Skip to main content

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/09/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य. योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल. साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34774
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

मला वाटत ह्या वाक्याचा अर्थ लावायची गरज नाही कारण पूर्ण चुकीच वाक्य आहे ते. वर दिलेल्या माहितीनुसार निर्धारित मात्रा ७०० ppm आहे, या पेक्षा जास्त उरिया हि भेसळ आहे. अमूल किंवा इतर नावाजलेल्या कंपन्या हि मानांकने पाळत असतील असा माझा विश्वास/अंदाज आहे. अवांतर> युरिया, रंग व इतर गोष्टींची भेसळ ऐकली होती. पण हि चित्रफित पहा दुधात फेविकॉल (किंवा त्या पध्दतीच केमिकल) ची भेसळ आहे,

In reply to by संदीप डांगे

अहो डांगे साहेब , टेन्शन घेऊ नका . याचा अर्थ एवढाच कि पटाईत याना दुधातील युरिया , टक्केवारी , या विषयी फारशी माहिती नाहीये ( तरीही ते बिनधास्त आकडे लिहित आहेत याच मात्र टेन्शन येतं , मला )

In reply to by संदीप डांगे

डागें साहेब, सोसायटीत दुधाला डिग्री लागाया पाई काय काय पाप करतील कुणास ठाउक ??? युरिया घालत्यात, साकर्‍या घालत्यात, परवा तर एक पट्या सनला पुट्टी घालताना सापडला नव्ह, लई चोपला तेला,म्हनतोय कसा ''माझी डिग्री (snf) लागली नाही तर गरीबाच दुध जप्त करतासा ,अन तेच दुध मागल्या दारान बाजारात इकता. मग कुनी कुनि सागत्यात युरिया घाला, निरमा घाला. परवा तर गावात हीच चर्चा आता दुध धंद्यात म्हसराची गरज नाही. फकस्त पाम तेल, यूरिया, साबुन झाला की दुध तयार,अन कधी नासत बी नाही म्हन, असल दुद पिऊन पैलवान कुस्तीचे अदुगरच फडात चक्कर येऊन पडायचा की हो ? आपलाच जॅकेट फुटका अन कॅन गळका , त्येला कोन काय करनार,जाता जाता ह्या अडान्याच एवढ शबुद ध्येनात ठेवा की 1ग्रॅम लीटर=1000 पिपिएम

In reply to by संदीप डांगे

हाय हाय, जगात देव हाय,आता नवीन पद्धत येणार आहे. यात दुधच काय दुधाचे भांडे ,दुध काढणार्‍या चे हात किती स्वच्छ आहेत हे देखील कळणार .फक्त ते कसे वापरले जाते या वर अवलंबून आहे. नाहीतर तलाठ्याच्या लॅपटॉप सारखी गत होणार,

In reply to by Sanjay Uwach

अहो, मला म्हणायचे होते की सामान्य ग्राहकाला घरी येत असलेले दुध तपासून पाहण्यासाठी काही उपाय आहेत काय?

In reply to by संदीप डांगे

मा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुधाची भेसळ तपासण्याच्या उपकरणाचं अनावरण झाले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/president-ram-nath-kovind-unve…

In reply to by अमितदादा

बाजारात उपलब्ध असलेले ७०% दूध साबण , तेल , युरिया इ इ काहीतरी घालून तयार केलेले असते , असे पटाइत साहेबाना म्हणायचे आहे. माझा एक मित्रही असेच बोलत होता.

In reply to by डँबिस००७

साहेब हे सॉल्व्हंट्स परत परत वापरले जातात. तेल काढले आणि ते थोडेसे तापवले तरी या सॉल्व्हंट्सचे उर्ध्वपातन होते (६०-६५ अंश सेल्सियसला) याची वाफ थंड केली कि ती परत सॉल्व्हंट् म्हणून वापरता येते. त्यामुळे स्वस्त आणि महाग यात एवढा फरक येणार नाही. आणि आपण मी लिहिलेले शब्द नीट वाचले नाही का? असा स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरला तर तेल लवकर खराब होईल आणि त्याला वास लागेल. यांनतर कोणीही त्या कंपनीचे तेल कधीही विकत घेणार नाही. हे सर्व बाबा रामदेव यांनी केलेला अपप्रचार आहे. दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत.

In reply to by सुबोध खरे

एनडीडीबी पशुखाद्य कारखान्यात इलीवेटरने एक्स.मधील तेल बियांचा ग्रायडींग केलेला चुरा वर चढवताना आत गॅसचे स्फोट झाले आहेत़,विषेश करुन काॅटन सिड एक्सट्र्यकशनला. आमचे तिन कामगार गंभीर जखमी झाले होते. मग हा गॅस कुठून आला ? सर्व गोष्टी लिहणे कठीण आहे. मी स्वतः केमिकल इंजिनियरीगचा पदवीधर आहे. लहान वासराना जी पेंड देतात तो बायपास प्रोटीन तो कॉन्सेप्ट वेगळा आहे, एक्स प्लांट मधील शेगपेंड हातात घेऊन तरी पहा, मग काय ते ठरवा.

In reply to by विशुमित

थोडक्यात सांगायचे झाले तर ,शेतकऱ्या कडून आलेल्या तेल बिया ,मग त्या शेंगदाणा ,सोयाबीन करडी ,सरकी ,भाताचा कोंडा याचे पहिल्यांदा दाब देऊन तेल घाण्या द्वारे तेल काढले जाते .याची शुद्धता चांगली असते . तेल काढल्या नंतर उरलेला धान्याचा चोथ्या मध्ये देखील १० ते १६% तेल शिल्लक राहत असे .ते जनावरांना खाद्य म्हणून दिले जात होते . आता माणसाचे लक्ष या १० ते १६% शिल्लक असणाऱ्या तेलावर पडली .हे तेल काढण्या साठी त्याने एक रासायनिक प्रक्रिया शोधून काढली . या चोथ्यातून कांही रसायने पास केल्यास हे उर्वरित १० ते १६% तेल मिळू शकेल . आता हे किती योग्य प्रकारे हि पद्धत वापरली जाते यावर त्याची योग्यता ठरते . मी ज्या ठिकाणी काम करीत होतो त्या ठिकाणी हा रासायनिक पद्धतीने तेल काढलेले बिया हाताळताना डोळ्यातून पाणी येते किव्हा उपकरणात आग लागत असे . म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार . कांहींच्या मते असे कांही होत नाही . त्यातील सर्व रसायने बाहेर काढली जातात व उरलेली चोथ्यात देखील ४५% प्रथिने असतात . हे निव्वळ आमचे अज्ञान आहे . राहता राहिला प्रश्न रामदेव बाबाचा , साधी गणपती जवळ लावण्या साठी असणारी पन्नास रुपयाची समई देखील मेड इन चायना असेल , व सगळ्यांना याचा अभिमान वाटत असेल तर मी काय बोलणार . साध्या साध्य गोष्टी तयार करणारे रामदेव बाबा असूदेत किव्हा लक्ष्मण राव असुदे कोणीतरी भारतीय आहे एवढंच त्यातला घेणे. नाहीतर चेष्टा आवडे टवाळा.

In reply to by Sanjay Uwach

संजय राव, प्रतिसाद पटला ! तेलाच्या उत्पादनातले बारकावे हे त्या विषयातील तज्ञच सांगु शकतात. १०% ते १६% तेल काढण्यासाठी कंपनी किती खर्च करणार ? ह्यावर पुढच सर्व अवलंबुन असतय! आमच्या ईथे अजुनही घाण्यावरुनच नारळाच तेल आणल जात ! त्या शिवाय नारळाच वर्जिन ऑईल उपलब्ध आहे जे काही शेकडो वर्ष केरळात बनवल जात. सुक्या नारळापासुन काढलेल्या नारळाच्या तेला पेक्षा हे वर्जिन ऑईल वेगळ व उपयुक्त असत. त्याचे औषधीय वापरही आहेत. हे वर्जिन ऑईल नारळाच्या चोथ्यापासुन निघालेल्या दुधाला कढवत ठेवुन केल जात! तुपासारख हे वर्जिन ऑईल शरिराला खुप उपयुक्त असत !

In reply to by Sanjay Uwach

म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार . कांहींच्या मते असे कांही होत नाही . त्यातील सर्व रसायने बाहेर काढली जातात व उरलेली चोथ्यात देखील ४५% प्रथिने असतात . हे निव्वळ आमचे अज्ञान आहे आपण केमिकल इंजिनियर आहात असे म्हणता मग हेक्झेन चा उत्कलन बिंदू हा कमी असतो आणि ते पेट्रोलपेक्षा( पेट्रोल हे ऑक्टेन आहे एन आणि आयसोचे मिश्रण) जास्त सहज उडून जाईल हे आपणास ठाऊक असेलच तरीही ते चोथ्यात शिल्लक राहील हा आपला दावा कसा मानायचा? ऊरलेल्या बियांत प्रथिने शिल्लकच राहतात आणि ती जनावरांना खुराक म्हणून वापरतात ती मुळीच निकृष्ट दर्जाची नाहीत. उदा. शेंगदाण्याची पेंड हि मानवी बालकांना पौष्टिक आहार म्हणून वापरली जाते मग जनावरांना का नाही? यात ४१% प्रथिने असतात शिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. http://www.medindia.net/calories-in-indian-food/common_foods/nuts_and_oi... शेंगदाण्याच्या पेंडीत ४१ % प्रथिने असतात हे मी वर दुव्यासह तुम्हाला दिले आहे. डॉ सुबोध खरे यांचे संशोधन म्हणून केलेला दावा नाही. मूळ शेंगदाण्यात ४८ टक्के तेल असते आणि २५ टक्के प्रथिने असतात.https://en.wikipedia.org/wiki/Peanut त्याचे तेल काढले कि आपोआप उरलेल्या पेंडीत त्यातील प्रथिनाचे प्रमाण वाढलेले असते. यात आमचे अज्ञान आहे म्हणून तुमचा अहं दुखावला जातो याला कोण काय करणार? एखाद्या गोष्टीस विरोध करायचा म्हणून करू नका. त्याच्या मागे सज्जड पुरावा असावा. तुम्ही आणि मी शास्त्राचे विद्यार्थी आहोत. रामदेव बाबांची/ पतंजली उत्पादने स्वस्त आहेत कारण जाहिरातीवर होणारा ४० % खर्च त्यांनी वाचविलेला आहे. त्यांचे "कच्ची घाणी का तेल" हा त्यांचा कोल्ड प्रेस्ड आहे कि एक्सपेलर चा आहे हे मला कुठे सापडलेले नाही. माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे कोल्ड प्रेस मध्ये फक्त तीळ आणि ऑलिव्ह तेल काढले जाते.( म्हणून त्याला एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणतात). बाकी इतर तेलबियांमधून तेल काढण्यासाठी घाणीत एकतर गरम पाणी वापरतात किंवा घाणीच्या डिझाईन मुळे होणाऱ्या घर्षणामुळे तेल बियाच्या पेशी फुटून बाहेर येते. ( इतर तेलबिया मध्ये कोल्ड प्रेसने तेल फार कमी प्रमाणात बाहेर येते) आपल्याला याबद्दल काही माहिती देता आली तर कृपया द्या. असो.

In reply to by सुबोध खरे

डॉ .खरे साहेब , अतिशय विनम्र पणे व आपला आदर राखून कांही गोष्टी बद्दल मी आपले मत मांडू इच्छितो . आपण जे ४१% प्रथिने एक्सट्रेक्शन नंतर तेल बियांत राहतात असे वारंवार सांगता ,हे सत्य आहे .पण याचा व्यवसायिक दृष्टीकोन पाहिलात तर , तेल बियांतील तेल या आधीच आपण काढलेले आहे, बरोबर आहे .राहिलेला चोथा मी ज्याला फिलर किंवा वाळू म्हणालो ,तो घेऊन मी कुण्या शेतकऱ्या कडे गेलो व यात ४१% प्रथिने आहेत तुझ्या जनावरांना हे घाल असे म्हटलो तर तो नाही म्हणेल कारण मला दुधाचा दर हा फॅट (सिंग्धांश ) वर मिळतो , प्रथिनावर नाही असे कदाचित तो सांगेल .पशुखाद्य मध्ये दुभत्या जनावर साठी साधारण पणे ( ब्रीडिंग पिरियड मध्ये ) २५% प्रोटीन पुरी आहेत .आतातर कांही नामांकित कंपन्यांनी प्रोटीन १८% सुद्धा चालेल असे ठरवले आहे व ७% किंमत फॅट वाढवण्या साठी वापरीत आहेत . साधारण पणे मीठ + डाय कॅलसियम फॉस्पेट +१.५% युरिया व इतर धान्यातून हि गरज भागवली जाते .कि जी फार खर्चिक नाही . एक्सट्रेक्शन प्लांट मधील बाहेर येणाऱ्या मालातून सॉल्व्हन्ट पूर्ण पणे बाहेर काढला जातो .फक्त कधी कधी ड्रायर ठीक नसल्यास ,किंवा गरम केक पोत्यात भरल्यास ज्या वेळी बंद सिस्टीम मधून हॅमर मिल ( चक्की ) मध्ये येतो त्यावेळी घर्षण मुळे तयार होणाऱ्या उष्णेतून डोळ्यातून पाणी येणे ,वास येणे ,असे प्रकार घडू शकतात .हा मानव निर्मित दुर्लक्षित प्रकार असल्याने याचे समर्थन होऊ शकत नाही . सॉल्व्हन्ट १००% बाहेर काढला जातो .लहान मुलांना सप्लिमेंटरी फूड म्हणून नाचणी पेंड , शेंगदाणा पेंड , याचा उपयोग केला जातो हे सत्य आहे मात्र बाळाचं आई आधी त्याला दिवस भरात लिटरभर दूध पाजते हे हि खरे आहे .एक्सट्रेक्शन चे रसायन पोत्यातून आणले जाते किंवा "आमचे अज्ञान आहे ' हे शब्द आमचे नसून आपणच व्यक्त केलेले (अज्ञानजन्य) हे विशुमित यांनी सविस्तर सांगा असे सांगितल्या वर ते मी उध्द्रुत केले आहेत . गैर समजातून असे घडू शकते . मत मतांतर असू शकते पण विरोधाला विरोध ,द्वेषमूलक आणि अज्ञानजन्य सारखे शब्द मनाला कुठेतरी खिन्न करतात .कांही गोष्टी सोप्या भाषेत सांगताना थोड्या चुका होऊ शकतात पण हि शास्त्रीय माहिती असून हि हा अमुक पक्षाचा ,अमुक महाराजांचा समर्थक असा रबर स्टॅम्प विनाकारण मारला जातो . हि माहिती फक्त अभ्यासाने किंवा अनुभवाने आपण सांगू शकतो . श्री खरे साहेब आपल्या माहिती व समर्पक विषय मांडणी बद्दल पुन्हा एकदा आदर व्यक्त करून विराम देतो ..

In reply to by Sanjay Uwach

सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट मध्ये तेल बियांतील तेल काढण्या साठी जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याचेच पुढचे व्हर्जीन क्लोरोफॉर्म जे माणसास ऑपरेशनच्या वेळी दिले जाते त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार . दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो हि सर्व आपलीच विधाने आहेत. ती मी पुराव्यानिशी खोडून काढली आहेत. द्रावक म्हणून कार्बन टेट्राक्लोराइड वापरले जाते ( ते विषारी आहे हे मान्य) हे आपण कोणत्या आधारावर लिहिले आहे. उरलेली पेंड विषारी असते हेही आपण कोणत्या आधारावर बोलत आहात. Groundnut cake is a livestock feed, mostly used by cattle as protein supplements.[36] It is one of the most important and valuable feed for all types of livestocks and one of the most active ingredient for poultry rations. स्रोत विकिपीडिया भारतातील शेतकरी शेकडो वर्षांपासून ही शेंगदाणे, सरकी इ ची पेंड जनावरांना उत्तम पशुखाद्य म्हणून देत आलेले आहेत. तेंव्हा ते निकृष्ट किंवा विषारी असण्याचे आपले विधान चूक आहे. हान मुलांना सप्लिमेंटरी फूड म्हणून नाचणी पेंड , शेंगदाणा पेंड , याचा उपयोग केला जातो हे सत्य आहे मात्र बाळाचं आई आधी त्याला दिवस भरात लिटरभर दूध पाजते हे हि खरे आहे. सहा महिन्यापर्यंतच मुलाला आईचे दूध पोषणासाठी पुरेसे असते. यानंतर त्याला इतर घाण आहार देण्याची गरज असते येथेच गरिबीमुलांचे कुपोषण होते. आईने एक लिटर दूध पाजले ( ही अर्थातंच अतिशयोक्ती आहे) तरी त्यात ९८ टक्के पाणी असते आणि १.१% प्रथिने असतात. यामुळेच आदिवासी भागात मुलांचे कुपोषण होते. यासाठीच आहार तज्ज्ञांनी स्वस्त आणि अतिशय पोषक असलेली शेंगदाण्याची पेंड वापरून आहार तयार केले आहेत. साधा हिशेब केलात तर आपल्याला लक्षात येईल कि एक लिटर आईच्या दुधात फक्त ११ ग्राम प्रथिने असतात.(स्रोत विकी) एक वर्षाच्या बाळाला( १० किलो वजन) रोज २० ग्रॅम प्रथिने लागतात. हि प्रथिने पुरवण्यासाठी सहा महिन्यांनी ठोस( घाण आहार देण्याची गरज पडते) १०० रुपये किलोची डाळ देण्यापेक्षा (२५ % प्रथिने) स्वस्तात उपलब्ध असली पेंड २५-३० रुपये किलो ( ४१ % प्रथिने) हि नक्कीच चांगली आहे. राहिली गोष्ट कच्ची घानी का तेल हे काही रामदेव बाबानी काढलेले नवीन उत्पादन नाही. कमीत कमी १५ उत्पादक तरी ते तेल तयार करत आहेत अगदी "अडानी" यांचा उद्योग फॉर्च्युन यांचे हे उत्पादन कित्येक वर्षे उपलब्ध आहे. आणि याची किंमत १३० रुपये लिटर आहे तर रामदेव बाबांचे तेल कमीत कमी किंमत १२५ रुपये लिटर ला आहे. http://www.fortunefoods.com/products/cooking-oil/fortune-kachi-ghani-mu… ज्या तर्हेने त्यांनी आपले विपणन/जाहिरात केलेली आहे त्याने शहरी लोकांना असे वाटते बाबा रामदेवांनी काही तरी जादुई उत्पादन शोधून काढले आहे. माझे म्हणणे एवढेच आहे कि एखाद्या गोष्टीची भलामण करण्यासाठी सज्जड पुरावा असायला हवा. बाबा रामदेव केवळ मोठ्या उद्योगपतींना किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देतात म्हणून त्यांचे विपर्यस्त दावे मान्य करता येणार नाहीत. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करने हि गोष्ट चूक आहे. खाली धर्मराज मुटके यांनी अतिशय योग्य असा प्रतिसाद दिला आहे. त्यात मी अधिक काही लिहू शकत नाही.

In reply to by सुबोध खरे

त्याला इतर घाण आहार देण्याची गरज अरे रे! बाकी विकिपीडिया बद्दल आमच्या श्रद्धास्थानाचे मत खालीलप्रमाणे .

In reply to by सुबोध खरे

आई एक लिटर दूध बाळाला पाजते'' जरूरी नाही ते सर्व आईचे असेल इतर स्त्रोत म्हणजे गाईचे कींवा म्हशीचे असा घ्यावा.

In reply to by सुबोध खरे

आस्था चेनेल वर तेल काढण्याची विधी कित्येकदा दाखविली आहे. ती पाहून निष्कर्ष काढू शकतात. बाकी मला पद्धत जुन्या काळातली वाटली. अनेक घाणे फिरताना दिसत होते. (अश्या घाण्या मी जुन्या दिल्लीत तेलवाल्या गल्लीत बघितल्या होत्या)/. अधिक काही सांगू शकत नाही.

खरे साहेब डालडा वर तुमचे विचार लिहीले नाहीत ! का त्या वेळी कंपनीने लोकांची दिशाभुल केलेली नव्हती ? चाळीस एक वर्ष लोक हे तुप खात होते, अजुनही खातात ! डालडा अजुनही बाजारात उपलब्ध आहे.

In reply to by डँबिस००७

अवांतर: माझा खूप चांगला मित्र व मी अमेरिकेत, बराच काळ ऑफिस तर्फे क्लायंट साईट वर होतो, माझा मित्र सुसंस्कृत सुशिक्षित (असे बरेच सु )शुद्ध शाकाहारी समाजाचा, त्यामुळे खाण्याच्या बऱ्याच गोष्टीवर निर्भन्ध, त्यात तो ल्याकटोज इनटॉलेरांट, त्यामुळे तुपातील शिरा , चीज वैगरे गोष्टी पासूनसुद्धा दूर, बरं मी त्याला माझ्या परीने वेग वेगळे व्हेज पदार्थ (माझ्या टिफिन) मधले शेअर करायचो, पण बिचार्याचे खाण्याचे लैच हाल व्हायचे, असो पुढच्या लॉट मधे पुण्याहून एक जण येणार होता, त्याला मी फोनावलं, म्हटलं येताना डालडा सामानात लपवून घेऊन ये, इथं वॉल मार्ट मध्ये मला काय डालडा सापडत नाही. जेव्हा डालडा आला, तेव्हा कुठे तुपातले पदार्थ बिचारा खाऊ शकला, अश्या रीतीने डालडामाहात्म्याची ही साठा कहाणी, पाचा उत्तरी सुफलपूर्णम

In reply to by डँबिस००७

डालडा खाऊच नये असे प्रतिसाद मी अगोदर दिलेले आहेत परत ते द्यायचा टंकाळा आहे. कुणी खोदून काढले तर बरे होईल. बाकी डॅम्बीस ००७ आणि संजय उवाच यांचे प्रतिसाद त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरू मारतो अशा तर्हेचे समर्थन असणारे आहेत. त्यामुळे यापुढे मी त्याचा प्रतिवाद करीत नाही.

कोलगेट ने २० वर्षांपुर्वी असा प्रचार चालवलेला होता की मिठ व कोळसा या सारख्या पदार्थामुळे दातांच्या एनॅमेलवर ओरखडे जातात व दातांची हानी होते. २० वर्षांनंतर तीच कोलगेट आता टुथपेस्ट मध्ये मिठ, कोळसा, निम सारखे पदार्थ घालुन लोकांची दिशाभुल करत असते. हे सर्व देशाच्या हितासाठी आहे अस वाटत !!

In reply to by डँबिस००७

कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी हि तुमच्या आरोग्यासाठी काम करीत असेल हे गृहितकच मुळी चूक आहे. हे म्हणजे ब्रिटिश लोक भारतात आले ते भारताचा उद्धार करण्यासाठी असे म्हणण्यासारखे आहे. ते फक्त आपल्या नफ्यासाठी येथे आहेत. कोलगेट किंवा इतर बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या जाहिराती करतात त्या अतिरंजित पासून निखालस खोट्या पर्यंत असतात. म्हणून बाबा रामदेवांनी खोट्या जाहिराती करणे बरोबर आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का ?

In reply to by डँबिस००७

दुरुस्ती.... मी ती जाहिरात पाहिलेली आहे. त्यात 'खुरतरे और दानेदार' मंजन असा शब्दप्रयोग असे. आणि बारीक सफेद कोलगेट टूथ पावडरची भलामण असे. त्यात कोळशाने किंवा मिठाने नुकसान होते असे म्हटलेले नसे. खुरतरे वर भर होता. त्याचे उत्तर म्हणून विकोची जाहिरात 'केवळ चवीला चांगले असणे पुरेसे आहे का?" अशा प्रकारच्या टॅगलाइनची होती. मूळची जाहिरात जालावर सापडली नाही. पणा ही सापडली https://www.youtube.com/watch?v=rKi3zLiCyYk

In reply to by नितिन थत्ते

अगदी हेच म्हणणार होतो.. आक्षेप मीठावर नसून दातावर खरखरीत पदार्थ घासण्यावर होता.. त्या जाहिरातीत एक खरखरीत पावडर टेबलावर घासून टेबलावर ओरखडा आलेला दाखवत.. एनॅमल नाजूक असल्याने असेच ओरखडे दातावर येउ शकतात असे जाहिरातीत म्हटले होते.

दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत. हे फक्त पतंजली नावाच्या कंपनीलाच लागु का ?

In reply to by डँबिस००७

इतर कोणत्या कंपन्याचे प्रतिनिधी मिसळपाव वर असे दावे करत असते तरी नक्कीच विरोध केला असता

In reply to by संदीप डांगे

आपणा गल्लत करत आहात असे वाटते. पटाईत पतंजलीचे प्रशंसक असु शकतील पण म्हणुन ते प्रतिनिधी होत नाहित. हे म्हणजे मिपावर भाजपा समर्थनार्थ बोलणारे सगळे लोक भाजपाचे प्रतिनिधी आहेत असे म्हणण्यासारखे होइल.

In reply to by मृत्युन्जय

मी पटाईतांना प्रतिनिधी म्हटलेले नाही, इथे मिपावर कोणीही खाजगी कंपनीची भलामण करत काहीच्याकाही दावे हाणत असेल तर विरोध नको का करायला?

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब मी काही पतंजलीचा प्रतिनिधी नाही. बाकी जे सत्य आहे, डोळ्यांसमोर आहे. पहिल्यांदाच कुणी विदर्भातील शेतकर्यांचा विचार केला आहे, दुर्भाग्य हा व्यक्ती मराठी नाही. पुढच्या २ वर्षांत हजारोंच्या संख्येने विदर्भच्या लोकांना मिळालेला रोजगार तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पहालच. त्या नंतर जर तुम्ही मला पतंजलीचे प्रतिनिधी म्हणाल तर मला तर आपला गौरव झाला असे वाटेल. दिल्ली माझी कर्मभूमी असली तरी माझे पूर्वज विदर्भातच राहत होते, माझा जन्म हि तिथे झालेला आहे.

In reply to by विवेकपटाईत

अशी अनेक सत्ये तुमच्या डोळ्यासमोर असतील, पंतप्रधान कार्यालयात काम करता आपण. तीही येऊ द्या समोर. वाचायला आवडेल. जेव्हा विदर्भातल्या लोकांना रोजगार मिळेल तेव्हा बघू, आतापासून 'घोषणांच्या' आरत्या ओवाळायला मी तरी 'भक्त' नाही.

In reply to by डँबिस००७

हे फक्त पतंजली नावाच्या कंपनीलाच लागु का ? साहेब, पहिली गोष्ट मी इतर कंपन्याची भलामण केली आहे असे तुम्हाला कुठे दिसले? बहुराष्ट्रीय कंपन्या चोर नाहीत असे मी केंव्हा म्हणालो? किंवा बाबा रामदेव जे करीत आहे ते चूक आहे असे मी केंव्हा म्हणालो हे आपल्याला दाखवता येईल काय? उद्या बाबा रामदेवांचे जीन्स आली कि मी ती नक्की वापरेन. आंतरराष्ट्रीय कंपन्याना तिप्पट किंमत देण्यापेक्षा मी भारतीय कंपनीची जीन्स वापरणे नक्की पसंत करेन. म्हणूनच मी असे म्हणेन कि बाबा रामदेव यांनी असे चुकीचे दावे करण्यापेक्षा आमचे उत्पादन कोणत्याही उच्च दर्जाच्या उत्पादनाइतके किंवा जास्त चांगले आहे असे म्हणाले पाहिजे. भारतीय माणूस किमतीबाबत नक्कीच जास्त जागरूक आहे. त्याच किंवा कमी किमतीत जर त्याला चांगले उत्पादन मिळाले तर तो नक्कीच स्वीकारतो. बाबा रामदेवांचे उत्पादने स्वस्त असण्याचे मूळ कारण काय तर जाहिरात आणि विपणन यासाठी उत्पादनाची ४० % किंमत ते वाचवतात. याचसाठी जर बाबा रामदेव यांनी प्रामाणिकपणाचा आधार घेतला तर ते जास्त चांगले एवढेच माझे म्हणणे आहे.

In reply to by सुबोध खरे

पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला नफा कुणालाही वाटत नाही. शिवाय हजारो शोधकर्ता विनामूल्य आपली सेवा देतात. त्यात बरेच निवृत्त शोधकर्ता आहेत. (JNUचे सुद्धा आहेत). एकदा एका मोठ्या कंपनीच्या अधिकारीला यावर मी प्रश्न विचारला होता. (त्याने स्पष्ट म्हंटले जी वस्तू पतंजली १०० रुपयांना देते ते आम्हाला १५० च्या खाली देणे शक्य नाही. कारण गुंतवणूक, त्यावर मालकाचा नफा, भारी पगार, विज्ञापनचा खर्च. लागत वाढली म्हणून कर हि जास्त. शिवाय विक्रेत्याला कमिशन हि जास्त द्यावे लागते. तुलना होऊ शकत नाही.

In reply to by विवेकपटाईत

पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला नफा कुणालाही वाटत नाही.
हे तुम्ही नक्की कोणत्या भूमिकेतून मांडत आहात ते माहित नाही. पण नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पतंजलीचे बाळकॄष्ण हे २५ हजार कोटींचे धनी झालेत असे वाचले. पतंजलीच्या सर्व कंपन्या नफा कुणालाही वाटत नाहीत हे खरेच म्हणायचे मग..? दहा वर्षात एवढे श्रीमंत कुणी भारतीय होत असेल तर मला नक्कीच अभिमान आहे, पण तो एक वेगळा विषय आहे. तुम्ही ज्या पद्धतीने इथे पतंजली ही एक सेवाभावी संस्था, नानफानातोटा तत्त्वावर चालवली जाणारी संस्था, एक लोकोपयोगी चळवळ अशी जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात तो अजिबात पटलेला नाही. पतंजलीला इतर डाबर, युनिलिवर, विको सारखी कंपनी असल्यासारखीच वागणूक द्यायला हवी. तीने धंदा करावा, पण ही 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' छाप प्रचार नै पटत.
जी वस्तू पतंजली १०० रुपयांना देते ते आम्हाला १५० च्या खाली देणे शक्य नाही. कारण गुंतवणूक, त्यावर मालकाचा नफा, भारी पगार, विज्ञापनचा खर्च. लागत वाढली म्हणून कर हि जास्त. शिवाय विक्रेत्याला कमिशन हि जास्त द्यावे लागते.
अ‍ॅम्वे किंवा अशाच प्रोडक्ट्सच्या चेनमार्केटींगच्या मिटींगमधे ही अशीच भाषा वापरली जाते असा अनुभव आहे.

सॉल्व्हेंट एकस्ट्रक्शन करुन तेल बीयातील ९८ % तेल काढुन घेतल्यावर ते तेल स्वस्त असायला पाहीजे, पण कच्चे घानीका तेल जर अश्या तेला पेक्षा स्वस्त असेल तर मध्ये तेच चालणार !!

लेखातल्या काही गोष्टी चुकतायेत काका... आशा आहे आपण गैरसमज न करून घेता योग्य खुलासा कराल.
शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही
विदर्भात उसाचं पीक फार कमी प्रमाणावर घेतलं जातं. त्यापेक्षा कापूस, सोयाबीन, ज्वारी चे अधिक पिक घेतात. तेव्हा आपलं वरच वाक्य इथे गैर लागू होतं.
दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही.
:>> इथे शेतकरी आत्महत्या आणि दलित असल्याचा संबंध कसा काय.. माझ्या माहिती प्रमाणे आत्महत्या सगळ्याच जाती धर्मातल्या शेतकऱयांनी केल्या आहेत, आणि त्या मागचे मुख्य कारण कर्जबाजरीपणा आणि नापिकी हे आहेत.
आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा
.मला तरी इथे त्यांचा व्यापाराचा स्वच्छ हेतू दिसतो.
हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला
या योगिनां विदर्भातली स्थिती आताच कशी काय दिसली. आपण वर म्हंटल्याप्रमाणे
गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश.
होता तेव्हा मागचे काही दशकं का हि स्थिती दिसली नाही ???? अजूनही बाकी प्रश्न आहेतच ते पुन्हा कधीतरी, तूर्तास एवढ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याच्या प्रतीक्षेत एक विदर्भातील रहिवासी.

In reply to by महासंग्राम

धागाकर्ता लेखक उत्तर द्यायच्या मुडात दिसत नै.... काय कारण असेल बरे बहुदा त्यांना थेट अन खोचक प्रश्न विचारलेले आवडत नसावंत बावा ????

च्यायला, रामदेव बाबा आणि त्यांच्या उत्पादनावर एक स्वतंत्र धागा काढा -दिलीप बिरुटे

In reply to by फेदरवेट साहेब

हा. आणि बाबांना सीएम करा. चैला मोठे लोक सुधरण्यासाठी गावे दत्तक घेतेत. आपण ह्यांना आख्खं राज्य देऊन टाकू. ते अनुशेष बिनुषेष सगळेच लफडे खतम. आरोग्यपूर्ण राज्य्/संपन्न राज्य म्हणून पैला नंबर येतय की नै बघा.

मुळ मुद्दा आहे, विदर्भातील फुड पार्क बातमी बद्दल !! त्याबद्दल रामदेव बाबांच अभिनंदन करायला माझ्या मते हरकत नसावी ! कारण एका बिझनेस मन ला हा बिझनेस कोठे ही उभा करता येऊ शकला असता ! दुसरा मुद्दा कच्चे घानी का तेल !! जर सॉल्व्हेंट एक्श्ट्रॉशन शिवाय तेल उत्पादन आणि वितरण मार्केटमधल्या ईतर तेलापेक्षा कमी किमतीत करत असतील तर ते लोकांच्या पसंतीस पडतीलच ! दाताच्या निगेसाठी कोलगेट सारख्या अनेक कंपन्यांनी सेंसेटीव्ह टुथपेस्टला पर्यायच नाही अस लोकाम्च्या मनात जाहीरातीच्या माध्यमातुन खोलवर बिंबवलेल आहे. मी ही असाच एक सेंसेटीव्ह दातांमुळे बेजार होतो. आता दंत कांती नावाची पतंजलीची पेस्ट वापरतोय. सेंसेटीव्हीटी पार गेली कधी हे मलाच कळल नाही, बाजारात उपलब्ध असलेल्या १०० % पेस्ट मध्ये प्रेसेपिटेटेड लाईम (चुना))हा बेस म्हणुन वापरला जातो. टुथपेस्टच्या जवळ जवळ ९०% भाग ह्या चुन्याचा असतो. त्या चुन्याच रुप औषधाच कॅरीयर अस असत. इतकी महाग टुथपेस्ट आपण विकत घेतो पण हातात ९०% चुनाच असतो.

पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे. रामदेवबाबांचे क्लेम किती गांभिर्याने घ्यावेत असा प्रश्न पडतो. http://www.livemint.com/Companies/hLEBBx17cFY5rPjTjmIP9O/The-Patanjali-…
At the factory, pasteurized unsalted butter produced by the Karnataka Co-operative Milk Products Federation Ltd was being mixed with local cow milk to produce ghee. The aloe vera unit is a processing and packaging unit, which was using pulp supplied by Dhandev Resorts and Health Care Pvt. Ltd (a Jaisalmer-based company owned by Roop Ram, an Indian National Congress leader). Patanjali claims that it has its own aloe vera plantations for making aloe vera juice. And contrary to Ramdev’s claims, Patanjali outsources manufacturing of some products like other packaged consumer products companies do. For instance, biscuits are made by Delhi-based Sona Biscuits (that also sells biscuits under Sobisco brand) and juices by a bunch of companies, including GK Dairy and Milk Products Pvt. Ltd (this company also sells products under the Gopalji brand). Patanjali’s juice products, which Ramdev claims to be natural, contains added sugar, water and required preservatives. Haridwar-based Aakash Yog Health Products Ltd manufactures noodles for Patanjali. Aakash used to make noodles for HUL’s Knorr brand, till recently.
ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रॉड्क्ट्सना ते श्या घालतायत त्यांच्याच सप्लायरकडून तीच प्रॉड्क्ट्स हे घेतायत.

In reply to by अनुप ढेरे

जाहिरात माणसाला काय काय खोटं बोलायला लावेल, सांगता येत नाही, मग ते योगी असोत नाहीतर भोगी! रच्याकने, जर बाबा या ‘खोडसाळ, अपप्रचार करणार्या’ लेखाविरूध्द न्यायालयात गेले असतील, तर ठीक.

In reply to by अनुप ढेरे

पतंजली रोज १००० टन ओलाविरा वापरते. वरील कंपनी हरीश धनदेव यांची आहे. त्यांची १२५ एकरात एलोविराची शेती आहे. हरीश बताते हैं कि उन्होंने पिछले चार महीने के दौरान हरिद्वार स्थित पतंजलि की फैक्ट्रियों को 125-150 टन एलोवेरा सप्लाई किया है. अर्थातच २५-३० टन महिना.http://www.ichowk.in/society/harish-dhandev-from-jaisalmer-quit-his-gov… असे अनेक शेतकरी आणि शेतकरी समूह पतंजलीला एलोविरा पुरवितात. एलोविराचा वापर औषधी, ज्यूस, साबण, शेम्पू इत्यादीत होतो. पतंजली जवळ स्वत:ची शेती नाही. त्या मुळे हि बातमी बिनबुडाची आहे. भारतीय कंपन्यांना एका छता खाली आणणे हे पतंजलीचे लक्ष्य आहे. कर्नाटकच नाही, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून इथल्या cooperative गायीचे बटर पतंजली विकत घेते. (हे स्वत: बाबा रामदेवांच्या मुखातून ऐकलेले आहे, उत्तर भारतात शुद्धतेची खात्री देता येत नाही म्हणून इथून विकत घेत नाही) यात कुठलीही लुकाछिपी नाही. ४-५ वर्षांपूर्वी गायीचे घी म्हणून घी कुणीही विकत नव्हते. आता गायीचे घी , गायीच्या घी नावाने म्हशीच्या घी पेक्षा महागात विकल्या जाते. या शिवाय पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर ते कुणी उत्पादित केले आहे, हे लिहिले असते. आपल्याला माहित नसेल, पण कधी चुकून आस्था चानेल पाहत असाल तर गेल्या महिन्यातच विभिन्न विद्यालयांचे कृषी विज्ञानिक देश्यातील कृषी शेतकर्यांचा परिसंवाद दाखविला होता. देशात कुठल्या भागात कुठल्या जडी-बुटी शेतकऱ्यांना फायदा होईल हा विषय होता.

In reply to by विवेकपटाईत

अ‍ॅलूवेरा मोठ्या प्रमाणात वापरणे यात काय मोठे? एक तर कोरफड ही वनस्पती शेकडो वर्षांपासून घराघरांमध्ये वापरली जाते. कुमारी आसव तर तीन पिढ्यांपूर्वी प्रत्येक मुलीला शिशु अवस्थेत दिले जात असे. पुन्हा त्यातल्या 'ई' जीवनसत्त्वाविषयीच्या माहितीचा बर्‍याच बहुराष्ट्रीय आणि देशी कंपन्यांनी उपयोग करून घेऊन शांपू, क्रीम, त्वचाप्रसाधने बनवली आहेत. त्यासाठी (कदाचित विदर्भातले नसतील पण) अनेक शेतकरी त्यांना कच्चा माल पुरवीत आले आहेत. आता एकाच ठिकाणी कोरफडीची शेती होत आहे हा वेगळेपणा. पण कोणतीही चाणाक्ष कंपनी एकाच ठिकाणच्या रिसोर्सेसवर अवलंबून राहाण्याचा धोका पत्करणार नाही. शिवाय कोरफड ही भरड जमिनीत कमी पाण्यात वाढू शकणारी वनस्पती आहे. तर विदर्भवासीयांनी आपली सुपीक काळी कसदार जमीन या पिकासाठी वाया का घालवावी? आणि शेतकर्‍यांचे एकाच खरेदीदारावरचे अवलंबित्व स्पष्ट झाले की कालांतराने त्यांची छुपी पिळवणूक सुरू होते हे सर्वज्ञात आहे. काही वर्षांपूर्वी सफेद मुसळी हे पीक घेण्याची मोठी लाट आली होती. त्यात अनेक शेतकरी पोळले आहेत. आणि प्रसाधने, शांपू यात अलीकडे लोकांचा कल नवनवीनतेकडे असतो. पिढ्यान् पिढ्या एकच 'जवाकुसुम' किंवा 'अफ्घान स्नो' वापरण्याचे दिवस कधीच संपले.

In reply to by विवेकपटाईत

" या शिवाय पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर ते कुणी उत्पादित केले आहे, हे लिहिले असते." हे तुम्ही बोल्ड करून काहीतरी विशेष आहे असे का दर्शवताय ? कायदा आहे भारतात तसा . सगळ्यांनाच लिहायला लागतं हे , अगदी माणिकचंद गुटखा वाल्याला सुध्दा

रामदेव बाबांशी काहीही वाकडे नाही. त्यांनी त्यांचा धंधा नक्कीच करावा. पण उगाच जनतेच्या भल्यासाठी करतोय असली भाषा वापरू नये. स्पर्धा करा आणी मार्केट मध्ये तग धरा.

In reply to by अभिजीत अवलिया

धंदा म्हटला की स्वतःचे/धंद्याचे मार्केटिंग करणे आलेच. अहो इतकेच काय वर्षभर काम करुनही अपराय्जल साठी स्वतःचे व्यवस्थित मार्केटिंग नाही केले तर प्रमोशन आणी इंक्रीमेंट खण्ण्ण्ण्ण्ण अस वाजत नाही.

हिंदुस्तान लिव्हर कंपनीने बनवलेला साबण डिटरजंट वैगेरे सारखा माल मोठ्या प्रमाणात भारताबाहेर मध्यपुर्वेत निर्यात होत असे. दुबई, ओमान, सौदीच्या मार्केट मध्ये असा माल मेड ईन ईंडीया च्या लेबल सकट बघायला मिळायचा ! साधारणपणे १० - १२ वर्षांपुर्वीपर्यंत हे चाललेल होत. त्यानंतर मध्य पुर्वेतील देशामध्ये (खास करुन सौदी मध्ये) युनि लिव्हरने स्वतःच्या फॅक्टर्या बांधल्या व तिथुन माल निर्यात करायला सुरुवात केली. त्यामुळे व्यवसायाचे समिकरण नेहमी बदलत असते हे मान्य करायला लागेल. जर रामदेव बाबाच्या निमित्याने का होईना जर विदर्भातील शेतकर्याला पर्यायी काम, रोजगार, धंदा मिळत असेल तर सर्वांनी त्याच स्वागत करायला हव. जर रामदेव बाबाची उत्पादने मार्केट मध्ये नाही चालली तर त्याचा तोटा हा रामदेव बाबाच्या कंपनीला होईल पण शेतकर्याना त्याचा काही तोटा नाही.

जर रामदेव बाबाच्या निमित्याने का होईना जर विदर्भातील शेतकर्याला पर्यायी काम, रोजगार, धंदा मिळत असेल तर सर्वांनी त्याच स्वागत करायला हव. ज
सहमत

पतंजलीचे बाकी काही माहित नाही पण याअगोदर डाबर रेड, मिसवॉक, विको, बबूल इ. देशी टुथपेस्ट वापरुन बघीतल्या आहेत. आता सध्या पतंजलीची दंतकांती वापरतो आहे आणि उल्लेख केलेया टुथपेस्टपेक्षा नक्कीच चांगले रिजल्ट आहेत. डाबर रेड ला मी दुसरा क्रमांक देईन. कोलगेट किंवा पेप्सोडेंट मी फक्त बाहेर गावी गेल्यावर वापरतो कारण त्यांच्या ५-१० रुपयाच्या छोट्या आकाराच्या ट्यूब्स उपलब्ध असतात व बरोबर बाळगायला बर्‍या पडतात. त्यांचे काही साबण देखील स्वस्त किंमतीत आणि चांगल्या दर्जाचे आहेत. वापरुन पाहिले आहेत. बाकी रामदेव बाबांचे प्रॉडक्ट आहे म्हणूनच घ्यायचे किंवा घ्यायचेच नाही, रामदेव बाबांचे प्रॉडक्ट आहे म्हणून उत्तमच असणार किंवा फालतूच असणार असा विचार मी तरी करीत नाही. असेही मध्यमवर्गीय संस्कार म्हणा किंवा लायकी नाही म्हणा पण मी एस्टॅब्लिश्ड ब्रॅंडींगचा भोक्ता नाहिये. उलट नवीन उत्पादने वापरुन बघायला आवडते. संडासात ओतायच्या फिनाईलमधे देखील ब्रॅंड बघणार्‍या लोकांकडे मी कुतुहुलयुक्त आश्चर्याने पाहतो. मल्टीनॅशनल असो की देसी कंपनी, सगळेजण शेवटी व्यवसाय करायला बसलेत. प्रत्येकजण आपले उत्पादन श्रेष्ठ आहे असे सांगतो. सगळ्यांचे दावे तपासत बसायचे तर घरात लॅब खोलावी लागेल. फक्त खाण्याच्या पदार्थांचा दर्जाबाबत आग्रही आहे.

In reply to by धर्मराजमुटके

अतिशय सहमत, ब्रँड पेक्षा दर्जा महत्वाचा आणि तो वापरल्याशिवाय कळत नाही, पण मला एखादी वस्तू आवडली नाही याचे कारण मी कंपनी मालकाचा द्वेष करतो म्हणून असे समजणे विचित्र आहे, रच्याकने, दंतकांती बद्दल अगदी तुमच्यासारखेच मत आहे, याच प्रकारे आधी मिस्वाक वापरायचो पण त्यांचा दर्जा नंतर खूप खराब झाला...

In reply to by संदीप डांगे

मला एखादी वस्तू आवडली नाही याचे कारण मी कंपनी मालकाचा द्वेष करतो म्हणून असे समजणे विचित्र आहे, मिठाई खात खात हलवायाशी भांडण करावे लागते डांगेण्णा..

In reply to by धर्मराजमुटके

उत्कृष्ट प्रतिसाद. मात्र मला दंतकांती आवडली नाही. एकदा वापरुन बघितली. कशीबशी संपवली आणि परत क्लोज अप / कोलगेट कडे वळलो. मिसवाक तर मला अजिबातच आवडत नाही. विको खुप महाग म्हणुन आणायचो नाही. डाबर रेड कधी वापरावीशी वाटली नाही. साबणाबाबत म्हणाल तर मला स्वतःला लक्स आवडतच नाही. घरचे कधीमधी आणतात. आणला की वापरतो. कटाक्षाने स्वदेशी वापरावे असे काही मत नाही पण स्वदेशी कंपन्यांचे साबण विदेशी कंपन्यांपेक्षा जास्त चांगले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. मी स्वतः अनुवेद, अफगाण (हा सहज मिळत नाही), फॅब इण्डिया (हे स्वदेशी आहेत की नाही ते माहिती नाही), पार्क अव्हेन्यु आणि सिंथोला ला पसंती द्यायचो. आता पतंजलीचे साबण नक्कीच चांगले आहेत (बरेचसे पण सगळेच नाही). त्यामुळे सध्या ते आणी हिमालयाज चे साबण वापरतो आहे). जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले.