✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा बाप्पा मोरया

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 07/07/2016 - 17:30  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास बरेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला. हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः १) तुम्ही स्वतः काढलेला गणेश. कोणत्याही माध्यमात असु द्या. पेन्टींग असले तर स्कॅन करुन पाठवा. म्युरल/मूर्ती असेल तर फोटो काढून पाठवा. पेन्ट फोटोशॉप मध्ये केलेला असेल तर फाइल पाठवा. फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल(एडीट न केलेली) पाठवा. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, फोटोज, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स, चारोळ्या, स्वरचित श्लोक अथवा कविता कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात.
२) तुम्ही स्वतः रचलेले गणेशाशी संबंधित छोटेसे काव्य/चारोळी पाठवावी. ह्यासाठी मात्र फक्त आठ ओळींची मर्यादा आहे. कृपया एका सदस्याने एकच एन्ट्री पाठवावी. . आता हे कशासाठी? तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे. तर मग चला. लागा कामाला. काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील. आपल्या एंट्रीज पाठवण्यासाठी मेलआयडी लवकरच कळवला जाईल तोपर्यंत...... होऊ दे चर्चा....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
19969 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

चारोळी येत नसेल तर नुसते

स्पा
गुरुवार, 07/07/2016 - 17:33 नवीन
चारोळी येत नसेल तर नुसते चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर चालेल का ?
  • Log in or register to post comments

ते वेगवेगळ्या एन्ट्री हायेत

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 17:39 नवीन
ते वेगवेगळ्या एन्ट्री हायेत रे. कोणतीही एक पाठवली तरी चालेल. दोन पाठवल्या तर अजून भारी. तुला काय म्हणा अवघड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल

यशोधरा
गुरुवार, 07/07/2016 - 17:37 नवीन
फोटो काढलेला असेल तर रॉ फाइल >> तुम्ही एडिटणार का?
  • Log in or register to post comments

हा. थोडासा. ;)

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 17:39 नवीन
हा. थोडासा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके.

यशोधरा
गुरुवार, 07/07/2016 - 17:40 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त उपक्रम. अनेक शुभेच्छा.

राजाभाउ
गुरुवार, 07/07/2016 - 17:47 नवीन
मस्त उपक्रम. अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मी ही प्रयत्न करेन चित्र

किसन शिंदे
गुरुवार, 07/07/2016 - 17:55 नवीन
मी ही प्रयत्न करेन चित्र काढण्याचा
  • Log in or register to post comments

ओ प्रयत्न शिंदे,

अभ्या..
गुरुवार, 08/11/2016 - 19:42 नवीन
ओ प्रयत्न शिंदे, कुठवर आलाय बप्पा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त उपक्रम...

मुक्त विहारि
गुरुवार, 07/07/2016 - 18:18 नवीन
बाकी चित्रकला म्हटल्यावर आमचा पास.
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतो.

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 18:23 नवीन
प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं

प्रचेतस
गुरुवार, 07/07/2016 - 18:55 नवीन
आमच्यासारख्या नास्तिकांनी कसं करायचं रे बाबा?
  • Log in or register to post comments

ते बघा नवनास्तिक चित्र

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 19:00 नवीन
ते बघा नवनास्तिक चित्र काढायचा प्रयत्न करु म्हणतायेत, शिका काहीतरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बघ की.. चित्र काढण्याचा आणि

किसन शिंदे
गुरुवार, 07/07/2016 - 19:11 नवीन
बघ की.. चित्र काढण्याचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याचा काय संबंध? येडच्चे ह्ये वल्ली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सहमत. येडं असण्याला. ;)

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 19:13 नवीन
सहमत. येडं असण्याला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अभ्या भाऊ मस्तच

राघवेंद्र
गुरुवार, 07/07/2016 - 20:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शहमत आहे

नाखु
Fri, 07/08/2016 - 08:41 नवीन
तुम्ही चित्र म्हणून काढा आम्ही देव म्हणून सजून घेऊ.. (संदर्भ दिवार सिनेमा आणि शशी-अमिताभ) नाखु सिनेमावाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

@वल्लि

मी-सौरभ
गुरुवार, 07/07/2016 - 19:04 नवीन
तुम्ही मुहुर्त न बघता पायात जोडे घालुन चित्र काढा नाय्तर कविता करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 19:04 नवीन
वेरुळातल्या हत्तीचा फोटो दे बाबा. (च्यायला हे वल्य्याची हार्डडीस्क तपासली तर कमीतकमी ३०० लेण्यातले गणपती निघतील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इतके नाय. पन्नासेक असतील :)

प्रचेतस
गुरुवार, 07/07/2016 - 19:06 नवीन
इतके नाय. पन्नासेक असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कसं खरं उत्तर आलं.

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 19:08 नवीन
कसं खरं उत्तर आलं. दे त्यातला एक चांगला अलंकारीक बघून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

घारापुरीचा फ़्याण्टास्टिक आहे.

प्रचेतस
गुरुवार, 07/07/2016 - 19:16 नवीन
घारापुरीचा फ़्याण्टास्टिक आहे. तो देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी पण

स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 07/07/2016 - 20:17 नवीन
माझ्याकडेही काही किल्ल्यांवरचे काही वेगळे गणेश फोटो आहेत. त्ये चालत्याल काय? की वल्लीसाहेबांसारखे मोठ्या मोठ्या साहेब लोकांचेच घेणार :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वल्ली गडभ्रमणातला राजगड असला

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 21:12 नवीन
वल्ली गडभ्रमणातला राजगड असला तरी तूही रायगड आहेस हे आम्हाला म्हैतेय. तू काहीही पाठव, ते अनवट आणि अनमोलच असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी

सूड
गुरुवार, 07/07/2016 - 21:15 नवीन
कवापत्तोर पायजे? नाय, आमास्नी येक गिलास पेंटिंग करायचंय. कवा पायजे सांगशिला तसं पिलान करु!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 21:24 नवीन
अक्खा म्हैनाय बघ. 15 ऑगस्ताचा झेंडा फडकायच्या आत दिलास तर भारी, नंतर मागे लागावे अशी परिस्थिती आणू नकोस फक्त. आणि तुझे चित्र मस्ट आहे हे लक्षात ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 14:05 नवीन
सुडक्या, वल्ल्या, मनोज आणि किसना ह्या मावळ्यांनी नुसत्या गप्पा मारलेल्या आहेत. कृपया चित्रे आणि फोटो मेल आयडी दिला आहे तिथे पाठवून देण्याची कृपा करावी. मंडळ आपली वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

देतो जी, वायच दम धरा.

सूड
Wed, 08/03/2016 - 15:18 नवीन
देतो जी, वायच दम धरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपण दोघे प्रसाद फस्त करू.

कंजूस
गुरुवार, 07/07/2016 - 19:23 नवीन
आपण दोघे प्रसाद फस्त करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त उपक्रम !

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 19:08 नवीन
मस्त उपक्रम !
  • Log in or register to post comments

एसमास्टर आणि विरुपाजी कडून

अभ्या..
गुरुवार, 07/07/2016 - 19:10 नवीन
एसमास्टर आणि विरुपाजी कडून सुलेखनातला बाप्पा अपेक्षित आहे हो.
  • Log in or register to post comments

कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर

भोळा भाबडा
गुरुवार, 07/07/2016 - 19:20 नवीन
कोणी डाऊनलोड करून पाठवलं तर कसं ओळखणार??
  • Log in or register to post comments

त्याचं मन त्याला नै खाणार?

खेडूत
गुरुवार, 07/07/2016 - 21:15 नवीन
त्याचं मन त्याला नै खाणार? असो. कल्पना झकास.. सच्चे मिपाकर मेजवानीस तयारच आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

तुम्ही पाठवा हो

चतुरंग
गुरुवार, 07/07/2016 - 21:20 नवीन
आम्ही ओळखू! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

गुगलोबा सगळ शोधुन द्येतोय

राजाभाउ
गुरुवार, 07/21/2016 - 18:35 नवीन
गुगलोबा सगळ शोधुन द्येतोय. https://support.google.com/websearch/answer/1325808?hl=en
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

चांगला उपक्रम!!

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 19:26 नवीन
चांगला उपक्रम!!
  • Log in or register to post comments

मीही प्रयत्न करेन चित्र

रातराणी
गुरुवार, 07/07/2016 - 23:57 नवीन
मीही प्रयत्न करेन चित्र काढण्याचा!
  • Log in or register to post comments

आयोव.....

अभ्या..
Fri, 07/08/2016 - 16:45 नवीन
आयोव.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

ल्ल्लूउउउउ नवचित्रकाराचे असे

रातराणी
Sat, 07/09/2016 - 11:37 नवीन
ल्ल्लूउउउउ नवचित्रकाराचे असे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या अभ्या.. चा निषेध निषेध निषेध. आता बघच तू. :X
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मैं भी

चांदणे संदीप
Fri, 07/08/2016 - 07:08 नवीन
मै भी कुछ करूंगा! (कुछ म्हणजे चित्र किंवा चारोळी) Sandy
  • Log in or register to post comments

करनाच पडेंगा रे सॅन्डयीबाबा.

अभ्या..
Fri, 07/08/2016 - 16:52 नवीन
करनाच पडेंगा रे सॅन्डयीबाबा. अपने घर का काम है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

जल्ला आपल्याला इतकी तरल

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 07/08/2016 - 07:59 नवीन
जल्ला आपल्याला इतकी तरल बुद्धी अन कलाकारी दृष्टिकोन असता तर बहार आली असती! मरू दे आम्ही आपली निरीक्षण भक्ती करू रे अभ्याव!
  • Log in or register to post comments

भक्ती होनाच सोल्जरभावा. उसके

अभ्या..
Fri, 07/08/2016 - 16:55 नवीन
भक्ती होनाच सोल्जरभावा. उसके बिना बाप्पा आतेच नई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापु आम्ही पण तुमच्याबरोबर.

राजाभाउ
गुरुवार, 07/21/2016 - 18:37 नवीन
बापु आम्ही पण तुमच्याबरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

न रंगवलेलं चित्र चालेल का?

जगप्रवासी
Fri, 07/08/2016 - 12:16 नवीन
न रंगवलेलं, फक्त बाप्पाचं चित्र काढलेलं चालेल का? मला चित्रात रंग भरता येत नाहीत.
  • Log in or register to post comments

हावो,

अभ्या..
Fri, 07/08/2016 - 13:09 नवीन
हावो, अवश्य चालतील, वाटल्यास रंगवून मी देईन एक कॉपी तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

काहीतरी करण्याचा नक्कीच

जागु
Fri, 07/08/2016 - 15:08 नवीन
काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments

एका कागदावर पेन्सिलने रेखाटले

प्रमोद देर्देकर
Fri, 07/08/2016 - 15:39 नवीन
एका कागदावर पेन्सिलने रेखाटले गणेश चित्र चालेल काय? पहिल्यांदाच प्रयत्न करेन. बघुया जमतंय काय.
  • Log in or register to post comments

'तारें जमीन पर' आठवला !

सस्नेह
Fri, 07/08/2016 - 16:04 नवीन
'तारें जमीन पर' आठवला !
  • Log in or register to post comments

छान उपक्रम,

नीलमोहर
Fri, 07/08/2016 - 20:12 नवीन
बाप्पांसाठी आणि मिपासाठी काहीपण.
  • Log in or register to post comments

चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश

पिंगू
Sat, 07/09/2016 - 09:35 नवीन
चित्र नाय जमणार, ओरिगामी गणेश चालेल का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा