Skip to main content

शृंगापत्ती

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

वाचने 92930
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

त्याला हि चिंता वाटते कि उद्या हीच मुलगी (रुपाली) तिच्या घरचे गरोदर झाल्यावर "घरचे स्त्रीरोग तज्ञ" म्हणून माझ्याकडे परत घेऊन आले तर? व्यावसायिक नीतिमत्ता बाळगून तिच्या जुन्या गर्भपाता बद्दल गप्प राहायचे आणि केस पेपर मध्ये पहिल्यांदाच गरोदर ( प्रायमि ग्रॅव्हिडा) असे खोटे लिहायचे ? कि मित्राच्या कुटुंबाला सर्व खरे सांगायचे? (जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर)
हां. हा नैतिक पेच आहे. प्रायमि ग्रॅव्हिडा असं अर्थातच लिहायचं नाही. कारण "घरच्या स्त्रीरोग तज्ञा"ला माहीत आहे की ही पहिली गर्भधारणा नाही. उलट प्रायमि ग्रॅव्हिडा असं लिहिलं तर ते व्यावसायिक नीतिमत्तेचं उल्लंघन होईल. जर त्या मुलीने आपल्या गर्भपाताबद्दल घरी सांगितले नसेल तर तो तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. डॉक्टरच्या नव्हे.

जर तर 1) गर्भाशयात राहिलेला भाग ,मुलगा म्हणून जिवंत असला तर आणि त्याने आई कुठे आहे विचारले असते तर ? 2) रुपाली समजा इम्पोटेन्ट झाली abortion नंतर तर ? 3) रुपाली ला तिच्या नवऱ्याहून अजून श्रीमंत कोणी मिळाला आणि त्या वेळी परत ती गर्भार असती तर ? 4) रुपेश ने IT मध्ये 2-3 switch मारले आणि तिच्या नवऱ्याहून जास्त श्रीमंत होऊन तिच्या आयुष्यात परत आला तर ? 5) रुपाली च्या डोळ्यात तिरस्कार ऐवजी प्रेम दिसले तर ?

सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत. अपेक्षितच. भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला. बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो! टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो! एकंदरीत असोच असो! गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.

In reply to by उडन खटोला

आपल्या स्वातंत्र्याच्या अतिरेकात आपण एखाद्या जीवाचे, एखाद्याच्या प्रेमाचे, एखाद्याच्या विश्वासाचे, एखाद्याच्या भावनांचे काय करतो आहे, याचाही विचार नाही हे अवघड आहे justify करायला

सगळ्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे प्रतिसाद दिलेले आहेत. अपेक्षितच. भार देणाराने दिला, घेणाराने काही काळ ठेवला नंतर नको वाटून टाकून दिला, टाकून देताना मदत करणारा गप्प बसला. नंतर काही काळाने आपण केलेलं काम दिसल्यानं मदत करणाऱ्याला त्रास होऊ लागला. बोलून दुःख हलकं होतं म्हणतात. ते झालेलं दिसलं नाही. असो! टोचून बोलल्यानं सुख व्हायला हरकत नाही, तेही दिसलं नाही, तेही असो! एकंदरीत असोच असो! गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे.

In reply to by उडन खटोला

गर्भात वाढणाऱ्या/नंतर मारल्या गेल्या जिवाबद्दल कुणाला काही वाटलं नाही. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति हे सगळीकडे दिसत आहे. अतिशय योग्य. आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. (आणि हे आमच्यासारख्या डॉक्टरना फार वेळा पाहावे लागते.) भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत? पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा. कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

+१ मी हेच वर लिहिले आहे. या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिली आणि नंतर कोणतेही सबळ कारण नसताना गर्भाची हत्या केली.

In reply to by श्रीगुरुजी

या मुलीने पूर्ण जाणतेपणी गर्भधारणा होऊन दिली
हे कुठुन कळला ? त्यांच्या हेल्मेटचा प्रॉब्लेम झाला असेल तर ??

In reply to by कपिलमुनी

हो.ना किंवा आपल्या समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून हेल्मेटला छिद्र पाडूनही दिलेले असू शकते. पॉसिबिलीटीज आर एंडलेस

In reply to by कपिलमुनी

गर्भधारणा होण्याची शक्यता किती हे डॉक्टरांनी वर लिहिलंच आहे आणि असा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं असतं हे देखील लिहिलं आहे.

In reply to by सुबोध खरे

भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?
सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.
पाळी चुकली तरीही काही दिवस थंड बसून राहता. मग मुलाचे अवयव तयार झालेले असतात. आता धावपळ करा. कशासाठी?
वरील लेखात मुलीच्या बाबतीत असे काही घडलेले आढळले नाही.
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली.
म्हणजे ती पहिल्या महिन्यातच तुमच्या मित्राकडे तपासायला आली असेल (त्या मुलीची पाळी नियमीत असेल असे गृहीत धरून).
त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले.
युरीन प्रेगनन्सी टेस्ट केली असती तरी चालले असते ना? सोनोग्राफी कशासाठी ? तुमच्या मित्रानी गर्भपाताच्या गोळया देऊनही दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही म्हणून छोटी शल्यक्रिया केली असे लेखात तुम्ही म्हटले आहे, ह्यात गर्भाचे अवयव तयार झाल्याचा उल्लेख आढळला नाही. ह्याचा अर्थ त्या मुलीने कायदेशीरपणे गर्भपात केलाय तर त्याला हत्या कसे म्हणता येईल? मला तर ती मुलगी प्रामाणीक वाटते. तीने गर्भपाता करण्याचे कारण सांगताना कोणतीही गोष्ट लपवली नाही. उद्या समजा तुमच्या डॉक्टर मित्राने मेडीकल ईथिक्स तोडून त्या मुलीच्या नवर्‍याला किंवा त्याच्या वडलांना मुलीच्या गर्भपाताबद्दल सांगितले व पुढे प्रकरण घटस्पोटापर्यंत गेल्यास तुमच्या मित्रावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का?

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे साहेब सगळ्यांना ही माहीती असतेच असे नाही. कधी कधी काळजी घेवूनही गर्भधारणा होतेच की.हे मान्य आहे पण गर्भ गर्भाशयातच आहे कि फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे, गर्भ एकच आहे जुळं/ तिळं आहे हे मूत्र तपासणीत कळत नाही. गर्भाशयात गर्भच आहे कि एका तऱ्हेचं कर्करोग आहे (ज्यात गरोदरपणाची मूत्र चाचणी + येते). ( पुरुषांच्या एका तर्हेच्या वृषणाच्या कर्करोगात सुद्धा गरोदरपणाची चाचणी + येते) ( http://www.cancer.org/cancer/gestationaltrophoblasticdisease/detailedgu…) अशा सर्व तर्हेच्या शंका साठी सोनोग्राफी करावी लागते. शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही. (आमच्या सरांना एका मुलीने गर्भाचे हात पाय दिसत असताना मी गरोदर असणे शक्यच नाही असे ठामपणे सांगितले. त्यावर सर शांत पणे म्हणाले बेटी एक तर तू खोटं बोलत आहेस किंवातू दुसरी व्हर्जिन मेरी असशील. तूच काय ते ठरव.) सोनोग्राफीचा रिपोर्ट काय हे मी येथे सांगणार नाही कारण व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप माझ्यावर होईल. स्वतःच्या बळावर जगू शकत नसलेल्या गर्भाचा( २८ आठवड्यापूर्वी) गर्भपात हि "हत्या" आहे का हे कायदेतज्ज्ञ सांगू शकतील. पण जे झालं ते पूर्ण कायदेशीर होतं एवढंच मी सांगू शकेन. उदा. सैनिक जेंव्हा शत्रूच्या सैनिकाला गोळी घालतो तेंव्हा ती "कायदेशीर" हत्या असते

In reply to by सुबोध खरे

एक महत्त्वाची गोष्ट राहिली. बहुसंख्य मुली तीन चार महिने झालेले असले तरी एकच महिना, दीडच महिना झाला आहे असे सर्रास खोटं बोलतात. कायद्याप्रमाणे १२ आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एकाच डॉक्टरचे मत लागते आणि १२ आठवड्यनंतर दोन डॉक्टरांची संमती लागते. हा कालावधी नक्की करण्यासाठी आणि वर म्हटल्याप्रमाणे इतर कारणांसाठी सोनोग्राफी केली जाते.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉ.खरेसाहेब. युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर तुमच्या डॉक्टर मित्राने त्या मुलीला सोनोग्राफी करायला सांगितली असती का?असा मी विचार करत होतो, परंतू सगळ्याच गोष्टी खुल्या करता येत नसतात (उदा. डॉक्टर रुग्णामधील संवाद) हे तुमच्या प्रतिसादातून कळले. अशा केसमध्ये सोनोग्राफीचे फायदेही समजले.

In reply to by मार्मिक गोडसे

युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल आणि धागा जन्मालाच आला नसता.

In reply to by सुबोध खरे

त्या मुलीची कोणतीही शारिरीक अथवा युरीन तपासणी न करता तुमच्या डॉक्ट मित्राने ती मुलगी गरोदरच आहे हे कसे ठरवले? गरोदरपणाच्या चाचणीचा क्रम थेट सोनोग्राफीने सुरू होतो का? पाळी चुकणे हे १०० % गरोदरपणाचे लक्षण आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

"उलटी" किंवा संशय ग्रस्त विचारसरणी. रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली. त्यांनी तिला गर्भाचे वय आणि स्थान इ सर्व ( वर म्ह्टल्याप्रमाणे) तपासण्यासाठी सोनोग्राफीसाठी पाठवले. मूत्र तपासणी "निगेटिव्ह" आली असती तर रूपालीला डॉक्टर कडे जायची गरजच नसती आणि धाग्याचे प्रयोजनच नसते

In reply to by सुबोध खरे

एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले
असे लेखात आहे.
रुपालीची पाळी चुकल्यावर तिने स्वतः मूत्र तपासणी केली( "कारण" तिला माहित होते.) त्यात ती गरोदर आहे हे समजल्यावर ती डॉक्टरांकडे आली.
असा उल्लेख आढळला नाही म्हणून शंका आली. त्यात तुम्ही वरील एका प्रतिसादात म्हटले आहे,
शिवाय जोवर गर्भ धारणा झाली आहे हे नक्की झालेले नसते तोवर लग्न न झालेली मुलगी "कुमारिका" आहे हे गृहीत धरून तिची आतून तपासणी करता येत नाही.
त्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल तुमचा डॉक्टर मित्र साशंक होता म्हणूनच खात्री करण्यासाठी सोनोग्राफीला पाठवले असाही अर्थ होऊ शकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

सविस्तर १०० मार्कांचा निबंध पाहिजे का? मला तो झेपणार नाही. मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.

In reply to by सुबोध खरे

मूळ मुद्दा पहा फाटे फोडण्यापेक्षा.
त्या मुद्द्यावर मी प्रतिसाद दिलेले आहेत आणि ते तुम्ही वाचलेही आहेत.
माझ्या कडून आता अधिक काही लिहिणे नाही इति लेखनसीमा
असे तुम्ही म्हटल्यामुळे तेव्हडे सोडून मला धाग्यावर पडलेल्या शंका विचारतोय, परंतू
युरीन प्रेग्ननन्सी टेस्ट निगेटीव आली असती तर रुपाली स्त्री रोग तज्ञाकडे कशाला जाईल आणि धागा जन्मालाच आला नसता.
असे चुकीची गृहीतके मांडू नका. जशी लघवीची प्रेग्ननन्सी टेस्ट चूकीची + येऊ शकते तशी चुकीची निगेटीवही येऊ शकत असेलच ना?

अबाबो, कसलं घमासान झालं ह्या धाग्यावर, अनेकांना खरेंचा साधासा मुद्दा लक्षात आलेला दिसला नाही, सगळे व्यावसायिक नितीमत्तेवर तोंडसुख घेत आहेत, चिंता वेगळीच होती डॉक्टरांच्या मित्राची!

जाला वर पूर्ण वेळ सक्रिय असणाऱ्या माणसांची एक विशिष्ट मनोवृत्ती दिसून येते. ते बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात आणि त्यांना जाल हेच जग असे वाटते. लग्नाआधी संबंध ठेवले तर त्यात वावगे नाही. आणि हे तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला/ बायकोला प्रामाणिकपणे सांगून टाका. यात सकृतदर्शनी काहीच चूक नाही. पण असे विचार करणारे लोक आपल्या भारतात किती आहेत. १-२ % ( एक ते दोन टक्के) पेक्षा जास्त नाहीत. उरलेले ९८ टक्के लोक जाला वर नाहीत किंवा तशा विचार सरणीचे नाहीत. या २% लोकांमध्ये प्रेम विवाह करणारे किती असतील ४० %. म्हणजे लोकसंख्येच्या ०.८% लोकांना सकृत दर्शनी विवाह पूर्व संबंध मान्य असतील. बाकी एकंदर प्रेमविवाहाचे प्रमाण किती असेल ते भारतात १०-१२ % पेक्षा जास्त नाही. राहिली प्रचंड लोकसंख्या आजही ठरवून विवाह करते. यात आई वडिलांचा फार मोठा वाटा नक्कीच आहे. आई वडील प्रथम "बाकी सर्व" चौकशी करतात आणि मगच मुलगा/ मुलगी "पाहण्याचा" कार्यक्रम केला जातो. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत "बहुसंख्य" पुरुष दांभिक आहेत.स्वतः बाहेर कितीही शेण खाल्ले तरी त्यांना बायको मात्र अनाघ्रात कलिकाच हवी असते. आणि त्यांच्या आय बहिणींचे पण म्हणणे "पुरुषांनी काहीही केले तर चालते पण बाईच्या जातीला असे करून चालते का? असेच दुर्दैवाने असते. वर कुणी तरी लिहिले आहे ते सत्य आहे. बरेच पुरुष "चोच मारण्याचा" प्रयत्न करतात त्यातील बहुसंख्य पुरुष "असफल" होतात. मग पुरुषी अहंकार आड येतो. मी जर धुतल्या तांदुळासारखा आहे, लग्न पूर्व संबंध ठेवला नाही( खरं तर ठेवू शकलो नाही) मग माझी बायको "स्त्री" असून कसे काय ठेवू शकते. मी छातीठोक पणे हे सांगतो कि ठरवून केलेल्या विवाहात जर मुलीने लग्नाच्या अगोदर प्रामाणीकपणे सांगितले कि माझे विवाहपूर्व संबंध होते तर ९९ % विवाह मोडतील. कोण आई, बाप किंवा आत्या मावशी आपल्या मुलाचे लग्न "अशा" मुलीशी करून द्यायला तयार होतील. "असल्या" छप्पन्न मुली आणून उभ्या करिन हा घराघरात होणारा संवाद पुनःप्रक्षेपीत होत असतो. प्रेम विवाहाला विरोध करतानाही हाच संवाद ऐकायला मिळेल. ( "अशा / असल्या" मुली हि "माझी मनोवृत्ती" नसून ऐकू येणाऱ्या संवादातील शब्द आहेत अन्यथा छिद्रान्वेषी लोक यात हि बोट घालतील प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील किती लोक" आपल्या भावाचे/ मुलाचे लग्न अशा "प्रामाणिक" मुलीशी करायला तयार होतील. माझा मुलगा / भाऊ जर "तिच्याशीच लग्न करायचे" असे म्हणाला तर मी त्याला आशीर्वाद देईन हा उदात्त विचार फक्त प्रेम विवाह असेल आणि त्या मुलाची भावनिक गुंतवणूक असेल तरच शक्य आहे.नाहीतरी मुलगा/ भाऊ लग्न करणारच आहे तर मोडता का घाला. उगाच "हात दाखवून अवलक्षण का करा" असा व्यवहारी विचार आहे बघून बघायची तर "असली" मुलगी कशाला हाच सर्वसाधारण विचार. दुर्दैवाने एखादी मुलगी अगदी तरुण वयात विधवा झाली तर तिच्याशी आपल्या भावाचे/मुलाचे लग्न करून द्यायला किती बायका तयार होतील? हे सर्व प्रेम विवाहातच शक्य आहे. लग्नापूर्वी मुलीला फायब्रॉईड( गर्भाशयात गोळा) आहे असे समजल्यावर मोडलेली लग्ने मला माहित आहेत, जेथे मुलीच्या "हातात" काहीच नसते. तसे जालावर "आधुनिक होणे" फार सोपे आहे. हस्तादपि न दातव्यं, गृहादपि न दीयते (मधली ओळ आत्ता आठवत नाही) वचने किम दरिद्रता . आणि प्रेम विवाहात जर मुलीने असे सांगितले कि माझे अगोदर प्रेम होते आणि शरीरसंबंध होते तर ४०-५० % विवाह मोडतील.हे प्रमाण प्रेमाच्या कोणत्या टप्प्यात सांगितले यावर अवलंबून असेल. भावनिक गुंतवणूक होण्याच्या अगोदर सांगितले तर जास्त विवाह मोडतील. एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला अनुभवातून आलेले शहाणपण आहे ( आणि ज्याची शास्त्रीय कारण मीमांसा आता माहिती आहे) ते म्हणजे महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे. म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात यामुळे त्या स्त्री पुरुषांची भावनिक गुंतवणूक जास्त असते. वरील केस मध्ये रुपालीचा प्रेम विवाह आहे कि ठरवून ते मला माहित नाही. "व्यावसायिक गोपनीयतेमुळे"(हा शब्द आता योनिशुचितेपेक्षा पवित्र झाला आहे) माझ्या मित्राने मला सांगितले तेवढेच मी येथे लिहिले आहे त्यामुळे रुपालीने ते तिच्या नवऱ्याला सांगितले असेल कि नाही हे माहित नाही. आजही बहुसंख्य (कदाचित १०० %) "ताईचा सल्ला' सारख्या सदरात येणारे सल्ले "तुम्ही लग्नापूर्वी काय केलेत हे नवऱ्याला/ बायकोला अजिबात सांगू नका" असेच असतात हे यामुळेच आहे. कारण अशा उपचार तज्ज्ञांना हे "अनुभवातून आलेले शहाणपण" आहे. जालावरील जग हेच खरे जग आहे असे समजणारे बरेच लोक बऱयापैकी आभासी जगात वावरत असतात असे वाटते.प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यापासुन फार लांब आहे. कोंबडीपेक्षा मसालाच जास्त चवदार झालायं हि मात्र वस्तुस्थिती. ते तसंच असतं. नुसती उकडलेली कोंबडी किती लोक खातील.

त्या डॉक्टरनी आपल्या मित्राची फसवणूक केली असे मला वाटत नाही , कारण तो मित्र मुलाचे लग्न ठरवताना डॉक्टरकडे चौकशीस आला नव्हता त्यामुळे त्याला रुपालीबद्दल माहिती देणे वा सत्य न लपवणे हे डॉक्टरचे (मित्राच्या नात्याने) कर्तव्य होवूच शकत नाही ..बाकी एक डॉक्टर म्हणून त्यांना व्यावसायिक नितिमत्ता पाळावीच लागेल त्यामुळे अपराधीपणाचे कारण नाही. बाकी लग्नाआधीचे शारिरिक संबंध हे भावी जोडीदाराला सांगितलेच पाहिजेत असे नाही पण भावी जोडीदाराने त्याबद्दल लग्नाआधी विचारले तर लपवू नये असे मला वाटते. पण त्याचबरोबर भावी जोडीदाराने त्याबद्दल (विचारायचे असल्यास) लग्नाआधि विचारावे लग्नानंतर विचारणे योग्य नाही. लग्न ठरताना मुला मुलीने स्वतःची मेडिकल हिस्टरीही एकमेकांना सांगावी असे मला वाटते . वेगवेगळे मोठे आजार, सर्जरी, फिट्स , अबॉर्शन्स , महत्वाचे अपघात, अपघाताच्या मोठ्या खुणा (जसे त्वचेवर जळाल्याचे डाग ई) याबाबत एकमेकांना अंधारात ठेवू नये. झालंच तर स्वतःला चष्मा आहे का नाही (की कॉन्टॅक्ट लेन्स वापरत आहे), केस खरेच काळे आहेत (की रंगवत आहे) , आणि पुढे जावून आपला जन्म गर्भारपणाच्या कितव्या महिन्यात झाला , कुटूंबातील अनुवंशिक स्वरुपाचे ज्ञात असणारे आजार, हे देखील होणार्‍या जोडीदाराला स्वतःहून सांगायला हवे (अर्थात हे माझे मत !!)

In reply to by मराठी कथालेखक

प्रतिसाद अगदी पटला. फक्त लग्नाआधीचे अ‍ॅबॉर्शन हा अजूनही (भयंकर) नैतिक गुन्हा समजला जातो. माझ्या मते तसे समजले जाऊ नये पण वास्तव हेच की ही गोष्ट खुल्या दिलाने स्वीकारणारे आणि ती माहीत झाल्यावर, आपल्या होणार्‍या बायकोशी आपली वागणू़क त्यामुळे न बदलणारे लोक फारच कमी सापडतील. योनिशुचितेचा पगडा समाजावर फारच मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टरांच्या मित्राला त्यामुळेच आपत्ती वाटत असावी. समागमामुळे स्त्री अशुद्ध होत नाही, अगदी लग्नपूर्व समागमानेसुद्धा, हे जर स्वीकारता आले तर गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो. आजकाल सुशिक्षित महाराष्ट्रीय समाजात चांगले शिकलेल्या मुलामुलींचे विवाह फारच उशीरा होतात. मुलामुलींचा लैंगिक कोंडमारा होतो. कित्येक मुले/मुली असे संबंध ठेवीत असतील. यात मुलाच्या बाजूला काहीच धोका नाही. पण मुलीला गर्भ राहिला तर कौटुंबिक आणि सामाजिक समस्या उद्भवते, हे वाईट आणि विषमतादर्शक असले तरी खरे आहे. लवकर विवाह उरकणे हा यावर उपाय नाही, (नाही तर जुन्या काळी मोठी चळवळ उभारून कायदा करायला लावून बंद पाडले गेलेले बालविवाहच बरे होते असे म्हणावे लागेल) तर परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता असणे हा आहे.

In reply to by राही

'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. समागमसुख हे उच्च दर्जाचे सुख (मजा, आनंद काहीही म्हणा)आहे. ज्या काळात ते सर्वाधिक प्रमाणात हवेहवेसे वाटते, त्या काळात त्यापासून मुकावे लागू नये. येथे टेनिसच्या जुन्या इतिहासातले एक उदाहरण अवांतर ठरू नये. पुष्कळ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कॅशने विंबल्डन स्पर्धा जिंकली. करंडक स्वीकारल्यानंतर मैदानात लगेचच घेतल्या जाणार्‍या मुलाखतीत नेहमीचा ठरीव प्रश्न 'तुला कसं वाटतंय विंबल्डन जिंकल्यावर' त्यालाही विचारण्यात आला. रांगड्या पीटने भर मैदानात तुडुंब स्टेडियमसमोर सांगितले 'I am thrilled. This is more thrilling than even sex' केवळ अशा अद्वितीय कामगिरीतले यश हेच सेक्समधल्या आनंदापेक्षा अधिक आनंद देऊ शकते.

In reply to by राही

साधारण किती जणांमध्ये सेक्स केला तर चालेल? कितीचा ग्रुप मान्य करावा असं आपलं मत आहे? द्रौपदी स्टाईल एका स्त्रीचे चार पाच की एखाद्या नरपुंगवाप्रमाणे एका चे आठ दहा जणींशी की जोड्या जुळवा प्रमाणे इकडे चार तिकडे चार अशा कॉम्बिनेशन्स? परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता कशी ठरवणार?

In reply to by संदीप डांगे

नाही. वाह्यात नाही लैंगिक मुक्तता परस्पर संमतीने मान्य असेल तर अशा यात शक्यता लक्षात घ्यायला हव्यात ना? अशा प्रकारच्या संबंधाने नंतर ज्या गोष्टी होतील त्याला कुणाला जबाबदार धरणार?

In reply to by राही

अगदी सहमत !

In reply to by राही

'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. आता एकदा आपण लैंगिक मुक्तता मान्य केली आणि लग्न हे केवळ शरीर संबंधांसाठी नाही हेही मान्य केले तर मग असे परस्परसंमतीने मुक्त लैंगिक संबंध लग्नांनंतर ही चालू ठेवण चुकीच का ? आता ते बेकायदेशीर आहे वगैरे मुद्दे असु शकतात, पण सध्या बेकायदेशीर हा मुद्दा जरा बाजुला ठेवला तर काय ?

In reply to by राजाभाउ

वैवाहिक जोडीदाराच्या संमतीने असायला हरकत नाही. पण स्त्रीस गर्भधारणा झाल्यास संतती कुणाची हा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून निदान स्त्रीला गर्भधारणा हवी असतानाच्या काळात तरी टाळायला हवं इतर काळात गर्भधारणा होणार नाही याची नीट काळजी घेवुन असायला हरकत नाही. पण यातला दुसरा भावनिक मुद्दाही लक्षात घ्यायला हवा की अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैवाहिक जोडिदाराबद्दलच प्रेम , आपुलकी वगैरे न वाटण्याचा धोका... थोडक्यात विवाहबाह्य शरिरिक संबंध हरकत नाही पण सदर विवाहिताने त्याकडे फक्त 'शारिरीक संबंध' म्हणून बघणे आणि भावनिक्/मानसिकदृष्ट्या न गुंतणे इष्ट. मग त्या विवाहबाह्य जोडिदाराचाही तसाच दृष्टीकोन असणे गरजेचे आहे नाहीतर ताण होवू शकतो. म्हणून विवाहबाह्य शारिरिक संबंध हे फक्त अपवादात्मक परिस्थितीतच (वैवाहिक जीवनातील शारिरिक संबंध सुरळीत नसल्याने) निर्माण झालेत तर ठीक. उदा: पती-पत्नी दीर्घकाळ एकमेकांपासून दूर असणे , कुणा एकाचा पदीर्घ आजार, कुणा एकाची प्रणयेच्छा दीर्घकाळ अत्यंत कमी वा नष्ट होणे ई ई.

In reply to by राही

> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. त्यासाठी "लग्नाचे अमीश देउन बलात्कार"साराखे कित्येक (कालबाह्य?) फौजदारी कायदे बदलावे लागतील नाही का? मला नाही वाटत की अद्याप बहुसंख्य भारतीयांच्या संरक्षणासाठी बनवलेले कायदे काही २ - ५ ट्क्के लोकांच्या सोयीसाठी बदलता येतील. तस्मात असे संबंध जेल मध्ये जावे लागण्याच्या रीस्क वरच ठेवावे लागतील

In reply to by राही

त्यामुळेच लग्न केव्हाही करा किंवा करू नका, पण सेक्स १६पासून पुढे लवकरात लवकर झाला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुलगा असो वा मुलगी, अनेक समस्या उद्भवणार नाहीत

In reply to by राही

गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो
गर्भपाताचे काही दीर्घकालीन परिणाम त्या स्त्रीच्या शरीरावर होवू शकतात असे मला वाटते म्हणून इतर मेडिकल हिस्टरी इतकेच महत्व मी गर्भपाताला दिले आहे. अर्थात मला वैद्यकीय ज्ञान नाही , डॉक्टर याबाबत अधिक काही सांगतील तर बरं होईल. बाकी 'लैंगिक मुक्तता' याबद्दल तत्वतः सहमत ...ज्या वयात शरीरसुखाची फार जास्त गरज वाटते ते वय..खरेतर कित्येक वर्षे (१६ ते २५ म्हंटले तरी ९ वर्षे होतातच) त्या सुखाशिवायच काढणे चुकिचे आहे यामुळे त्यानंतरही वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होवू शकतात. पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद संमजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे ? व्याह्वारिकदृष्ट्या अनेक प्रश्न /क्लेष निर्माण होवू शकतात, ही परिपक्वता येण्यास काही काळ जावा लागेल.

In reply to by मराठी कथालेखक

गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय? लैंगिक मुक्तता हा पुरोगामित्वाचा भाग आहे काय? आपल्या सुखासाठी एखाद्या जीवाचा जगण्याचा अधिकार त्याला न देणं हे समांजसपणाचं द्योतक आहे काय? नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.

In reply to by उडन खटोला

गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय?
माझ्या प्रतिसादात असं कुठे दिसलं ?
नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.
हे काय लॉजिक ? शिवाय प्रतिसाद तुम्हाला नव्ह्ताच राहीं यांना होता. प्रतिसाद समजला नाहि तर त्यावर उत्तर द्यायची घाई कशाला ?

In reply to by मराठी कथालेखक

तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीत त्यामुळे ते समजलेत. लैंगिक मुक्तते बरोबर येणारे side effects स्विकारण्याची तयारी नसताना उगाच त्या तथाकथित मुक्ततेचा स्वीकार परिपकवता आलेली नाही वगैरे कमेंट लोक करतात. म्हणजे तसं केल्यानंतर जे होईल त्याला परिपक्वता म्हणायचं असाच अर्थ होतो की. साधा प्रश्न आहे लैंगिक मुक्तता कशी स्वीकारणार नि त्याच्या मर्यादा कशा ठरवणार? मखरातला प्रतिसाद राही मॅडम नि तुम्ही (आणखी काही लोकांसारखे) दोघेही देता असं स्पष्ट नि थेट मत आहे. बाकी चालू द्या.

In reply to by उडन खटोला

तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीत
ज्या कथेचं त्या त्या धाग्यावर बोला.. बाकी "मखरातला प्रतिसाद" ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला माहित नाही. सांगितलेत तर बरे होईल आणि नसेल सांगता येत तर तसं सांगा

In reply to by मराठी कथालेखक

मखरात बसून दिलेले प्रतिसाद म्हणजे ग्राउंड रिअलिटी माहिती नसताना उगाच उंचावर बसून दिलेले प्रतिसाद.

In reply to by उडन खटोला

असं....मला कोणती ग्राउंड रिअ‍ॅलिटी माहित नाही असं तुम्हाला वाटतं ? उदाहरण द्या . उगाच नसती खुसपटं काढण्यापेक्षा तर्क मांडा..

In reply to by मराठी कथालेखक

'पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद समंजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे' सहमतच. पण अशा केसेस ही त्या दिशेने वाटचाल आहे. मूळ धाग्यातल्या आशयावर टीप : नको असलेला गर्भ राहिल्यावर बरेच दिवस ढिम्म राहाणे हा मूर्खपणाच. जर गर्भ राहिला नसता आणि वाढला नसता तर पुढची सगळी परिस्थिती उद्भवली नसती. मग कुणालाच अपराधगंड आला नसता.

अश्या परिस्थितीत मी काय करेल ह्याविषयी थोडंसं... 1. मी जर खरे साहेबांच्या मित्राच्या जागी असतो, तर 'तुका म्हणे उगी राहावे ,जे जे होईल ते ते पाहावे' अशी भूमिका घेईल. भविष्यात जर मित्राला किंवा त्याच्या मुलाला या सगळ्या प्रकाराविषयी कळले तर " तुमच्या संसारात मला खोडा घालायचा नव्हता म्हणून मी शांत राहिलो" असे उत्तर देईल. आत्ता सुरु असलेला संसार मोडण्यापेक्षा नंतर संबन्ध बिघडलेले चालतील. ह्याचं कारण असं की त्या दोघा नवरा बायको मधील नातं कसं आहे ह्याची मला सुतराम कल्पना नाही. कदाचित तिने त्याला सगळं सांगितले असेल किंवा नसलेही. उद्या त्याला कळल्यावर त्याने निर्णय घ्यावा. शरीरसंबंधातून तिला काही STD झाले नसतील असं गृहीत धरून सांगतो की तिला स्वीकारायचे की नाही हा तात्विक प्रश्न आहे. ह्याविषयी प्रत्येकाचे तत्व/विचार वेगळे असू शकतात. कोण बरोबर कीं चूक ते परमेश्वर ठरवेल. थोडंसं अवांतर होईल पण तरी सांगतो, लग्न आणि हनिमून झाल्यावर ,एक मुलगी तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर पळून गेलेली मी पाहिली आहे. काही दिवसांनी (साधारण 3-4 महिन्यांनी) ती नवऱ्याकडे परत आली आणि त्याने तिचा स्वीकार केला !!! कारण एकच..त्याचे तिच्यावर मनापासून प्रेम होते..!! खरे साहेब, तुमच्या मित्राला मानसिक दृष्ट्या ह्यातून बाहेर पडायला सांगा. एवढेच करणे त्यांच्या हातात आहे. 2. लग्नाआधी शरीरसंबंध असलेला/असलेली मुलगा /मुलगी मी जावई/सून म्हणून स्वीकारेल का ? सद्य स्थितीत मला एक मुलगी आहे. मुलाचे लग्नाआधी संबंध असल्याचे मला लग्नाधीच कळल्यास मी ते लग्न न होऊ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. लग्नाआधी शरीरसंबंध हे माझ्या तत्वात बसत नाहीत. पण हे कारण त्या मुलाला मी स्पष्ट सांगेल आणि त्याची बदनामी माझ्याकडून तरी होऊ देणार नाही. लग्नानंतर जर मला असे काही कळले तर त्यांच्या संसाराचा एकंदरीत रागरंग बघून मध्यस्थी करेल. कोणत्याही परिस्थितीत लग्न मोडणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय असेल. माझ्या मुलीला या गोष्टीची कल्पना आल्यास तिचा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेल आणि तिला पाठिंबा देईल. माझ्या मुलीने लग्नाआधी शरीरसंबंध ठेऊ नये यासाठी मी तिला तशी शिकवण जरूर देईल. पण याउपरही तसे काही झाल्यास आणि मुलीला त्याच व्यक्तशी लग्न करायचे असल्यास, मी त्या मुलाची पूर्ण चौकशी करून लग्नाला परवानगी देईल. त्या मुलाचे इतरही बऱ्याच मुलींशी संबंध आहेत असे कळल्यावर मी मुलीची योग्य प्रकारे समजूत काढून हे लग्न होउ देणार नाही. आता ह्या केसमध्ये माझ्या मुलीचे मी दुसऱ्या कोणासोबत लग्न लावून देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे...पोरीचा बाप म्हणून माझी भूमिका त्यावेळी काय असेल हे मी आत्तातरी सांगू शकत नाही... पण कुठल्याही परिस्थितीत आदळआपट,भांडणतंटे, मारामारी,फसवाफसवी होणार नाही असा प्रयत्न करेल. मुळात अनुभवांती माझे असे मत झाले की...कोणाच्याही आयुष्यात आपण एका प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करू शकत नाही आणि करू सुद्धा नाही... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !!!

राही,
>> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.
पहिली गोष्ट म्हणजे, जर मुक्त लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर मग लग्न करायचंच कशाला? दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी परस्परसंमत हा शब्द वापरला असला तरी या प्रकारात स्त्री पुरुषाकडून पार नागवली जाणार आहे. विवाहासारख्या संस्काराच्या बाबतीत बाजार भरतो, तर परस्परसंमतीचा काय थोर सत्संगमेळा भरणारे का? शेवटी पैसे देऊनच व्यवहार होणार आहे आणि त्यास लग्नाचं बंधन नाही. थोडक्यात काय परस्परसंमती = गणिकाहाट . वेश्येची काय हालत होते माहितीये ना ! आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

सहमत हा नक्कीच महत्वाचा / संवेदनशील विषय आहे...(माझ्या सारख्या विनापत्यांना नाही पण )निदान पालाकांसाठी तरी ..पालकांना आपला/ली वयात आलेली मुलगा/मुलगी एखाद्या भिन्नलिंगी मित्राशी संबंध ठेवू इच्छित असेल तर त्याबद्दल आपली भूमिका आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण तयार ठेवावे लागेल.. "मी म्हंटला ना एकदा नाही, मग वाद घालायचा नाही..तंगडं तोडून हातात देईन" वगैरे शैलीत हा प्रश्न हाताळता येणार नाही..तुमचे विचार काहिही असले तरी प्रश्न खूप संयमाने हाताळावा लागेल. याकरिता वेगळा धागा काढाच.

In reply to by गामा पैलवान

लग्न केवळ शरीरसंबंधासाठीच करायचे हे मत आता मागे पडते आहे. आयुष्यात बर्‍यापैकी स्थैर्य आल्यावर, मुलांचे व्यवस्थित संगोपन करता येईल, राहाण्याची सोय मनाजोगती होईल अशी खात्री वाटल्यावर आजकाल मुले लग्न करतात. निदान मुंबईत आणि मराठी उच्चशिक्षित कुटुंबांत आज ही स्थिती आहे. सर्व समाजात आणि सर्व भारतात नाही हे मान्यच. पण त्या दिशेने वाटचाल आहे हे नक्की. ह्याला माणसाच्या (सुखाविषयीच्या) वाढलेल्या अपेक्षा, व्यक्तिस्वातंत्र्याचे नवीनच उमजलेले मोल आणि त्यामुळे एकत्र कुटुंबात आणि लहान जागेत राहाण्याची तयारी नसणे असे अनेक पैलू आहेत. शेतीवरचे अवलंबित्व कमी होणे किंवा कष्टाची शेती नकोशी वाटणे, पांढरपेशे व्यवसाय/नोकर्‍या वाढणे, शहरीकरण होणे, मूळ घरापासून दूर नोकर्‍या असणे, दिवसाचा मोठा वेळ त्यासाठीच्या प्रवासात जाणे असे अनेक नवे प्रश्न आहेत जे लग्नाचा विचार पुढे ढकलतात. पुरुषाशी स्वखुशीने लग्नपूर्व संबंध ठेवणार्‍या स्त्रियांना गणिका म्हणणे ही हीन आणि पुरुषी मनोवृत्ती आहे. अनेक पुरुषही ही नैसर्गिक ऊर्मी विझवता न आल्यामुळे असे संबंध ठेवतात. आपण जिथे राहाता त्या देशात आणि अनेक पाश्चिमात्य देशात हे समाजमान्य आहे. लिव इन तर आता कायदेशीरही आहे.

राही, मुळातून गणिकेस तुच्छ मानावेच कशाला? परस्परसंमतीने सगळा व्यवहार होतोय ना? मग तिला तुच्छ मानण्यात काय अर्थ? पुरूषांना फार आवडतील अशा गणिका. समस्या लक्षात येतेय का? पुरुषी वर्चस्ववाद ही समस्या नाहीये. परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवणारी स्त्री गणिकाधर्माचं पालन करतच असते. पुढे जेव्हा ती कुणाचीतरी पत्नी होते, तेव्हा तिला पत्नीधर्माचं पालन करावं लागतं. तर गणिकाधर्म आणि पत्नीधर्म आपापल्या ठिकाणी शोभून दिसंत असले तरी ती पार वेगळी दोन टोकं आहेत. एकीचं लग्न नवऱ्याशी झालंय तर एकीचं स्वत:शीच झालंय. एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातांना स्त्रीची प्रचंड भावनिक ओढाताण होईल. तिचा आत्मसन्मान कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडेल. ही समस्या आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आनगापै., लग्नबंधनात असेपर्यंत दोघांही जोडीदारांनी एकमेकांशी निष्ठा ठेवणे नैतिक आणि कायदेशीर आहे. पण लग्नबंधन काही कारणांनी तुटले, किंवा घडलेच नाही, किंवा फार उशीरा घडले तर स्त्री-पुरुष दोघांनीही त्या त्या काळात (कधी कधी अख्ख्या आयुष्यात) शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे. ब्रह्मचर्य हेच जीवन, .... हे मरण' ही एकेकाळची आणि यथेच्छ टर उडवली गेलेली कल्पना तर आपल्या प्रतिसादांतून डोकावत नाहीय ना?

In reply to by राही

राही,
>> शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे.
मग शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करणं क्रूर नाही काय? गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का? का थांबायची/थांबवायची इच्छाच नव्हती? मग पोर पाडलंच कशाला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राही, रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. माझ्याकडून चुकीने हे तथ्य निसटलं. मात्र मूळ मुद्दा तसाच आहे. आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का!
लै गोल गोल फिरताय राव तुम्ही. "आपल्या जिभेचे चोचले पुरवायला कोण्या जीवाची हत्या करावी काय" असा प्रश्न जणू विचारत आहात. पिरांनी योग्य उत्तर दिलंय. कोणी संभोगसुख घेत असेल तर इतर कोणालाही नक्की काय समस्या आहे? त्यांचं प्रोटेक्शन वाया गेलं असेल, गोळ्या काम करु शकलेल्या नसतील. व्हाटेव्हर. पण सगळे अगदी ह्याच मुद्द्यावर का उभे राहून जोर देतायत की "तीने मजा मारली असावी" जस्ट डॉक्टरांच्या मित्राने डॉक सांगितले की तिचे अमूक एक विचार होते म्हणून?

In reply to by आजानुकर्ण

न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी करतात?
तुम्ही कधी एखादा कंडोम फेकून दिलेला नाहीये का? त्यात लाखो न जन्मलेले जीव मेलेले असतात.

In reply to by राजेश घासकडवी

हा हा. अर्थात तो वापरलेला कंडोम असेल तरच त्यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता आहे ना! (दादा कोंडकेंच्या ओळी आठवल्या चार आण्याचे तीन आणले काय गं तुम्ही केले, मला वाटलं सख्या ते फुगंच हाय मी पोरांना दिले. आता यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता बरीच कमी आहे असे वाटते) (दादा कोंडकेप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता.... काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.