लेखनप्रकार (Writing Type)
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
प्रतिक्रिया
म्हणणार होतो!
आमच्या कल्चरल नाईटला मी ते "वो माह जनवरी था.... पासून ते वो साल दुसरा था ये साल दुसरा है" पर्यंत खेचले होते प्रकरण! पोरे बुंगाट झाली होती.
मस्त आहे. म्हणताना मस्त वाटते एकदम.
अल्ताफ राजा एक नंबर आहे
आमच्या पण कल्चरल ला एकाने सुरु केले होते..
पण मार्च पर्यंत आला आणि त्याला आम्ही स्टेजवरुन अक्षरशः उचलून बाहेर फेकला
अल्ताफ राजा एक नंबर आहे!
धागा काढल्याबद्दल धन्यवाद !! एकदम नॉस्टॅल्जिक झालो !!
अजून गाणी येऊ द्या !!
अरे भावांनो, जोजो च " वो कौन थी " विसरलात का ?
https://www.youtube.com/watch?v=efX9tssirYo
मस्तच आहे! पण वन हिट वंडर झाला जोजो...
युफोरिया आणि सुलतान खान अजुनही रोज एकतोय
एकेकाळचा गुणी गायक "अभिजित भट्टाचार्य " चे "लोहे कि तू ना बनी " पण चांगले होते.
"सावन में लग गायी आग" एका चित्रपटाची कथा एका गाण्यात चित्रित केली आणि त्याच मान हलवून नाचणं जबरा ...
प्रतिसादातली सगळीच गाणी मस्त आहेत! आणखी एक हरवलेलं नाव म्हणजे मेह्नाझ. कालच तिचा मौसम हा संपूर्ण अल्बम गाना.कॉम वर मिळाला! मौसम च टायटल ट्रॅक आणि व्हिडीओ दोन्ही सुरेख आहेत. स्ट्रिंग्ज हा तर माझा अतिशय लाडका बॅन्ड! दूर आणि धानी हे अल्बम कधीही आणि कितीही वेळा ऐका!
इला अरुण चे सरसो के खेतो मे पहला उजाला मार डाला मार डाला तेरी ( त्यातला एक फ्रंट ला नाचणारा चकणा होता असे शिरीष कणेकरांनी शोधुन दाखवले होते.) इला अरुण च्या एका गाण्यात चक्क गे कपल वर गाण दाखवलेल होत. त्या काळाच्या मानाने जास्तच थोडस एक तरल अॅबस्ट्रॅक्ट लेस्बीयन थीम असलेल गाण होत फाल्गुनी पाठकच फोटोतुन सुंदरी उतरते परीकथेत झाकलेल होत.
सय्योनी चैन एक पल नही और कोइ हल नही इइइइइइइ सय्योनी..ईईईईईईईईईईईईईईई मस्त आर्त ताणुन खेचायचा अस्वस्थता घेरुन टाकायची मग गिटार चा जबरद्स्त तुकडा यायचा. दिल दहेला देने वाला म्युझिक लिरीक्स
शान च गाण तर ग्रेटच होत
तनहॉ दिल तनहा सफर फिर क्यु उसे डुंढे नजर तनहॉ दिल....
त्यानंतर नुकताच शान जो इथे आज उनसे मिलना है हमे मध्ये भेटला तर तस्साच गोड वाटला. शान एकदम छान
नंतर तो ट्रेन मध्ये ब्रश करता करता तो बंगाली कोण
मायरी मायरी त्याचे बोल कधीच कळले नाहीत सुरुवातीचे पण गाण झकास होत.
तो एक पाण्याखाली वाजवणारा बॅन्ड होता सिल्वर रुट ना
डुबा डुबा रहता हु
जिजाजीकडे आलेली प्रेमात पडलेली प्रिती जांगियानी छुइ मुइ सी तुम लगती हो प्यारी प्यारी दिखतीहोत.
सुरुवात ज्यापासुन झालेली ते मेड इन इंडिया पण स्टायलीश आणि ग्लॅमरस होत. सध्या म्हातारा दिसणारा मिलिंद सोमण तेव्हा चांगला दिसायचा.
शुभा मुग्दल ची गाणी पण जबर होती. पुरानी जीन्स और गिटार मोहल्ले की छत और मेरे यार हे बहुधा त्या काळातलच एक झकास गाण होत . परी होती रागेश्वरी होती.' एकुण फ्रेश काहीतरी नविन करण्याचा काळ होता. कॉपी होती प्रयोग होते पण मजा येऊन गेली.
एक मात्र कोणी फार प्रतिभाशाली नव्हता एक एक प्रयोगापुरता वेगळा व छान होता.
बाबा सहगल रॅप केल नविन छान वाटल
शंकर महादेवनने श्वास रोखुन दाखवला जे शास्त्रीय संगीतातली नॉर्मल बाब आहेत. पण मजा आली कारण त्याचे लिरीक्स मस्त होते वेगात होते इन्टेसीटी त्या स्पीड ची मजा यायची.
अल्प मर्यादीत प्रतिभेचा शाप या सर्वांनाच होता फार थोडे वक्त की कसौटी पे टीक सके
शान शंकर अजुन आहेत कारण त्यांच्यात ती प्रतिभा होती. दम होता.
पण एक छोटा काळ एक लाट आली छान भिजवुन गेली.
याच्यावर अजुन डिटेल लिहावस वाटत
धागा एक नंबर धाग्यासाठी धन्यवाद.
यातली बहुतेक गाणी ऐकतच मोठा झालो असल्याने ते जुने दिवस आठवले. बाकी सगळी गाणी वरती आली आहेतच. तरीही माझ्याकडुन काही गाणी
तुमको देखा तो दिवाने हो गये
व्हेलेण्टाइन डे
आ जाने जा (रिमिक्स)
दिल का आलम
कभी यादों मै आऊ
चुरा लिया
कही दूर जब (जगजीत सिंग)
अपाचे इंडीअनचे वॉर्निंग (रिमिक्स) गाणे कुठे मिळेल का? नो रिझर्व्हेशन मधल्या या गाण्याचे दुसऱ्या अल्बममध्ये (नफ विब्स विथ डॉन राजा) मध्ये रिमिक्स होते. पुर्वी कॅसेट असताना ते अनेक वेळा ऐकले आहे. पण आता कुठेही सापडत नाही आहे.
इंडिपॉप म्हणजे माझा विक पॉइंट...अगदी परवाच बाबा सहगल चे दिल धडके परत ऐकले होते...
धाग्यात काही गाणी नव्याने दिसली, त्याबद्धल आभार्स... पल्याडला कामी येतील.
बाकी स्टाईल भाई फक्त फक्त अश्विनी भावे साठीच पाहिले होते, डॅम हॉट ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
तो काळच वेगळा होता. मला वाटते सर्व प्रथम इंडिपॉप बाबा सहेगलमुळे लोकप्रिय झाले. लोकांनी या नव्या प्रयोगाचे स्वागत केले. त्यानंतर मग एकापेक्षा एक दमदार गायक आणि सुंदर गाणी आली. ज्यांचे चित्रीकरण ही एक जमेची बाजू होती. आणि लोकांना या गाण्यांनी वेड लावले. रिमिक्स असो वा स्वतंत्र अल्बम गाणी एका वेगळ्याच प्रकारे सादर होत होती आणि नेहमीच्या एकाच बाजाच्या हिंदी चित्रपट संगीतापेक्षा लोकांनी श्रवणीय गाणी ऐकायला मिळत होती. त्यामुळे हा प्रकार खुप लवकर प्रसिध्द झाला. त्या गायकांना सुध्दा प्रसिध्दीचे वलय लाभले.
आज पुन्हा ती गाणी आठवली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
शाळेचं शेवटचं वर्ष.... येणाऱ्या कॉलेज जीवनाची रंगीत स्वप्नं आणि सोबतीला इंडिपॉप..... सगळे जुने दिवस झर्र्कन डोळ्यांसमोर तरळून गेले. वर उल्लेखलेलं प्रत्येक गाणं तेव्हा हिट होतं. एक म्युझिक चॅनेलही होतं तेव्हा ज्यावर दिवसभर हीच गाणी रिपीट होत असायची. युफोरिया, जुनून, पंकज उधासचं और आहिस्ता, पिया बसंती रे, शुभा मुद्गलचा पूर्ण अल्बम, बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या सूरत है, मुझे मिल जो जाये थोडा पैसे आणि कितीतरी अगणित गाणी..... खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. याच दरम्यान आलेलं लास केचप पण खूप लोकप्रिय झालं होतं.
धन्यवाद माम्लेदारचा पंखा.... जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल.
बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या सूरत है
बॉम्बे व्हायकिंग्सचं क्या जरा नजरों से केह दो मस्त आहे, सेलिना एकदम चिक्की माल दिसते त्यात !
अशीच लिसा रे आफरिन आफरिन मध्ये दिसते, वाळंवंटातली उष्णता तिला सहन होत नाही हे तिच्या कपड्यांवरुन समजले होते मला ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
चाँदनी रातें - शमसा कंवल ! केवळ अप्रतिम!
हे गाण खूप असायचे टीव्ही वर....खूपच मजा असायची ...
https://www.youtube.com/watch?v=yK97tjSwmmo
एक गाणे आठवते ये मेरी मुन्नी .. नक्की रेमोचेच आहे का? आणखी कुणाचे (जाणकारांनी लेखण्या परजाव्यात)
मला रेमोचे नसरूद्दीन्च्या जलवामधले देखो देखो जलवा हे गाणे आवडते (त्याच रेमोने रे सरा रे सरा हे गाणे गायले असावे -प्र्भुदेवा-माधुरीवर चित्रीत झालेले पुकार सिनेमातले.
बाकी दूर्दर्शन्वर दाखविण्यात येणारी हिंदी पॉप म्हणजे परी हूं आणि मेड इन ईंडीया ,उषा उत्थुप ने गायलेले काही अल्बम गाणी आहेत अता नेमकी आठवत नाहीत कुणाला माहीती असतील तर सांगणे (या ९० च्या दशकातच)
ओ मेरी मुन्नी, मुन्नी मुन्नी बेबे. हे रेमो फर्नांडेझचेच गाणे. रेमोचे बॉलिवुड हिट म्हनजे हम्मा हम्मा.
कोर्ट केसमध्ये गेलेले गाणे म्हणजे 'अफलातून' मधले मै हूं अफलातून (त्यात आइभैणीवर शिव्या होत्या)
शंकर महादेवनचा आवाज आहे. रेमोने गायलेलं फेमस हिंदी गाणं म्हणजे ' प्यार तो होना ही था ' चा टायटल ट्रॅक.
रेमोने गायलेलं फेमस हिंदी गाणं म्हणजे ' प्यार तो होना ही था ' चा टायटल ट्रॅक.ते जस्पिंदर नरुला सोबत म्हणलेले टैटलला होते त्यापेक्षा कुमारशानूचे श्रवणीय होते. अर्थात रेमो फर्नांडेझ काही स्पेशल टैपचेच गाणे म्हणू शके.
अहाहा...एक से एक गाणी होती ९० च्या दशकातली !
आजची गाणी काही दिवस ऐकली कि नंतर कंटाळवाणी वाटू लागतात...पण ९० च्या दशकातल्या गाण्यांची बात काही औरच...!
रात्रीच्या वेळी नीरव शांततेत FM वर हि गाणी ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योगचं...!
ओ सनम 'तेरी आँखोंकी कि कसम by लकी अली हे हि खुप आवडते गाणे
आय माय स्वारी....
ओ सनम मोहब्बत कि कसम, असे वाचावेचालतय चालतय, आक्ख्या गाण्यात ते गहरे नशीले डोळेच लक्षात राह्यलेले.
विविधभारती च्या म्युझिक मसाला कार्यक्रमात बरीच जुनी इंडीपॉप गाणी असतात.
विवा कसे काय आठवले नाही अजुन कोणाला..?
अर्रे हो! विवाची चोरी चोरी आँखोसे, हम नयें गीत सुनायें मस्तच आहेत...
याची लिंक द्या हो जरा
अमिताभ चे गाणे?? "एक रहे...
अमिताभ चे गाणे?? "एक रहे.....यप आणि अमिताभच अजुन एक.... कभी कभी चं रीमिक्स. ते पण मस्तं होतं.
हवा हवा ऐ हवा -
काला कव्वा काट खायेगा सच बोल -
नाम तेरा तेरा नाम तेरा तेरा -
सुपरहीट गाणे. अजून काही छान गाणी खाली दिलेली आहेत:
यामधील "गा रहा था" कातरवेळी / रात्री एकटे असताना ऐकण्यास खास वाटते. "बारीश का है मौसम" ही तर निव्वळ एक घटना / कथा आहे, पण ज्या प्रकारे त्याचे गाण्यामध्ये रुपांतर केलेले आहे ते उल्लेखनीय आहे.
https://www.youtube.com/watch?v=lkCVXeSnTo4
कांटा लगाSSSSSSSSSSS हाय लगा...आज्जा बंगले के पिच्छे ;)
शेफाली जरिवाला माझ्या कॉलेज मध्ये होती.. जुनी आठ्वण जागी झाली..
हायला...एसपीचे का तुम्ही?
ट का तुम्ही पण एसपीचे ?
हाय इतनी मेरी किस्मत कहा
मला वाटतं सोनु निगम,के के,मोहित चोहान, अलिशा, शान हे सर्व इंडिपॉप चे देणं आहे
१. है धुआ है धुआ -- विकास भल्ला
२. तुझे देखा सासे मुझे आती अब कम, धडकन रुक् गई निकले न दम
३. दिल क्या करे च remix
४. दूम तारा - सुचित्रा कृष्णमूर्ती
म्हणजे
कभी हा कभी ना मधली शाहरुखची नायिका च ना ?
आना मेरे प्यार को ना तुम झुटा समझो जाना
ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये
आणि ही मला वाटत शेखर कपुरची बायको होती एके काळी
एका अलबम मध्ये शेखर कपुर पण आहे तिच्याबरोबर
दाढीवाला एलिजाबेथ मि. इंडिया वाला
शेखर कपुर
अॅम आय राइट ?
बरोबर
तिचं 'जिंदगी मेरी' पण मस्त जमलय
लै भारी धागा!!!
वाचनखूण साठवतो !
अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का - काय ते गाणे , काय तो किशन कुमार , काय ती पोरे दारू पिऊन रडायची - चित्रपट पण आला नंतर गाण्यावर
वडाप च्या जीपड्यांमध्ये आजही