Skip to main content

हिशेब

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 01/09/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)

वाचने 61435
प्रतिक्रिया 291

प्रतिक्रिया

हे वैयक्तीक नाही तर समाजातल्या सध्याच्या ट्रेंड बद्दल आहे प्रत्येक वेळी निगेटिव पत्राच्या द्र्ष्टीकोनातून घटनेकडे बघणे (उपेक्षितांचे अंतरंग) हे आजकाल विद्वत्तेचे लक्षण समजले जाते आणि त्यासाठी कुठलीही गृहितके धरणे, सकारत्म पात्रांकडे अन्याय करणाऱ्या खलनायकासारखे बघाणे, सिलेक्टिव्ह अँड कन्विनिएंट रिडींग बिटवीन द लाइन हे कौशल्य असावे लागते. त्याला जर प्रस्थापित/विस्थापित , जातीय समीकरणे, स्त्री स्वातंत्र्य, शेतकरी आत्महत्या वगैरे असला तडका दिला ना कि मग रेसिपी जमून येते. .....आशुतोष बघा संदीप कुमारचा कसा बचाव करतो

In reply to by झेन

"समाजाचे ट्रेंड" काढायला पूर्ण सांख्यिकीशास्र फाट्यावर मारून , इव्हनिंगवॉक वर आलेली भाची पाहून निष्कर्ष काढणे ह्यातच काय ते ह्या धाग्याचे सार सामावले आहे, बाकी पात्र "negative" असल्याचा निष्कर्ष मजेशीर आहे, वैयक्तिक अनुभवाला सामाजिक लेव्हल पर्यंत सत्यच समजण्याच्या वृत्तीवर हसावे का रडावे हे तर आतापर्यंत कळत नव्हतं मात्र स्वतः रिडींग बेटवीन द लाईन्स करून स्त्रियांचे प्रश्न ते शेतकरी प्रश्न ह्यांना तडका म्हणून सर्टिफाय करणाऱ्या बृहस्पती वृत्तीचेही आश्चर्य वाटते!

मोगाखान मोड ऑन.. एक बायको व तीन मोलकरणी ! त्यापेक्षा धर्म बदलून चार बायकाच केल्या असत्या तर जास्त सुखी झाला असता ना?

In reply to by चंपाबाई

शनिवार रविवार चार बायकांची चार पोर सांभाळायची? काहीही हं.

In reply to by चंपाबाई

@ चंपाबाई घरचं झालं थोडं नि व्याह्या नं धाडलं घोडं

In reply to by संदीप डांगे

जरा खयालोकी नर्सरी बनने दो. छोटे छोटे खयालोंकी टीमे बनाकर मॅच होने दो. तो आयेगा मजा.

In reply to by चंपाबाई

त्या नंतर मुलगी धर्म कार्यासाठी इशरत जहाँ सारखी शाहिद झाली किंवा इसिस वाल्या पुरुषांच्या "सेवेत " गेली कि मज्जाच मज्जा !! आपण या दृष्टीने ट्रैनिंग सुरु केले असेलच नाही का मोगा खान ??