✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

त्रिपुरसुन्दरी

ज
ज्याक ऑफ ऑल यांनी
Tue, 09/13/2016 - 16:09  ·  लेख
लेख
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !! तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील . म्हणजे साधारण एखाद्या कोकणस्थ माणसाकडील न्याहारी , सकाळचे जेवण , दुपारचे भूकलाडू आणि रात्रीचे जेवण एवढ सगळं मिळून होणार नाही इतका मेनू तर एका जेवणात होता . (सकाळचे जेवण दुपारी ३ ला होते हे सांगायला नकोच) असो , विषय परत लायनीवर आणतो. तर पुरणपोळी , खीर , श्रीखंड असा भरगच्च गोडाचा मेनू होता. आणि माझा झाला होता देवानंद . मला काही गोड घशाखाली उतरत नव्हतं . त्यामुळे मी आपलं या मांडीवरून त्या मांडीवर असं करत केव्हा एकदा सगळे आवरतं घेतायत या विचारात होतो ... आणि हाच तो जालीम क्षण , जेव्हा माझ्या समोर ती बला आली. माझ्या बाजूलाच बसलेले एक आजोबा मला म्हणाले “कारे ? घे की एक पुरणपोळी आणखी !!”. हो-नको करता करता माझ्या ताटात पुरणपोळी वाढली गेलीच. मी कुरकुरत मला आवडत नाही वगैरे पुटपुटत होतो. तेवढ्यात ते आजोबा म्हणाले , “कसे रे तुम्ही आजकालचे जवान ? इतक्यात गुंडाळला गाशा ? घे घे एक पोळी घे मी सांगतो तुला कसं खायचं !!” असं म्हणून त्यांनी मोर्चा स्वयपाकघराकडे वळवला आणि “सुनबाई sssssss जरा तूप पिठीसाखर लिंबू वेलदोडा पूड आण गं !!” असा आदेश सोडला . झाssssलं ….. ईकडे माझा देवानंद सोडून आता "राजेंद्रकुमार कम भारतकुमार" झाला होता . मला वाटलं आता आजोबा पुरण-गिरण कसं करतात प्रात्यक्षिका सकट सांगतात का काय ? पण नाही ... म्हातारा तितका पण वाईट नव्हता. त्यांनी माझ्या ताटात एक गरमागरम पुरणपोळी वाढायला लावली , त्यावर लोणकढया तुपाची धार धरली अन मला ते नीट पसरवून घ्यायला लावलं ... अन मग इथे खरी “रेशिपी” सुरु झाली ... त्या पसरलेल्या तुपावर साधारण २-३ चमचे पिठीसाखरेचा थर घालण्यात आला , मग परत थोडं तुप त्यावरून लावून ... सरप्राईज एलिमेंट “लिंबू” मागवण्यात आला ... !! आजोबा म्हणाले “पीळ बाळा हे पोळीवर !! “ ( माझा चेहरा तेव्हा साधारणत: “सर मी ?" हे विचारणार्या मुलाचा होतो तसा झालेला .) मी आवंढा गिळून ते पिळल . मग बारी आली वेलदोडापुडीची , ती भुरभुरली त्यावर ... आणि केला पोळीचा रोल .... अन मग आजोबांच्या या "बाप्तिस्मा" प्रमाणे मान खाली घालून ( अन डोळे मिटून) मी तो घास घेतला . आणि महाराजा sssssss ….. काय सांगू ? तो ज्या क्षणी तोंडात घोळला .... आहाहाहाहा , (Background la ते कॅथेड्रल मध्ये वाजतं न ते गोस्पेल का काय ते ... हां तेच ) काय तो क्षण ... वावावा ... (मनोमन मी त्या आजोबांना दिलेल्या शिव्या मागे घेतल्या आणि त्यांना अडिशनल १०० वर्षे ग्रांट केली. ) म्हणजे ऐश्वर्या ने अभिषेकला "हो" म्हणलं असेल तेव्हा ... जसा आनंद अभ्या ला झाला असेल ना ... तोच आनंद (कम आश्चर्य ) मी अनुभवत होतो . हीच होती माझी पहिली (शब्दश:) तोंडओळख त्या “त्रिपुर-सुंदरी”शी . एकीकडे पुरणाची चव जिभेवर घोळतेय ... एकीकडे लिंबू आणि पिठीसाखारेचा साल्सा नाकपुड्या आणि जीभ गाजवून सोडतोय , Backdrop ला लोणकढी तुपाचा धीरोदात्त सुगंध रुंजी घालतोय ... निस्ता धिंगाणा भाऊ ... अन यात वेलदोडा म्हणजे मल्टी-ष्टरार मूवी मध्ये अचानक अपेक्षा नसताना एखादा राजपाल यादव भाव खावून जातो तसा फ्रेश अपीयरंस !! खरय ... त्रिपुरं व्यापून उरेल असं स्वर्गसुख तुम्हाला रोज नै मिळत महाराजा .... !! बघा तुम्हाला पण भेटतेय का ही "त्रिपुर-सुंदरी" कधी !! - ज्याक ऑफ आल ... ( कारण व्होल वावर ईज आवर ) ता.क. : देवानंद होणे – देवानंद ने जन्मभर एक से एक खुबसुरत नट्यांबरोबर काम केले पण लग्न मात्र त्यातील एकीशीही केलं नाही . ईथे : ताटात अत्यंत छान पदार्थ असून सुद्धा मी ते खात नव्हतो ... पदार्थांच्या बाबतीत माझा “देवानंद झाला होता .”
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
27164 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन

जेपी
Tue, 09/13/2016 - 16:19 नवीन
कुंद्याच्या पोळीवर तुप टाकुन आणी लिँबु पिळुन खाणे भारी प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

करून पाहू लवकरच .... कुंदा ..

ज्याक ऑफ ऑल
Tue, 09/13/2016 - 16:22 नवीन
करून पाहू लवकरच .... कुंदा ... म्हणजे करवीर नगरी न ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

भाऊ,

जेपी
Tue, 09/13/2016 - 19:20 नवीन
भाऊ, मकरसंक्रांतीला तिळगुळ च्या पोळ्या करतात. त्याला आमच्याकडे कुंद्याच्या पोळ्या म्हणतात. (मराठवाडी)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्याक ऑफ ऑल

अच्छा ...

ज्याक ऑफ ऑल
Wed, 09/14/2016 - 11:45 नवीन
मला हा शब्द फक्त एक कोल्हापुरी गोड पदार्थाच्या संदर्भात माहित होता ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

नै ओ कुंदा खरतर बेळगावचा फेमस

राजाभाउ
Fri, 10/07/2016 - 18:01 नवीन
नै ओ कुंदा खरतर बेळगावचा फेमस आहे. त्याच्या पोळ्या करतात का माहीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्याक ऑफ ऑल

पुरणपोळी वाह वाचून तो.पा.सु.

महासंग्राम
Tue, 09/13/2016 - 16:22 नवीन
पुरणपोळी वाह वाचून तो.पा.सु.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलेय!

यशोधरा
Tue, 09/13/2016 - 16:42 नवीन
मस्त लिहिलेय!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

ज्याक ऑफ ऑल
Wed, 09/14/2016 - 11:46 नवीन
मंडळ आभारी हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

:) मस्त.

पद्मावति
Tue, 09/13/2016 - 16:49 नवीन
:) मस्त.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

ज्याक ऑफ ऑल
Wed, 09/14/2016 - 11:47 नवीन
मंडळ आभारी हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

हेच म्हणतो...

भटक्य आणि उनाड
Tue, 09/13/2016 - 16:52 नवीन
+१११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

ज्याक ऑफ ऑल
Wed, 09/14/2016 - 11:47 नवीन
मंडळ आभारी हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्य आणि उनाड

हाय

सामान्य वाचक
Tue, 09/13/2016 - 16:53 नवीन
पुरणपोळी हे माझे पहिले प्रेम आता ती सुंदरी खाऊन पहिली पाहिजे
  • Log in or register to post comments

पुपो आवडत नाही पण तुमचा लेख

अजया
Tue, 09/13/2016 - 16:59 नवीन
पुपो आवडत नाही पण तुमचा लेख आवडला!
  • Log in or register to post comments

अग काय हे

सामान्य वाचक
Tue, 09/13/2016 - 17:03 नवीन
मेरा दिल तोड दिया तुने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

:(

अजया
Tue, 09/13/2016 - 17:16 नवीन
:( पुपो न आवडणारी एकमेव देशस्थ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

अरेरेरे..!

जेपी
Tue, 09/13/2016 - 19:22 नवीन
अरेरेरे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वा!! असा प्रकार करून कधी पुरण

संजय पाटिल
Tue, 09/13/2016 - 17:06 नवीन
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाही, आता एकदा खाउन बघतो. आणि त्या बरोबर भुरकायला जर कटाची आमटी असेल तर विचारायला नको..
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
Tue, 09/13/2016 - 19:10 नवीन
वा!! असा प्रकार करून कधी पुरण पोळी खाल्ली नाही काय भन्नाट वर्णन आहे! खाऊन पाहिलीच पाहिजे अशी त्रिपुरसुंदरी एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

खुसखुशीत!

रातराणी
Tue, 09/13/2016 - 17:10 नवीन
खुसखुशीत!
  • Log in or register to post comments

वा मस्तच !

पगला गजोधर
Tue, 09/13/2016 - 19:16 नवीन
पुढच्या वेळेस ह्या रोल् मधे कुरडइ कुस्करुन टाकुन प्रयोग करा !
  • Log in or register to post comments

आंबट सार

एनिग्मा
Tue, 09/13/2016 - 19:29 नवीन
पु.पो. आंबट सारात बुडवून खायला मज्जा येते. आणि सोबत पंचामृताचे चाटण. गौरी ला होतो असा स्वयंपाक आमचा कडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

भारी!

जव्हेरगंज
Tue, 09/13/2016 - 19:50 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments

वा वा

आनंदयात्री
Tue, 09/13/2016 - 21:09 नवीन
वा वा! तुमचे शतश: धन्यवाद या लेख बद्दल.
  • Log in or register to post comments

असं असतं तर ते सगळं!

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/13/2016 - 23:02 नवीन
असं असतं तर ते सगळं!
  • Log in or register to post comments

तुम्ही खा किलोभर साबुदाणा

टवाळ कार्टा
Tue, 09/13/2016 - 23:28 नवीन
तुम्ही खा किलोभर साबुदाणा खिचडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

लेख आवडला

पैसा
Tue, 09/13/2016 - 23:07 नवीन
लेख आवडला. वाचताना एक जुनी म्हण आठवली. "कोकणस्थाकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही." पण पुरणपोळीवर लिंबू? कल्पनाच करू शकत नाहीये.
  • Log in or register to post comments

केवळ वर्णनामुळे खाईल

अनन्त अवधुत
Tue, 09/13/2016 - 23:33 नवीन
आदरवाईज पुरणपोळी आणि लिंबू?? झक्कास लिहिलंय.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

रुपी
Wed, 09/14/2016 - 02:58 नवीन
छान लिहिलंय. पुरणपोळी आणि तुपाची धार यानंतर मला बाकी काही थर द्यायला संयम राहणार नाही ;)
  • Log in or register to post comments

पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स

रेवती
Wed, 09/14/2016 - 03:06 नवीन
पिठीसारखरेपर्यंत सिक्वेन्स पाहिला होता, पण हे पुढील प्रकरण नव्याने वाचलं. नाही धाडस व्हायचं. माझा मावसभाऊ सत्यानारायणाच्या शिर्‍यात आमटी घालून खातो व आमचे चेहरे पाहून त्यास चेव चढतो. त्याच्यामते फारच भारी चव असते.
  • Log in or register to post comments

माझा एक भाउ, आमरस आणि भात

पगला गजोधर
Wed, 09/14/2016 - 09:21 नवीन
माझा एक भाउ, आमरस आणि भात खातो, एक जण आमरस व कुरडइ आवडीने खातो, एक मैत्रिण चहा व भात खाते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गजोधर, आमरस आणि कुरडइ

पद्मावति
Wed, 09/14/2016 - 11:55 नवीन
गजोधर, आमरस आणि कुरडइ कॉंबिनेशन भन्नाट लागते. मला आवडतं. आमरस भात पण ऐकलंय पण ट्राय नाही केलं. बाकी शिर्याबरोबर आंब्याचे लोणचे कधीकधी बरं लागतं. एका सिंधी मैत्रिणीचं पाहून शिर्याबरोबर(खास करून कणकेचा) पापड मी नेहमीच खाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

शिर्याबरोबर आंब्याचे लिम्बाचे

पगला गजोधर
Wed, 09/14/2016 - 11:57 नवीन
शिर्याबरोबर आंब्याचे लिम्बाचे लोणचे १+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

आणि हो, पापडावरून एक आठवले,

पगला गजोधर
Wed, 09/14/2016 - 12:00 नवीन
गरम गरम वरण भात तूप , घेऊन त्यावर पापड कुस्करून टाकायचा, अन लिंबाच लोणचं तोंडी लावायचं *पापड शक्यतो बाजरीचा व कोळश्यावर शेकलेला हवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

येस्स्स्स्स!!!

पद्मावति
Wed, 09/14/2016 - 12:03 नवीन
येस्स्स्स्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

उडदाचा भाजलेला पापड फोडणीच्या पोळीबरोबर मस्त लागतो.

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 20:56 नवीन
पोळीत शेंगदाणे आणि बरोबर तिखट लोणचे किंवा ठेचा पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

बोकाजी

पगला गजोधर
गुरुवार, 09/15/2016 - 18:45 नवीन
बोकाजी पुढच्या वेळेस प्रयोग करून जरूर पहा, फोडणीची पोळी, एअर फ्रायर मधे २०० सेंटी वर ३.५ मिनिटे फ्राय करा, एक चमचा साखर पाणी स्प्रे करा, लिंबू पिळा. अन बघा कसं टेस्टी लागतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अहो भाया, वरण भाताबरोबर पापड,

रेवती
गुरुवार, 09/15/2016 - 17:23 नवीन
अहो भाया, वरण भाताबरोबर पापड, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची पिवळी भाजी काय म्हणाल तो पदार्थ चांगला लागतो की हो..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

वरण भाताबरोबर पापड, काकडीची

पगला गजोधर
गुरुवार, 09/15/2016 - 18:46 नवीन
वरण भाताबरोबर पापड, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची पिवळी भाजी
+ आणि जिलेबी व मट्ठा ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

चवदार धागा... :)

प्रभास
Wed, 09/14/2016 - 09:18 नवीन
चवदार धागा... :)
  • Log in or register to post comments

अशी एक पुरणपोळी खायची

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 09:30 नवीन
मग एक वाटी कटाची आमटी प्यायची, मग अजून एक पुरणपोळी, मग अजून एक वाटी आमटी... and so on. याला आमच्याकडे सिमेंट चढवणे असा शब्द आहे. बाकी देशस्थ जेवणाबाबत सहमत. पण स्वयंपाक करणारा/री क-हाडे पाहिजे.
  • Log in or register to post comments

कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या

गणामास्तर
Wed, 09/14/2016 - 10:48 नवीन
कटाची आमटी ओरपत पुरणपोळ्या खाणे हि खरी मजा. गुळवणी वगैरे प्रकार पुरणपोळी सोबत वाढणाऱ्या लोकांना फटके द्यायची इच्छा होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

+११ गुळवणी हा

नाखु
Fri, 10/07/2016 - 12:57 नवीन
प्रकार नक्की का शोधला असावा याचाच शोध घेतला पाहिजे. कटाची आमटी (तर्री जाळ असेल तर )अगदी भाकरी बरोबरही मस्त चवदार लागते. माझ्या मते कटाची आमटी नखरे न करणारे रसायन आहे...भाता बरोबर्,पु पो बरोबर्,भाकरी-साधी पोळीबरोबर तित्च्क्याच गुण्या गोविंदाने नांदते. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

वाह!!!

अनिरुद्ध प्रभू
Wed, 09/14/2016 - 10:17 नवीन
आवडलं बर लेखन...उत्तम लिहिता..
  • Log in or register to post comments

लेखन आवडले...

मुक्त विहारि
Wed, 09/14/2016 - 10:36 नवीन
पुपो आणि आमरस (त्यातही केशर किंवा हापूस) हे माझे आवडते कॉबिनेशन. बाकी पुपो खावी ती आमच्या सौ.च्या हातची. तुपावर तळलेली पुपो, बाजूला चांदीच्या वाटीत घरगूती लोणकढे तूप, आमरस आणि जोडीला खंग्री वांग्याची भाजी किंवा झणझणीत खिमा असेल तर, स्वर्ग सूख. बादवे, पंचामृत आणि कटाची आमटी (डाळ शिजवतांना जास्त झालेले पाणी सांबार करतांना पण वापरता येवू शकते.) हे स्वयंपाकघरातील उरले-सुरले संपवण्यासाठी, एखाद्या गृहीणीने रचलेला कट आहे, असे माझे मत.
  • Log in or register to post comments

काहीही हं मुवि!

बोका-ए-आझम
Wed, 09/14/2016 - 11:33 नवीन
पुरणपोळी आणि खिमा? किंवा वांग्याची भाजी? मला तिन्ही आवडतात पण एकत्र नाही खाऊ शकत. आणि तुपावरच्या पुरणपोळीला परत तूप? Weird combination आहे हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुरणपोळी आणि खीमा यावर '

पद्मावति
Wed, 09/14/2016 - 12:02 नवीन
पुरणपोळी आणि खीमा यावर ''काहीही हं' ला भयंकर अनुमोदन पण तुपात तळलेली पुपो आणि वरती तूप.....आय हाय.....जन्नत!!!!! बाकी श्रीखांडावर तूप, शिर्यावर तूप पण अप्रतिम लागतं. तूप मी कशाबरोबरही खाऊ शकते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अगदी अगदी

सामान्य वाचक
Wed, 09/14/2016 - 12:22 नवीन
तूप कशातही घाला, पदार्थाची उंची फूटभर वाढते Btw बेसनाचे लाडू कुस्करून त्यात तूप आणि पिठीसाखर घालून मस्त लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

पाचुंदा

रानडेंचा ओंकार
गुरुवार, 10/13/2016 - 12:56 नवीन
याला पाचुंदा म्हणतात, ५ च्या पटीत लाडू घ्यायचे, लाडू कुस्करून त्यात तूप आणि पिठीसाखर... एक नंबर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

पुरणपोळी आणि खीमा

मुक्त विहारि
Wed, 09/14/2016 - 13:09 नवीन
त्याचे काय आहे.... मस्त तुपावरची पुरणपोळी खाल्यावर, त्याची गोड चव जायला हवी, असे माझे मत. मग २-४ घास भाकरीचे खीमा किंवा झणझणीत वांग्याच्या भाजी बरोबर खावून, जीभ थोडी हुळहूळून घ्यायची आणि मग पुपो खायची. असो, हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. एखादी पुपो अजून खाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा