मन कसे वेडे-पिसे
मन कसे वेडे-पिसे
कधी हसे कधी रुसे
कल्लोळात भावनांच्या
कधी अलगद फसे !
मन कसे वेडे-पिसे
कधी असे कधी तसे
बोलघेवड्या मनात
मूक आठवांचे ठसे !
मन कसे वेडे-पिसे
स्वप्नं जुनी जाळितसे
शांतावल्या चितेवर
स्वप्नं नवी रचितसे !
मन कसे वेडे-पिसे
सप्तरंगी वस्त्र जसे
शुभ्र-सुखाच्या सोबती
दु:ख काळे शोभतसे !
मन कसे वेडे-पिसे
मोरपीस नाजुकसे
आठवांच्या झोतासवे
कृष्णामाथी डुलतसे !
मन कसे वेडे-पिसे
जणु नभ पोकळसे
जाता धरु नाठाळास
हाती येते कवडसे !
~पल्लवी~
वाचने
4032
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वा!!! सुंदर
छान आहे
सुरेख आहे कविता
व्वा!
In reply to व्वा! by प्राजु
असेच म्हणतो..
छान
+१
मन कसे
मस्त
फेनिक्स
छान
सुंदर. मात्
छान आहे
वा:
वा...!!
मस्त
सुरेख
छान..
सुंदर कविता
कविता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच