दिवाळी अंक २०१६ - आवाहन
नमस्कार मिपाकरहो!
सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत.
रहस्यकथा वाचायला कोणाला आवडत नाही! लहानपणापासून आपण सगळेच शरलॉक होम्स, ब्योमकेश बक्षी, फेलूदा, काळा पहाड, बॅ० अमर विश्वास आदिंच्या रहस्यकथा वाचत / ऐकत / पहात आलो आहोत. याच अनुषंगाने यंदाच्या दिवाळी अंकात रहस्यकथांसाठी एक वेगळा कोपरा, वेगळा विभाग आपण ठेवणार आहोत. या दालनासाठी तुमच्याकडून रहस्यकथा हवी आहे. स्वतंत्रपणे रहस्यकथा लिहिलीत तर सोन्याहून पिवळं, पण अन्य भाषांतली भाषांतरित / रूपांतरित कथाही चालेल! (अर्थात योग्य त्या "पेरणे"ला श्रेय द्यायचं मात्र विसरू नका!)
अर्थात सगळा अंकच रहस्यकथांना वाहिलेला नाही. अन्य कथा, लेख, पाकृ, कविता, मुलाखती, चित्रं वगैरेंचंही स्वागतच आहे.
...आणि काही नियम/सूचना:
१) तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा. कोणत्याही प्रकारच्या वाङ्मयचौर्याचा ढका आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाला लागू नये ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
२) मिपाचा दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, आणि त्यासाठी आम्ही दिवाळी अंक टीम आटोकाट प्रयत्नही करणार आहोत. आलेल्या साहित्याला नीट निवडून, टिपून, पारखून मगच दिवाळी अंकात स्थान दिलं जाईल. याचाच अर्थ काही साहित्य नाकारावं लागेल. समजा, तुमचं लेखन नाकारलं गेलं तर कृपया नाराज होऊ नका. आपणांला वाटल्यास ते स्वतंत्रपणे मिपावर नक्की प्रकाशित करा.
३) दिवाळी मंगलमय, आनंदाचा सण आहे हे आपण सगळेच जाणतो. तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत बीभत्सपणाचा आंबटरस असू नये. हा नियम रहस्यकथांसाठीही आहे. विशेषतः रहस्यकथांसाठी हा नियम फारच जाचक वाटू शकतं याची कल्पना आहे. हे सोपं नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात फारशी मजाही नसते. ;) तरी तुम्हाला काही मदत/सल्ला/मार्गदर्शन हवं असल्यास साहित्य संपादकांशी संपर्क साधावा.
--x--
दिवाळी ३० ऑक्टोबर २०१६ला सुरू होते आहे. तुमचं लेखन आल्यावर ते वाचून, मुद्रितशोधन करून, सजवून चकाचक करायला लागणारा वेळही जमेस धरावा लागेल. म्हणून, आपलं लेखन उशीरात उशीरा १ ऑक्टोबर २०१६ पर्यंत साहित्य संपादक या आयडीला व्यनीने पाठवा.
त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आम्ही आहोतच!
- टीम दिवाळी अंक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सेम सेम!
क्रुपया साहित्य संपादक आयडी
व्यनीसाठी
अनेकांच्या आग्रहाला मान देऊन
नमस्कार!
कथा पाठवली आहे, तरीही कृपया
नेहेमी २४ तासाच्या आत पोच
पोच
ओह. आपले दोन्ही लेख पोचले
दिवाळी अंक २०१६ साठी लेख
व्यनि की जीमेल?
सासंला व्यनि आलेला नाही
मिपा दिवाळी अंकाच्या आगमनाचा