शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
वाचने
92930
प्रतिक्रिया
413
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता हा खर्या अर्थाने नैतीक
In reply to लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. by सुबोध खरे
त्याला हि चिंता वाटते कि
In reply to लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. by सुबोध खरे
जर तर
सगळ्यांनी आपापल्या
+1
In reply to सगळ्यांनी आपापल्या by उडन खटोला
सगळ्यांनी आपापल्या
गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या
In reply to सगळ्यांनी आपापल्या by उडन खटोला
माझी परतिक्रिया आहे कि
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
सहमत डॉक
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
+१
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा ??
In reply to +१ by श्रीगुरुजी
हो ना!
In reply to पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा ?? by कपिलमुनी
गर्भधारणा होण्याची शक्यता
In reply to पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा ?? by कपिलमुनी
भावनेच्या भरात आपण कामक्रीडा
In reply to गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या by सुबोध खरे
गोडसे साहेबसगळ्यांना ही
In reply to भावनेच्या भरात आपण कामक्रीडा by मार्मिक गोडसे
एक महत्त्वाची गोष्ट राहिली.
In reply to गोडसे साहेबसगळ्यांना ही by सुबोध खरे
धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन
In reply to एक महत्त्वाची गोष्ट राहिली. by सुबोध खरे
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट
In reply to धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन by मार्मिक गोडसे
त्या मुलीची कोणतीही शारिरीक
In reply to युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट by सुबोध खरे
"उलटी" किंवा संशय ग्रस्त
In reply to त्या मुलीची कोणतीही शारिरीक by मार्मिक गोडसे
एके दिवशी रुपाली आपली पाळी
In reply to "उलटी" किंवा संशय ग्रस्त by सुबोध खरे
सविस्तर १०० मार्कांचा निबंध
In reply to एके दिवशी रुपाली आपली पाळी by मार्मिक गोडसे
मूळ मुद्दा पहा फाटे
In reply to सविस्तर १०० मार्कांचा निबंध by सुबोध खरे
अबाबो, कसलं घमासान झालं ह्या
सहमत
In reply to अबाबो, कसलं घमासान झालं ह्या by संदीप डांगे
जाला वर पूर्ण वेळ सक्रिय
अतिशय सहमत! नाथिंग मोर टू ऍड.
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
मस्त.
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to हस्तादपि न दातव्यं गृहादपि न by शाम भागवत
+1
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
100 टक्के
In reply to जाला वर पूर्ण वेळ सक्रिय by सुबोध खरे
त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची
अतिशय सहमत
In reply to त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची by मराठी कथालेखक
थोडी भर
In reply to अतिशय सहमत by राही
साधारण किती जणांमध्ये सेक्स
In reply to थोडी भर by राही
वाह्यात प्रश्न
In reply to साधारण किती जणांमध्ये सेक्स by उडन खटोला
नाही. वाह्यात नाही
In reply to वाह्यात प्रश्न by संदीप डांगे
....
In reply to थोडी भर by राही
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता
In reply to थोडी भर by राही
अपवादात्मक परिस्थितीत आणि जोडीदाराच्या संमतीने
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता by राजाभाउ
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ???
In reply to थोडी भर by राही
त्यामुळेच लग्न केव्हाही करा
In reply to अतिशय सहमत by राही
+१
In reply to त्यामुळेच लग्न केव्हाही करा by संदीप डांगे
गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो
In reply to अतिशय सहमत by राही
गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले
In reply to गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो by मराठी कथालेखक
उगाच खुसपट काढायचा प्रयत्न
In reply to गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले by उडन खटोला
तुमच्या कथे एवढे प्रतिसाद
In reply to उगाच खुसपट काढायचा प्रयत्न by मराठी कथालेखक
डोक्यावर पडला आहात काय ?
In reply to तुमच्या कथे एवढे प्रतिसाद by उडन खटोला
मखरात बसून दिलेले प्रतिसाद
In reply to डोक्यावर पडला आहात काय ? by मराठी कथालेखक
...
In reply to मखरात बसून दिलेले प्रतिसाद by उडन खटोला
असं....मला कोणती ग्राउंड रिअ
In reply to मखरात बसून दिलेले प्रतिसाद by उडन खटोला
खरे आहे.
In reply to गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो by मराठी कथालेखक
अश्या परिस्थितीत मी काय करेल
'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही स्वविसंगत कल्पना आहे
वेगळा धागा काढायची वेळ आली!
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही स्वविसंगत कल्पना आहे by गामा पैलवान
सहमत
In reply to वेगळा धागा काढायची वेळ आली! by संदीप डांगे
लग्न आणि शरीरसंबंध
In reply to 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही स्वविसंगत कल्पना आहे by गामा पैलवान
थोडी भर, किंबहुना
In reply to लग्न आणि शरीरसंबंध by राही
गणिका = तुच्छा ?
कसं काय?
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
कुठे थांबायचं ते माहित हवं ना ?
In reply to कसं काय? by राही
गर्भारपण कुठे थांबायला
In reply to कुठे थांबायचं ते माहित हवं ना ? by गामा पैलवान
क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं.
In reply to कुठे थांबायचं ते माहित हवं ना ? by गामा पैलवान
अवघड आहे राव गापै.
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
आपल्या शरीरसुखासाठी न
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
पॅरॅडॉक्स
In reply to क्षमस्व. रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. by गामा पैलवान
न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण
लोल
In reply to न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी by राजेश घासकडवी
न जन्मलेला जीवाची म्हणजे
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण