त्रिपुरसुन्दरी
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !!
तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील . म्हणजे साधारण एखाद्या कोकणस्थ माणसाकडील न्याहारी , सकाळचे जेवण , दुपारचे भूकलाडू आणि रात्रीचे जेवण एवढ सगळं मिळून होणार नाही इतका मेनू तर एका जेवणात होता . (सकाळचे जेवण दुपारी ३ ला होते हे सांगायला नकोच) असो , विषय परत लायनीवर आणतो. तर पुरणपोळी , खीर , श्रीखंड असा भरगच्च गोडाचा मेनू होता. आणि माझा झाला होता देवानंद . मला काही गोड घशाखाली उतरत नव्हतं . त्यामुळे मी आपलं या मांडीवरून त्या मांडीवर असं करत केव्हा एकदा सगळे आवरतं घेतायत या विचारात होतो ...
आणि हाच तो जालीम क्षण , जेव्हा माझ्या समोर ती बला आली. माझ्या बाजूलाच बसलेले एक आजोबा मला म्हणाले “कारे ? घे की एक पुरणपोळी आणखी !!”. हो-नको करता करता माझ्या ताटात पुरणपोळी वाढली गेलीच. मी कुरकुरत मला आवडत नाही वगैरे पुटपुटत होतो. तेवढ्यात ते आजोबा म्हणाले , “कसे रे तुम्ही आजकालचे जवान ? इतक्यात गुंडाळला गाशा ? घे घे एक पोळी घे मी सांगतो तुला कसं खायचं !!”
असं म्हणून त्यांनी मोर्चा स्वयपाकघराकडे वळवला आणि “सुनबाई sssssss जरा तूप पिठीसाखर लिंबू वेलदोडा पूड आण गं !!” असा आदेश सोडला . झाssssलं ….. ईकडे माझा देवानंद सोडून आता "राजेंद्रकुमार कम भारतकुमार" झाला होता . मला वाटलं आता आजोबा पुरण-गिरण कसं करतात प्रात्यक्षिका सकट सांगतात का काय ?
पण नाही ... म्हातारा तितका पण वाईट नव्हता. त्यांनी माझ्या ताटात एक गरमागरम पुरणपोळी वाढायला लावली , त्यावर लोणकढया तुपाची धार धरली अन मला ते नीट पसरवून घ्यायला लावलं ... अन मग इथे खरी “रेशिपी” सुरु झाली ... त्या पसरलेल्या तुपावर साधारण २-३ चमचे पिठीसाखरेचा थर घालण्यात आला , मग परत थोडं तुप त्यावरून लावून ... सरप्राईज एलिमेंट “लिंबू” मागवण्यात आला ... !! आजोबा म्हणाले “पीळ बाळा हे पोळीवर !! “ ( माझा चेहरा तेव्हा साधारणत: “सर मी ?" हे विचारणार्या मुलाचा होतो तसा झालेला .) मी आवंढा गिळून ते पिळल . मग बारी आली वेलदोडापुडीची , ती भुरभुरली त्यावर ... आणि केला पोळीचा रोल .... अन मग आजोबांच्या या "बाप्तिस्मा" प्रमाणे मान खाली घालून ( अन डोळे मिटून) मी तो घास घेतला .
आणि महाराजा sssssss ….. काय सांगू ? तो ज्या क्षणी तोंडात घोळला .... आहाहाहाहा , (Background la ते कॅथेड्रल मध्ये वाजतं न ते गोस्पेल का काय ते ... हां तेच ) काय तो क्षण ... वावावा ... (मनोमन मी त्या आजोबांना दिलेल्या शिव्या मागे घेतल्या आणि त्यांना अडिशनल १०० वर्षे ग्रांट केली. )
म्हणजे ऐश्वर्या ने अभिषेकला "हो" म्हणलं असेल तेव्हा ... जसा आनंद अभ्या ला झाला असेल ना ... तोच आनंद (कम आश्चर्य ) मी अनुभवत होतो . हीच होती माझी पहिली (शब्दश:) तोंडओळख त्या “त्रिपुर-सुंदरी”शी .
एकीकडे पुरणाची चव जिभेवर घोळतेय ... एकीकडे लिंबू आणि पिठीसाखारेचा साल्सा नाकपुड्या आणि जीभ गाजवून सोडतोय , Backdrop ला लोणकढी तुपाचा धीरोदात्त सुगंध रुंजी घालतोय ... निस्ता धिंगाणा भाऊ ... अन यात वेलदोडा म्हणजे मल्टी-ष्टरार मूवी मध्ये अचानक अपेक्षा नसताना एखादा राजपाल यादव भाव खावून जातो तसा फ्रेश अपीयरंस !!
खरय ... त्रिपुरं व्यापून उरेल असं स्वर्गसुख तुम्हाला रोज नै मिळत महाराजा .... !! बघा तुम्हाला पण भेटतेय का ही "त्रिपुर-सुंदरी" कधी !!
-
ज्याक ऑफ आल ... ( कारण व्होल वावर ईज आवर )
ता.क. : देवानंद होणे – देवानंद ने जन्मभर एक से एक खुबसुरत नट्यांबरोबर काम केले पण लग्न मात्र त्यातील एकीशीही केलं नाही .
ईथे : ताटात अत्यंत छान पदार्थ असून सुद्धा मी ते खात नव्हतो ... पदार्थांच्या बाबतीत माझा “देवानंद झाला होता .”
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन
करून पाहू लवकरच .... कुंदा ..
भाऊ,
अच्छा ...
नै ओ कुंदा खरतर बेळगावचा फेमस
पुरणपोळी वाह वाचून तो.पा.सु.
मस्त लिहिलेय!
धन्यवाद !!
:) मस्त.
धन्यवाद !!
हेच म्हणतो...
धन्यवाद !!
हाय
पुपो आवडत नाही पण तुमचा लेख
अग काय हे
:(
अरेरेरे..!
वा!! असा प्रकार करून कधी पुरण
+१
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाहीकाय भन्नाट वर्णन आहे! खाऊन पाहिलीच पाहिजे अशी त्रिपुरसुंदरी एकदा.खुसखुशीत!
वा मस्तच !
आंबट सार
भारी!
वा वा
असं असतं तर ते सगळं!
तुम्ही खा किलोभर साबुदाणा
लेख आवडला
केवळ वर्णनामुळे खाईल
छान लिहिलंय.
पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स
माझा एक भाउ, आमरस आणि भात
गजोधर, आमरस आणि कुरडइ
शिर्याबरोबर आंब्याचे लिम्बाचे
आणि हो, पापडावरून एक आठवले,
येस्स्स्स्स!!!
उडदाचा भाजलेला पापड फोडणीच्या पोळीबरोबर मस्त लागतो.
बोकाजी
अहो भाया, वरण भाताबरोबर पापड,
वरण भाताबरोबर पापड, काकडीची
चवदार धागा... :)
अशी एक पुरणपोळी खायची
कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या
+११ गुळवणी हा
वाह!!!
लेखन आवडले...
काहीही हं मुवि!
पुरणपोळी आणि खीमा यावर '
अगदी अगदी
पाचुंदा
पुरणपोळी आणि खीमा