लेखनप्रकार (Writing Type)
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं .........
माईरी याद वो आई !.....
मेड इन इंडिया ........
आँखों में तेरा ही चेहरा ....
तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !
आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात.
एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे !
मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !!
काही तूनळी लिंका :
मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg
गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk
तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g
माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0
आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE
डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
प्रतिक्रिया
khalid didi
https://www.youtube.com/watch?v=f7-YyghdmzU
HISHAM abbas with shahbaz SUBA
https://www.youtube.com/watch?v=BuKOCWMOdOo
"नाझिया हसन" ची एक वेगळीच छाप होती डिस्को गाण्यांची "डिस्को दिवाने आणि आप जैसा कोई" हे विशेष लोकप्रिय झाले होते.
लेस्ली लुईसचे "भिगी भिगी रातों मे" आणि बिददुचे "दिल बोले बूम बूम, कभी मिलते है हम तुम" एक नंबरचं आहेत.
रागेश्वरी चे "मैने देखे है सभी रंग दुनिया के ...,
,सुचित्रा कृष्णमुर्ती- "डोले डोले"
स्टाईल भाई नावाचा प्रकारही होता (आजच्या हनीसिंगचा तो आद्य अवतार.)
@ भाते साहेब ते 'अपाचे इंडिअन' आमचे कडे हायेत(जवळ जवळ सगळणी),
क्रमशः
लिहायला थोडं ऑड वाटतय पण श्री अन्नू मलिकजींनी गायलेलं 'धुआ धुआ हो रहा है समा कही तो है आग लगी' हे गाणं.
सोनूचं तुझे लगे ना नजरीया ओढले चुनरिया
आरयन भाऊंचं आखोमे तेरा ही चेहरा आणि ये सदा कहती क्या सुन तो मेरी जाना
बाबा सहगल्चं आजा मेरी गाडी मे बैठ जा
इन्स्टंट कर्मा - दील क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाये, बाहोमे चले आ
अभिजीत - कभी यादो मे आओ कभी खाबो मे आओ
अजुन आठवतील तसे देतोच.
इंडिपॉपच्या जमान्यात आशाताईंनी सुध्दा काही गाणी गायली होती. पडदे में रहने दो या गाण्याचे रिमिक्स आणि रात शबनमी भिगी चांदनी......... जानम समझा करो ही दोन आठवतात.
'दिल पे नाराज था हमे बडा सनम, पर क्या बतलायें हम' हे पण छान होत आशाजींचं ....!
एका गान्यात 'सुनाली बेन्ड्रे' होती. मॅन्क्वीनचे रुपांतर होते तिच्यात. बहुतेक जानम समझा करो.
दिल ले गयी कूडी... बघुन आम्ही तरुण झालो...
:)
- शरभ
Shyla Lopez. Khatranak.
Bahome chale aao and hum bewafa hargiz na the.
लोपेझ बाई ....
लै खतरनाक प्रकरण बघा .....
+१००
जबरदस्त धागा. बरीच नवीन गाणी समजली.
रिमिक्सेस फारसे आवडत नसून सुद्धा "बॉम्बे व्हायकिंग" ची गाणी त्यांच्या व्हिडिओज मुळे जास्त आवडायची. खासकरून "क्या सुरत हे" आणि "मोना रे" (अतुल परचुरे, व्रजेश हिरजी आणि यश टाँक यांची एका मुलीसाठी चढाओढ.....तीही सबटायटल्स मधून. अफलातून व्हिडियो होता.)
"रुप तेरा मस्ताना" रिमिक्स चा व्हिडियो सुद्धा भारी होता.
आज बर्याच वर्षांनंतर हे सगळं परत परत बघताना आणि ऐकताना खूप भारी वाटतं.
जबरदस्त नॉस्टॅलजिया.....
शंकर महादेवनचे 'सामने ये कौन आया' एकदम सही..
रेट्रो लूक्स, लॅम्ब्रेटा स्कुटर्स लैच भारी राव ...
हरिहरन आणि लेस्ली चा कलोनिअयन कझन्स हा नाद्याबाद अल्बम.
पण यातलं कृष्णा नि बेग ने आणि Its’ gonna be alright या दोघांचेच विडिओ आले . ( बहुतेक)
रच्याकने , , हरिहरन चा ' काश ' आमचा जीव कि प्राण अल्बम आहे !
गाणी सगळी इंडिपॉप म्हणता येणार नाहीत , गझल्स होत्या- पण आम्ही तर बुआ पंखे झालो तेव्हापासुन 'हरी 'चे !
इथे बराच वेळ बॉम्बे व्हायकिंग चा उल्लेख होत नसल्याने आश्रय वाटत होते .
खास आठवण यायचे कारण म्हणजे मध्ये एका दारू पार्टीत नीरज श्रीधर - बॉम्बे व्हायकिंग च संतापाक आणि भारतीय चेहरा , याची ओळख झाली आणि थोड्या गप्पा झाल्या . सध्याही तो गात असतो आणि त्याचा एक स्टुडिओ आहे .
एकेकाळचा त्याची लोकप्रियता बघता हा बराच शांत माणूस वाटलं . शेवटी त्याला इंडी पॉप बद्दल आणि बॉम्बे विकिंग्स बद्दल छेडले असता तो म्हणाला कि या घोस्टनची ऐक वेळ होती ... आणि ती सर्व काही घेऊन गेली ..आणि हे मार्केट बॉलीवूड पुढे टिकले नाही ..
"बजा के बाजा, बना मै राजा, मंजुला" या बाबा सैगलच्या गाण्याचा व्हिडिओ आहे का कोणाकडे?
https://www.youtube.com/watch?v=wwdLg2jhi3Q
हा हा...हेच्च
काय माप राव आमच्या कॉलेजच्या सोनेरी आठवणी जागवल्या.....धन्स...लय भारी
अजूनही आमच्या मोबाईल मध्ये हि सर्व टवटवीत गाणी आहेत . बादवे आम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात आमच्या आवडत्या लकी अलीचे , आमचे आवडते "ओ सनम " हे गाणे गाऊन घसा साफ करून घेतला होता .
क्या बात...क्या बात! मस्त आठवणी जाग्या झाल्या.
हजारो ख्वाइशें ऐसी मधलं 'बावरां मन देखने चला एक सपना' हे एक अफाट गाणं. इंडीपॉप नसलं तरी या यादीतलंच वाटतंय.
स्वानंद किरकीरे आणि शुभा मुद्गल दोघांनी पण गायलंय. तरी मला शुभा वालं व्हर्जन जास्त आवडतं. संगीत बहुतेक शांतनू मोईत्राचं.
मागे स्वानंदला बोलताना ऐकलं, की अजुनही या गाण्याबद्दल प्रतिक्रिया येतात. मला तरी अगदीच सहाजिक वाटलं ते.
धम्माल धागा ... त्याकाळात पंकज उदास, जगजीत सिंह, आशा ताई यांची गझल सॉंग्स पण छान यायची.
त्यातली हि गझल जगजीत आणि लताजीच्या आवाजातली ... कही कही से हर चेहरा ऑल टाइम आवडीची आहे. तसेच
जब सामने तो तुम आ जाते हो
मुझे खबर थी वो मेरा नहीं पराया था
चुपके चुपके
और आहिस्ता कीजिये बातें
परत इला अरुण हिचे वोट फॉर घागरा, निगोड़ी कैसी जवानी, बिछुड़ा, सुनीताचे परी हूँ मैं, आशा ताईचे ओ मेरे सोना रे, जानम समझा करो, अलकाचे खोया खोया चाँद, सोनूचे अब मुझे रात दिन, अदनानची लिफ्ट करा दे, भीगी भीगी रातों मैं, नैन से नैनों को मिला लिस्ट अनलिमिटेड आहे.
' नशा ही नशा है' - सुखविंदर सिंग बेस्ट
आनंद शिंदे मिलिंद शिंदेची गाणी इंडीपॉपमध्ये न घेतल्याबद्दल जाहीर निषेध.
बादवे रेतिवाला नवरा, वाट बघतय रिक्शावाला असली गाणी कोणत्या टाईपात येतात? लोकगीते म्हणून सांगू नका.
बहुतेक 'चिंधीपॉप' मधे येत असतील... =))
आरारारारारा बाजारच उटीवला भावानं =)) =))
कुणाच्याही भावना दुखावल्या आसतील तर आधीच माफी मागतो बावा !!! ;)
चिंधीपॉप. खत्तरा शब्द.
आवड्या.
पण हि चिंधीगिरी वडाप, कालीपिली आणि रिक्षावाल्याना लै आवडते.
"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....
"Sochtaa hu us kaa dil"he babul supriyo che gaane sarv visarle ki ky....varil Dhagya mde & Comments mde ullekh kelele sarvech gaani agdich javal mhanje khupech javal vaatnaari ahet....Dhaga Lihnaryala Salaaam....
Band Of Boys che "Meri Neend Ud Gayi Hii...& Altaaf Raja chi pn athavn theva.....bhavanno...."Tum Toh Thehre Pardesi..., Toh Ghungaru Bandh Liye & Apna Usse Banaya he pn changle gaane hote
ले गयी दिल मेरा मंचली
खलीवली खलीवली खलीवली
'एक से बढकर एक' - सूत्र संचालन 'कार्तिकी राणे'
हा. त्यात मुकुल देव होता. असे टॉप टेन प्रोग्राम्स हेच इंडीपॉपचे लाँचपॅड होते.
वन अल्बम वंडर ह्या कॅटेगरीत गणेश हेगडे राहिला. त्याचा 'मै दिवाना' वगैरे गाण्यावरचा डान्स बरा होता. शूटिंग आणि प्रेझेंटेशनला पैकी मार्क.
रागेश्वरीचा 'हा ये दुनिया बडी रंगीली" वन साँग वंडर होता.
गणेश आचार्यचा पण एक अल्बम होता बहुधा.
कमाल खानचा पण ओ ओ ओ जानेजा हे अल्बममधलेच हिट होते, नंतर पिक्चरात आले.
काही काळ कॅनेडिअन्/ब्रिटिश पंजाबी रेगा/रॅप/पॉप वाल्यानी डोके उठवले होते.
हार्ड कौरचे 'एक गलासी' आधी बरे वाटले, नंतर तिचे उचके चाळे आणि जॉनी गद्दार मधले गाणे बघुन ऐकवत नाही.
रागेश्वरी चे 'मेरे मेहबूब चल और कही' लैच सेंटीमेंटल होते राव...
क्लायमॅक्स मस्तच ....
Pankaj Sarawgi
Pyar Hai Tumse...
निगोडी कैसी जवानी है झालयं का वर?
...तिचे उचके चाळे...:)) -शरभ
स्टिरिओ नेशन चे 'डोन्ट ब्रेक माय हार्ट' राहिले की ....
'म्युझिक एशिया चॅनल'वर न चुकता रोज सकाळी लागायचे
बाबोव ......
'ऐका दाजीबा' राह्यलंय की जणू...
सोनू निगमचे : https://www.youtube.com/watch?v=OVI6Uzh5Las - तूऽऽ
https://www.youtube.com/watch?v=J8zlroVMYeM : दिवाना तेरा.
अमिताभ मियांचे : https://www.youtube.com/watch?v=P9J0-Al3odo - एक रहेन ईर
शुभा मुद्गल : https://www.youtube.com/watch?v=CsN9MAfsGIM&list=PL8FAgeC0DYXDWl7DxPryTbsut4KJA4NBM - अब के सावन ऐसे बरसे.
आशा भोसले : https://www.youtube.com/watch?v=3JnXgAtt34M जानम समझाकरो
https://www.youtube.com/watch?v=k5JKlkHWxGg : केसरिया है रूप म्हारो.
आणि लई म्हत्वाचे : https://www.youtube.com/watch?v=smDKvkkoWpM रूप तेरा मस्ताना रिमिक्स ..
कोई ख्वाब में रोज आता है - अलका याग्निक- https://www.youtube.com/watch?v=1HoNaEO8B9w
दिल था यही अभी अभी - अलका याग्निक - https://www.youtube.com/watch?v=5X_dKdMFJQA
मुझे मोहोब्बत सी हो गायी है- रूपकुमार राठोड - https://www.youtube.com/watch?v=tzCNtjGFSVQ
हू हल्ला हू - अनयडा - https://www.youtube.com/watch?v=Pkr61XiYt64
चांदी जैसा रंग है तेरा - पंकज उधास - https://www.youtube.com/watch?v=2FEpust-rXw
मेहेंदी की रात आयी - https://www.youtube.com/watch?v=OVZRS8oWMN8
इश्क मेरा तडपावे - सुखबीर - https://www.youtube.com/watch?v=AKmq8Xqr03A
आणि हे एक "संस्मरणीय" गीत
हंगामा हंगामा संजय रैना - https://www.youtube.com/watch?v=xB-r-X_xTF8
बहुतेक आवडती गाणी वर आलीत, अजून काही,
आजा सोणेया, घर आजा सोणेया, शाझिया मंझूर
http://youtu.be/JuTnKaCwBGY
पहले तो कभी कभी गम था, अल्ताफ राजाचं हे एकमात्र आवडणारं गाणं,
http://youtu.be/TfELfvs92Gg
कभी तो नजर मिलाओ, भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना,
मुझको भी तो लिफ्ट करा दे, अदनान सामी
मेरी मर्जी आणि इतर, देवांग पटेल,
ऑफिसमध्ये ऐ राजू, सारखं वाजवून वात आणला होता लोकांनी, मग कुणालाही राजू बनवलं जायचं :)
http://youtu.be/Zh9CuOpQqLU
हे तर अहाहा, सुंदर !!
http://youtu.be/EbPVTxLiKm8
व्वा मस्त धागा!!! एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या :) यात माझे पण दोन पैसे
याच काळात हरभजन मान चे दोन गाणे खूप गाजले
1) लाली लाल दुपट्टे वाली
2) कुडी कट के कालजा ले गायी (ओये होये नावाचा अल्बम होता.)
आणि शुभा मुद्गलचं सीखो ना नैनो कि भाषा पिया पण फार आवडायचं
आणि हो धाग्यासाठी धन्यवाद!!!! वा.खू.सा.आ.
मजा आली. बहुतेक सर्वच अल्बम मधील नायिका एकाचवेळी सुंदर, निरागस आणि ...... कशा काय बुवा दिसू शकतात ? तो जमानाच वेगळा होता काय ? की आमची नजरच वेगळी होती ? :)
अवांतर : आमचा जमाना, तुमचा जमाना म्हणजे वय झाल्याची खुण आहे असे इथे कोणीतरी म्हटले होते बुवा.
व्हिडिओ आहे का? तुनळीवर बराच शोधला, पण सापडत नाहीये.
त्यातली सगळ्यात कल्ला लाइन