Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on Mon, 08/22/2016 - 01:00
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल! (अर्थात योग्य त्या "पेरणे"ला श्रेय द्यायचं मात्र विसरू नका!) अर्थात सगळा अंकच रहस्यकथांना वाहिलेला नाही. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे. ...आणि काही नियम/सूचना: १) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. २) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा. ३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम रहस्यकथांसाठीही आहे. विशेषतः रहस्यकथांसाठी हा नियम फारच जाचक वाटू शकतं याची कल्पना आहे. हे सोपं नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात फारशी मजाही नसते. ;) तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा. --x-- दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच! - टीम दिवाळी अंक
  • Log in or register to post comments
  • 16576 views

प्रतिक्रिया

Submitted by शिव कन्या on गुरुवार, 09/29/2016 - 17:38

In reply to आमचं बी लिखाण अर्धवट राहिल्या by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

सेम सेम!

सेम सेम! थोडीसी मोहलत दो भाई. :(:(
  • Log in or register to post comments

Submitted by हरेश तुपे on गुरुवार, 09/29/2016 - 10:43

Permalink

क्रुपया साहित्य संपादक आयडी

क्रुपया साहित्य संपादक आयडी सांगावा.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 09/29/2016 - 10:52

In reply to क्रुपया साहित्य संपादक आयडी by हरेश तुपे

Permalink

व्यनीसाठी

साहित्य संपादक
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on गुरुवार, 09/29/2016 - 18:00

Permalink

अनेकांच्या आग्रहाला मान देऊन

अनेकांच्या आग्रहाला मान देऊन अंतिम तारीख १५ ऑक्टोबर करण्यात येत आहे. दिवाळी अंक संपादन-सजावट टीमला कमी वेळ मिळेल. त्यामुळे आपल्या लेखनाची अंदाजे शब्दसंख्या आणि लेखात काही फोटो/व्हीडियो असल्यास "साहित्य संपादक" या आयडीला व्यनि करून कळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Fri, 10/14/2016 - 21:36

Permalink

नमस्कार!

नमस्कार! दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचं असल्यास रविवार संध्याकाळपर्यंत पाठवावं ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sun, 10/16/2016 - 14:17

Permalink

कथा पाठवली आहे, तरीही कृपया

कथा पाठवली आहे, तरीही कृपया साहित्य संपादकांनी जमल्यास अन जास्त जिकिरीचे वाटत नसल्यास प्रवेशिका पाठवणाऱ्यांना जमले तर अगदी एकोळी काय द्विशब्दीय "लेखन मिळाले" इतकी तरी पोचपावती द्यावी ही आग्रहाची विनंती मी साहित्यसंपादक मंडळाला करतो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 10/16/2016 - 14:25

In reply to कथा पाठवली आहे, तरीही कृपया by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

नेहेमी २४ तासाच्या आत पोच

नेहेमी २४ तासाच्या आत पोच द्यायचा प्रयत्न असतो. तरी उशीर झाला असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 10/16/2016 - 14:33

In reply to नेहेमी २४ तासाच्या आत पोच by आदूबाळ

Permalink

पोच

मलाही मिळालेली नाही, मी अ‍ॅझुम केलं आहे की माझा संदेश पोचलाय,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 10/16/2016 - 14:46

In reply to पोच by स्वाती दिनेश

Permalink

ओह. आपले दोन्ही लेख पोचले

ओह. आपले दोन्ही लेख पोचले आहेत. क्षमस्व आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Sun, 10/16/2016 - 18:45

Permalink

दिवाळी अंक २०१६ साठी लेख

मी सुद्धा अनुवादित कथा पाठविली होती, ती मिळाली की नाही ते कळविणे, नसेल मिळाली तर पुन्हा पाठवीन. अर्थातच प्रकाशित करण्यायोग्य वाटली नाही तर उत्तर पाठविण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 10/16/2016 - 19:37

In reply to दिवाळी अंक २०१६ साठी लेख by जयन्त बा शिम्पि

Permalink

व्यनि की जीमेल?

व्यनि केला होतात की जीमेल? शक्य असेल तर मला पुन्हा व्यनि करून पाठवा.
  • Log in or register to post comments

Submitted by साहित्य संपादक on Sun, 10/16/2016 - 21:09

Permalink

सासंला व्यनि आलेला नाही

सासंला व्यनि आलेला नाही आपल्या कथेचा.कृपया व्यनि किंवा जी मेल परत करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 10/23/2016 - 13:49

Permalink

मिपा दिवाळी अंकाच्या आगमनाचा

मिपा दिवाळी अंकाच्या आगमनाचा सांगावा देणारे फटाके चेपुवर (फेसबुकवर) फुटायला सुरुवात झालेली आहे! आपल्या भिंतीवरूनही शेअर करा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com