Skip to main content

अता खेळी महाराष्ट्रातील कामाची

लेखक नाखु यांनी बुधवार, 31/08/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या "खासदारांनी गाव दत्तक घेऊन आदर्श खेडे" या संकल्पने अंतर्गत सचिन ने (खासदार असून्ही आपुलकीने एकेरी ऊल्लेख करावासा वाटतोय त्या बद्दल क्षमस्व्)आंध्रामधील पुत्तमराजूकन्ड्रिगा ईग्रजी नाव Puttamrajuvari Kandrika दत्तक घेतले होते साल २०१४ नोव्हेंबर. त्याचा झालेला कायापालट गोषवारा असा: पहिली भेट२०१५मध्ये दिली नंतर वारंवार कामाचा आढावा व प्रगती यांचा पाठपुरावा केला. खासदार निधीतून २.७९ कोटी रुपयाचा निधी सचिनने उपल्ब्ध करून दिला. जोडीला सरकारकडून ३ कोटी रुपयाचा निधी उपल्ब्ध झाला मूल्भूत सुविधा यांच्यावर काटेकोर खर्च करण्यात आला. घरटी स्वच्छतागृह उभारणी आणि नळ-वीज जोडणी केली गेली (गाव बहुसंख्य मागास-इतर मागासवर्गीय असूनही एकाही सरकारी योजनेतून लाभ मिळालेले नव्हते) पक्के व प्रशस्त रस्ते,सांडपाणी पुन:प्रक्रीया केंद्र्,खेळण्यासाठी क्रीडांगण आणि सार्वजनीक सभागृह्/केंद्र याचा समावेश आहे. गाव लहान असूनही (३९९ वस्ती आणि ११० घरे) जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केला गेला आहे. त्या नंतर याच महिन्यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद मधील डोंजा हे गाव दत्तक घेतले आहे. संपुर्ण वृत्त इथेअगदी छायाचित्रांसहीत पक्के व प्रशस्त रस्ते सांडपाणी पुन:प्रक्रीया केंद्र् अता वाट पहात आहे उस्मानाबादमधील या गावाच्या बदलाची. कुणी उस्मानाबादमधील मिपाकर असतील त्यांना काही माहीती असल्यास या धाग्यावर टंकावी.. वाद-प्रतिवाद्,शेरे ताशेरे स्वागतार्ह (यात माझे स्वतःचे काहीही कर्तुत्व नसून काही चांगले/विधायक घडत आहे तेही आपल्याच राज्यात हे कळावे म्हणून हा लेख प्रपंच्) सजग वाचकांना माहेत असलेल्या पण मिपाकरांना माहीत नसलेल्या अश्या खर्या खुर्या आदर्श गावाच्या कायापालट कथा मिळाल्या तर ह्या धाग्याचा उद्देश सफल होईल. ता.क. जाता जाता असाही एक प्रयत्न सचिनकडून
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5536
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

चांगली सुरुवात. सचिनने सुरुवात महाराष्ट्रातल्याच एका खेड्यापासऊन केली असती तर अधिक चांगले वाटले असते. पण हेही नसे थोडके.

सचिन आपण करत असलेल्या कामाची फारशी प्रसिद्धी न करता चांगले काम करीत असतो. त्याने आजपर्यंत अनेक चांगली कामे जाहिरात न करता केली आहेत. शिखरावर पोहोचूनसुद्धा जमिनीवर पाय ठेवून असलेल्या सचिनबद्दलचा आदर द्विगुणित झालेला आहे.

अत्यंत स्वागतार्ह...! सचिनपासून प्रेरणा घेऊन इतर खासदारांनीसुद्धा दत्तक घेतलेल्या गावांचा विकास केला असेल अशी अपेक्षा करूया.

स्पृहणिय काम ! असे काम दर वर्षी एक वेगळे गाव दत्तक घेऊन प्रत्येक आमदार-खासदाराने प्रामाणिकपणे केला तर दहाएक वर्षांत भारतात लक्षणिय विकास दिसू शकेल. मात्र, अश्या कामामध्येच, गावाचा झालेला विकास केवळ कायम ठेवावा हेच नव्हे तर तो स्वतःच्या सहकार्याने कसा वाढवत ठेवावा याचेही मार्गदर्शन गावकर्‍यांना करण्याची गरज आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र, अश्या कामामध्येच, गावाचा झालेला विकास केवळ कायम ठेवावा हेच नव्हे तर तो स्वतःच्या सहकार्याने कसा वाढवत ठेवावा याचेही मार्गदर्शन गावकर्‍यांना करण्याची गरज आहे.
हे सगळ्यात महत्वाचे

इतर सर्व खासदारांनी खासदार निधीतून केलेल्या अशा कामांचा हिशेब लोकांसमोर यायला हवा. खरे तर खूप काही होऊ शकते.

In reply to by पैसा

यासाठी प्रत्येक आमदार-खासदाराचे काम दाखविणारे संस्थळ बनविण्याचा मनसुबा दोन वर्षांपूर्वी ऐकला होता. आपल्या कामाचा हिशेब असा संस्थळावर दाखवणे गैरसोईचे वाटल्यामुळे अंतर्गत विरोध झालेला दिसतोय !

ज्या ज्या खासदारांनी जी कांहीं गावे दत्तक घेतली आहेत, त्यात त्यांनी काय काय कामे केली आहेत याचा घोषवारा जाहीर केला पाहिजे. याचे चित्रीकरण करून दूरदर्शनवर दाखवले पाहिजे, अन्यथा ह्या घोषणाच ठरतील. या बाबतीत सचिनचे अभार मानावे लागतील.

आपणही गुंतवळ ,थर्मोकोलचे तुकडे, न विरघळणारे पदार्थ आपल्या ड्रेनेज मधे टाकण्याचे सोडून देउ या. एकच लिफ्ट वापरूया. रात्री अनावश्यकपणे जिन्यातील दिवे चालू असतात ते मालवू या. खासदारानी काय केले या पेक्षाही अशा लहान वाटणार्‍या गोष्टी का लक्षात घेत नाही आपण ? किती वेल टू डू लोकाना याची चाड आहे. आमच्या इथे वर्षापूर्वी स्वछता अभियान झाले त्यावेळी सुमारे १४० लोकानी फ्लॅट बुक केले होते त्यातले फक्त दोन आले. आता बोला..... !

धन्यवाद नाखुकाका. नकारात्मक गोष्टी लिहिणं सोपं असतं पण सकारात्मक गोष्टी समोर आणणंही आवश्यक असतं. ते केल्याबद्दल धन्यवाद. रच्याकने शीर्षकाचा copyright आत्मूगुर्जींचा आहे ना? ;)

स्त्रोत महाराष्ट्र टाईम्स आजचा दिवस खासदार निधीतून होणारी कामे - व्यायामशाळा, सौर उर्जा उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देणे - भूमिगत गटार व्यवस्थापन, शौचालयाचे बांधकाम - खेळांसाठी मैदानाची उपलब्धता - राजीव गांधी भवनाची निर्मिती - पोल्ट्री फार्म, शेळ्या मेंढ्या व जनावरांची तपासणी मोहीम - ठिबक सिंचन संच बसविणे - गावकऱ्यांची आरोग्य तपासणी शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा व संगणक कक्ष स्थापन करणे - आधार नोंदणी, शेतकऱ्यांचे निर्माण, रस्ता डांबरीकरण चांगल्या कामाची प्रशंसा करण्याची वाईट्ट खोड असलेला जुनाट नाखु बिनसुपारीवाला