Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by झपाटलेला फिलॉसॉफर on Tue, 08/30/2016 - 19:19
कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे. हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल . आगावू धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 11529 views

प्रतिक्रिया

Submitted by राजाभाउ on Wed, 08/31/2016 - 12:58

In reply to नाही मिळत तर जाऊ दे ना.. by चिनार

Permalink

वटणीवर आणायच म्हणजे काय करायच

वटणीवर आणायच म्हणजे काय करायच चोरया,मारया , खुन, भ्रष्टाचार, बलात्कार .... वगैरे असत तर ठीक हाय पण त्यांचा (पुण्यात्म्यांचा) हा प्रॉब्लेम हाय विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट याला कस वटणीवर आणायच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/31/2016 - 13:14

In reply to वटणीवर आणायच म्हणजे काय करायच by राजाभाउ

Permalink

याला कस वटणीवर आणायच.

याला कस वटणीवर आणायच.
शादी के पैले जै हनुमान शादी के बाद जै श्रीराम
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 12:44

In reply to म्हंजे भारतात जन्म by चिनार

Permalink

अवं त्याइच्याबी काई अडचणी

अवं त्याइच्याबी काई अडचणी असतील, आपलाले का मालूम, आपण का पवित्र आत्मे हावो?
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 08/31/2016 - 12:52

In reply to अवं त्याइच्याबी काई अडचणी by संदीप डांगे

Permalink

हे बी खरंय राजा...

हे बी खरंय राजा... माय जौदे..पण थुम्ही अकोल्यात राहून बी अपवित्र कसं काय ऱ्हायले? राजेश्वराच्या मंदिरात जात न्हवते काय ??
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:18

In reply to हे बी खरंय राजा... by चिनार

Permalink

सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात

सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात जन्माले येतात मंग ते जगाचा उद्धार कराले बाहेर पडतात हे आमचं शिक्रेट हाये. आमि का सांगावं? "they are among us"
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 08/31/2016 - 14:12

In reply to सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात by संदीप डांगे

Permalink

थेच म्हनो मी..मले मालूम हाय

थेच म्हनो मी..मले मालूम हाय ना थुमच शिक्रेट..पन साऱ्यासमोर आनायाचं व्हतं.. बाकी माये अकोल्यातले तीन वर्ष लयच गजब होते..त्याच्यावर लिहीन म्हंतो कधीतरी..
  • Log in or register to post comments

Submitted by संन्यस्त खड्ग on Wed, 08/31/2016 - 13:10

Permalink

एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु? ज्या अपत्याचे आईबाप त्याचे parenting नाकारतात तो व्यक्ती काय संस्कार घेऊन मोठा होईल? समाजाविषयी किती प्रेम आपुलकी असेल ? असा समाज भलेही सामाजिक आर्थिक प्रगती साध्य करूही शकेल पण... पण... पण... एकं सत् विप्र बहुधा वदन्ति सारखे स्वानुभवी तत्वज्ञान तो मांडू शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:19

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

भाई, आपका लॉजिक भोत भोत

भाई, आपका लॉजिक भोत भोत गंडेला है!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/31/2016 - 13:22

In reply to भाई, आपका लॉजिक भोत भोत by संदीप डांगे

Permalink

गंडेला म्हणजे काय पारच

गंडेला म्हणजे काय पारच गंडेलाय मला पण ते लाघवी बिघवि बरच काय काय आठवतंय. जौ दे. उगी कशाला त्या आठवणी.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 13:34

In reply to गंडेला म्हणजे काय पारच by अभ्या..

Permalink

नंतर परत विचार केला तर

नंतर परत विचार केला तर साहेबांना पाश्चात्त्य जीवनशैलीवर निशाना साधायचा तर नाहीना असं वाटून गेलं...
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 08/31/2016 - 14:04

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

तुमच्या गुरूंना म्हणावं

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Wed, 08/31/2016 - 14:04

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

तुमच्या गुरूंना म्हणावं

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 14:07

In reply to तुमच्या गुरूंना म्हणावं by गणामास्तर

Permalink

उर्ध्वरेतन पद्धती >> काय

उर्ध्वरेतन पद्धती >> काय अस्ते ओ ते?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/31/2016 - 14:14

In reply to उर्ध्वरेतन पद्धती >> काय by संदीप डांगे

Permalink

ते नदीपात्रातील रेती उचलायची

ते नदीपात्रातील रेती उचलायची पध्दत असते. मग नदीपात्रात खड्डे पडतात. पात्र बदलते. एकूणच प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. सध्या बंदीय सरकारकडून. तरीही काही लोक करतात. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/31/2016 - 14:20

In reply to ते नदीपात्रातील रेती उचलायची by अभ्या..

Permalink

झालं का? आता प्रतिसाद परत

झालं का? आता प्रतिसाद परत कळफलकात घ्या. म्हणजे तुम्ही कसे बुद्धीमान, तेजपुंज वगैरे राहाल.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 08/31/2016 - 16:48

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

अरेरे

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु?
अरेरे शकुंतलेच्या पोटचा भरत, कुंतीच्या पोटचे धर्म/अर्जुन/भीम .... सर्व संभोगसुखाच्या पोटी जन्मलेले लोकं समाजमित्र की समाजशत्रु ???
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 09/01/2016 - 08:37

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

आजपर्यंत जन्मलेले सगळे मानवप्राणी हे

हे संभोगातूनच जन्मलेले आहेत. आजकाल या शब्दांना काय अर्थ आहे? पूर्वीच्या काळी asexual reproduction व्हायचं की काय माणसांमध्ये?
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on गुरुवार, 09/01/2016 - 14:37

In reply to एका जुन्या जाणत्या मिपाकराचे मत by संन्यस्त खड्ग

Permalink

brahmadnyani

brahmadnyani jabal - tyanchi katha vachali ahe? Nasel tar vaacha!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 08/31/2016 - 14:41

Permalink

भारतीय / हिन्दु / मराठी

भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा......
मराठी समाज हा हिन्दु / भारतीय पेक्षा वेगळा आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Wed, 08/31/2016 - 15:10

Permalink

=))

गंभीरपणे काही विचार लिहायचे होते, पण इथले प्रतिसाद वाचून अशक्य हसायला येतंय, काय लिहायचं होतं तेही इसरलंय, आपण कसे घडलोत, म्हणजे ते पुण्यवान, ज्ञानी इ. असे आपण आहोत का, असल्यास नवीन पिढीला तसेच घडवायचे, तसे नसल्यास आपण जसे घडलो त्याच्या बरोबर उलटया पद्धतीने घडवायचे, सिंपल !!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 08/31/2016 - 17:12

Permalink

अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे

आता अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे विषय निघालाच आहे, तर हा धागाही वाचून घ्या म्हणतो: http://www.misalpav.com/node/23698
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 09/01/2016 - 01:25

Permalink

धर्माची टिंगल

आतिवास,
>> पण ओढूनताणून दरवेळी 'सनातन धर्म' या संकल्पनेची टिंगलटवाळी करण्यामागचा तुमचा उद्देश समजला नाही.
तुमच्याशी याबाबत सहमत आहे. लेखात पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी / कणखर वगैरे जन्म घेणारे आत्म्यांच्या जागी राजकारणेच्छुक नेतेमंडळी टाका. स्पिरिच्युअल कोशंटच्या जागी नीतिमत्तेची पातळी टाका. बघा आजच्या समाजाचं मूर्तिमंत वर्णन उभं राहतं की नाही ते. वर अभ्या.. म्हणतात की गेले उडंत .... आमचे आम्ही तयार करु. तर आता भ्रष्ट नेतेमंडळींच्या गराड्यात चारित्र्यवान माणसे अभ्या.. कशी निर्माण करणार आहेत ते समजून घ्यावयास आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on गुरुवार, 09/01/2016 - 09:10

In reply to धर्माची टिंगल by गामा पैलवान

Permalink

धन्यवाद सहमतीसाठी.

धन्यवाद सहमतीसाठी. पण तुम्ही जे म्हणताय ते मी म्हणत नाहीये. माझा रोख वेगळा आहे. असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 09/01/2016 - 11:59

In reply to धन्यवाद सहमतीसाठी. by आतिवास

Permalink

चर्चा आणि मतैक्य

आतिवास, तुमचा रोख वेगळा असला तरी चालेल. तुम्ही म्हणता की धर्म प्रवाही असायला हवा, त्याने नवी मू्ल्ये, संकल्पना स्वीकारायला हव्यात, तो समतेचं मूल्य मानणारा हवा, तो सर्वसमावेशक हवा ... इत्यादि, इत्यादि. तर माझा प्रतिसाद हे त्या दिशेने उचललेलं छोटंसं पाऊल म्हणून समजा. अर्थात, ते तुम्हाला शंभर टक्के पटायलाच हवं असा आग्रह मी धरू शकंत नाही. :-) चर्चा व्हावी पण मतैक्याची अपेक्षा नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 09/01/2016 - 01:27

Permalink

बोका-ए-आझम,

बोका-ए-आझम, >> माझ्या मते it's high time we stop taking religion seriously. साफ चूक. आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. म्हणूनंच माझ्या मते it's high time we start taking religion seriously. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 09/01/2016 - 13:58

Permalink

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .
नका येऊ म्हणावं , तसंही येऊन काही होईल त्यांच्या हातून असं नाही वाटत असले येडछाप विचार असतील तर. स्वतःच्या हातून काही झालं नाही कि प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या नावावर , आणि त्यातही "आजकाल ची पिढी ना " म्हणत आपलं वाढलेलं पोट खाजवत आंबट ढेकरा द्यायची घाणेरडी सवय असते बऱ्याच लोकांना.
त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे
आणि हे कोण ठरवलं ? या गृहस्थांनी काय मिळवलाय आयुष्यात ? किती लोकांना अन्नाला लावलं ? किती लोकांचं भलं केलं ? (अध्यात्मिक नका सांगू. पोटापाण्याचा प्रश्न किती लोकांचा मिटवला ते सांगा). मागच्या पिढ्या सगळ्या चांगल्याच होत्या का ? काही विदा आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 09/01/2016 - 14:39

Permalink

झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे

झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे नानासाहेब नेफळे असावेत का?
त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
जगाचं माहिती नाही, पण मिपावर अनेक पुण्यवान आयडी फिरूनफिरून नव्याने जन्म घेत असतात व त्यामुळे संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेले धागे व प्रतिसाद अजिबात पहायला मिळत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 09/01/2016 - 17:45

In reply to झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे by श्रीगुरुजी

Permalink

करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !

करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !
  • Log in or register to post comments

Submitted by कायरा on गुरुवार, 09/01/2016 - 21:04

Permalink

मेणबत्ती विझली की विझली. मग

मेणबत्ती विझली की विझली. मग एका मेणबत्तीने दुसर्‍या मेणबत्तीत प्रवेश केला असे कधी होत नाही. माणसाचे पण तसेच आहे. एकदा मेला की मेला. मग त्याचा आत्मा या शरीरातून दुसर्‍या शरीरात गेला अस कधी होत नाही. ज्ञानी माणसाचा आत्मा तो मेला की संपला. मग तो आत्मा दुसर्‍या ज्ञानी माणसाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी वाट बघतो व त्याला योग्य जागा सापडत नाही हे सर्व हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 09/02/2016 - 02:06

Permalink

चरणकमल

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 09/02/2016 - 02:06

Permalink

चरणकमल

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com