✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा बाप्पा मोरया

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 07/07/2016 - 17:30  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास बरेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला. हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः १) तुम्ही स्वतः काढलेला गणेश. कोणत्याही माध्यमात असु द्या. पेन्टींग असले तर स्कॅन करुन पाठवा. म्युरल/मूर्ती असेल तर फोटो काढून पाठवा. पेन्ट फोटोशॉप मध्ये केलेला असेल तर फाइल पाठवा. फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल(एडीट न केलेली) पाठवा. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.
२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी. . आता हे कशासाठी? तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे. तर मग चला. लागा कामाला. काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील. आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत...... होऊ दे चर्चा....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
19969 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

चालेल, धावेल, नाचेल.

अभ्या..
Sat, 07/09/2016 - 09:45 नवीन
चालेल, धावेल, नाचेल. मला वाटले सुधांशू दा ओरिगामी बाप्पा देतील पण तू आहेस मग भारीच. पिंग्या लेका मला शिकीव कि थोडीसी ओरिगामी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

देणारच आहे.

सुधांशुनूलकर
Sun, 07/10/2016 - 18:45 नवीन
ओरिगामी बाप्पा तयार आहे. पण मोदक आणि उंदीर याशिवाय गणपती कसा असेल? म्हणून बाप्पाबरोबर ओरिगामी बहुरंगी मोदक आणि उंदीरही पाठवतो. पिंगूनेही जरूर पाठवावा. पिंग्या लेका मला शिकीव कि थोडीसी ओरिगामी.== थोडासा धिर्धर भावा, या डिसेंबरमध्ये मुंबईत ओरिगामी प्रदर्शन आहे, त्यानिमित्त काही सोप्या ओरिगामी कलाकृतींचे व्हिडिओ बनवून मिपावर टाकणार आहे दिवाळीच्या सुमारास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारीच ओ सुधांशूदा,

अभ्या..
Sun, 07/10/2016 - 19:06 नवीन
भारीच ओ सुधांशूदा, येऊ द्या. वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

इतरही काही माध्यमं

सुधांशुनूलकर
Sun, 07/10/2016 - 19:24 नवीन
बाप्पा साकारायला इतरही काही माध्यमं सुचली ती अशी - क्विलिंग फुलांची रांगोळी (calling आत्मूगुर्जी) रांगोळी भरतकाम, विणकाम कागदाचा लगदा (papier mâché) या माध्यमांतूनही बाप्पा साकारला तर चालेल का? चालणार असेल, तर या कलांमध्ये पारंगत मिपाकरांनी जरूर भाग घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालेल चालेल.

अभ्या..
Sun, 07/10/2016 - 19:30 नवीन
चालेल चालेल. फक्त त्याचा फोटू पाठवावा लागेल. मूळ कलाकृती मिपाला दिली तर ठेवावी कुठे हा प्रश्न असल्याने मी घरी नेईन याची नोंद घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

क्विलिंग ची कल्पना भारी आहे!!

सूड
Mon, 07/11/2016 - 15:18 नवीन
क्विलिंग ची कल्पना भारी आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट

पिशी अबोली
Sat, 07/09/2016 - 12:47 नवीन
वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट बघतेय.
  • Log in or register to post comments

बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस,

अभ्या..
Sat, 07/09/2016 - 12:50 नवीन
बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस, कोकणी,भटी किंवा मालवणीतल्या गणेशस्तुतीच्या चार ओळी लिहून पाठव. संस्कृत पण चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

येस, प्रयत्न तर होणारच..☺

पिशी अबोली
Sat, 07/09/2016 - 13:20 नवीन
येस, प्रयत्न तर होणारच..☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर

अभ्या..
Sat, 07/09/2016 - 12:54 नवीन
ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर सामील झाला पाहिजे. या ना त्या स्वरूपाने. आपले मुटेकाका पण गझल पाठवणारेत. ;) आता बघा तुम्हीच आणि काय पाठवायचे त्याच्या मागे लागा
  • Log in or register to post comments

सांस्कृतीक समरसता

माहितगार
Sat, 07/09/2016 - 13:03 नवीन
सांस्कृतीक समरसता दर्शवण्याच्या दृष्टीने गणपतीबाप्पांनी स्कलकॅप चा मुकुट घातलेलेल्या चित्राची एंट्री चालू शकेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

होय, चालेल की.

शिद
Sat, 07/09/2016 - 14:17 नवीन
होय, चालेल की. आणखी समरसता दाखवण्यासाठी गणपतीच्या हातात क्रॉस व कमरेला क्रिपाण/कॄपाण पण दाखवा, कसं? ;) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हे सुचलच नव्हतं आयडीया चांगली

माहितगार
Sat, 07/09/2016 - 14:31 नवीन
हे सुचलच नव्हतं आयडीया चांगली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

काय काय केले तर चालेल

लालगरूड
Sun, 07/10/2016 - 19:13 नवीन
काय काय केले तर चालेल
  • Log in or register to post comments

आपणास काय येते गरुडपंत?

अभ्या..
Sun, 07/10/2016 - 19:32 नवीन
आपणास काय येते गरुडपंत? कलेतील गणेशाचे कोणतेही स्वरुप पाठवा. ते घेऊ आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

आपलं काम झाल आहे... :)

लालगरूड
Mon, 07/11/2016 - 14:11 नवीन
आपलं काम झाल आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आवर सगर गोला करून

चांदणे संदीप
Mon, 07/11/2016 - 07:03 नवीन
नक्की पिल्यान काय हाय? :/
  • Log in or register to post comments

सूचना

अभ्या..
गुरुवार, 07/21/2016 - 17:43 नवीन
नमस्कार मंडळी. आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात. . डिअर सासंमं: कृपया हे धाग्यात अ‍ॅड करा.
  • Log in or register to post comments

ओकेज!!

सूड
गुरुवार, 07/21/2016 - 18:26 नवीन
ओकेज!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दादूस \o/

चांदणे संदीप
Tue, 07/26/2016 - 18:00 नवीन
आज रात्री माझ्या चार ओळी आणि एक लहानसे चित्र कम नक्षीकाम जीमेलच्या पोस्टात! हुर्रे! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्ये जिगर,

अभ्या..
Tue, 07/26/2016 - 21:09 नवीन
ह्ये जिगर, एकच वादा, संदीपदादा. धन्यवाद भावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

डन डना डन डन!

चांदणे संदीप
Tue, 07/26/2016 - 23:02 नवीन
डन डना डन डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वाह, मस्तं उपक्रम.

पद्मावति
गुरुवार, 07/21/2016 - 19:57 नवीन
वाह, मस्तं उपक्रम.
  • Log in or register to post comments

भन्नाट उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/29/2016 - 06:30 नवीन
भन्नाट उपक्रम ! मूळ कल्पना आणि प्रतिसादातल्या सूचना एक लंबर !! या वेळेचा मिपा गणेशोत्सव कलेच्या थाटामाटात चमकणार असेच दिसतेय !!!
  • Log in or register to post comments

मुलांनी काढलेले चित्र चालेल

मितभाषी
Fri, 07/29/2016 - 06:59 नवीन
मुलांनी काढलेले चित्र चालेल का
  • Log in or register to post comments

एका सदस्याच्या किमान दोन

मितभाषी
Fri, 07/29/2016 - 07:01 नवीन
एका सदस्याच्या किमान दोन एंट्री घेऊन त्यातुन बेस्ट निवडा.
  • Log in or register to post comments

मुलांनी काढलेल्या एन्ट्र्या

अभ्या..
गुरुवार, 08/11/2016 - 19:44 नवीन
मुलांनी काढलेल्या एन्ट्र्या आल्या आहेत. प्लीज, प्लीज ही स्पर्धा फक्त मिपाकरांसाठी आहे. त्यांच्या छोट्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीत सेपरेट आहे स्पर्धा. तरी बच्चेलोग अभी ठोडा रुकनेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

माझी वेंट्री पाठवली रे अभ्या

स्पा
Fri, 07/29/2016 - 07:20 नवीन
माझी वेंट्री पाठवली रे अभ्या :)
  • Log in or register to post comments

थोडे अवांतर करतोय त्याबद्दल

सौंदाळा
Fri, 07/29/2016 - 10:29 नवीन
थोडे अवांतर करतोय त्याबद्दल क्षमस्वः १००% शाडुची गणेशमुर्ती कशी ओळखायची याच्या काही टीप्स मिळतील का? पिंपरी चिंचवडमधे अशी मुर्ती कोठे मिळेल याची माहिती दिल्यास अजुन उत्तम.
  • Log in or register to post comments

आकुर्डी गावठाण

चांदणे संदीप
Fri, 07/29/2016 - 11:50 नवीन
डाखवे बंधू, मूर्तीकार. विठ्ठल मंदिरापासून सेंट उर्सुला शाळेकडे जाताना डाव्या बाजूला एका छोट्या गल्लीत पण चांगल्या मोठ्या जागेत यांचे मूर्तीचे दुकान + घर आहे. मी मागच्याच शनिवारी गेलो होतो. उदया संध्याकाळी परत जाणार आहे. सध्या त्यांच्याकडे १०० ते १२५ शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. शाडू मातीची मूर्ती ही जड असते प्लॅस्टर पेक्षा. धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

धन्यवाद सँडी

सौंदाळा
Fri, 07/29/2016 - 14:28 नवीन
धन्यवाद सँडी या किंवा पुढच्या आठवडाअखेर नक्की भेट देईन.
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Fri, 08/05/2016 - 08:51 नवीन
माझ्याकडून संदीपला धन्यवाद... येत्या शनिवारी चक्कर टाकेन (आणि हो तुझे नाव नक्की सांगणार कवीवर्य संदीपभौंनी पाठवले म्हणून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

माझी चित्रकला प्रचंड वाईट आहे

avinash kulkarni
Wed, 08/03/2016 - 13:25 नवीन
माझी चित्रकला प्रचंड वाईट आहे त्यामुळे जे काही काढेन त्याला गणपती समजून घ्याल का ?
  • Log in or register to post comments

बिंदास हो, एकदम बिंदास.

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 14:02 नवीन
बिंदास हो, एकदम बिंदास. मी काही केले तरी त्याला बॅनर म्हणतात लोक. ;) त्यामुळे घाबरनेका नै. बिंदास भेजनेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: avinash kulkarni

मिपा बरॊबरची आनंददायी सुरुवात

झुमकुला
गुरुवार, 08/04/2016 - 13:57 नवीन
मिपा बरॊबरची आनंददायी सुरुवात बाप्पाच्या म्युरलचे छायाचित्र पाठवून केली आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

दॅटस ईट.

अभ्या..
गुरुवार, 08/04/2016 - 14:06 नवीन
दॅटस ईट. मानले तुम्हाला भौ. एकच नंबर. जिओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमकुला

छान!

स्वाती दिनेश
Fri, 08/05/2016 - 13:14 नवीन
उपक्रम छान आहे, आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

पाठवायची लास्ट तारीख़ कधी

patilachaganya
गुरुवार, 08/11/2016 - 18:26 नवीन
पाठवायची लास्ट तारीख़ कधी आहे
  • Log in or register to post comments

अवं पाटील, लास्टंबेस्ट तारीख

अभ्या..
गुरुवार, 08/11/2016 - 18:28 नवीन
अवं पाटील, लास्टंबेस्ट तारीख तर १५ ऑगस्ट आहे की. पाठवा पाठवा लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: patilachaganya

अर्धा प्रयत्न झालेला आहे,

सूड
गुरुवार, 08/11/2016 - 18:35 नवीन
अर्धा प्रयत्न झालेला आहे, उरलेला अर्धा लवकरात लवकर करणेत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सुडूक फास्ट. तुझा रुमाल

अभ्या..
गुरुवार, 08/11/2016 - 19:41 नवीन
सुडूक फास्ट. तुझा रुमाल टाकलेला आहे. ऐनवेळी टांगारुपणा नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कोलाज चालेल का?

संजय पाटिल
गुरुवार, 08/11/2016 - 19:36 नवीन
कोलाज चालेल का?
  • Log in or register to post comments

होय मालक चालेल, इमेज मात्र

अभ्या..
गुरुवार, 08/11/2016 - 19:40 नवीन
होय मालक चालेल, इमेज मात्र जेपीइजी अथवा बिटमॅप द्या. (माझ्या डोसक्यात दोन टाइपचे कोलाज आलेत बरका. एक म्हणजे कागद, तंतू, कापड वगैरे फाडून त्याचे त्तुकडे एकमेकाला लावून केलेला ट्रॅडिशनल कोलाज आणि दुसरा म्हणजे सध्या अ‍ॅप्स मध्ये केला जाणारा वेगवेगळया फोटोंचा संच म्हणजे कोलाज) तुम्ही कोणता पाठवणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

नमस्कार मंडली,

अभ्या..
Tue, 08/16/2016 - 14:33 नवीन
नमस्कार मंडली, ह्या चित्रमालेला गणेशोत्सवाच्या दिवसाइतक्या १० प्रवेशिका येतील का ह्याची चिंता होती पण आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अगदी मला माहीतही नसलेल्या आयडींकडून छान छान अन वेगवेगळ्या माध्यमातली चित्रे आली आहेत. वेळ आहे आता बस्स म्हणायची. आता मिपाकरांनी कृपया चित्रे अथवा फोटो पाठवू नका. फक्त ज्यांनी काही तयार करण्यास सुरुवात केलीय त्यांनी उद्या पर्यंत (दि.१७-०८-२०१६) पाठवली तरी चालतील. त्यांची चित्रे एका धाग्यात मांडली जातील. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हे हे हे

चांदणे संदीप
Tue, 08/16/2016 - 20:12 नवीन
आस नाय दादूस.... आता बास नाय मानायचा! मिपाकर पेटलेत आता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

इतक्या उशिरा?

सूड
Tue, 08/16/2016 - 20:21 नवीन
इतक्या उशिरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

असा कं करतस बाला, जगू दे ना

अभ्या..
Tue, 08/16/2016 - 20:39 नवीन
असा कं करतस बाला, जगू दे ना मना. येवरे दिवस कं बोललो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा