Skip to main content

मन कसे वेडे-पिसे

लेखक पल्लवी यांनी बुधवार, 28/01/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मन कसे वेडे-पिसे कधी हसे कधी रुसे कल्लोळात भावनांच्या कधी अलगद फसे ! मन कसे वेडे-पिसे कधी असे कधी तसे बोलघेवड्या मनात मूक आठवांचे ठसे ! मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे सप्तरंगी वस्त्र जसे शुभ्र-सुखाच्या सोबती दु:ख काळे शोभतसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ~पल्लवी~
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4037
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

छान आहे कविता... छान गती आहे. १-२-४ हे यमक आणखी मजा आणतं. आणि "दु:ख काळे शोभतसे !" हे तर लै भारी... -------------------------------------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

>> मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! >> हे तर खूपच आवडले :) पुलेशु.

क्या बात है! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ही कडवी अतिशय उच्च. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

संपूर्ण कविताच सुंदर. मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! यात""हाती येई कवडसे" असे केले तर? मुमुक्षु

कविता आवडली. (मानसिक)बेसनलाडू

मस्त... :) --अवलिया काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला? मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!

मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मस्त.. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

मस्त आहे--- वेडे पिसे मन. मीनल.

असल्यासारखे मन!
मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे !
सुंदर कविता.

शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! अगदी वेगळीच कल्पना .. कविता आवडली हेवेसांनलगे !! अजुन येउ द्या !!

शब्द, लय, कल्पना आवडली... :-) अवांतर - शिधा आहे भौ केसु, रंगास्वामी... कवि कसे वेडे पिसे शब्द जुने रचितसे मिपावर्ल्या लोकांवर धडा धडा फेकितसे!

:) मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे वा: खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मस्त झालीये अगदी नाजुक अलवार...... :)

कविता मस्तच आहे.

सुरेख कविता..! तात्या.

कविता आवडली..

एकदम सुरेख कविता.