दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे. जर्मनीच्या उत्तर टोकाच्या हाम्बुर्ग येथे अँजेला डोरीथी कास्नर यांचा १७ जुलै १९५४ रोजी जन्म झाला. आई इंग्रजी व लॅटिनची शिक्षिका आणि वडिल क्विट्झो येथील प्रोटेस्टंट चर्च ऑफिसचे काम करत असल्याने लहानपणापासून सुसंस्कृत आणि सुरक्षित वातावरणात वाढलेली अँजेला अभ्यासात रुची ठेवून होती. शाळेत असताना गणित आणि रशियन तिचे विशेष आवडीचे विषय होते. कास्नर कुटुंब नंतर इस्ट बर्लिनपासून ८० किमी वर असलेया टेंप्लिन गावात रहायला गेले. क्विट्झो काय किवा टेंप्लिन काय तेव्हाच्या पूर्व जर्मनीत होते आणि त्या वेळच्या राजकीय परिस्थीतीचे पडसाद कळतनकळत लहानग्या अँजेलाच्या मनावर आणि मेंदूवर कोरले जात होते. शाळा संपल्यावर तिने लाइपझिश युनिवर्सिटीमध्ये फिजिक्स शिकायला जाण्याचा निर्णय घेतला. तेथेच तिची भेट उलरिश मेर्केलशी झाली आणि दोघे विवाहबध्द झाले. लाइपझिशमध्ये शिकत असताना अँगेला इतर उपक्रमातही भाग घेत असे. तेथल्या विद्यार्थ्यांनी ७३-७४ साली एक पडका बुरूज शोधला, दुसर्या महायुध्दात त्याची पार पडझड झाली होती. १५५१ मधल्या ह्या मॉरिट्झबास्टेलचे ऐतिहासिक महत्त्व मुलांनी जाणले आणि तो पुनरुज्जिवित करण्याकरता चळवळ सुरू केली. त्याकाळच्या पूर्व जर्मनीतल्या प्रशासनाला हे मान्य नव्हतेच. पण ३०,००० च्या वर विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी हे काम लाइपझिश युनिव्हर्सिटीच्या देखरेखीखाली केले आणि एक सुंदर स्टूडंट क्लब तयार झाला. लाइपझिशमधले ते एक मोठे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. अँजेलाचा ह्या चळवळीत सक्रिय सहभाग होता.
उलरिश आणि अँजेला ह्या दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पूर्व बर्लिनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेथे अँजेला यांनी अॅकेडमी ऑफ सायन्सेस मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स & केमिस्ट्री येथे काम सुरू केले. एकीकडे तिथे शिकणेही चालूच होते. काही कारणास्तव १९८१ मध्ये उलरिश आणि अँजेला वेगळे झाले. क्वांट्म केमिस्ट्री वर संशोधन करून ८६ साली अँजेला यांनी पि एच डी प्राप्त केली. त्याच वर्षी नात्यातल्या एका लग्नाकरता त्या प्रथमच पश्चिम जर्मनीत आल्या. दोन्ही जर्मनीतली तफावत त्यांच्या डोळ्यांना,मनाला जाणवत होती. इकडे जर्मनीतच्या राजकारणात आणि समाजातही बदलाचे वारे वेगाने वाहत होते. १९८९ च्या नोव्हेंबर मध्ये बर्लिनची भिंत जमीनदोस्त करून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाली. वर्षभरात म्हणजे ३ ऑक्टोबर १९९० ला पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे पूर्ण एकत्रीकरण झाले. आजही त्यांना त्याबद्दल विचारले असता त्या म्हणतात तो अनुभव शब्दातीत आहे, तो आनंद शब्दांच्या पलिकडचा आहे. बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव मेर्केल यांच्यावर पडला आणि त्या तिकडे खेचल्या गेल्या. त्यांनी सत्ताधार्यांच्या विरोधी पक्षाच्या डेमोक्राटिशं आउफब्रुक म्हणजे डेमोक्रेटिक अवेकनिंग ह्या चळवळीत उडी घेतली. ९० सालीच ह्या डेमोक्राटिशं आउफब्रुकचे सीडीयु मध्ये विलिनीकरण झाले आणि मेर्केलना प्रवक्तापदी नेमण्यात आले.
एकत्रीकरणाआधीच्या पूर्व जर्मनीच्या लोथार दे मझियर यांच्या काळ्जीवाहू मंत्रीमंडळात त्यांनी प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आणि एकत्रीकरणानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत जिंकून त्या डॉइशं बुंडेसटाग मध्ये म्हणजे जर्मन पार्लमेंटमध्ये निवडून गेल्या. चॅन्सेलर हेल्मुट कोहेल ह्यांच्या मंत्रीमंडळात त्या मिनिस्टर फॉर वुमेन अँड युथ झाल्या. आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी कचेर्यांमध्ये स्त्रीपुरुष समान संधीचा कायदा आणला. प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे हे कटाक्षाने पाहिले आणि कुटुंब आणि कचेरीमधल्या वेळाचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने कामाच्या तासांमध्ये फ्लेक्सिबिलिटी आणली. मुलाच्या जन्मानंतर आई वडिल दोघांकरताही पालकत्वाची रजा मंजूर झाली. त्यांचे काम पाहता कोहेलनी त्यांना ९४ साली पर्यावरण आणि अणुसुरक्षा मंत्री केले. त्यांच्या कामाला आता वेग आला होता, क्षितिज विस्तारत होते. यु एन ची पहिली पर्यावरणपरिषद बर्लिन मध्ये आयोजित केली गेली आणि जगभरातल्या CO2 चे वाढत चाललेले प्रमाण कसे कमी करता येईल हा त्या परिषदेतला एक महत्त्वाचा विषय होता. चॅन्सेलर कोहेल त्यांच्या कामावर संतुष्ट होते. अनेकदा त्यांचा उल्लेख कौतुकाने ते 'माइन मेडशन' म्हणजे 'माझी मुलगी' असा करत असत. ९८ च्या निवडणूकीत कोहेल सरकारचा पराभव झाला आणि मग मेर्केलबाई सीडीयुच्या सेक्रेटरी जनरल झाल्या. सीडीयुच्या त्या जवळपास ९ वर्षे उपाध्यक्षा होत्या, मग २००० मध्ये त्या पार्टीच्या अध्यक्षा झाल्या. २००५ च्या निवडणुकीत चॅन्सेलर गेहार्ड श्रोडर ह्यांचा पराभव करून त्या जिंकून आल्या. सीडीयु, सीएसयु आणि एसपीडी ह्यांची ६ आठवड्यांच्या चर्चेनंतर युती होऊन मग मेर्केलबाईंना चॅन्सेलरपदाची शपथ दिली. जर्मनीच्या त्या पहिल्या स्त्री चॅन्सेलर आहेत. एका पुरूष प्रधान पक्षामध्ये राहून आपली यशस्वी वाटचाल त्या सातत्याने करत आहेत. कुटुंब आणि स्त्रियांच्या हक्कापासून उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांपर्यंत अनेकविध क्षेत्रांमधल्या त्यांच्या सक्रिय, सजग सहभागामुळे जर्मनीचा चेहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
फुकुशिमा न्यूक्लिअर प्लँट मधील भयंकर अपघातानंतर मेर्केलबाईंनी जर्मनीतल्या १७ पैकी ८ अणुभट्ट्या बंद करणार असल्याचे जाहीर केले. उर्जेचे दुसरे स्त्रोत वापरण्याच्या दॄष्टीने कोणती पावले उचलता येतील ह्यावर विचार सुरू केला आणि जागतिक तपमानवाढीच्या समस्येला हाताळताना जर्मनी अग्रेसर ठरू लागला. युरोपातल्या देशांनी एकत्र येऊन आपली वेगवेगळी चलने एकत्रित करून एकच युरो हे चलन स्वीकारावे असा प्रस्ताव आला. काही देशांची त्याला मान्यता नवह्ती पण युरोपच्या एकंदरीत अर्थकारणासाठी हे गरजेचे पाऊल होते आणि त्याचा पाठपुरावा करून जर्मनीसारख्या बलशाली देशाने डॉइशमार्क सोडून युरो स्वीकारला.युरोपियन युनियन मधला मेर्केल ह्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय आहे. जागतिक मंदीच्या लाटेत त्या समर्थपणे टिकून राहिल्या. जर्मनीला मंदीची झळ कमीत कमी पोहोचली. जर युरो गडगडला तर युरोप गडगडेल ह्या त्यांच्या विधानामुळे त्यांची युरोपियन युनियन वरची निष्ठा दिसून येते.
मेर्केलबाईंना स्वयंपाकाची आवड आहे. त्यांचे कार्तोफेल सुपं म्हणजे पोटॅटो सूप आणि फ्लाउमन कुकन म्हणजे प्लम केक ही खासियत आहे. आता त्यांच्या व्यापातून त्यांना कुकिंग साठी कमी वेळ मिळतो किंबहुना मिळतच नाही पण करियरच्या सुरुवातीच्या काळात अगदी मंत्री झाल्यावरही प्लमच्या सिझनमध्ये त्यांचा एखादा विकांत प्लम केक बेकिंगसाठी राखून ठेवलेला असे. अजूनही जुन्या सहकार्यांकडून त्यांच्या प्लम केकची आठवण काढली जाते. त्यांचे फूटबॉल प्रेम सर्वश्रुत आहेच. २०१४ साली जर्मनीने जेव्हा फूटबॉल विश्वचषक जिंकला तेव्हाचा त्याचा आनंद कान्सलेरिन म्हणून तर तर होताच पण एक फूटबॉलवेडी प्रेक्षक म्हणून जास्त होता.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्या बरोबरची बर्लिनमधील त्यांची भेट दोन्ही देशांमधल्या व्यापारी संबंधांसाठी महत्त्वाची ठरली. तर मोदी-मेर्केल भेटीनंतर त्यावर कळस चढला. भारत आणि जर्मनी मधील व्यापाराला जलदगतीने मंजुरी मिळावी ह्याकरताचा करार झाला. २००९ मध्ये भारतातर्फे त्यांना जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशविदेशातून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. फोर्ब्जच्या "मोस्ट पॉवरफूल वुमन ऑफ द वर्ल्ड" ह्या सन्मानावर त्यांनी २००६ पासून नऊ वेळा हक्क बजावला आहे. टाइमच्या २०१५ च्या त्या 'पर्सन ऑफ द इयर' आहेत. २००५ पासून जर्मनीच्या कान्सलेरिन असलेल्या मेर्केलबाईंना आयुरारोग्य लाभो आणि त्या देशाच्या आणि युरोपच्या पर्यायाने जगाच्या राजकारणात अशाच तळपत राहोत ह्या शुभेच्छा!
जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे. जर्मनीच्या उत्तर टोकाच्या हाम्बुर्ग येथे अँजेला डोरीथी कास्नर यांचा १७ जुलै १९५४ रोजी जन्म झाला. आई इंग्रजी व लॅटिनची शिक्षिका आणि वडिल क्विट्झो येथील प्रोटेस्टंट चर्च ऑफिसचे काम करत असल्याने लहानपणापासून सुसंस्कृत आणि सुरक्षित वातावरणात वाढलेली अँजेला अभ्यासात रुची ठेवून होती. शाळेत असताना गणित आणि रशियन तिचे विशेष आवडीचे विषय होते. कास्नर कुटुंब नंतर इस्ट बर्लिनपासून ८० किमी वर असलेया टेंप्लिन गावात रहायला गेले. क्विट्झो काय किवा टेंप्लिन काय तेव्हाच्या पूर्व जर्मनीत होते आणि त्या वेळच्या राजकीय परिस्थीतीचे पडसाद कळतनकळत लहानग्या अँजेलाच्या मनावर आणि मेंदूवर कोरले जात होते. शाळा संपल्यावर तिने लाइपझिश युनिवर्सिटीमध्ये फिजिक्स शिकायला जाण्याचा निर्णय घेतला. तेथेच तिची भेट उलरिश मेर्केलशी झाली आणि दोघे विवाहबध्द झाले. लाइपझिशमध्ये शिकत असताना अँगेला इतर उपक्रमातही भाग घेत असे. तेथल्या विद्यार्थ्यांनी ७३-७४ साली एक पडका बुरूज शोधला, दुसर्या महायुध्दात त्याची पार पडझड झाली होती. १५५१ मधल्या ह्या मॉरिट्झबास्टेलचे ऐतिहासिक महत्त्व मुलांनी जाणले आणि तो पुनरुज्जिवित करण्याकरता चळवळ सुरू केली. त्याकाळच्या पूर्व जर्मनीतल्या प्रशासनाला हे मान्य नव्हतेच. पण ३०,००० च्या वर विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी हे काम लाइपझिश युनिव्हर्सिटीच्या देखरेखीखाली केले आणि एक सुंदर स्टूडंट क्लब तयार झाला. लाइपझिशमधले ते एक मोठे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. अँजेलाचा ह्या चळवळीत सक्रिय सहभाग होता.
उलरिश आणि अँजेला ह्या दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पूर्व बर्लिनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेथे अँजेला यांनी अॅकेडमी ऑफ सायन्सेस मध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स & केमिस्ट्री येथे काम सुरू केले. एकीकडे तिथे शिकणेही चालूच होते. काही कारणास्तव १९८१ मध्ये उलरिश आणि अँजेला वेगळे झाले. क्वांट्म केमिस्ट्री वर संशोधन करून ८६ साली अँजेला यांनी पि एच डी प्राप्त केली. त्याच वर्षी नात्यातल्या एका लग्नाकरता त्या प्रथमच पश्चिम जर्मनीत आल्या. दोन्ही जर्मनीतली तफावत त्यांच्या डोळ्यांना,मनाला जाणवत होती. इकडे जर्मनीतच्या राजकारणात आणि समाजातही बदलाचे वारे वेगाने वाहत होते. १९८९ च्या नोव्हेंबर मध्ये बर्लिनची भिंत जमीनदोस्त करून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाली. वर्षभरात म्हणजे ३ ऑक्टोबर १९९० ला पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे पूर्ण एकत्रीकरण झाले. आजही त्यांना त्याबद्दल विचारले असता त्या म्हणतात तो अनुभव शब्दातीत आहे, तो आनंद शब्दांच्या पलिकडचा आहे. बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव मेर्केल यांच्यावर पडला आणि त्या तिकडे खेचल्या गेल्या. त्यांनी सत्ताधार्यांच्या विरोधी पक्षाच्या डेमोक्राटिशं आउफब्रुक म्हणजे डेमोक्रेटिक अवेकनिंग ह्या चळवळीत उडी घेतली. ९० सालीच ह्या डेमोक्राटिशं आउफब्रुकचे सीडीयु मध्ये विलिनीकरण झाले आणि मेर्केलना प्रवक्तापदी नेमण्यात आले.
एकत्रीकरणाआधीच्या पूर्व जर्मनीच्या लोथार दे मझियर यांच्या काळ्जीवाहू मंत्रीमंडळात त्यांनी प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आणि एकत्रीकरणानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत जिंकून त्या डॉइशं बुंडेसटाग मध्ये म्हणजे जर्मन पार्लमेंटमध्ये निवडून गेल्या. चॅन्सेलर हेल्मुट कोहेल ह्यांच्या मंत्रीमंडळात त्या मिनिस्टर फॉर वुमेन अँड युथ झाल्या. आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी कचेर्यांमध्ये स्त्रीपुरुष समान संधीचा कायदा आणला. प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे हे कटाक्षाने पाहिले आणि कुटुंब आणि कचेरीमधल्या वेळाचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने कामाच्या तासांमध्ये फ्लेक्सिबिलिटी आणली. मुलाच्या जन्मानंतर आई वडिल दोघांकरताही पालकत्वाची रजा मंजूर झाली. त्यांचे काम पाहता कोहेलनी त्यांना ९४ साली पर्यावरण आणि अणुसुरक्षा मंत्री केले. त्यांच्या कामाला आता वेग आला होता, क्षितिज विस्तारत होते. यु एन ची पहिली पर्यावरणपरिषद बर्लिन मध्ये आयोजित केली गेली आणि जगभरातल्या CO2 चे वाढत चाललेले प्रमाण कसे कमी करता येईल हा त्या परिषदेतला एक महत्त्वाचा विषय होता. चॅन्सेलर कोहेल त्यांच्या कामावर संतुष्ट होते. अनेकदा त्यांचा उल्लेख कौतुकाने ते 'माइन मेडशन' म्हणजे 'माझी मुलगी' असा करत असत. ९८ च्या निवडणूकीत कोहेल सरकारचा पराभव झाला आणि मग मेर्केलबाई सीडीयुच्या सेक्रेटरी जनरल झाल्या. सीडीयुच्या त्या जवळपास ९ वर्षे उपाध्यक्षा होत्या, मग २००० मध्ये त्या पार्टीच्या अध्यक्षा झाल्या. २००५ च्या निवडणुकीत चॅन्सेलर गेहार्ड श्रोडर ह्यांचा पराभव करून त्या जिंकून आल्या. सीडीयु, सीएसयु आणि एसपीडी ह्यांची ६ आठवड्यांच्या चर्चेनंतर युती होऊन मग मेर्केलबाईंना चॅन्सेलरपदाची शपथ दिली. जर्मनीच्या त्या पहिल्या स्त्री चॅन्सेलर आहेत. एका पुरूष प्रधान पक्षामध्ये राहून आपली यशस्वी वाटचाल त्या सातत्याने करत आहेत. कुटुंब आणि स्त्रियांच्या हक्कापासून उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांपर्यंत अनेकविध क्षेत्रांमधल्या त्यांच्या सक्रिय, सजग सहभागामुळे जर्मनीचा चेहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
फुकुशिमा न्यूक्लिअर प्लँट मधील भयंकर अपघातानंतर मेर्केलबाईंनी जर्मनीतल्या १७ पैकी ८ अणुभट्ट्या बंद करणार असल्याचे जाहीर केले. उर्जेचे दुसरे स्त्रोत वापरण्याच्या दॄष्टीने कोणती पावले उचलता येतील ह्यावर विचार सुरू केला आणि जागतिक तपमानवाढीच्या समस्येला हाताळताना जर्मनी अग्रेसर ठरू लागला. युरोपातल्या देशांनी एकत्र येऊन आपली वेगवेगळी चलने एकत्रित करून एकच युरो हे चलन स्वीकारावे असा प्रस्ताव आला. काही देशांची त्याला मान्यता नवह्ती पण युरोपच्या एकंदरीत अर्थकारणासाठी हे गरजेचे पाऊल होते आणि त्याचा पाठपुरावा करून जर्मनीसारख्या बलशाली देशाने डॉइशमार्क सोडून युरो स्वीकारला.युरोपियन युनियन मधला मेर्केल ह्यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय आहे. जागतिक मंदीच्या लाटेत त्या समर्थपणे टिकून राहिल्या. जर्मनीला मंदीची झळ कमीत कमी पोहोचली. जर युरो गडगडला तर युरोप गडगडेल ह्या त्यांच्या विधानामुळे त्यांची युरोपियन युनियन वरची निष्ठा दिसून येते.
मेर्केलबाईंना स्वयंपाकाची आवड आहे. त्यांचे कार्तोफेल सुपं म्हणजे पोटॅटो सूप आणि फ्लाउमन कुकन म्हणजे प्लम केक ही खासियत आहे. आता त्यांच्या व्यापातून त्यांना कुकिंग साठी कमी वेळ मिळतो किंबहुना मिळतच नाही पण करियरच्या सुरुवातीच्या काळात अगदी मंत्री झाल्यावरही प्लमच्या सिझनमध्ये त्यांचा एखादा विकांत प्लम केक बेकिंगसाठी राखून ठेवलेला असे. अजूनही जुन्या सहकार्यांकडून त्यांच्या प्लम केकची आठवण काढली जाते. त्यांचे फूटबॉल प्रेम सर्वश्रुत आहेच. २०१४ साली जर्मनीने जेव्हा फूटबॉल विश्वचषक जिंकला तेव्हाचा त्याचा आनंद कान्सलेरिन म्हणून तर तर होताच पण एक फूटबॉलवेडी प्रेक्षक म्हणून जास्त होता.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्या बरोबरची बर्लिनमधील त्यांची भेट दोन्ही देशांमधल्या व्यापारी संबंधांसाठी महत्त्वाची ठरली. तर मोदी-मेर्केल भेटीनंतर त्यावर कळस चढला. भारत आणि जर्मनी मधील व्यापाराला जलदगतीने मंजुरी मिळावी ह्याकरताचा करार झाला. २००९ मध्ये भारतातर्फे त्यांना जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशविदेशातून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. फोर्ब्जच्या "मोस्ट पॉवरफूल वुमन ऑफ द वर्ल्ड" ह्या सन्मानावर त्यांनी २००६ पासून नऊ वेळा हक्क बजावला आहे. टाइमच्या २०१५ च्या त्या 'पर्सन ऑफ द इयर' आहेत. २००५ पासून जर्मनीच्या कान्सलेरिन असलेल्या मेर्केलबाईंना आयुरारोग्य लाभो आणि त्या देशाच्या आणि युरोपच्या पर्यायाने जगाच्या राजकारणात अशाच तळपत राहोत ह्या शुभेच्छा!Book traversal links for दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अँगेलाबाईंच्या कारकिर्दीचा
मेर्केलबाईंची काही काही धोरणे
+११
जागतिकीकरण
आज ०३ ऑक्टोबर २०१७, आजच
हो
लेख आवडला.
+१
आढावा आवडला.
त्यांची निर्वासित धोरणं पटत
का? काय चूकीचं धोरण आहे त्यात
इमिग्रेशन धोरणात चुकीचं काही
हो,
थोड्या फार चुका होणार च. आणि
इमिग्रेशन धोरणात वाईट काही
जर्मनीच्या बाबतीत फक्त व्हाईट
मर्केल जन्म १९५४
अहो ती प्रत्यक्ष जन्मली नसेल
प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव
पण मोठ्या पिक्चर कडे बघितलंत
ओळख आवडली
छान ओळख!
छान माहिती
सद्गुण का विकृती ?
White man's guilt पेक्षाही guilt for Nazi past.
याच जोडीला Deutsche Bank आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृत