असतं
आयुष्य जरी असलं अवघड
खूप काही शिकवत असतं
उतरत्या चंद्रकले प्रमाणे
जीवन आपलं सरत असत
नवी दोस्ती नवं नात
जोडणं जरी सोपं असत
एकदा जोडल्यानंतर मात्र
टिकवणं मोठं कसब असत
बघू-करू म्हणता म्हणता
आयुष्य सर्रकन सरकत असत
आठवणींचे मोती ओवता ओवता
म्हातारपण येत असत
सरणावर देह विसावतो तेव्हा
जगणं आपलं संपत असतं
तिथवर पोहोचण्याआधी मात्र
माणूस म्हणून जगायचं असतं
----------
149
वास्तव
छान आवडली.
कविता ओके टोके.
मला ते १४३ माहीत होते, हे १४९
ही कविता १४८वी आहे.
जहाँपनाह तूस्सी ग्रेट हो!
कविता आवडली.
प्रतिसादाबद्दल सर्वांनाच