नमस्कार मंडळी.
गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात.
मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास बरेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला.
हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः
१) तुम्ही स्वतः काढलेला गणेश. कोणत्याही माध्यमात असु द्या. पेन्टींग असले तर स्कॅन करुन पाठवा. म्युरल/मूर्ती असेल तर फोटो काढून पाठवा. पेन्ट फोटोशॉप मध्ये केलेला असेल तर फाइल पाठवा. फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल(एडीट न केलेली) पाठवा. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी. . आता हे कशासाठी? तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे. तर मग चला. लागा कामाला. काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील. आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत...... होऊ दे चर्चा....
वाचने
20063
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
चारोळी येत नसेल तर नुसते
ते वेगवेगळ्या एन्ट्री हायेत
In reply to चारोळी येत नसेल तर नुसते by स्पा
फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल
हा. थोडासा. ;)
In reply to फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल by यशोधरा
ओके.
In reply to हा. थोडासा. ;) by अभ्या..
मस्त उपक्रम. अनेक शुभेच्छा.
मी ही प्रयत्न करेन चित्र
ओ प्रयत्न शिंदे,
In reply to मी ही प्रयत्न करेन चित्र by किसन शिंदे
मस्त उपक्रम...
प्रयत्न करतो.
आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं
ते बघा नवनास्तिक चित्र
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
बघ की.. चित्र काढण्याचा आणि
In reply to ते बघा नवनास्तिक चित्र by सूड
सहमत. येडं असण्याला. ;)
In reply to बघ की.. चित्र काढण्याचा आणि by किसन शिंदे
अभ्या भाऊ मस्तच
In reply to सहमत. येडं असण्याला. ;) by अभ्या..
शहमत आहे
In reply to अभ्या भाऊ मस्तच by राघवेंद्र
@वल्लि
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
इतके नाय. पन्नासेक असतील :)
In reply to वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे by अभ्या..
कसं खरं उत्तर आलं.
In reply to इतके नाय. पन्नासेक असतील :) by प्रचेतस
घारापुरीचा फ़्याण्टास्टिक आहे.
In reply to कसं खरं उत्तर आलं. by अभ्या..
मी पण
In reply to कसं खरं उत्तर आलं. by अभ्या..
वल्ली गडभ्रमणातला राजगड असला
In reply to मी पण by स्वच्छंदी_मनोज
कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी
In reply to वल्ली गडभ्रमणातला राजगड असला by अभ्या..
अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा
In reply to कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी by सूड
सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि
In reply to अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा by अभ्या..
देतो जी, वायच दम धरा.
In reply to सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि by अभ्या..
आपण दोघे प्रसाद फस्त करू.
In reply to आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं by प्रचेतस
मस्त उपक्रम !
एसमास्टर आणि विरुपाजी कडून
कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर
त्याचं मन त्याला नै खाणार?
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
तुम्ही पाठवा हो
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
गुगलोबा सगळ शोधुन द्येतोय
In reply to कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर by भोळा भाबडा
चांगला उपक्रम!!
मीही प्रयत्न करेन चित्र
आयोव.....
In reply to मीही प्रयत्न करेन चित्र by रातराणी
ल्ल्लूउउउउ नवचित्रकाराचे असे
In reply to आयोव..... by अभ्या..
मैं भी
करनाच पडेंगा रे सॅन्डयीबाबा.
In reply to मैं भी by चांदणे संदीप
जल्ला आपल्याला इतकी तरल
भक्ती होनाच सोल्जरभावा. उसके
In reply to जल्ला आपल्याला इतकी तरल by कैलासवासी सोन्याबापु
बापु आम्ही पण तुमच्याबरोबर.
In reply to जल्ला आपल्याला इतकी तरल by कैलासवासी सोन्याबापु
न रंगवलेलं चित्र चालेल का?
हावो,
In reply to न रंगवलेलं चित्र चालेल का? by जगप्रवासी
काहीतरी करण्याचा नक्कीच
एका कागदावर पेन्सिलने रेखाटले
'तारें जमीन पर' आठवला !
छान उपक्रम,
चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश
चालेल, धावेल, नाचेल.
In reply to चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश by पिंगू
देणारच आहे.
In reply to चालेल, धावेल, नाचेल. by अभ्या..
भारीच ओ सुधांशूदा,
In reply to देणारच आहे. by सुधांशुनूलकर
इतरही काही माध्यमं
In reply to भारीच ओ सुधांशूदा, by अभ्या..
चालेल चालेल.
In reply to इतरही काही माध्यमं by सुधांशुनूलकर
क्विलिंग ची कल्पना भारी आहे!!
In reply to इतरही काही माध्यमं by सुधांशुनूलकर
वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट
बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस,
In reply to वा:! अजून एक भारी उपक्रम..वाट by पिशी अबोली
येस, प्रयत्न तर होणारच..☺
In reply to बहिणाबाई नुसती वाट बघू नकोस, by अभ्या..
ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर
सांस्कृतीक समरसता
In reply to ह्या उपक्रमात प्रत्येक मिपाकर by अभ्या..
होय, चालेल की.
In reply to सांस्कृतीक समरसता by माहितगार
हे सुचलच नव्हतं आयडीया चांगली
In reply to होय, चालेल की. by शिद
काय काय केले तर चालेल
आपणास काय येते गरुडपंत?
In reply to काय काय केले तर चालेल by लालगरूड
आपलं काम झाल आहे... :)
In reply to आपणास काय येते गरुडपंत? by अभ्या..
आवर सगर गोला करून
सूचना
ओकेज!!
In reply to सूचना by अभ्या..
दादूस \o/
In reply to सूचना by अभ्या..