Skip to main content

ताज्या घडामोडी - १

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 14/07/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

वाचने 77373
प्रतिक्रिया 388

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद_१९८२

विधानपरीषदेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे तावातावाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध करीत होते. मागील वर्षीचे त्यांचे बॉस पवार असे म्हणाले होते की विदर्भातील नागरिकांची जी मागणी असेल (वेगळा विदर्भ किंवा संयुक्त महाराष्ट्र) त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल. पवारांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मागील वर्षी आपण काय बोललो होतो ते आता विसरून गेले आहेत.

In reply to by प्रसाद_१९८२

हुतात्मे मुम्बै म्हाराष्ट्रात रहावी म्हणुन झाले होते ना ? त्यांच्या हौतात्म्याचा आणि वेगळ्या विदर्भाचा काय संबंध ?

In reply to by श्रीगुरुजी

स्वयंघोषित गोरक्षकांनी जो उच्छाद मांडलाय त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते मांडा.

गोरक्षक संघटनांचे अत्याचार ,काश्मीरमधे उसळलेला दंगा यावर चकार शब्द न काढणारे मा.पंप्र यांना मौनी मोदी अशी पदवी द्यावी

मुंबई: मोडकसागर ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठाणे जिल्हयातील ४४ गावांना धोका... वाडा येथील तहसीलदारांचा अतिदक्षतेचा इशारा... महाराष्ट्र टाइम्स

काही महिन्यांपूर्वी कोणत्या तरी विद्यापीठाने 'मुलींनी जीन्स, गुडघ्याच्या वर असणारे स्कर्ट्स घालू नये' असा काही तरी आदेश काढला होता. तो आदेश निघाल्याक्षणी माध्यमातून व वृत्तपत्रातून जोरदार टीका सुरू झाली. नेहमीप्रमाणे या मुद्द्यांवर हिंदु संघटनांना झोडपण्यात आले. पुरोगामी व निधर्मी विचारवंत (म्हणजेच निधर्मांध) यात आघाडीवर होते. मोदी सत्तेवर आल्यापासून भारतात फॅसिझम व असहिष्णुता वाढत आहे यावर या सर्वांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. आता दोन दिवसांपूर्वीच 'Kashmiri outfit threatens to burn girls alive for driving two-wheelers ' अशी धमकी देणारी पोस्टर्स काश्मिरमध्ये सर्वत्र लावलेली आहेत. Srinagar: An organisation styling itself Sangbaaz Association Jammu and Kashmir, Azad Kashmir has issued a chilling warning to girls in the Valley: do not dare to drive a scooty. According to a report in dna, this 'stone-pelters' association in Kashmir has put up posters in Lal Chowk, threatening to immolate girls if they ride a Scooty (to mean two-wheelers) in the Valley. "We request all girls, please do not use Scooty. If we see a girl riding Scooty, we will burn the Scooty as well as the girl (sic)", reads the posters, using a mix of English and Urdu. Posters of Hizb-ul-Mujahideen (HuM) and Lashkar-e-Taiba (LeT) also have surfaced in south Kashmir. They ask people to continue agitation till freedom and urge women not to venture out of their homes, and government employees not to go to work. The stone-throwers association has also named some shopkeepers and banks and asked them to shut down immediately or face consequences. They have also ordered mosques to sing songs of freedom and jihad and to offer prayers, says the report. भारतातील निधर्मांधांनी या मुद्द्यावर अजूनपर्यत तोंड उघडलेले दिसत नाही. कोणी पुरस्कार देखील परत केलेले दिसत नाही. त्यांची दातखिळ बसलेली दिसत आहे. अर्थात अहिंदूंच्या अन्यायी व पुराणमतवादी आदेशांवर सोयिस्कर मौन पाळणे व हिंदूंच्या बाबतीत बेंबीच्या देठापासून किंचाळणे हीच पुरोगामित्वाची व निधर्मतेची व्याख्या असल्याने त्यांच्या मौनाचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. http://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/310716/kashmiri-o…

In reply to by श्रीगुरुजी

मग तुम्ही का गप्प बसलात, त्यांच्या किंचाळण्याची वाट बघत? की तुम्हाला फक्त पुरोगामी व निधर्मवाद्यांविरोधातच बेंबीच्या देठापासून किंचाळण्यात स्वारस्य आहे? हा प्रकार लैच डोक्यात जातो राव. ते एक्स्ट्रीमिस्ट काही बोंबलले की हे लिबटार्ड्सकडे बोट दाखवणार आणि किंचाळणार, "बघा बघा आता कसे मौन धरुन बसलेत", काय चाललंय काय हे नेहमी नेहमी??? पुरोगामी कोणा विरोधात बोलतात, नै बोलत ह्याच्या नोट्स काढत बसणे ह्याशिवाय हिंदू-एक्स्ट्रीमिस्टची भलामण करणार्‍यांना दुसरं काय येतं?

In reply to by संदीप डांगे

बातमी वाचल्यावर लगेच तिथे या धमकीच्या विरोधात किंचाळलो होतोच. गप्प बसून राहणे हे निधर्मांधांचं गुणवैशिष्टय. आमचं नाही.

In reply to by संदीप डांगे

ते सूक्ष्मावस्थेत जाउन किंचाळतात... ०.४ डेसिबलच्या खाली. ती किंकाळी ऐकु याय्ला तपस्या करावी लागते.

In reply to by संदीप डांगे

याकडे लक्ष वेधू इच्छितो. आणि लिबटार्ड्स हे सिलेक्टिव्हच वागतात. म्हणून तर त्यांची विश्वासार्हता ढासळलेली आहे. बाकी हिंदू एक्स्ट्रीमिस्ट हा शब्द ऐकून मजा वाटली. वाळवंटात मृगजळ शोधणं आणि हिंदू एक्स्ट्रीमिस्ट शोधणं यात काहीही फरक नाही. दोन्हीही अस्तित्वात नसलेल्या गोष्टी आहेत.

संदीप डांगे, अहो, एक्स्ट्रीमिस्टचा अर्थ मला माहितीये. पण हिंदू-एक्स्ट्रीमिस्ट हा पदार्थ कुठे मिळतो ते माहीत नाही. भारत शासनानं जंग जंग पछाडूनही सापडला नाही. तुम्हाला सापडला का? आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

जगभर दुसरे देश असण्याचं भाग्य मुस्लिम ख्रिस्चनांचं ... तॅ सव्वाशे देशात आहेत.... तुमचे सगळे हितेच ... एकाच देशात

In reply to by चंपाबाई

उदाहरणार्थ पाकिस्तान, सीरिया, इराक, लेबेनॉन, सोमालिया, इजिप्त, नायजेरिया, बांग्लादेश, येमन इत्यादी..अर्धे तर मुस्लिम देश आधीच खंगलेत आणि उरलेले त्या मार्गावर आहेत। त्यापेक्षा आपला एक भारत बरा कि म्हणायचा। बाकी साहेब विरोध करा की द्वेष काय म्हणुनी करता, झोप लागती ना नीट.

In reply to by अमितदादा

तुमच्या नजरेला सगळे खंगलेलेच दिसतात काय हो ? रुपयाच्या कैकपट असलेले वाळवंटी व युरोपियन नाणी दिसायची बंद झाली का ? खंगलेले हिंदु असलेलेही देश आहेत... लंका नेपाळ म्यानमार ... कमळाच्या भाजलेल्या बिया विकून पोट भरणारी दरिद्री मुले असणारा कंबोडिया ....

In reply to by गामा पैलवान

सोपं आहे. जो जो हिंदूंंच्या बाजूने बोलतो, तो हिंदू एक्सट्रिमिस्ट असतो.

In reply to by श्रीगुरुजी

गोरक्षणाच्या नावाखाली माणसांना अमानुष मारणारे हिंदू एक्सट्रिमिस्ट आहेत
पटलं तर पुढचा उदाहरण सांगतो

In reply to by गामा पैलवान

गौ रक्षक दिसत नाहीत काय? बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे माहिती नाहीत काय? हे हिंदू एक्ष्ट्रिमिस्ट नाहीत तर कोण आहेत?

In reply to by अनुप ढेरे

'बीफच्या संशयावरून ठेचून मारणारे' हेच ते. हवे तेच ऐकणे. नुकताच आलेला गुन्हा संशोधन खात्याचा अहवाल यांच्या गावीही नसतो. मूळ मुद्दा बीफ नसून, गायीची चोरी हा असावा. तू नळी वर गाय चोरीचे कितीतरी विडिओ आहेत. जिज्ञासूंनी पाहावेत. यांना 2002 दिसतं, पण गोध्रा नाही. वाणी दिसतो, पण लाख पंडित नाही. हिंदू एक्सट्रिमिस्ट दिसतो, पण जगभर चाललेला हिंसाचार आणि भारतातील हिंसाचार यातील साम्य आणि त्याची सहज कळू शकणारी कारणे दिसत नाहीत. कारण त्याला धर्म नसतो. झोपलेल्याला उठवला जाऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसा उठवणार? शुद्ध लांगुलचालन देशाला कुठे नेणार आहे? पुरोगामी लोकांना, आर्मीच्या जवानांसमोर ढाल म्हणून उभे केले, म्हणजे सगळे तत्वज्ञान एकदमच कळेल.

In reply to by बोलबोलेरो

या, तुमचीच कमतरता व्हती... मुद्दा मुलीना दुचाकी चालवण्याच्या फतव्याबद्दल आहे, तुम्ही गोध्रा, पंडित, आर्मी काय काय घेऊन येताय!☺ तुम्हाला जगभर चाललेला हिंसाचार दिसतो, बुडाखाली काय जळतं तेवढं दिसत नाही... असो..

In reply to by बोलबोलेरो

गायीची चोरी हा असावा.
छान. दलितांना फटके देणारेपण याच कारणाने देत असतील राईट? लांगूलचालन म्हणे.
हिंदू एक्सट्रिमिस्ट दिसतो
दिसणारच! कारण हिंदुस्थानातच रहातो मी. सिरियातल्या/टर्कीतल्या दहशतवादाशी काय देणं घेणं माझं? मला माझ्या परिसराचीच काळजी असणार. अरबस्तानात कोणीतरी जास्तं धर्मांध दंगा करत आहे म्हणून माझ्या देशात जे लोक धर्माच्या आधारावर हिंसा सुरू करत आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं?
झोपलेल्याला उठवला जाऊ शकतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसा उठवणार?
हेच तुम्हाला लागू आहे.
पुरोगामी लोकांना, आर्मीच्या जवानांसमोर ढाल म्हणून उभे केले, म्हणजे सगळे तत्वज्ञान एकदमच कळेल.
आर्मीचा काय संबंध इथे? आणि गौरक्षक किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक कुठे सीमेवर लाढायला जातात?

In reply to by अनुप ढेरे

माझ्या देशात जे लोक धर्माच्या आधारावर हिंसा सुरू करत आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं?
नकाच करू, फक्त सगळ्यांकडे बघा. आपणच म्हणतो कि मोदी आल्यापासून हिंदू एक्सट्रीमीसम वाढला. योगी, भोगी यांची बडबड वाढली. तसेच हेदेखील. पण मोदी येण्याआधीपासून चालू असलेला धार्मिक हिंसाचार का दिसू नये तुम्हाला. तेव्हा दहशतवादाला धर्म एक नसतो? एक्सट्रॅमिस्ट फक्त हिंदूच असतो का?
गौरक्षक किंवा तुमच्यासारखे त्यांचे समर्थक
मी गौरक्षक अथवा समर्थक नाही. एखादी दुभती गाय अथवा वासरू पळवून नेल्यास, त्याच्या मालकाचे नुकसान होणार आहेच ना? जी गुरे खाटीकखान्यात मारण्यासाठीच नेली जात आहेत,( वांझ असल्याने )त्याबद्दल आक्षेप नाही.
सीमेवर लाढायला जातात?
मी हे बुर्हाण वाणी समर्थक लोकांवर पेलेट गनच्या वापराबद्दल पुरोगामी जे बोलतात, त्या संदर्भात बोललो. हे सारे एकत्रित पणे लिहिण्याचे कारण, या साऱ्या घटनात एक नियोजित रणनीती आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे.

In reply to by बोलबोलेरो

जी गुरे खाटीकखान्यात मारण्यासाठीच नेली जात आहेत,( वांझ असल्याने )त्याबद्दल आक्षेप नाही शेतकरी दुभत्या गायी जाणुन्बुजुन मरायला देतात की काय ? नव्या कायद्याने सगळ्याच गोहत्यावर बंदी आहे

In reply to by चंपाबाई

राज्यातले इतके सगळे कत्तलखाने काय बंद झाले कि काय? नाही ना? चालू आहेतच ना?

In reply to by बोलबोलेरो

कत्तलखाने फक्त गायीसाठीच असतात का ? बाकीच्या प्राण्यात देव रहात नसल्याने ते कापले तर चालतात.

In reply to by बोलबोलेरो

नकाच करू, फक्त सगळ्यांकडे बघा. आपणच म्हणतो कि मोदी आल्यापासून हिंदू एक्सट्रीमीसम वाढला. योगी, भोगी यांची बडबड वाढली. तसेच हेदेखील. पण मोदी येण्याआधीपासून चालू असलेला धार्मिक हिंसाचार का दिसू नये तुम्हाला. तेव्हा दहशतवादाला धर्म एक नसतो? एक्सट्रॅमिस्ट फक्त हिंदूच असतो का?
धार्मिक हिंसाचार चालू आहे हे तरी मान्य केलत हे थोडकं नाही. आधी चालू होता हिंसाचार म्हणून आता बोलायचं नाही हे काय लॉजिक आहे? का दर वेळेला बोलताना इंझमाम जशी सुरुवात करायचा ''बिस्मिल्ला उल रहमान रहीम, बॉयज प्लेड वेल" तसं "धार्मिक हिंसाचार अरबस्तानात चालू आहे, काँग्रेच्या राज्यात होता, आज गौरक्षकांनी उच्छाद मांडलेला आहे" असं बोलायचं? जे चूक आहे त्याला चूक न म्हणता आधीही हे होतं म आता चूक म्हणू नका ही कसली आर्ग्युमेंट?
मी हे बुर्हाण वाणी समर्थक लोकांवर पेलेट गनच्या वापराबद्दल पुरोगामी जे बोलतात, त्या संदर्भात बोललो.
अजिबात नाही. वरील चर्चेत वाणीचं नाव कोणी घेतलं? वाणी निर्दोष बिचारा आहे हे कोण म्हणालं? विषय नसताना उगाच सैनिकांची नावं घेऊन आपला भांडखोर/घातक अजेंडा पुढे करणं याला काय म्हणायचं? हे सैनिकांच्या नावावर आपली पोळी भाजणं आहे. एकदा सैनिक हा शब्द पुढे केला की भावनिक मुद्दा सुरू करून लॉजिकल चर्चा होणार नाही हे बघायचं हाच अजेंडा असतो यामागे.

भाजप गुजरातेत लोकप्रियता गमवत आहे... आजचा पेपर

In reply to by कपिलमुनी

म्हणतातच ना कि एक चित्र / फोटो निशब्द अस्तो पण एक पुर्ण कहाणि सांगुन जातो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सॉरी हल्लीच झालेल्या काही वैयक्तिक नुकसानासंबंधित गोष्टी आठवल्या, त्या इथे अश्या प्रकारे बाहेर पडायला नको होत्या, पण काय करणार आम्हीपण माणसेच आहोत. :( :'(

In reply to by कपिलमुनी

काश्मीर मधील सद्यपरीस्थिती दर्शवणारा दुर्दैवी फोटो
हा फोटो तो मुलगा खेळत असताना घेतलेला फोटो आहे. तो मुलगा काही सैनिकांवर दगड मारत नाहीय्ये. असल्या फोटोला गांभीर्याने घेण्याची गरज नाही व या फोटोवरून काश्मीरमधील सद्यस्थिती दिसते वगैरे गैरसमजूत करून घ्यायची गरज नाही. या फोटोतला एक सैनिक घाबरल्याचा अभिनय करतोय तर दुसरा मागे हात बांधून निवांत उभा आहे. हाच फोटो दुसर्‍या कोनातून बघा आणि हसणारे सैनिक बघा. अजून एक

In reply to by श्रीगुरुजी

बापूसाहेब हे खालचे दोन्ही फोटो न पाह्तासुद्धा मी एक गोष्ट विचारेन या मुलाचे वय किती असेल? ४-५ वर्षे ? अशा मुलाला संरक्षक दलांच्या जवानांवर गलोलीने दगड मारावे हे स्वतःच्या डोक्यात येईल का? मग अशा बाल्काला "कीड" म्हणावे असे तुम्हाला का वाट्ले.

In reply to by सुबोध खरे

त्या फोटो खालची दुसरी कॉमेंट वाचा, काही गोपनीय गोष्टी मी इथे बोलू शकत नाही, हे ध्यानी घेऊनही जर आपल्याला विषय ताणण्यात रस असेल तर माझा निरुपाय आहे डॉक्टर, रच्याकने, कॉमेंट क्र 2 मधील दिलगिरी आपण वाचलेली दिसत नाही, असो, हल्लीच मिळालेल्या ज्ञानामृतानुसार People believe what they want to believe :)

In reply to by संदीप डांगे

नाही, त्रिवार नाही, मी एक शपथ घेतलेली आहे, ती निभवायची आहे, रिटायरमेंट पर्यंत नाही मरेपर्यंत, हे पित्त पोटात घेऊनच मी लाकडाच्या राशीवर जाणार आहे, ह्याचा ज्याला जो अर्थ काढायचा तो काढो, मी पहिले इमान माझ्या देशाला अन दुसरे माझ्या फोर्सला वाहिलेले आहे. :)

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब काश्मीरची परिस्थिती किती वाईट आहे हे मलाही माहिती आहे ? माझ्या हाताखाली माझ्या बरोबर काम केलेला क्षकिरण तंत्रज्ञ याला ११ वर्षाच्या मुलीने बुरख्यातून पिस्तुल काढून गोळी मारली. तेंव्हा तेथे काम करणाऱ्या इतर सैनिकांची मनोवृत्ती काय आहे हे मी बऱ्यापैकी जाणून आहे. म्हणूनच हा प्रश्न मी उपस्थित केला. डांगे अण्णांची भाषा वापरायची असती तर चार वर्षाच्या मुलाला कीड म्हणता याचा अर्थ तुमची विचारसरणी किडकी आहे किंवा तुमचा मेन्दु सडला आहे असे म्हणालो असतो. सक्रुत दर्शनि ते बरोबर वाटते पण ते तसे नाही हे मीही जाणतो. तुम्ही माफी मागितली तरी विचारसरणी समजून येतेच अशाही टिप्पणी येतात. हे मी अनुभवलेले आहे. परंतु माझी पातळी मी सहसा खाली येऊ दिली नव्हती. आपलीही भाषा संयत आणि विनम्र होती त्यात अलिकड़े झालेला बदल काही पटला नव्हता. पटत असेल तर पहा अन्यथा सोडून द्या आणि माफ करा मज पामरासी काय थोरपण पायींची वहाण पायी बरी .

रायगडमध्ये मोठी दुर्घटना, सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, 2 एसटी बससह छोटी वाहनं बुडाली, 22 जण बुडाल्याची भीती .

महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे झालेल्या भीषण अपघाताची बातमी : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=PABBTA http://www.esakal.com/eSakal/Photogallery/1/5332701034005429346_Mid.jpg पुलाची पाहणीबिह्णी करायची काही पद्धत आहे का? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुलाची पाहणी मे महीन्यात करण्यात आलेली होती ,त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुल व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता .

In reply to by viraj thale

शेजारीच काँग्रेसकाळात बांधलेला नवा पूल आहे. जुन्या पुलाची तपासणी नव्या सरकारच्या काळात मे २०१६ ला झालीहोती व पूल वापरण्यायोग्य आहे असे सर्टिफिकेट दिले होते. तरीही मोदीभक्त लोक ६० वर्षात काँग्रेसने दुर्लक्ष केले म्हणुन पूल पडला असे कोकलत आहेत.

In reply to by चंपाबाई

चम्पा बाइ कसल्या आजाराने पिडित आहे रे तु ,नाही डोक्यावर पडल्यासारखे काय लिहितो ना तु म्हणुन चवकशी करतोय.

गो हत्या विधेयकच मुळात अपूर्ण आणि अर्धवट असून यात सामान्य शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही. गो पालक हे बहुसंख्य हिंदू शेतकरीच आहेत, इथं दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना त्यांचा कुटुंबीयांचा सांभाळ करण मुश्किल होत असताना हि भेकड आणि म्हातारी जनावरे कुणी सांभाळायची, मग किती तरी शेतकरी आशा गाई सोडून देतात किंवा बेकायदेशीर रित्या विकून टाकतात. जालावर ह्या संदर्भात बातम्या उपलब्द आहेत, तसेच ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या लोकांना यातील वस्थूस्थिती कळू शकेल. महाराष्ट्र सरकारने गाई साठी आश्रम खोलनार म्हणून जाहीर केलेलं, कुठे आहेत आश्रम? का 2,3 आश्रम स्थापन केले की काम झालं. शेतीची किंवा पशुपालनाची काही हि जाणीव नसणाऱ्या लोकांचे हे खेळ आहेत. या गो रक्षकानी कधीही गाई च्या शेणाला किंवा मुताला हात लावला नसेल आणि जर ऐवडाच प्रेम असेल तर लोकांचे जीव घेण्यापेक्षा का नाहीत हे ग्रामीण भागात जाऊन म्हाताऱ्या गाई पाळत. म्हातारी गाई खाटीकास विकणे जरी क्रूर वाटत असले तरी त्यास पर्याय नाही आजच्या परिस्थितीत शेतकरी हेच करू शकतो, बाकी ज्यांना प्रेम असेल त्यांनी शेतकऱ्याकडून गाई घेऊन सांभाळ करावा. बर एकवेळ गाई बद्दल चे प्रेम समजू शकतो पण गो वंश बंदी कायदा कशा साठी? म्हातारे बैल यांचं काय करायचं याचा सरकार ने विचार केला नाही. मध्यंतरी आस ऐकलेलं कि फडवणीस यांनी एक गाई आणून वर्षा वर बांधली होती आणि 4 दिवस नाटक करून ती तिथून हलवली. बर गो रक्षकांना गाई ची वाहतूक दिसते पण त्या गाई खाटीकास विकणारे हिंदू शेतकरीच आहेत हे कोण लक्षात घेत नाही. सरकार आणि गो रक्षकांनी हि भेकड जनावरे पाळावीत आणि हिंदू धर्म वाचवावा हि विनंती.

In reply to by अमितदादा

अमितदादा, ह्यावर बारीक चर्चा झालेली आहे इकडे, तेव्हा फ्याक्टस समोर सो कॉल्ड गौरक्षकांचं पितळ उघडं पडतं असा अनुभव आहे...

In reply to by संदीप डांगे

ठीक आहे मला माहित नव्हतं. धन्यवाद डांगे साहेब .मग ह्या धाग्यावर मी चर्चा थांबवतो.

In reply to by अमितदादा

चर्चा थांबवा असे सुचवायचे नव्हते हो, जेव्हा जेव्हा गौरक्षक डोके बाहेर काढतील तेव्हा तेव्हा चर्चा झालीच पाहिजे... शहरी भिडू उगाच सॉफ्ट कॉर्नर ठेऊन असतात ते बदलले पाहिजेच ..

नाशिकमध्ये काल नारोशंकर मंदिराची घंटा बुडाली... बुजुर्गांच्या मते ही भयंकर पूर परिस्थिती आहे... हवामान खाते किमान २४ तासाचे तरी परफेक्ट भाकीत करू शकते असे वाचले होते, जलसंधारण आणि हवामान खात्यात समन्वय नसल्याने ही वेळ आज नाशिककरांवर आली, अन्यथा २४ तास आधीच थोडे थोडे पाणी सोडता येणे शक्य होते...

In reply to by गामा पैलवान

म्हणुन तर तुम्ही लंडनात बsun ब्रिटिशांची सेवा करताय.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, अहो, तुम्हाला कितीदा सांगितलंय की मी हिंदुहितासाठी इंग्लंडमध्ये आलोय ते. सारखं कसं विसरता तुम्ही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात हिंदू असल्याचा विलक्षण गर्व आहे, अन त्याचे कुठलेही हित व्हावे म्हणून मी तुम्हाला ठेकेदारी/मुखत्यारपत्र दिलेले नाहीये, त्यामुळे , जरा हिशेबात बोला, वैयक्तिक द्रव्यलोभाला हिंदूहित वगैरे मुलामे देण्याचे कारण नाही, अर्थात द्रव्यलोभ वाईट नसतो, किंवा चांगल्या जीवनाची आस सुद्धा वाईट नसते, फक्त ते मान्य करायचा दम लागतो, तो छपरी फॅनटीक लोकांत नसतो. सारांश :- लंब्याचवड्या फेकायच्या असल्या तर फेका, त्याच्यासाठी धर्म वेठीस धरायचे कारण नाही