दिनु आणि जान्या आजा
ही कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी
अरे!!! थांब का ईतका घाईत चालु राहिलाय . पाठीमागुन दिनुला कुणीतरी आवाज दिला .आवाज ऐकुन दिनु मागे वळला बघतो तर कुणीतरी काठी टेकत टेकत त्याच्या दिशेन येत होतं.
आजुबाजुला काळोख असल्यामुळे दिनुला नक्की कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हते.
जेव्हा तो म्हातारा जवळ आला तेव्हा दिनुने त्या म्हाताऱ्याला ओळखले.
तो म्हातारा जान्या आजा(जनार्दन) होता.
गावातील सर्वात जुना म्हातारा हाच होता. दिनुने जान्या आजाला
कुठ गेला होता . म्हनुन विचारले
तेव्हा जान्या आजा म्हणाला आरं पोरा मी शेताकडं गेलो होतो .रे!! येतांना ऊशीर झाला . बरं तु कुठ गेलता.
मी पन शेतातच गेलतो. खेकडं पकडायला .
पन एक पन नाही घावल.
बरं चल मग आता घरी येळ झालाय.
तुला तर माहीतच आहे वाटेत .
तांबड्याच रान लागत तिठ हडळ निघते ते.
दिनुने हे ऐकताच त्याच्या अंगावर काटा आला ..
अरे जान्या आजा काही पन गोष्टी नको काढु लय भिती वाटते.
बरं बाळा चल लवकर नाही काही बोलत . दोघेही अंधारातुन न बोलता बांधावरुन चालत होते. हळुहळु तांबड्याच रान आल सगळीकडे गर्द झाडी होती.
पानांची सळसळ , रातकिड्यांची किरकिऱ कानावर येत होती.
तेवढ्यात समोरुन एक बाई पळतच समोरच्या झुडुपाआड गेली.
दिनु व. जान्या आजाने ते बघितले हे बघुन दिनु ओरडनारच होता पन जान्या आजाने त्याला गप रहा सांगितले.
दिनु ने जान्या आजाचा हात घट्ट पकडला होता.
आता वातावरण खुपच बदलले होते.
सोसाट्याचा वारा, कोल्हेकुई , मध्येच मांजरांचा आवाज...
हे काय होतंय आजा दिनुने न रहावुन विचारले.
तेव्हा जान्या आजा म्हणाला.
पोरा हा वातावरणातील बदल नक्कीच काहीतरी सांगतोय
काहीतरी भयानक होणार हे मात्र नक्की.
तु अजिबात घाबरु नको.. दिनु बाळ
मी आहे ना!!
पण जान्या आजा पुढे काही बोलणार तोच .. पाठीमागुन कुणीतरी जान्या आजाच्या डोक्यात
दगडाने घाव घातला.
पुढचे शब्द बोलायला त्यांना जमलेच नाही. ते जीव सोडुन जमिनी वर पडले..
दिनुनं मागे वळुन बघितलं .
...
व एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले..
आणि डोळ्यात एक विलक्षण चमक आली...
समाप्त.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजी सोनीयाचा
सहमत नाखुकाका...
गावातील सर्वात जुना म्हातारा
तेवढ्यात समोरुन एक बाई पळतच
(No subject)
न्हायतर मागच्या वेळची दिनूचे
काहींच्या काही कथा असा
त्याला लोलकथा असा शब्द आहे.
अरे काय हे. काल्पनिक
हडळीच नाव दिनु??
काय सूदर्ला नाही
पांडू मोड अॉन -›
...
मी पन शेतातच गेलतो. खेकडं