Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Mon, 09/26/2016 - 19:34
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं ! आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात. एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे ! मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !! काही तूनळी लिंका : मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0 आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
  • Log in or register to post comments
  • 44407 views

प्रतिक्रिया

Submitted by मारवा on Tue, 09/27/2016 - 19:44

In reply to अच्छा सिला दिया तुने मेरे by संपत

Permalink

त्यातली सगळ्यात कल्ला लाइन

आजही हमने बदले है कपडे आजही हम नहाये हुए है ही होती पण ते पॉप नव्हत ना. तो किशनकुमार नावाचा गुलशन चा भाऊ होता त्यानंतर अनेक एक्स्ट्रांचा आत्मविश्वास वाढलेला....
  • Log in or register to post comments

Submitted by nashik chivda on Tue, 09/27/2016 - 22:02

Permalink

Khalid & HISHAM abbas

khalid didi https://www.youtube.com/watch?v=f7-YyghdmzU HISHAM abbas with shahbaz SUBA https://www.youtube.com/watch?v=BuKOCWMOdOo
  • Log in or register to post comments

Submitted by सुंड्या on Tue, 09/27/2016 - 23:44

Permalink

गझब आहेत मिपाकर

"नाझिया हसन" ची एक वेगळीच छाप होती डिस्को गाण्यांची "डिस्को दिवाने आणि आप जैसा कोई" हे विशेष लोकप्रिय झाले होते. लेस्ली लुईसचे "भिगी भिगी रातों मे" आणि बिददुचे "दिल बोले बूम बूम, कभी मिलते है हम तुम" एक नंबरचं आहेत. रागेश्वरी चे "मैने देखे है सभी रंग दुनिया के ..., ,सुचित्रा कृष्णमुर्ती- "डोले डोले" स्टाईल भाई नावाचा प्रकारही होता (आजच्या हनीसिंगचा तो आद्य अवतार.) @ भाते साहेब ते 'अपाचे इंडिअन' आमचे कडे हायेत(जवळ जवळ सगळणी), क्रमशः
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on Wed, 09/28/2016 - 09:06

Permalink

क्या सुरत है क्या सुरत है

लिहायला थोडं ऑड वाटतय पण श्री अन्नू मलिकजींनी गायलेलं 'धुआ धुआ हो रहा है समा कही तो है आग लगी' हे गाणं. सोनूचं तुझे लगे ना नजरीया ओढले चुनरिया आरयन भाऊंचं आखोमे तेरा ही चेहरा आणि ये सदा कहती क्या सुन तो मेरी जाना बाबा सहगल्चं आजा मेरी गाडी मे बैठ जा इन्स्टंट कर्मा - दील क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाये, बाहोमे चले आ अभिजीत - कभी यादो मे आओ कभी खाबो मे आओ अजुन आठवतील तसे देतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश माने on Wed, 09/28/2016 - 12:21

Permalink

इंडिपॉपच्या जमान्यात

इंडिपॉपच्या जमान्यात आशाताईंनी सुध्दा काही गाणी गायली होती. पडदे में रहने दो या गाण्याचे रिमिक्स आणि रात शबनमी भिगी चांदनी......... जानम समझा करो ही दोन आठवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 11:57

In reply to इंडिपॉपच्या जमान्यात by नरेश माने

Permalink

आशाजींचं ....!

'दिल पे नाराज था हमे बडा सनम, पर क्या बतलायें हम' हे पण छान होत आशाजींचं ....!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 09/29/2016 - 12:02

In reply to आशाजींचं ....! by एस.योगी

Permalink

एका गान्यात 'सुनाली बेन्ड्रे'

एका गान्यात 'सुनाली बेन्ड्रे' होती. मॅन्क्वीनचे रुपांतर होते तिच्यात. बहुतेक जानम समझा करो.
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on Wed, 09/28/2016 - 12:31

Permalink

जसबीर जस्सी...

दिल ले गयी कूडी... बघुन आम्ही तरुण झालो... :) - शरभ
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 09/28/2016 - 12:40

Permalink

आजा पिया तोहे प्यार दू

Image removed. लैच रोमॅण्टीक रिमिक्स होता हे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/28/2016 - 13:17

In reply to आजा पिया तोहे प्यार दू by कपिलमुनी

Permalink

Shyla Lopez. Khatranak.

Shyla Lopez. Khatranak. Bahome chale aao and hum bewafa hargiz na the.
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 11:59

In reply to Shyla Lopez. Khatranak. by अभ्या..

Permalink

+१००

लोपेझ बाई .... लै खतरनाक प्रकरण बघा ..... +१००
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Wed, 09/28/2016 - 12:41

Permalink

जबरी

जबरदस्त धागा. बरीच नवीन गाणी समजली. रिमिक्सेस फारसे आवडत नसून सुद्धा "बॉम्बे व्हायकिंग" ची गाणी त्यांच्या व्हिडिओज मुळे जास्त आवडायची. खासकरून "क्या सुरत हे" आणि "मोना रे" (अतुल परचुरे, व्रजेश हिरजी आणि यश टाँक यांची एका मुलीसाठी चढाओढ.....तीही सबटायटल्स मधून. अफलातून व्हिडियो होता.) "रुप तेरा मस्ताना" रिमिक्स चा व्हिडियो सुद्धा भारी होता. आज बर्याच वर्षांनंतर हे सगळं परत परत बघताना आणि ऐकताना खूप भारी वाटतं. जबरदस्त नॉस्टॅलजिया.....
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:06

In reply to जबरी by सुमीत भातखंडे

Permalink

शंकर महादेवनचे

शंकर महादेवनचे 'सामने ये कौन आया' एकदम सही.. रेट्रो लूक्स, लॅम्ब्रेटा स्कुटर्स लैच भारी राव ...
  • Log in or register to post comments

Submitted by पुजारी on Wed, 09/28/2016 - 13:50

Permalink

कलोनिअयन कझन्स

हरिहरन आणि लेस्ली चा कलोनिअयन कझन्स हा नाद्याबाद अल्बम. पण यातलं कृष्णा नि बेग ने आणि Its’ gonna be alright या दोघांचेच विडिओ आले . ( बहुतेक) रच्याकने , , हरिहरन चा ' काश ' आमचा जीव कि प्राण अल्बम आहे ! गाणी सगळी इंडिपॉप म्हणता येणार नाहीत , गझल्स होत्या- पण आम्ही तर बुआ पंखे झालो तेव्हापासुन 'हरी 'चे !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमन्त वाघे on Wed, 09/28/2016 - 15:35

Permalink

बॉम्बे व्हायकिंग

इथे बराच वेळ बॉम्बे व्हायकिंग चा उल्लेख होत नसल्याने आश्रय वाटत होते . खास आठवण यायचे कारण म्हणजे मध्ये एका दारू पार्टीत नीरज श्रीधर - बॉम्बे व्हायकिंग च संतापाक आणि भारतीय चेहरा , याची ओळख झाली आणि थोड्या गप्पा झाल्या . सध्याही तो गात असतो आणि त्याचा एक स्टुडिओ आहे . एकेकाळचा त्याची लोकप्रियता बघता हा बराच शांत माणूस वाटलं . शेवटी त्याला इंडी पॉप बद्दल आणि बॉम्बे विकिंग्स बद्दल छेडले असता तो म्हणाला कि या घोस्टनची ऐक वेळ होती ... आणि ती सर्व काही घेऊन गेली ..आणि हे मार्केट बॉलीवूड पुढे टिकले नाही ..
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Wed, 09/28/2016 - 16:43

Permalink

आठवलेली आणखी काही गाणी

गुरु ऑफ पीस माँ तुझे सलाम और आहिस्ता चुपके चुपके तेरा मेरा प्यार
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 17:09

Permalink

"बजा के बाजा, बना मै राजा,

"बजा के बाजा, बना मै राजा, मंजुला" या बाबा सैगलच्या गाण्याचा व्हिडिओ आहे का कोणाकडे?
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Wed, 09/28/2016 - 17:31

In reply to "बजा के बाजा, बना मै राजा, by टवाळ कार्टा

Permalink

हाच का?

https://www.youtube.com/watch?v=wwdLg2jhi3Q
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 17:39

In reply to हाच का? by भाते

Permalink

हा हा...हेच्च

हा हा...हेच्च
  • Log in or register to post comments

Submitted by भम्पक on Wed, 09/28/2016 - 18:14

Permalink

.धन्स...लय भारी....!!!

काय माप राव आमच्या कॉलेजच्या सोनेरी आठवणी जागवल्या.....धन्स...लय भारी अजूनही आमच्या मोबाईल मध्ये हि सर्व टवटवीत गाणी आहेत . बादवे आम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात आमच्या आवडत्या लकी अलीचे , आमचे आवडते "ओ सनम " हे गाणे गाऊन घसा साफ करून घेतला होता .
  • Log in or register to post comments

Submitted by रायबा तानाजी मालुसरे on Wed, 09/28/2016 - 18:36

Permalink

क्या बात...क्या बात! मस्त

क्या बात...क्या बात! मस्त आठवणी जाग्या झाल्या. हजारो ख्वाइशें ऐसी मधलं 'बावरां मन देखने चला एक सपना' हे एक अफाट गाणं. इंडीपॉप नसलं तरी या यादीतलंच वाटतंय. स्वानंद किरकीरे आणि शुभा मुद्गल दोघांनी पण गायलंय. तरी मला शुभा वालं व्हर्जन जास्त आवडतं. संगीत बहुतेक शांतनू मोईत्राचं. मागे स्वानंदला बोलताना ऐकलं, की अजुनही या गाण्याबद्दल प्रतिक्रिया येतात. मला तरी अगदीच सहाजिक वाटलं ते.
  • Log in or register to post comments

Submitted by भावना कल्लोळ on Wed, 09/28/2016 - 18:59

Permalink

धम्माल धागा ... त्याकाळात

धम्माल धागा ... त्याकाळात पंकज उदास, जगजीत सिंह, आशा ताई यांची गझल सॉंग्स पण छान यायची. त्यातली हि गझल जगजीत आणि लताजीच्या आवाजातली ... कही कही से हर चेहरा ऑल टाइम आवडीची आहे. तसेच जब सामने तो तुम आ जाते हो मुझे खबर थी वो मेरा नहीं पराया था चुपके चुपके और आहिस्ता कीजिये बातें परत इला अरुण हिचे वोट फॉर घागरा, निगोड़ी कैसी जवानी, बिछुड़ा, सुनीताचे परी हूँ मैं, आशा ताईचे ओ मेरे सोना रे, जानम समझा करो, अलकाचे खोया खोया चाँद, सोनूचे अब मुझे रात दिन, अदनानची लिफ्ट करा दे, भीगी भीगी रातों मैं, नैन से नैनों को मिला लिस्ट अनलिमिटेड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:10

In reply to धम्माल धागा ... त्याकाळात by भावना कल्लोळ

Permalink

सुखविंदर

' नशा ही नशा है' - सुखविंदर सिंग बेस्ट
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/28/2016 - 19:18

Permalink

आनंद शिंदे मिलिंद शिंदेची

आनंद शिंदे मिलिंद शिंदेची गाणी इंडीपॉपमध्ये न घेतल्याबद्दल जाहीर निषेध. बादवे रेतिवाला नवरा, वाट बघतय रिक्शावाला असली गाणी कोणत्या टाईपात येतात? लोकगीते म्हणून सांगू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 09/29/2016 - 08:12

In reply to आनंद शिंदे मिलिंद शिंदेची by अभ्या..

Permalink

बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत

बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत असतील... =))
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 09/29/2016 - 08:15

In reply to बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत by संदीप डांगे

Permalink

आरारारारारा बाजारच उटीवला

आरारारारारा बाजारच उटीवला भावानं =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 09/29/2016 - 08:30

In reply to आरारारारारा बाजारच उटीवला by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

कुणाच्याही भावना दुखावल्या

कुणाच्याही भावना दुखावल्या आसतील तर आधीच माफी मागतो बावा !!! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 09/29/2016 - 11:46

In reply to बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत by संदीप डांगे

Permalink

चिंधीपॉप. खत्तरा शब्द.

चिंधीपॉप. खत्तरा शब्द. आवड्या. पण हि चिंधीगिरी वडाप, कालीपिली आणि रिक्षावाल्याना लै आवडते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Vishvnath Shelar

Submitted by Vishvnath Shelar on Wed, 09/28/2016 - 21:35

Permalink

Babul Supriyo...

"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....
  • Log in or register to post comments
Profile picture for user Vishvnath Shelar

Submitted by Vishvnath Shelar on Wed, 09/28/2016 - 21:43

Permalink

Babul Supriyo

"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....
  • Log in or register to post comments
Profile picture for user Vishvnath Shelar

Submitted by Vishvnath Shelar on Wed, 09/28/2016 - 21:46

Permalink

Altaf Raja & Band of Boys

Band Of Boys che "Meri Neend Ud Gayi Hii...& Altaaf Raja chi pn athavn theva.....bhavanno...."Tum Toh Thehre Pardesi..., Toh Ghungaru Bandh Liye & Apna Usse Banaya he pn changle gaane hote
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 09/28/2016 - 23:39

Permalink

ले गयी दिल मेरा मंचली

ले गयी दिल मेरा मंचली खलीवली खलीवली खलीवली
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 11:26

Permalink

'एक से बढकर एक'

'एक से बढकर एक' - सूत्र संचालन 'कार्तिकी राणे'
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 09/29/2016 - 11:48

In reply to 'एक से बढकर एक' by एस.योगी

Permalink

हा. त्यात मुकुल देव होता. असे

हा. त्यात मुकुल देव होता. असे टॉप टेन प्रोग्राम्स हेच इंडीपॉपचे लाँचपॅड होते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 09/29/2016 - 11:54

Permalink

वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत

वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत गणेश हेगडे राहिला. त्याचा 'मै दिवाना' वगैरे गाण्यावरचा डान्स बरा होता. शूटिंग आणि प्रेझेंटेशनला पैकी मार्क. रागेश्वरीचा 'हा ये दुनिया बडी रंगीली" वन साँग वंडर होता. गणेश आचार्यचा पण एक अल्बम होता बहुधा. कमाल खानचा पण ओ ओ ओ जानेजा हे अल्बममधलेच हिट होते, नंतर पिक्चरात आले. काही काळ कॅनेडिअन्/ब्रिटिश पंजाबी रेगा/रॅप/पॉप वाल्यानी डोके उठवले होते. हार्ड कौरचे 'एक गलासी' आधी बरे वाटले, नंतर तिचे उचके चाळे आणि जॉनी गद्दार मधले गाणे बघुन ऐकवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:14

In reply to वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत by अभ्या..

Permalink

रागेश्वरी

रागेश्वरी चे 'मेरे मेहबूब चल और कही' लैच सेंटीमेंटल होते राव... क्लायमॅक्स मस्तच ....
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on गुरुवार, 09/29/2016 - 12:20

In reply to वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत by अभ्या..

Permalink

वन अल्बम वंडर

Pankaj SarawgiImage removed. Pyar Hai Tumse...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/29/2016 - 12:06

Permalink

निगोडी कैसी जवानी है झालयं का

निगोडी कैसी जवानी है झालयं का वर?
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on गुरुवार, 09/29/2016 - 12:12

Permalink

तिचे उचके चाळे

...तिचे उचके चाळे...
:)) -शरभ
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:16

Permalink

'डोन्ट ब्रेक माय हार्ट'

स्टिरिओ नेशन चे 'डोन्ट ब्रेक माय हार्ट' राहिले की ....
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:17

In reply to 'डोन्ट ब्रेक माय हार्ट' by एस.योगी

Permalink

'म्युझिक एशिया चॅनल'

'म्युझिक एशिया चॅनल'वर न चुकता रोज सकाळी लागायचे
  • Log in or register to post comments

Submitted by एस.योगी on गुरुवार, 09/29/2016 - 12:25

Permalink

बाबोव ......

बाबोव ...... 'ऐका दाजीबा' राह्यलंय की जणू...
  • Log in or register to post comments

Submitted by बांवरे on गुरुवार, 09/29/2016 - 12:32

Permalink

लई भारी धागा.

सोनू निगमचे : https://www.youtube.com/watch?v=OVI6Uzh5Las - तूऽऽ https://www.youtube.com/watch?v=J8zlroVMYeM : दिवाना तेरा. अमिताभ मियांचे : https://www.youtube.com/watch?v=P9J0-Al3odo - एक रहेन ईर शुभा मुद्गल : https://www.youtube.com/watch?v=CsN9MAfsGIM&list=PL8FAgeC0DYXDWl7DxPryTbsut4KJA4NBM - अब के सावन ऐसे बरसे. आशा भोसले : https://www.youtube.com/watch?v=3JnXgAtt34M जानम समझाकरो https://www.youtube.com/watch?v=k5JKlkHWxGg : केसरिया है रूप म्हारो. आणि लई म्हत्वाचे : https://www.youtube.com/watch?v=smDKvkkoWpM रूप तेरा मस्ताना रिमिक्स ..
  • Log in or register to post comments

Submitted by वाह्यात कार्ट on गुरुवार, 09/29/2016 - 14:03

In reply to लई भारी धागा. by बांवरे

Permalink

९०'स म्हणजे सोनू बाबा. त्याच्यासोबतचे काही 'मोनू '

कोई ख्वाब में रोज आता है - अलका याग्निक- https://www.youtube.com/watch?v=1HoNaEO8B9w दिल था यही अभी अभी - अलका याग्निक - https://www.youtube.com/watch?v=5X_dKdMFJQA मुझे मोहोब्बत सी हो गायी है- रूपकुमार राठोड - https://www.youtube.com/watch?v=tzCNtjGFSVQ हू हल्ला हू - अनयडा - https://www.youtube.com/watch?v=Pkr61XiYt64 चांदी जैसा रंग है तेरा - पंकज उधास - https://www.youtube.com/watch?v=2FEpust-rXw मेहेंदी की रात आयी - https://www.youtube.com/watch?v=OVZRS8oWMN8 इश्क मेरा तडपावे - सुखबीर - https://www.youtube.com/watch?v=AKmq8Xqr03A आणि हे एक "संस्मरणीय" गीत हंगामा हंगामा संजय रैना - https://www.youtube.com/watch?v=xB-r-X_xTF8
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on गुरुवार, 09/29/2016 - 14:05

Permalink

मस्त धागा !!

बहुतेक आवडती गाणी वर आलीत, अजून काही, आजा सोणेया, घर आजा सोणेया, शाझिया मंझूर http://youtu.be/JuTnKaCwBGY पहले तो कभी कभी गम था, अल्ताफ राजाचं हे एकमात्र आवडणारं गाणं, http://youtu.be/TfELfvs92Gg कभी तो नजर मिलाओ, भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना, मुझको भी तो लिफ्ट करा दे, अदनान सामी मेरी मर्जी आणि इतर, देवांग पटेल, ऑफिसमध्ये ऐ राजू, सारखं वाजवून वात आणला होता लोकांनी, मग कुणालाही राजू बनवलं जायचं :) http://youtu.be/Zh9CuOpQqLU हे तर अहाहा, सुंदर !! http://youtu.be/EbPVTxLiKm8
  • Log in or register to post comments

Submitted by गिरिजा देशपांडे on गुरुवार, 09/29/2016 - 14:34

Permalink

व्वा मस्त धागा!!! एकदम जुन्या

व्वा मस्त धागा!!! एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या :) यात माझे पण दोन पैसे याच काळात हरभजन मान चे दोन गाणे खूप गाजले 1) लाली लाल दुपट्टे वाली 2) कुडी कट के कालजा ले गायी (ओये होये नावाचा अल्बम होता.) आणि शुभा मुद्गलचं सीखो ना नैनो कि भाषा पिया पण फार आवडायचं
  • Log in or register to post comments

Submitted by गिरिजा देशपांडे on गुरुवार, 09/29/2016 - 14:37

Permalink

आणि हो धाग्यासाठी धन्यवाद!!!!

आणि हो धाग्यासाठी धन्यवाद!!!! वा.खू.सा.आ.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Fri, 09/30/2016 - 17:24

Permalink

मजा आली

मजा आली. बहुतेक सर्वच अल्बम मधील नायिका एकाचवेळी सुंदर, निरागस आणि ...... कशा काय बुवा दिसू शकतात ? तो जमानाच वेगळा होता काय ? की आमची नजरच वेगळी होती ? :) अवांतर : आमचा जमाना, तुमचा जमाना म्हणजे वय झाल्याची खुण आहे असे इथे कोणीतरी म्हटले होते बुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Sat, 10/15/2016 - 00:37

Permalink

कोणाकडे अब के सावन

व्हिडिओ आहे का? तुनळीवर बराच शोधला, पण सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sat, 10/15/2016 - 17:22

In reply to कोणाकडे अब के सावन by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

(No subject)

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com