Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 220085
प्रतिक्रिया 460

प्रतिक्रिया

बरं मग काय ठरले? १. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही? २. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही? आणि सर्वात महत्वाचे-- नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

१. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही? नाही. २. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? आहे. हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही? योग्य नाही. आणि सर्वात महत्वाचे-- नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही? आहे. ऐकिवात आलेल्या माहितीनुसार १८३० मध्ये कोणतातरी इंग्रज सरकारने कायदा केला अन त्याद्वारे नरबळीवर बंदी घातली. तेव्हां नारळ उपयोगात येऊ लागले ;)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही? आहे. ऐकिवात आलेल्या माहितीनुसार १८३० मध्ये कोणतातरी इंग्रज सरकारने कायदा केला अन त्याद्वारे नरबळीवर बंदी घातली. तेव्हां नारळ उपयोगात येऊ लागले ;)
म्हणजे नारळ फोडणे हे बळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप ही ऐकीव माहिती आहे. मी सुरवातीपासूनच हेच म्हणत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या ज्या श्रुतीस्मृती म्हणतो त्या ऐकिव माहितीच नाही का? मुळात सगळी कर्मकांडे ऐकीवच ;)

खरा सुधारक कर्मकांडातील फोलपणा लोकांना समजावून सांगेल. एखाद्या कर्मकांडाला पर्यायी आधुनिक कर्मकांड तयार करुन किंवा असलेल्या कर्मकांडाला आधुनिकतेचा गिलावा देऊन स्वतःच्या नावाने "सुधारक" असा डंका पिटणार नाही. :)

In reply to by सतिश गावडे

समाजसुधारकांना सदर गोष्ट अत्यंत चपखलपणे लागू पडते.

In reply to by सतिश गावडे

मला तसे वाटत नाही. अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो. दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे ही समूह जीवनातील कर्मकांडच आहेत. अनेक प्रथांच कर्मकांडात रुपांतर होते.कर्मकांडच नको ही गोष्ट मानवी स्वास्थ्यासाठी मानवणारी नाही.नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात

In reply to by प्रकाश घाटपांडे

@

अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.

››› +++१११ धर्मसुधारणा आणी धर्मनिर्मूलन यातला फरक त्यातल्या उपयोगितेसह जोपर्यंत जांच्या लक्षात येणार नाही. तोपर्यंत वरील मत त्यांच्याकडून स्विकारलच जाणार नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला तसे वाटत नाही. अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.
प्रत्येक वेळी निरर्थक किंवा हानीकारक कर्मकांडांना पर्याय द्यावा लागतोच असे नाही. अशी कर्मकांडे पर्याय न देताही नष्ट होऊ शकतात. उदा. जानवे परीधान करणे, कानावर जानवे अडकविणे इ. निरर्थक कर्मांना कोणताही पर्याय न देता सुद्धा ही कर्मे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूजेतील अनावश्यक, निरर्थक भाग अशाच तर्‍हेने कोणताही पर्याय न देतासुद्धा हळूहळू नष्ट होणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एग्झॅक्टली!! तर, पूजा-पाठ-कर्मकांड ह्याप्रकारात "संपूर्ण फालतूगिरी ते संपूर्ण कर्मठपणे आवश्यकच" ह्या दोन प्रचंड दूर अंतरावर असणार्‍या टोकांच्या मधे बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात. प्रत्येकाला त्याचे वागणे तारतम्याला धरुनच आहे असे वाटते. त्यामुळे आवश्यक-अनावश्यक प्रत्येक व्यक्तिच्या स्वत:च्या तारतम्यानुसार ठरते. अशा परिस्थितीत धर्मसुधारणा म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा कराव्या ह्याबद्दल दोन व्यक्तिंमधे मतभेद असणे शक्य आहे ना?

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही दिलेल्या दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे या गोष्टींना पैसे पडत नाहीत तसेच विशेष वेळ वाया जात नाही. मुळात ज्याच्याकडे वेळ आणि पैसा असेल त्याने इतरांना त्रास होणार नसेल अशा पद्धतीने व्यक्तिगत आणि सामाजिक हितास बाधा न आणणारी कर्मकांडे करण्यास कुणाचाच आक्षेप नसावा. ती त्या व्यक्तीची व्यक्तिगत बाब म्हणता येईल. मात्र काही व्यक्ती जेव्हा जुन्या कर्मकांडांना आधुनिक "सुधारणांचा" गिलावा चढवून व्यवसाय करतात आणि वरुन स्वतःस "धर्मसुधारक" म्हणवून घेतात ते खटकते.

नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात खर आहे तुमचे. पण नरबळी द्यायच्या ऐवजी, नारळाचा बळी दिला तर तो त्या 'नारळा'वर अन्याय नाही का होत?

In reply to by प्रसाद_१९८२

तुलनेने कमी. तसे शेवटी जीवो जीवस्य जीवनम चक्र हे निसर्गचक्रच आहे. सांगायचा मुद्दा असा की लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

@लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत. › +१ . रैट्ट. हाच अनुभव आहे.. त्यासाठी धर्मसुधारणावादीच रहावं लागतं. मग ते कुणाला कित्तीही गिलावेकार का वाटे ना? त्यांच्याही आकलनाची मर्यादा लक्षात ठेवायला हवी मला!

In reply to by पैसा

म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला?? मी भांडणं उकरुन काढतो मिपावर?? आणि तुम्ही कंपूबाजी करता ते काय असतं मग...?? कोणालाही काही बोलतांना जरा जपून बोलावे माणसाने. लक्षात येईल लवकर ते बरं. (-जमलं काय? ;))

In reply to by संदीप डांगे

जमतंय, जमतंय! आता भांडायला बकरा शोध. आणि ५०० झाल्यावरच थांब. मी चालले वॉशिंग मशिन लावायला. लोकांची धुणी धुण्यापेक्षा आपल्या घरची धुते! =))

In reply to by पैसा

(नाही तरी कूम्पणाबाहेरून आलेल्या पाल्याचे काय करायचे हा प्र्शन्च होता.) बकरा ज्याचा त्याने आणावा ( पक्षी शोधावा). पाला निवडून मिळणार नाही,आहे तसा आहे त्या स्थीतीत स्वीकारावा,नारळाची चौकशी करू नये,काही भाज्यांची रोपे आहेत त्यांचा पाला/भाजी मागू नये,पिशवी आपली आपण आणावी,प्लास्तीक पिशवी मिळणार नाही बाकी सूचना नंतर. नाखु पाचशेची सुपारीवाला संघाचा सभासद

In reply to by पैसा

आता भांडायला बकरा शोध.
खरा बकरा की मातीचा बकरा? आणि मशीन आणल्यावर त्याच्यासमोर नारळ फोडला होता का?

"पुरुषमेध" प्राचीन भारतात होता. व सरळ नरबळी त्यात होत असे. यात पण इतकं आश्चर्य वाटण्यासारख काय आहे ? प्रत्येक प्राचीन संस्कृतीत नरबळी होताच. रोमनांमध्ये होता ग्रीक मध्ये होता सर्वत्र जगात सर्वत्र होता. आपण वेगळे व श्रेष्ठ आहोत हा गंड असेल तरच अडचण आहे. भारतरत्न पांडुरंग वामन काणें च्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रात सर्व सखोल विश्लेषणासहीत मुळ श्लोकासहीत उपलब्ध आहे. त्या पुरुषमेध चा संबंध नारळ फोडण्याच्या प्रतिकाशी आहे की नाही हे मात्र माहीत नाही.

In reply to by मारवा

अमुक एक नियम जर काही कारणाने पाळणे वा अमुक एक विधी थांबवायची वा बदलायची असेल तर. (पुर्वीच्या काळी हे अस्तित्वात होते हे मान्य करुन कारण त्याशिवाय पर्याय नव्हता ) तर पुर्वी हा नियम योग्य होता यज्ञ विधी इ. योग्य होते. मात्र सध्या कलियुग आहे व कलियुगात हे वर्ज्य आहे. अशी एक थीम वापरुन कलिवर्ज्याच्या आधारावर पुर्वीच्या कायद्यात "अ‍ॅमेन्डमेंट्स" केल्या जात असत. वरील पुरुषमेध अश्वमेध इ. अडचणीचे यज्ञ आता कलियुगात वर्ज्य आहेत. असे प्रतिपादन नंतरच्या धर्मग्रंथांनी केले. वरील संदर्भ असा आहे. जुने नियम- अतिप्राचीन तैत्तीरीय ब्राह्मण एका विशिष्ट यज्ञात पुरुषाचा बळी कसा द्यावा कोणत्या लक्षणांचा पुरुष निवडावा इ.चे या प्रोसीजरचे विस्ताराने विवरण करते. वाजसनेयी संहीतेत तैत्तिरीय प्रमाणेच याचे उल्लेख येतात. त्यानुसार वैश्याचा बळी मारुत ला, ब्राह्मण पुरुषाचा बळी ब्रह्मा या देवतेला इ. यात अकरा बलीवेंदींवर अकरा प्राणी बळी दिले जात इ. इ.. या यज्ञाच्या समाप्तीनंतर यजमान वनात संन्यासी बनुन निघुन जात असे. हा एक भाग. तसेच दुसरा एक मोठा महत्वपुर्ण यज्ञ होता अश्वमेध, हा एक अनेक गुंतागुंतीच्या विधींचा समावेश असलेला. अतीविचीत्र विधी रीती समाविष्ट असलेला अतीप्राचीन यज्ञ होता .इ.पु. २ ते अगदी १८ व्या शतकातल्या जयसिंग अशा अनेक ऐतिहासीक राजांनीही हा यज्ञ केल्याची नोंद आहे असे काणे म्हणतात. आणि एक असाच राजसुय नावाचा यज्ञ होता हा अतीदीर्घकाळ दोन वर्षांपर्यंतही चालत असे. कलिंग सम्राट खारवेला तसेच नयनिका राणीने हा यज्ञ केल्याची नोंद असलेले ऐतिहासिक शिलालेख आढळतात. कलिवर्ज्य- याने वरील तीनही प्रकारच्या यज्ञांवर बंदी घातली. व पुरुषबळीचा, अश्वमेध आणि राजसुय हे यज्ञ कलियुगात करण्यास मनाई केली. या तिघांचा एकेक कलिवर्ज्य नियम आहे. कलिवर्ज्याचा उल्लेख असलेले सर्व ग्रंथ ऐतिहासिक दृष्ट्या अलीकडच्या काळातीलच आहेत.

In reply to by मारवा

ही नयनिका म्हणजे नागनिका. ही प्रथम सातकर्णीची राणी. सिमुख सातवाहनाची सून. ह्यांनी केलेल्या अनेक यज्ञांची नोंद नाणेघाटातील प्रतिमालेखात आहेत. हयात एक राजसूय आणि दोन अश्वमेधांची नोंद आहे. खारवेलाचा हाथीगुंफ़ेतील प्रस्तरलेख बराचकाळ पावेतो अज्ञात होता. ह्यानेच दक्षिणपथाधिपतीला (सातवाहन) ह्यांना सीमेवर रोखल्याची नोंद मिळते.

संदीप डांगे,
>> अशा परिस्थितीत धर्मसुधारणा म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा कराव्या ह्याबद्दल दोन व्यक्तिंमधे मतभेद >> असणे शक्य आहे ना?
अगदी बरोबर बोललात बघा. म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही. कर्मकांड हे श्रद्धा व/वा भक्तिपूर्वक करायचं असतं. अन्यथा नुसती कसरत होते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हे धर्मशास्त्र म्हणजे काय? धर्मशास्त्राचा प्रमाण ग्रंथ कुठला मानावा?

In reply to by प्रचेतस

प्रचेतस, वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या उपसानांसाठी वेगवेगळी शास्त्रे लिहिण्यात आली. त्यास ढोबळमानाने स्मृती म्हणता येईल. उपासक जी उपासनापूजाप्रार्थना करता तिला स्मृतीचा आधार असावा अशी कल्पना आहे. ते जमंत नसल्यास सरळ उपासना टाळावी. उगीच मनमानी करू नये अशी कल्पना आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्मृतीही अनेक आहेत मग कोणती स्मृती प्रमाण मानावी?

In reply to by प्रचेतस

प्रचेतस, तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता. जर माहित नसेल तर तत्ज्ञांना विचारावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जे पाहिजे तेच योग्य मानायचे असेल तर मग धर्माशास्त्राला काय अर्थ राहिला?

In reply to by प्रचेतस

तुम्ही म्हणताय
जे पाहिजे तेच योग्य मानायचे असेल तर मग धर्माशास्त्राला काय अर्थ राहिला?
पैलवान म्हणताय ते असे. तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता. तुम्ही पाहीजे ती स्मृती म्हणजे एका विषयावर दोन वेगवेगळी असलेल्या दोन स्मृती असतील वा तीन वेगवेगळी मते असलेल्या तीन स्मृती असतील तर तुम्ही त्या दोन वा तीन पैकी कुठलीही एक योग्य मानुन चालु शकता असे ते म्हणत आहेत. पण स्मृतीच मानायची आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर जायला त्यांनी धर्माने परवानगी दिलेली नाही. आता त्या दोन स्मृतीच्याच दोन तरतुदी परस्परविरोधी असतील तर तुम्ही काहीही घ्या निवडा चालेल. ते धर्मसंमतच असेल. आता हेच इंटरेस्टींग आहे. सध्याच्या गायीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात मुळ नियमांना पाळल तरी चालेल गायीचा बळी द्या उत्तरकालीन कलिवर्ज्याचे धर्मग्रंथ आधारभुत मानले तरी चालेल गायीचा बळी देऊ नका. आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे.

In reply to by मारवा

@आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे. ››› हिच तर मजा आहे शास्त्रा~धार संमंत धर्मसुधारणेची. उदा~ @चोरी करावी@ यालाही शास्त्रात आधार. @चोरी करू नये. @ यालाही! मग ते शास्त्र न रहाता फक्त परस्पर विरोधी विचारांचा संग्रह होऊन बसतं. सावकर शास्त्राधाराला एरंडाचं गुह्राळ म्हणत असत, ते उगीच नाही! म्हणूनच माझ्यासारखा माणूस धर्मातल्या चूकिच्या गोष्टी काढताना/बदलताना/त्यागताना , त्या गोष्टी चूक, अन्याय्य आहेत, असं म्हणून त्या आंम्ही स्वबुद्धीनी आणी केवळ नितिमत्तेच्या आधारावर बदलतो आहोत. असं म्हणून बदलल्या, काढल्या पाहिजेत. आणी त्यालाच खरीखुरी धर्मसुधारणा म्हटलं पाहिजे असा आग्रह धरतो. आणी म्हणूनच मला, शास्त्राचा आधार देऊन महिलांनाही धर्मातले कोणतेही आधिकार देणारा, किंवा अन्य कोणतिही सुधारणा आणणारा मला दांभिक वाटतो. (संदर्भ-महिलांना अंत्येष्टी क्रियेचा दिला जाणारा कथीत शास्त्राधार! व असे अनेक. ) मग त्या पुरोहिताच्या मनातली तसं करण्याची इच्छा किति का निर्मळ असे ना! या पद्धतिनी केलेल्या सुधारणेला व्यवहारात काहिही अर्थ उरत नाही.. कारण , आज शास्त्राचा आधार देऊन जी सुधारणा घडवली जाते, तीच उद्या गरज पडल्यावर परत विरूद्ध बाजुनी आधार देऊन काढूनंही घेतली जाऊ शकते. आणी पुन्हा २पावलं पुढं आलेला समाज परतीच्या वाटेला मागे जाऊ शकतो. यापेक्षा स्वबुद्धिनी (म्हणजेच धर्माद्न्या न जुमानता) केलेला बदल हा जास्तीत जास्त शाश्वत रहाण्याची शक्यता असते. म्हणून मला तीच वाट वंद्य आणी आचरणीय वाटते. कारण , कथीत धर्मशास्त्र मागे राहिलं तरी हरकत नाही, पण समाज पुढे गेलाच पाहीजे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मबंधजी मी तुम्हाला समजु शकलेलो नाही. तुम्ही एकीकडे इतके भेदक विश्लेषण एखाद्या कडव्या धर्मसुधारकासारखे करता. दुसरीकडे (माफ करा कृपया व्यक्तिगत घेऊ नये ) तुम्ही स्वतः माझ्या माहीतीप्रमाणे पुरोहीत आहात. तर हा अंतर्विरोध तुम्ही कसा मॅनेज करता. मी खरच तुम्हाला ओऴखु शकलेलो नाही. जर तुम्ही खरेच असे विचार बाळगता तर तुम्ही एकीकडे त्याच शोषण व्यवस्थेचा एक भाग म्हणुन एक सक्रीय घटक म्हणुन काम का करता ? हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही प्रच्छ्न बौध्द्द सारखे प्रच्छन्न सुधारक वगैरे आहात का ? एक गावठी उदाहरण घेतो समजा एका गावात नविन ऑफसेट मशीन्स आल्यानंतर खिळाप्रेस चे जुने ३ छापखाने राहीलेत. बाकी सर्व ऑफसेट मध्ये कनव्हर्ट झाले. पण गावातील माधवराव हे जुने गृहस्थ ( आठवतय का ग मालती ? आपल्या लग्नाची पत्रिका बाबांनी तो पत्रिकेचा गठ्ठा आणायला मलाच " आर्यभुषण" मध्ये पाठवलेल होत. त्यातली एक ठेऊन घेतली होती व मी तुला पोस्टाने पाठव्लेली) तर असे काही जे माधवराव शिल्लक आहेत शेवटचे थोडेफार त्यांची एक खिळाप्रेस ची गर ज आहे त्यांना खिळाप्रेस शी एक इमोशनल अ‍ॅटेचमेंट आहे. तर तुम्ही ती पुर्तता करणारे खिळाप्रेस चे शेवटचे शिलेदार आहात का ? म्हणजे माझा एक आपला अंदाज तुम्ही का सक्रीय सहभाग देताय मग ? तुमच अस तर लॉजिक नाही ना की मी थांबलो तर काय फरक पडेल लोक दुसरा पुरोहीत बघतील. ते दारुबंदी वेळेस हा युक्तीवाद असतो. तर तुम्ही एक गुढ आणि कॉम्प्लेक्स व्यक्ती आहात माझ्यापुरते तरी. मला तुम्हाला समजुन घेण्यात मदत करावी. अजुन एक स्पेसीफीक प्रश्न एकुण समजा ४० रुढी आहेत तर त्यापैकी जरी ३३ वाइट असल्या तरी उरलेल्या ७ फार चांगल्या आहेत व त्या ७ चे जतन च नव्हे संवर्धनही होणे अगत्याचे आहे असे तर तुमचे मत नाही ? म्हणजे तुम्ही उरलेल्या ७ आवश्यक चांगल्या योग्य न्याय्य रुढींच्या संवर्धनासाठी हे काम करत आहात ? काय आहे तुमची भुमिका नेमकी ? आपला विनम्र मारवा

In reply to by मारवा

आत्मबंधबुवांविषयी एवढा विचार नका करु मारवाजी, त्यांनी त्यांच्या खिळाप्रेसचे रुपांतर डायकट आणि क्रेझिंग मशीनमध्ये केलेय. चांगला चालुय धंदा त्यांचा. कधी कधी ऑफसेट वाल्यापेक्षा कमी रिस्क आणि भांडवलावर जास्त नफा कमवतात ते. . (गुर्जी, हे अगम्य शब्द वाटले तरी तुमच्या विषयी काही वाईट साईट नाहीये बरका. तुमच्या फ्लेक्सिबिलिटीचे कौतुकच आहे. नायतर येताल दुदुदुदुदुद ल्लुल्लुल्लुलु करत)

In reply to by गामा पैलवान

उदाहरणार्थ हा स्त्रीच्या पुनर्विवाहा संदर्भातील घोळ बघा. स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार. कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो. आता नेमके काय करावे ? मूळात अजुन एक मुद्दा याहुन महत्वाचा आहे तो असा की समजा वरील प्रमाणे विसंगती नाही हे मान्यही केले वा कालानुक्रमे बदल नाहीत हे ही मान्य केले. एक धर्मशास्त्रांतर्गतच एक सुसंगती ही दाखवुन दिली तरीही त्यांचा जर निकाल हा असेल की पुनर्विवाहाचा अधिकार अमान्यच आहे पति कसाही असला तरीही. तर मुळात हा नियम केवळ धर्मग्रंथात आहे व सुसंगत आहे म्हणुन तो योग्य व न्याय्य आहेच असे का मानावे ? म्हणजे असे असेलच असे धरुन कुठल्या नैतिकतेच्या कसोटीवर मान्य करावे. अजुन एक सध्या खाण्यापिण्याचे नियम फारच कडक आहेत या संदर्भात हा एक नियम बघा जुना नियम- गौतम व विष्णुधर्मसुत्र व याज्ञवल्क्य आणि पाराशर स्मृती नुसार ब्राह्मण चार प्रकारच्या शुद्रांच्या घरी अन्न ग्रहण करु शकत असे. ते असे होते एक त्याचा दास, त्याचा गुराखी, त्याचा कुलमित्र ( हेरीडिशीयरी फ़ॅमिली फ़्रेंड हा शब्द काणे वापरतात) आणि ब्राह्मणाचे शेत बटाईने राखणारा सालदार (हिस्सा घेऊन हा मुद्दा महत्वाचा मराठी प्रतिशब्द कोणताही असो) जरी यापैकी हे चारी शुद्रवर्णीय असले तरी यानुसार ब्राह्मणाला यांच्या केवळ यांच्या घरी यांच्या हातचे अन्न खाण्याची परवानगी दिलेली होती. शिवाय यात पाचवा ब्राह्मणाचा न्हावी जो असेल त्यालाही काही धर्मग्रंथ यात घेत. म्हणजे त्याच्या शुद्र न्हाव्याकडेही ब्राह्मण जेऊ शकत असे. कलिवर्ज्य- वरील चारही व पाचव्या प्रकारच्या शुद्रा कडे ब्राह्मणाने भोजन करण्याच्या परवानगीला पुर्णपणे नाकारतो. कुठल्याही परीस्थीतीत शुद्राकडे भोजन करु नये असा प्रतिबंध घालतो. आता केवळ धर्मग्रंथात आहे म्हणुन शुद्राकडे जेवु नये वा ज्याला शुद्र मानतो तो त्या साठी पात्र नाही हे कुठल्या नैतिक निकषावर ठरवावे ? सुसंगती नाही त्यामागील न्यायिक संकल्पना मला अधिक महत्वाची वाटते. सुसंगति तर मिळुनही जाईल. त्यात काही विशेष नाही.

In reply to by मारवा

कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो. आता नेमके काय करावे ?
असल्य स्मृती, ग्रंथात काय लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करून विधवा/घटस्फोटित महिलेने तारतम्य वापरून आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. असल्या ग्रंथांवर आधारीत निर्णय घ्यायचा असेल तर कुराणावर आधारीत वर्तणूक ठेवणार्‍या मुस्लिमांमध्ये व आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही.
कलिवर्ज्य- वरील चारही व पाचव्या प्रकारच्या शुद्रा कडे ब्राह्मणाने भोजन करण्याच्या परवानगीला पुर्णपणे नाकारतो. कुठल्याही परीस्थीतीत शुद्राकडे भोजन करु नये असा प्रतिबंध घालतो.
तद्दन मूर्खपणा

In reply to by श्रीगुरुजी

मात्र जी व्यक्ती हिंदु आहे धार्मिक आहे. व धर्मग्रंथांवर व त्यांच्या अधिकारावर श्रद्धा ठेवणारी आहे. व आपल्या दैनंदिन कृत्यांचा नैतिक आधार म्हणुन या ग्रंथांवर व त्यातील शिकवणीवर गायडन्स वर अवलंबुन आहे. त्याचे आग्रहाने जमेल तितके आचरण करण्याबाबत आग्रही आहे. जिथे पुर्ण आचरण जमत नाही तिथे गिल्टी फिल करणारी आहे. अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती जर म्हणेल की मी हे असे असे वागतो याचे कारण माझा धर्म व त्याचा ग्रंथ मला असे वागण्याची परवानगी देतो वा त्यात अशी तरतुद आहे. मग हे केवळ तुम्ही म्हणता तद्द्दन मुर्खपणा म्हणून त्याने का मानावे ? तो जर या वागण्याला वरील धर्मग्रंथांचे समर्थन देत असेल तर मग काय करावे ? हे इतर धर्माविषयीही अर्थातच लागु आहे.

In reply to by मारवा

अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती जर म्हणेल की मी हे असे असे वागतो याचे कारण माझा धर्म व त्याचा ग्रंथ मला असे वागण्याची परवानगी देतो वा त्यात अशी तरतुद आहे. मग हे केवळ तुम्ही म्हणता तद्द्दन मुर्खपणा म्हणून त्याने का मानावे ? तो जर या वागण्याला वरील धर्मग्रंथांचे समर्थन देत असेल तर मग काय करावे ?
'तद्दन मूर्खपणा' हे माझे वैयक्तिक मत आहे. परदेशात माझ्या बरोबर अपार्टमेंटमध्ये एक हैद्राबादचा मुस्लिम मुलगा होता. तो फक्त शुक्रवारीच डोक्यावरून स्नान करायचा. इतर दिवशी फक्त खांद्यावरून. ६ दिवस डोक्याला पाणी नसल्याने शेवटचे २-३ दिवस डोक्याला वाईट वास यायचा. त्याला एकदा यासंबंधी कारण विचारले असताना त्याने सांगितले की त्याचा धर्म वाळवंटात जन्माला आला व तिथे पाण्याचे खूप दुर्भिक्ष असल्याने अशी पद्धत पडली. मला ते लॉजिक पटले. परंतु मी त्याला सांगितले की त्या काळात तसे करणे लॉजिकल होते, परंतु २० व्या शतकात या देशात २४ तास स्वच्छ पाणी घरी उपलब्ध असताना ६ व्या शताकासारखेच वागण्याची गरज आहे का? त्याला हा मुद्दा पटला, परंतु त्याने आपल्यात बदल केला नाही. तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे. या मतात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. फक्त जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण पारंपारीक अर्थाने धर्म मानत नाही हे व आपल्या सोयीनुसार वा बुद्धीनुसार वा स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावतो याची जाणीव असु दिली म्हणजे झाले. दुसर धर्मात वा धार्मिक ग्रंथात लिहीलेली प्रत्येक बाब ही सनातन सत्य नसुन, ईश्वरी नसुन मानवीच आहे व हितसंबंधाची प्रेरणा त्यामागे अर्थातच आहे. उदाहरणार्थ धर्मग्रंथांचा एक जुना नियम असा होता. गोसव नावाच्या जुन्या यज्ञात "अनुबंध्या" गायीचा बळी ("बॅरन काऊ" असा अर्थ काणे सांगतात) अग्निस्तोमाच्या शेवटी एका विशीष्ट विधीनंतर दिला जात असे. मान्यवर पाहुण्याला देण्यासाठी बनवलेल्या मधुपर्क या विशेष पदार्थातही मुख्य घटक म्हणुन गायीचे मास वापरण्यात येत असे. गोभिल गृह्यसुत्रानुसार अष्टकश्राध्द्दातही गायीचा बळी दिला जात असे.. आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे. कलिवर्ज्य वरील सर्व जुने नियम रद्द करत कुठल्याही कारणासाठी कुठल्याही यज्ञात गायीच्या बळीचा निषेध करतो. गोवध कलिवर्ज्य ठरवतो. खर म्हणजे माझा मूळ प्रश्न गामा पैलवान यांना होता ते जे म्हणत होते तंतोतंत शास्त्रात जे आहे ते पाळावे नाही तर ती कसरत ठरते त्यावरुन तो विचारलेला होता. तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?

In reply to by मारवा

आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे.
श्राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते. कदाचित प्राणीहत्या करताना मनात अपराधी भावना असावी व त्या हत्येचे संपूर्ण पातक आपल्यावर न येता त्यातला काही भाग देवाकडे/पितरांकडे जावा अशी मनात इच्छा असावी. जर हे प्राणी सेवनासाठी न मारता फक्त नवस/श्राद्ध इ. साठीच मारले गेले असते तर मारल्यानंतर त्या प्राण्यांची प्रेते सेवन न करता जाळून किंवा पुरून टाकली असती. मुस्लिमसुद्धा कोंबड्या/बकर्‍या सेवनासाठी कापतात. परंतु त्यांना मारताना अल्लाला भागीदार करून घेतात. त्यामागे हीच भावना असावी. मुळात पितरांचे अस्तित्व हे अमूर्त/अदृश्य अस्तित्व आहे. असे अस्तित्व मूर्त्/दृश्य वस्तूंनी कसे काय तृप्त राहू शकेल? अवांतर - आमच्या घराण्याच्या ज्ञात पूर्वजांपैकी सर्वजण शाकाहारी होते. त्यांच्या श्राद्धाला गायीचे मांस भोजनात ठेवले तर ते तृप्त राहण्याऐवजी शाप देतील.
तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?
मी शाकाहारी आहे. मला जे पटत नाही ते बंद करताना किंवा जे पटते ते स्वीकारताना मी धर्माची याला मान्यता आहे का, याविषयी धर्मग्रंथात काय लिहिले आहे, आपण हे करताना धर्मपालन करीत आहोत का, ही परंपरा योग्य की अयोग्य इ. गोष्टींचा विचार करीत नाही. मी फक्त माझ्या मनाचा कौल स्वीकारतो. निव्वळ गोहत्याच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांच्या हत्या बंद व्हाव्यात असे माझे मत आहे

In reply to by श्रीगुरुजी

तुमची मते छान स्पष्टपणे मांडलीत ती आवडली. विशेषतः हे श्राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते. आदी शंकराचार्य यज्ञातील पशु हिंसेचे तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच उघड दांभिक समर्थन करतात तेव्हा त्याचे आश्चर्य व मौज नेहमीच वाटते.

म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही. ^^^^ अगदी इस्लामी धर्मगुरुसारखं आहे हे विधान..

In reply to by संदीप डांगे

.... पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो. >> अय्या हो!? मग ही मनमानी आहे की नाही????? =)) =))

मारवा, परस्परविरोधी धर्मशास्त्रे असतील तर काय करावे असा तुमचा प्रश्न आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल. आता स्मृतीविपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्यानुसार आचरण करू नये या मताचा मी आहे. उदाहरणार्थ द्विभार्या प्रतिबंधक कायदा ही प्रचलित स्मृती आहे. त्यामुळे शक्य असलं तरी दोन बायका करू नयेत (मात्र हा कायदा धाब्यावर बसवून अनेक लोकं अतिरिक्त विवाह करतात ते वेगळं). अर्थात, हिंदुंचं कुठलंही धर्मशास्त्र आवाहन, सूचना वा सल्ला देतं. आदेश देत नाही. आदेश देण्याचं काम स्मृतीचं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल. अत्यंत विनम्रतेने आपणांस सुचवु इच्छितो आपणांस असे म्हणावयाचे असेल की धर्मसुत्रे धर्मशास्त्रे एकीकडे व स्मृति दुसरीकडे असे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे कायदा नियम या अर्थाने केवळ स्मृतीतच आहे व धर्मशास्त्रे केवळ पुजापाठ उपासने संदर्भातील विवेचन करतात. तर आपले म्हणणे कृपया आपल्या आवडीच्या कुठल्याही अधिकृत म्हणजे धार्मिक अधिकृतच ग्रंथातुन केवळ एकवार तपासुन घेतले तर बरे होइल. कारण धर्मसुत्रे धर्मशास्त्रे व स्मृती तिनही विविध आचरणाचे नियम व कायदे यांनी भरलेले आहेत व या बाबतीत स्मृती वेगळी धर्मसुत्र वेगळे असा भेद नाहीच. सर्वात मुळात श्रुती त्यानंतर स्मृती त्यानंतर पुराणे हा क्रम सर्वमान्य आहे. त्यात भाष्यकार हा वेगळा भाग आहे उदा. याज्ञवल्क्यस्मृतीवरील " मिताक्षरा" ही विज्ञानेश्वराने लिहीलेली टीका/भाष्य आहे. तो उत्तरकालीन इंटरप्रीटर आहे. मनुमृती चे भाष्यकार मेधातिथी आहे कुल्लुक आहे मेधातिथी ११ व्या कुल्लुक तर अगदी अलीकडचा आहे. हा एक भाग. काही स्मृतीतर अगदी अलीकडच्या काळातील आहेत उदा. देवल स्मृती व त्याहुन अनेक धर्मसुत्रे अती प्राचीन आहेत. काही तर इ.स.पुर्व ७ व्या शतकापर्यंत मागे जातात. धर्मसुत्रातला व स्मृतीतला कायदा हा नुसता प्रोव्हीजन्स नाहीतर शिक्षेच्या तरतुदींसहीत दिलेला आहे. त्याचे अ‍ॅक्च्युअल इम्प्लीमेंटेशन हा वेगळा विषया आहे. पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही. वरील सर्व विवेचनही एका बाजुला ठेवा या व्यतिरीक्त दोन स्मृतीच घेतल्या तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तरी त्यात परस्परविरोधी नियम कायदे मोठ्या प्रमाणावर आहेतच. त्यावर आक्षेप एक भाग. दुसरा परंपरेनेही त्यावर सॉर्ट आउट ची जी सोय केलेली आहे ती आपणास माहीत असेलच. शिवाय हा कलिवर्ज्य चे अ‍ॅमेंडमेंट. तर पहीला आक्षेप इनकसिस्टंसीचा आहेच पण तो फारच बेसीक त्यानंतर हितसंबंधाचा त्यानंतर मानवीय असण्याचा व त्याहुन महत्वाचा त्यातील अन्न्याय्य भेदभावयुक्त शोषक विषम तरतुदींचा ज्या कुठल्याच स्वाभाविक न्यायाच्या कसोटीवर कधीही टीकत नाहीत. ते बंधन का मानावे स्वतंत्र चिकीत्सा करुन स्वतंत्र धर्मनिरपेक्षनीतीने का आचरण करु नये या संदर्भातील आक्षेप आहेत. त्यामागील शोषणावर आक्षेप आहे. तर वरील स्मृतींच फक्त साठी खालील एक मुद्दा पहा. यात सध्या कात्यायन या एकाच स्मृतीचा उल्लेख असला तरी त्यातील परस्परविरोध एकदा तपासुन घ्या दुसरी स्मृतीचे उदाहरण शोधुन देतो. अजुन एखादे काँक्रीट दोन स्मृतीभेद असलेले उदाहरणही देतो सध्यापुरते हे बघा. "आततायिन " व्यक्तीने (डेस्परेट/व्हायोलंट) युद्धाच्या पवित्र्यात जर हल्ला केला तर आणि त्याला स्वत:चा बचाव करण्याच्या हेतुने मारले तर त्यात काहीही गैर नाही असे अनेक जुन्या धर्मशास्त्रांचे मत होते. आततायिन च्या व्याख्येत हिंसक पुरुष जो शस्त्रसज्ज आहे/दरोडेखोर आहे/आग लावण्याच्या हेतुने/ एखाद्याची पत्नी पळवण्याच्या हेतुने / जर आक्रमण करत आहे अशांचा समावेश होता. तर अशा "आततायिन" व्यक्तीवर प्रतिहल्ला करुन त्याला ठार मारणे धर्मसंमत होते. मात्र यात असा "आततायिन" ब्राह्मण असेल तर मात्र त्याला मारावे की नाही याविषयी अनेक धर्मसुत्रांत अगोदरपासुनच मतभेद होते. प्रातिनिधीक म्हणुन वसिष्ठ धर्मसुत्र म्हणतो जर ब्राह्मण हा आततायिन म्हणुन हल्ला करण्यास आला व इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जरी तो वेदाधिकारी असला तरी त्याच्या प्रतिकारात केलेल्या हत्येने ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. दुसरीकडे कात्यायन स्मृती म्हणते ब्राह्मण हा जरी आततायिन असेल व हल्ला करत असेल तरी त्याला (स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी देखील मारु नये) भृगु म्हणतो आततयिन शुद्र असेल तर मारायला हरकत नाही मात्र ब्राह्मणाला मारु नये

आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! तुम्ही म्हणालात की :
आंम्ही स्वबुद्धीनी आणी केवळ नितिमत्तेच्या आधारावर बदलतो आहोत. असं म्हणून बदलल्या, काढल्या पाहिजेत.
ठीक आहे. वादापुरती ही भूमिका मान्य करूया. पुढे तुम्ही म्हणालात की :
आज शास्त्राचा आधार देऊन जी सुधारणा घडवली जाते, तीच उद्या गरज पडल्यावर परत विरूद्ध बाजुनी आधार देऊन काढूनंही घेतली जाऊ शकते.
आता गम्मत बघा की, नेमका हाच युक्तिवाद तुमच्या बुद्धीलाही लागू पडतो. आज तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीचा हवाला देताहात. उद्या कशावरून ती बदलणार नाही? समजा जरी बदलली नाही तरी, भावी पिढ्यांचा काय भरोसा? तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

@तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना? ››› नाही . अजून तरी कुणी आजपर्यंत घडलेल्या सुधारणा बुद्धीच्या आधारे फिरवून उलट मागे नेलेल्या दिसत नाहित. जेव्हढे बदल झालेत ते भरपूर टिकलेत. उलट धार्मिक संघटनाच धर्माद्न्या काढून ते पुसायचा प्रयत्न करतायत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! स्त्रियांचे सबलीकरण ही एक सुधारणा आहे. मात्र त्याकरिता ४९८ अ सारखा अन्यायी कायदा बनवणे ही कुधारणा आहे. ही कुधारणा बुद्धीच्या सहाय्याने केलेली आहे. तुमच्या वैयक्तिक बुद्धी व नीतीच्या आधारे केलेल्या धर्मसुधारणा देखील शास्त्रबद्ध केल्या नाहीत तर पुढे त्यांची गती ४९८ अ सारखी होणार नाही हे कशावरून? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात. पण चिपाड बंद हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही. मी थांबतो. तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!

In reply to by अत्रुप्त आत्मा

चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात. पण चिपाड बंद धर्म हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही. मी थांबतो. तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!

In reply to by अत्रुप्त आत्मा

धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. धर्मात बदलाची सोय दिलेली आहे. तीचे स्वरुप थोडे वेगळे आहे इतकेच. कलिवर्ज्य ही बदलाचीच सोय आहे. व धर्माअंतर्गत आहे. पांडुरंग वामन काणे अत्यंत अभिमानाने पाश्चात्यांना संबोधुन म्हणतात की आमच्याकडे ही धार्मिक कायदे स्टॅटीक नव्हते त्यात बदल होत असे व "कलिवर्ज्य" सारक्या व भाष्यकारांची भाष्ये या बदलांना कायद्यातील बदलांना धर्मांतर्गतच बदलाची सुविधा उपलब्ध करुन देत. कलिवर्ज्य ने काही चांगले बदलही केले काही व्यावहारीक उपयोगाचे बदलही केले. तर ती ही सोय होती म्हणुनच केले. उदा. एक बदल पहा जुना मुळ नियम याज्ञवल्क्यस्मृती १-७२ नुसार एखाद्या स्त्रीने व्याभिचार केला असेल तर आणि त्यानंतर तिला मासिक पाळी आली तर अशी स्त्री व्याभिचाराच्या कलंकातुन सहज मुक्त होते. मात्र अशी स्त्री जर या व्याभिचाराच्या योगाने गर्भवती झाली तर मात्र अशा स्त्रीच्या पुत्राने (मातेचा) वा भावाने (बहीणीचा) त्याग केला पाहीजे. त्यांना टाकुन दिले पाहीजे. वसिष्ठ धर्मसुत्रही असाच आदेश तिन वरीष्ठ वर्णीय स्त्रीयांनी शुद्र पुरुषाशी केलेल्या व्याभिचारासंदर्भात देतो. तिथेही नियम गर्भवती होणे न होणेवर अवलंबुन आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकेत याचा अर्थनिर्णय करतांना विज्ञानेश्वर म्हणतो त्यागाचा अर्थ घराबाहेर काढणे असा नसुन अशा स्त्रीला धार्मिक कार्यक्रम व लैगिंक संबंध नाकारणे इतकाच आहे. वसिष्ठ पुन्हा चारच स्त्रीयांचा त्याग करावा असे म्हणतो त्यात पतीच्या गुरु वा शिष्याशी व्याभिचार करणारी, पतीच्या हत्येचा प्रयत्न, वा खालच्या वर्णाच्या पुरुषाशी व्याभिचार करणारी. कलिवर्ज्य- नविन नियम कुठल्याही परीस्थीतीत मातेचा वा भगिनीचा त्यांनी जरी व्याभिचार केला असेल व त्यायोगे त्या गर्भवती झाल्या असल्या तरी त्यांचा त्याग करण्यास प्रतिबंध लावतो. आता धर्मांतर्गतच वरील मुळ नियमात बदल करुन "कलिवर्ज्य" चा वापर करुन पुर्वीपेक्षा उदार भुमिका घेतलेली दिसत आहे. असेच आणखी काही नियम आहे जसे सत्रांवर ज्यात मोठ्या प्रमाणावर पशुबली होत असेल नियोगावर बंदी इत्यादी आहेत. आता यात वेगळी एक बाब अशी आहे की एकुण संख्या कलिवर्ज्याची ६० ते ६५ एक्झॅट नाही सांगता येत ती बघितली तर शोषण अजुन तीव्र करणारे स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे वर्नव्यवस्था अधिक घट्ट करणारे च बदल तुलनेने जास्त आहेत हे कटु वास्तव आहे. आणि पांडुरंग वामन काणे सारखे थोर अभ्यासकही त्यात कधी कधी वाईट बदलांचीही भलामण करतात ते फारच खेदजनक व उद्वेगजनक आहे. एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे.

In reply to by मारवा

काणे ह्यांचे हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे का? असल्यास कुठे मिळेल?

In reply to by मारवा

@एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे. ››› यातच सर्व आलं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! सार्वजनिक गणेशोत्सव देखील नकारात्मक रीत्या बदलला आहे. काय करावं मग? तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीच्या सहाय्याने सुचवलेल्या सुधारणाही नकारात्मक मार्गाने जाणार नाहीत याची शाश्वती काय? आ.न., -गा.पै.

मारवा, १.
पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही.
माझं भेदवर्णन ढोबळ (कॅज्युअल) आहे हे मान्य. मात्र हेच अचूक व्हावं असा माझा आग्रह आहे. स्मृती म्हणजे राजाज्ञा मानली जावी. तिची व्याप्ती सार्वजनिक म्हणूनंच अतिशय मर्यादित असावी. आजच्या भाषेत किमान पण प्रभावी कायदे आणि बळकट अंमलबजावणी असावी. यासोबत खाजगीतले नियम पाळणे हे स्वयंप्रेरित असावे. या स्वयंप्रेरणेस दिग्दर्शन धर्मशास्त्राद्वारे व्हावं अशी अपेक्षा आहे. आता आततायी ब्राह्मणाकडे वळूया. जर कोणी ब्राह्मण आततायीपणे वागंत असेल तर तो ब्राह्मणंच नव्हे. म्हणजे जर कोणी आततायीपणा केला तर धर्मशास्त्रे वाचत न बसता सरळ त्याचा कोथळा बाहेर काढावा. हा मथितार्थ आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जर कोणी आततायीपणा केला तर धर्मशास्त्रे वाचत न बसता सरळ त्याचा कोथळा बाहेर काढावा.
कोथळा काढायचा अधिकार धर्मशास्त्राने कुणाला दिलाय? इतकी अराजकता असेल असे वाटत नाही.

In reply to by अभ्या..

गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी आहेत त्यामुळे त्यांना हा अधिकार असू शकतो.