मन कसे वेडे-पिसे
कधी हसे कधी रुसे
कल्लोळात भावनांच्या
कधी अलगद फसे !
मन कसे वेडे-पिसे
कधी असे कधी तसे
बोलघेवड्या मनात
मूक आठवांचे ठसे !
मन कसे वेडे-पिसे
स्वप्नं जुनी जाळितसे
शांतावल्या चितेवर
स्वप्नं नवी रचितसे !
मन कसे वेडे-पिसे
सप्तरंगी वस्त्र जसे
शुभ्र-सुखाच्या सोबती
दु:ख काळे शोभतसे !
मन कसे वेडे-पिसे
मोरपीस नाजुकसे
आठवांच्या झोतासवे
कृष्णामाथी डुलतसे !
मन कसे वेडे-पिसे
जणु नभ पोकळसे
जाता धरु नाठाळास
हाती येते कवडसे !
~पल्लवी~
वाचने
4048
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!! सुंदर
वा!!!
सुंदर कविता...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: https://sucheltas.blogspot.com
छान आहे
छान आहे कविता...
छान गती आहे. १-२-४ हे यमक आणखी मजा आणतं.
आणि
"दु:ख काळे शोभतसे !" हे तर लै भारी...
--------------------------------------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
सुरेख आहे कविता
>> मन कसे वेडे-पिसे
स्वप्नं जुनी जाळितसे
शांतावल्या चितेवर
स्वप्नं नवी रचितसे !
मन कसे वेडे-पिसे
मोरपीस नाजुकसे
आठवांच्या झोतासवे
कृष्णामाथी डुलतसे !
>>
हे तर खूपच आवडले :)
पुलेशु.
व्वा!
क्या बात है!
मन कसे वेडे-पिसे
मोरपीस नाजुकसे
आठवांच्या झोतासवे
कृष्णामाथी डुलतसे !
मन कसे वेडे-पिसे
जणु नभ पोकळसे
जाता धरु नाठाळास
हाती येते कवडसे !
ही कडवी अतिशय उच्च.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
असेच म्हणतो..
In reply to व्वा! by प्राजु
संपूर्ण कविताच सुंदर.
मन कसे वेडे-पिसे
जणु नभ पोकळसे
जाता धरु नाठाळास
हाती येते कवडसे !
यात""हाती येई कवडसे" असे केले तर?
मुमुक्षु
छान
कविता आवडली.
(मानसिक)बेसनलाडू
+१
मस्त... :)
--अवलिया
काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
मन कसे
मन कसे वेडे-पिसे
मोरपीस नाजुकसे
आठवांच्या झोतासवे
कृष्णामाथी डुलतसे !
मस्त..
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.
मस्त
मस्त आहे--- वेडे पिसे मन.
मीनल.
फेनिक्स
असल्यासारखे मन!
सुंदर कविता.
छान
शांतावल्या चितेवर
स्वप्नं नवी रचितसे !
अगदी वेगळीच कल्पना .. कविता आवडली हेवेसांनलगे !!
अजुन येउ द्या !!
सुंदर. मात्
सुंदर.
मात्रा आणि शब्दरचना छानच.
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
छान आहे
शब्द, लय, कल्पना आवडली...
:-)
अवांतर - शिधा आहे भौ केसु, रंगास्वामी...
कवि कसे वेडे पिसे
शब्द जुने रचितसे
मिपावर्ल्या लोकांवर
धडा धडा फेकितसे!
वा:
:)
मन कसे वेडे-पिसे
जणु नभ पोकळसे
जाता धरु नाठाळास
हाती येते कवडसे
वा:
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
वा...!!
मस्त झालीये अगदी नाजुक अलवार...... :)
मस्त
कविता मस्तच आहे.
सुरेख
सुरेख कविता..!
तात्या.
छान..
कविता आवडली..
सुंदर कविता
आवडली..
कविता
आवडली. नादमय आहे आणि निराळ्या उपमांचा केलेला वापरही लक्षणीय.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच
एकदम सुरेख कविता.