Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on Mon, 08/22/2016 - 01:00
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल! (अर्थात योग्य त्या "पेरणे"ला श्रेय द्यायचं मात्र विसरू नका!) अर्थात सगळा अंकच रहस्यकथांना वाहिलेला नाही. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे. ...आणि काही नियम/सूचना: १) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. २) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा. ३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम रहस्यकथांसाठीही आहे. विशेषतः रहस्यकथांसाठी हा नियम फारच जाचक वाटू शकतं याची कल्पना आहे. हे सोपं नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात फारशी मजाही नसते. ;) तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा. --x-- दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा. त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच! - टीम दिवाळी अंक
  • Log in or register to post comments
  • 16576 views

प्रतिक्रिया

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 08/22/2016 - 01:29

Permalink

रहस्यकथा!!!!

ज्जे बात! दीर्घकथा चालेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/22/2016 - 01:52

In reply to रहस्यकथा!!!! by बोका-ए-आझम

Permalink

चालेल की! पळेल!

चालेल की! पळेल!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 08/22/2016 - 10:54

In reply to रहस्यकथा!!!! by बोका-ए-आझम

Permalink

तुमची तर हवीच !!

तुमची तर हवीच !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 08/22/2016 - 12:05

Permalink

दिवाळी अंकास शुभेच्छा.

दिवाळी अंकास शुभेच्छा. अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 08/22/2016 - 13:12

Permalink

मला माझी एखादी कथा द्यायला

मला माझी एखादी कथा द्यायला आवडेल मिपा च्या दिवाळी अंकात.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 08/22/2016 - 13:21

Permalink

अगोदर मिपा वर टाकलेली कथा परत

अगोदर मिपा वर टाकलेली कथा परत दिली तर चालेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/22/2016 - 13:28

In reply to अगोदर मिपा वर टाकलेली कथा परत by ज्योति अळवणी

Permalink

नाही. लेखन पूर्वप्रकाशित

नाही. लेखन पूर्वप्रकाशित नसावं. हा मुद्दा नजरेला आणून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 13:28

In reply to अगोदर मिपा वर टाकलेली कथा परत by ज्योति अळवणी

Permalink

अहो तै, मुख्य वाचक तेच असणार

अहो तै, मुख्य वाचक तेच असणार ना? . प्रतिसाद पण तेच येतील. चालेल का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 08/22/2016 - 14:44

In reply to अहो तै, मुख्य वाचक तेच असणार by अभ्या..

Permalink

श्री अभ्या... माझी कथा जर

श्री अभ्या... माझी कथा जर दिवाळी अंकात येणार असेल आणि मुख्य वाचक तेच असतील(असं तुमचं मत आहे माझं नाही...) तर मला चालेल. कारण माझा विश्वास आहे जे (तुमच्या म्हणण्याप्रमाणे)मुख्य वाचकांव्यतिरिक्त जे वाचक वाचतील आणि प्रतिसाद देतील ते देखील मला वाचायला आवडतील. कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 15:47

In reply to श्री अभ्या... माझी कथा जर by ज्योति अळवणी

Permalink

कोणी एखादा प्रश्न विचारला की

कोणी एखादा प्रश्न विचारला की आपण कायमच वाकड्यात का शिरता ते मला कळत नाही
हो, गणपती आले की बदलणारे मी स्वभाव.
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Tue, 08/23/2016 - 08:44

In reply to कोणी एखादा प्रश्न विचारला की by अभ्या..

Permalink

अभ्या काकूला त्रास नको देऊ

अभ्या काकूला त्रास नको देऊ
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Tue, 08/23/2016 - 08:44

In reply to कोणी एखादा प्रश्न विचारला की by अभ्या..

Permalink

अभ्या काकूला त्रास नको देऊ

अभ्या काकूला त्रास नको देऊ
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 08/22/2016 - 13:39

Permalink

वावा!

अंकासाठी शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 08/22/2016 - 13:46

Permalink

एक कथा डोक्यात घोळत आहे...

"एका लग्नाची गोष्ट" ह्या नावाची. ती दिली तर चालेल का? अद्याप ती कथा कुठेही प्रकाशित झालेली नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 13:47

In reply to एक कथा डोक्यात घोळत आहे... by मुक्त विहारि

Permalink

येऊ द्या मुवि.

येऊ द्या मुवि. मी पण 'टॉवेलटोपी' लिहितो.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 08/22/2016 - 13:49

In reply to येऊ द्या मुवि. by अभ्या..

Permalink

'टॉवेलटोपी'

ह्या बाबत काही विचारू नकोस. एका पेक्ष एक भारी अनुभव आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/22/2016 - 17:27

In reply to येऊ द्या मुवि. by अभ्या..

Permalink

मी पण "शाल-श्रीफळ", "कद-उपरणं

मी पण "शाल-श्रीफळ", "कद-उपरणं" असलं काहीतरी लिहीन!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 08/22/2016 - 17:30

In reply to मी पण "शाल-श्रीफळ", "कद-उपरणं by सूड

Permalink

धन्याकडून वरातीत वाजणार्‍या

धन्याकडून वरातीत वाजणार्‍या गाण्यांवर लेख मागवता येईल. =))
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/22/2016 - 13:48

In reply to एक कथा डोक्यात घोळत आहे... by मुक्त विहारि

Permalink

__/\__ अर्थात!

__/\__ अर्थात!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Mon, 08/22/2016 - 14:34

Permalink

रेसिपी देते.

रेसिपी देते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 08/22/2016 - 15:24

Permalink

शुभेच्छा !!

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा ! नेहमीप्रमाणे अंक बहारदार असेल यात काही वाद नाही. दिवाळी अंक टीमला शुभेच्छा !!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Mon, 08/22/2016 - 15:53

Permalink

कधी लिहून पाहिली नाही

कधी लिहून पाहिली नाही रहस्यकथा, पण प्रयत्न करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 08/22/2016 - 16:39

In reply to कधी लिहून पाहिली नाही by स्वामी संकेतानंद

Permalink

बहुत आभार!

बहुत आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 08/22/2016 - 16:45

In reply to कधी लिहून पाहिली नाही by स्वामी संकेतानंद

Permalink

अरे वा! मस्तच!

येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 08/22/2016 - 16:55

Permalink

सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!!

सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!! फराळाच्या ताटाची वाट पाहतोय -बाप्या
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Mon, 08/22/2016 - 17:13

In reply to सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

तू बी लिव बे सायच्या

तू बी लिव बे सायच्या
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 21:58

In reply to तू बी लिव बे सायच्या by स्वामी संकेतानंद

Permalink

स्वामी, बापू तुम्हीलोक

स्वामी, बापू तुम्हीलोक वर्हाडी शिव्या शिकवा कि राव. त्यो भारत गणेशपुरे भैताडाशिवाय दुसरं काय बोलना झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 08/22/2016 - 22:41

In reply to स्वामी, बापू तुम्हीलोक by अभ्या..

Permalink

उघड प्रतिसादात सांगता येण्यालायक शिव्या,

ह्या शिव्या देणे सरासरी पोरगं "बब्बा" "आज्जी" वगैरे बोलायला लागलं की एकदम अकस्मात पडतं, प्रसंगी ह्या शिव्या प्रचंड घट्ट मैत्री निदर्शक विशेषणे होतात, तर सुरु करूया 1. भोसयच्या/भोसईच्या :- ह्या शिवीचा नागर भाषिक उच्चार देण्याची गरज वाटत नाही, तितका तू हुशार आहेस अभ्या. आत्यंतिक प्रेम-आनंद-आश्चर्य ते राग दाखवायला ही शिवी कामी येते, वैदर्भ दृष्टीनेच नाही तर पॅनइंडिया तत्वावर इतकी सुंदर अन पॉलीमॉर्फिक शिवी सापडणे कठीण आहे, उदाहरणे प्रेम - ह्या इन्याच्या घरी गेलं का ह्याचं पोट्टं नीरा काका काका करत अंगावर कुद्या मारते भोसईचं (ह्यात विन्या, विन्याची लक्ष्मी, रिटायर्ड लक्ष्मी उर्फ माय अन ब्रह्मदेवासारखा मग्न असलेला बाप कोणालाच काही गैर वाटत नाही तर कौटुंबिक संबंध घट्ट असल्याचा तो पुरावा असतो) आनंद - अरे भोसईचा राहणे, काय खास खेडते (खेळतो) रे बावा थो आश्चर्य - १५ जुलाब करून बी भोसईचा दिन्या रोडगे म्हणले का बातच (लगेच धावत येते) तर अश्या ह्या सुंदर शिवी नंतर आपण पुढे वळूयात काही कमअस्सल कॉपीराईट वऱ्हाडी शिव्यांकडे, लक्षात घ्यायचा मुद्दा हा की ह्या शिव्या वऱ्हाड प्रांत म्हणजे विदर्भाच्या अकोला अमरावती वाशीम यवतमाळ बुलडाणा अन काही अंशी वर्धा ह्याच जिल्ह्यात दिल्या जातात, स्वामींच्या भागात म्हणजे झाडीपट्टी मध्ये वेगळ्या शिव्या असतात सूक्ष्म फरकाच्या, म्हणजे बघ जाणकार जसे नासिक सीडलेस अन तासगाव चमन द्राक्षाच्या प्रतीत फरक करू शकतो तितके सूक्ष्म, अन ह्या सगळ्या शिव्यांचे एमसीएक्स उर्फ कमोडिटी एक्सचेंज म्हणजे नागपूर शहर आहे तिथे सगळी व्हरायटी मिळते , असो वऱ्हाडी शिवी संपदेतील पुढील मौक्तिकें खालील प्रमाणे 2 सायच्या :- ह्याचा शब्द अन भाषिक उद्गम मला माहिती नाही पण ही युनिव्हर्सल शिवी आहे आमच्याकडली, प्रोग्रॅमिंग करताना ज्या हेडरफाइल declare करायला लागतात सुरुवातीला ही तसली हेडर फाइल आहे शुद्ध, हिच्याशिवाय कितीही शुद्ध वऱ्हाडी बोलली तरी ती सिंटॅक्स एररच देणार ही खात्री बाळगा, ही शिवी अघोरी साधू सारखी असते, हिला घोंगडी पांघरा का राख हिला फरक पडत नसतो उदाहरणे :- १. विनू :-आज सायचं चिकन खायचा मूड हाय लेक दिनु :- भसकला का सायच्या सावन लागलं हाय ना विनू :- कायच करा सायच्याले सावन कई खतम होते रे बा दिन्या?? दिनु :- राय न सायच्या उगामुगा एखाद हफ्ता मंग लागन तर एखाद कुत्तल्डलं कापून खायजो पर सद्याशीक कंट्रोल मदी राय होबासक्या 3. फोकनीच्या विथ अ "न" नॉट अ "ण" , आमच्याकडे कुलकर्णी/कांबळे/कुरेशी/कुदळे पाटील कोणाच्याही, पोरानं जरी ही शिवी दिली तरी "ण" कधीच लावणार नाही! ती "न" लावूनच दिली जाते, पुर्वीच्याकळी महाभारतात बाण मंत्राभिमंत्रीत करत त्यात उच्चार चुकला तर बाणावर शक्ती विराजमान होत नसे, तेच शास्त्र ह्या शिवीला लागू पडते ह्याची नोंद घ्यावी! तेव्हा "फोकनीच्या" विथ अ "न" तर ही शिवी जरी प्रभावी अस्त्र असले तरी ही मुळात सायच्याची हाय पॉवर गोळी आहे म्हणजे बघ सायच्या जर 250 एमजी असली तर फोकनीच्या ही 500 एमजी असेल, बाकी उपयोग तेच, फक्त ही शिवी बहुतकरून दटावणे चेपणे इत्यादी कर्मसहाय्यक आहे, अन ह्या शिवीचा अखंड सप्ताह पानपट्टी नामक तीर्थक्षेत्री कायम सुरु असतो. हिच्या खेरीज ग्रामीण अंतर्भागात भाडखाव, संतरसोल्या, इमल्या, बालतारा, नसानकोंबड्या, गेंगल्या, बहिनमारी, इचिभना, वगैरे मौक्तिकेंही गुलाल बुक्का उधळावा तश्या सुरूच असतात, ह्या झाल्या सभ्य शिव्या, असभ्य शिव्यांकरता आधी बिरुटे सर म्हणतात तो कोनाडा उघडा तिकडे फुकट शिकवणी धागा सुरु करण्यात आम्हांस आनंद होईल ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 22:50

In reply to उघड प्रतिसादात सांगता येण्यालायक शिव्या, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ह्ये जिगर,

ह्ये जिगर, गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 08/22/2016 - 22:50

In reply to उघड प्रतिसादात सांगता येण्यालायक शिव्या, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ह्ये जिगर,

ह्ये जिगर, गंडा बांधून घेतलाय बे, अमरावतीत जाऊन चार शिव्या देऊन येईन तवाच तुला गुरुदक्षिणा दिइन.
  • Log in or register to post comments

Submitted by इल्यूमिनाटस on Tue, 08/23/2016 - 09:09

In reply to उघड प्रतिसादात सांगता येण्यालायक शिव्या, by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

धन्यवाद !

भाषा ज्ञानात भर टाकल्याबद्दल निशाणी डावा अंगठा या पिच्चर मध्ये अनासपुरे सारखा इचिभन म्हणत असतो , हि शिवी आहे हे आत्ता समजले ! शिव्यांशिवाय बोलणे म्हणजे बिन फोडणीचं वरण खाणे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 08/22/2016 - 17:17

In reply to सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

तुमच्याकडून पेस्शल हेरगिरी

तुमच्याकडून पेस्शल हेरगिरी कथा अपेक्षित आहे,
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 08/22/2016 - 17:21

In reply to तुमच्याकडून पेस्शल हेरगिरी by संदीप डांगे

Permalink

डांगेण्णा ना पेशल फूलछाप वाले

डांगेण्णा ना पेशल फूलछाप वाले हनुमोदन +१२३४५६७८९
  • Log in or register to post comments

Submitted by राजाभाउ on Mon, 08/22/2016 - 17:55

In reply to डांगेण्णा ना पेशल फूलछाप वाले by महासंग्राम

Permalink

अगदी अगदी. बापू लिहाच हेरकथा

अगदी अगदी. बापू लिहाच हेरकथा.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 08/22/2016 - 17:24

Permalink

सर्व लेखकु मंडळींस शुभेच्छा!!

दिवाळी अंक टीमला शुभेच्छा !!! अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहेच. सर्वत्र सहमती. वाचनमात्र नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 08/22/2016 - 18:42

Permalink

दिवाळी अंक टीमला अनेक

दिवाळी अंक टीमला अनेक शुभेच्छा. अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार असेल ह्याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 08/22/2016 - 18:46

Permalink

खूप खूप शुभेच्छा. मस्तं होणार

खूप खूप शुभेच्छा. मस्तं होणार दिवाळी अंक निश्चितच.
  • Log in or register to post comments

Submitted by उल्का on Mon, 08/22/2016 - 19:08

Permalink

शुभेच्छा

दिवाळी अंक टीमला खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sun, 08/28/2016 - 10:58

Permalink

सही! रहस्यकथा लिहली नाही कधी

सही! रहस्यकथा लिहली नाही कधी पण प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by Jack_Bauer on Sun, 09/18/2016 - 09:38

Permalink

कथा कश्या स्वरूपात प्रसिद्ध होतात ?

कथा कश्या स्वरूपात प्रसिद्ध होतात ? प्रत्येक कथा स्वतंत्रपणे कि सर्व कथा एकत्र ( अगर एकाच pdf मध्ये ) ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 09/18/2016 - 09:57

In reply to कथा कश्या स्वरूपात प्रसिद्ध होतात ? by Jack_Bauer

Permalink

स्वतंत्रपणे

उजव्या कॉलममधल्या विशेषांकाच्या लिंक्स बघा, म्हणजे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Sun, 09/18/2016 - 09:50

Permalink

पाककृती देते.

पाककृती देते.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sun, 09/18/2016 - 11:34

In reply to पाककृती देते. by इशा१२३

Permalink

रहस्यमय पाककृती?

म्हणजे नक्की कशाची आहे हा suspense? (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/18/2016 - 11:53

Permalink

अमोल गवळी यांनी

व्यंगचित्र पाठवतो असं म्हटलं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sun, 09/18/2016 - 12:11

Permalink

देवा देवा देवा

ते ऑलिंपिक मधे सुवर्ण पदक मिळणार होते त्याचे काय झाले. बरं ते पॅरालंपिकवाल्यांना खेलरत्न का नाय म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by शशिधर केळकर on Wed, 09/28/2016 - 18:40

Permalink

रहस्यकथा

मला एक अनुवादित रहस्यकथा पाठवायची आहे. व्यनि करताना मूळ संदेशात कथा कशी जोडायची ते कृपया कळवावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/28/2016 - 19:06

In reply to रहस्यकथा by शशिधर केळकर

Permalink

संदेश म्हणूनच

संदेश म्हणूनच सबंध कथा कॉपी पेस्ट करून पाठवा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 09/28/2016 - 22:25

Permalink

अर्रे... हे काय, आली की एक

अर्रे... हे काय, आली की एक ऑक्टोबर...!!! दोनच दिवस...?? काही एक्स्टेन्शन नै मिळणार्कं????
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 09/28/2016 - 22:56

In reply to अर्रे... हे काय, आली की एक by संदीप डांगे

Permalink

द्या की दादा!

द्या की दादा! थोडा उशीर झाला तरी हरकत नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 09/29/2016 - 08:04

In reply to द्या की दादा! by आदूबाळ

Permalink

आमचं बी लिखाण अर्धवट राहिल्या

आमचं बी लिखाण अर्धवट राहिल्या गेले आहे, दोन दिवस अजून मिळावी म्हणे मुदतवाढ :(
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com