शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
वाचने
92930
प्रतिक्रिया
413
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोच कुणाला आहे?
In reply to उघ्ड केलेली नाही. by चंपाबाई
बोच कुणाला आहे?
In reply to बोच कुणाला आहे? by सुबोध खरे
मेडिकल एथिक्स नुसार हे
In reply to बोच कुणाला आहे? by राजेश घासकडवी
चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला
In reply to मेडिकल एथिक्स नुसार हे by सुबोध खरे
ब्वॉर
In reply to चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला by राजेश घासकडवी
ह्म्म्म
काहीही शृंगापत्ती नाही
हे काहि पटले नाही.
In reply to काहीही शृंगापत्ती नाही by आजानुकर्ण
ओके डॉ.साहेब
In reply to हे काहि पटले नाही. by सुबोध खरे
मला आणखीन एक प्रश्न पडतो तो
बीज सोडलेल्या पुरुषाचे
In reply to मला आणखीन एक प्रश्न पडतो तो by राजेश घासकडवी
कोणी मिपाकर आपली सून जावई इत्यादी,
त्या डॉक्टरमित्राने रुपालीशी बोलावे
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची
In reply to त्या डॉक्टरमित्राने रुपालीशी बोलावे by गामा पैलवान
अनुप ढेरे,
गुंतागुंत
अचंबा वाटला
मला तर अशीच शक्यता जास्त
In reply to अचंबा वाटला by स्मिता.
लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणे
लग्नापूर्वी शरीर संबंध
Please forgive me for english typing.
मला तर हा प्रकार इसापनीती का
ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट
ते डॉ._______ आहेत हे स्पष्ट
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by शाम भागवत
ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by शाम भागवत
अहो मला तुमच्या बद्दल आदर आहे
In reply to ते डॉ. गुजराथी आहेत हे स्पष्ट by सुबोध खरे
लग्नापूर्वी शरीरसंबंध असणे ही
या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी
एम टी पी साठी आणखेही वॅलिड रीजन्स आहेत.
In reply to या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी by श्रीगुरुजी
वारल्या गेलो आहे!
In reply to या मुलीने जाणूनबुजून लग्नाआधी by श्रीगुरुजी
रुग्ण नसताना अशा मुलीची
In reply to वारल्या गेलो आहे! by आनंदी गोपाळ
रुग्ण नसताना अशा मुलीची सोनोग्राफी करणार्या, अन तिचे गर्भपाताचे ऑपरेशन करणार्या दोन्ही डॉक्टरांवर आजकालच्या फ्याशनप्रमाणे 'एफायार' दाखल करावा, अशी जोरदार मागणी नोंदवतो!
रुग्ण नसताना अशा मुलीची
In reply to रुग्ण नसताना अशा मुलीची by आनंदी गोपाळ
गुर्जी
In reply to रुग्ण नसताना अशा मुलीची by श्रीगुरुजी
तेच तर.. आता लिंगनिदानापर्यंत
In reply to गुर्जी by चंपाबाई
एफ आय आर करणे ही fashion आहे
In reply to तेच तर.. आता लिंगनिदानापर्यंत by पिलीयन रायडर
कोणता आजार होता?
In reply to वारल्या गेलो आहे! by आनंदी गोपाळ
वर त्या चंपाबाईंनी सुद्धा
In reply to कोणता आजार होता? by श्रीगुरुजी
पोटात जीव आहे म्हणुन तो
In reply to वर त्या चंपाबाईंनी सुद्धा by पिलीयन रायडर
गर्भपाता संबंधित असल्याच
In reply to पोटात जीव आहे म्हणुन तो by कैलासवासी सोन्याबापु
माझा प्रतिसाद नीट वाचा.
In reply to वर त्या चंपाबाईंनी सुद्धा by पिलीयन रायडर
गुर्जी
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचा. by श्रीगुरुजी
समजा त्या मुलीला फक्त तिच्या
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचा. by श्रीगुरुजी
माझ्या मते ही हत्या आहे.
In reply to समजा त्या मुलीला फक्त तिच्या by पिलीयन रायडर
तुमच्यामते तीने काय करायला
In reply to माझ्या मते ही हत्या आहे. by श्रीगुरुजी
गर्भपात करायला नको होता.
In reply to तुमच्यामते तीने काय करायला by संदीप डांगे
हो ना !
In reply to गर्भपात करायला नको होता. by श्रीगुरुजी
हा हा हा =))
In reply to हो ना ! by चंपाबाई
फिस्कन हसू आलं राव,
In reply to हा हा हा =)) by अनुप ढेरे
:)
In reply to फिस्कन हसू आलं राव, by अभ्या..
=))
In reply to हो ना ! by चंपाबाई
भारी!
In reply to हो ना ! by चंपाबाई
माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या
तुमच्या जिवश्च कंठश्च
In reply to माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या by संदीप डांगे
;) लोल!
In reply to तुमच्या जिवश्च कंठश्च by मृत्युन्जय
मनात पापी भावना नसली कि कोडे
In reply to ;) लोल! by संदीप डांगे
पॉसिबिलिटीज आर अनलिमिटेड!!! =
In reply to मनात पापी भावना नसली कि कोडे by वाल्मिक
काय राहिल्य
In reply to पॉसिबिलिटीज आर अनलिमिटेड!!! = by संदीप डांगे
=)) डांगेबुआ भयानक डांबिस
In reply to ;) लोल! by संदीप डांगे
साली फितरतही कुछ ऐसी है
In reply to =)) डांगेबुआ भयानक डांबिस by कैलासवासी सोन्याबापु
नुस्ता भयानक नाही तर
In reply to साली फितरतही कुछ ऐसी है by संदीप डांगे
हम्म..
काही लोकांचा विश्वास आहे कि
In reply to हम्म.. by पद्माक्षी
हा ना.
In reply to काही लोकांचा विश्वास आहे कि by मृत्युन्जय
धन्यवाद
In reply to काही लोकांचा विश्वास आहे कि by मृत्युन्जय
कमाल आहे
खरं सांगायचं तर खूप मनोरंजक
खूप मनोरंजक धागा
In reply to खरं सांगायचं तर खूप मनोरंजक by संदीप डांगे
कोंबडीपेक्षा मसालाच जास्त
अनुभव
लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.