पण गूढपट.. एकदम थरारक.. नक्की बघावा असा.
  • Log in or register to post comments

मला आवडलेले (?) काही भयपट

ज्याक ऑफ ऑल
Mon, 10/03/2016 - 16:54 नवीन
http://www.imdb.com/title/tt2023587/ - ममा http://www.imdb.com/title/tt0450385/ - १४०८ http://www.imdb.com/title/tt1130884/?ref_=nv_sr_1 - शटर आयलंड http://www.imdb.com/title/tt0230600/?ref_=fn_al_tt_4 - द अदर्स http://www.imdb.com/title/tt0298130/?ref_=fn_al_tt_1 - द रिंग http://www.imdb.com/title/tt3322940/ - एनाबेल
  • Log in or register to post comments

बाबाडूक पण चांगला चित्रपट आहे

संपत
Tue, 10/04/2016 - 20:11 नवीन
बाबाडूक पण चांगला चित्रपट आहे.. हॉरर पण थोडा मानसिक विश्लेषणाच्या अंगाने जाणारा इट फॉलोज पण चांगला आहे drag me to hell सुद्धा खुप मस्त आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा