Skip to main content

आत्मा की आवाज

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 30/08/2016 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे. हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल . आगावू धन्यवाद

वाचने 11626
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

आता अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे विषय निघालाच आहे, तर हा धागाही वाचून घ्या म्हणतो: http://www.misalpav.com/node/23698

आतिवास,
>> पण ओढूनताणून दरवेळी 'सनातन धर्म' या संकल्पनेची टिंगलटवाळी करण्यामागचा तुमचा उद्देश समजला नाही.
तुमच्याशी याबाबत सहमत आहे. लेखात पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी / कणखर वगैरे जन्म घेणारे आत्म्यांच्या जागी राजकारणेच्छुक नेतेमंडळी टाका. स्पिरिच्युअल कोशंटच्या जागी नीतिमत्तेची पातळी टाका. बघा आजच्या समाजाचं मूर्तिमंत वर्णन उभं राहतं की नाही ते. वर अभ्या.. म्हणतात की गेले उडंत .... आमचे आम्ही तयार करु. तर आता भ्रष्ट नेतेमंडळींच्या गराड्यात चारित्र्यवान माणसे अभ्या.. कशी निर्माण करणार आहेत ते समजून घ्यावयास आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्यवाद सहमतीसाठी. पण तुम्ही जे म्हणताय ते मी म्हणत नाहीये. माझा रोख वेगळा आहे. असो.

In reply to by आतिवास

आतिवास, तुमचा रोख वेगळा असला तरी चालेल. तुम्ही म्हणता की धर्म प्रवाही असायला हवा, त्याने नवी मू्ल्ये, संकल्पना स्वीकारायला हव्यात, तो समतेचं मूल्य मानणारा हवा, तो सर्वसमावेशक हवा ... इत्यादि, इत्यादि. तर माझा प्रतिसाद हे त्या दिशेने उचललेलं छोटंसं पाऊल म्हणून समजा. अर्थात, ते तुम्हाला शंभर टक्के पटायलाच हवं असा आग्रह मी धरू शकंत नाही. :-) चर्चा व्हावी पण मतैक्याची अपेक्षा नाही. आ.न., -गा.पै.

बोका-ए-आझम, >> माझ्या मते it's high time we stop taking religion seriously. साफ चूक. आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. म्हणूनंच माझ्या मते it's high time we start taking religion seriously. आ.न., -गा.पै.

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .
नका येऊ म्हणावं , तसंही येऊन काही होईल त्यांच्या हातून असं नाही वाटत असले येडछाप विचार असतील तर. स्वतःच्या हातून काही झालं नाही कि प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या नावावर , आणि त्यातही "आजकाल ची पिढी ना " म्हणत आपलं वाढलेलं पोट खाजवत आंबट ढेकरा द्यायची घाणेरडी सवय असते बऱ्याच लोकांना.
त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे
आणि हे कोण ठरवलं ? या गृहस्थांनी काय मिळवलाय आयुष्यात ? किती लोकांना अन्नाला लावलं ? किती लोकांचं भलं केलं ? (अध्यात्मिक नका सांगू. पोटापाण्याचा प्रश्न किती लोकांचा मिटवला ते सांगा). मागच्या पिढ्या सगळ्या चांगल्याच होत्या का ? काही विदा आहे का ?

झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे नानासाहेब नेफळे असावेत का?
त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.
जगाचं माहिती नाही, पण मिपावर अनेक पुण्यवान आयडी फिरूनफिरून नव्याने जन्म घेत असतात व त्यामुळे संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेले धागे व प्रतिसाद अजिबात पहायला मिळत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !

मेणबत्ती विझली की विझली. मग एका मेणबत्तीने दुसर्‍या मेणबत्तीत प्रवेश केला असे कधी होत नाही. माणसाचे पण तसेच आहे. एकदा मेला की मेला. मग त्याचा आत्मा या शरीरातून दुसर्‍या शरीरात गेला अस कधी होत नाही. ज्ञानी माणसाचा आत्मा तो मेला की संपला. मग तो आत्मा दुसर्‍या ज्ञानी माणसाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी वाट बघतो व त्याला योग्य जागा सापडत नाही हे सर्व हास्यास्पद आहे.

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.