Skip to main content

जगणे...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/07/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...
लेखनविषय:

वाचने 8479
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही. असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!

शांतरसात घुसले आणि मार्गी लागले. चान चान कवीता, आता बालगीते/बोब्बड गीते कधी? अखिल मिपा भावविश्व चाहता संघ

सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही. असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!
हा सदर काव्याचा ढिस्स क्लेमर समजावा. अशी इणंति!

सर्व सम्राट यांचा जाड्या मित्र रामभाउ अजून इथे कसा टपकला नाही. असो त्याची कमेंट आताच टाकतो. "कस्सं जमतं हो तुम्हाला बुवा..... आम्हाला तुमच्या फ्यान मधी घ्या णं ! "

ह्या धडासास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! 'धाडसास की 'धडासास'? बाकी कविता अवघड वाटली पण आवडली

वा! बुवा! कविता, गझल आवडली. एक बदल सुचवू का? मान्य कराच असे म्हणत नाही पण पण विचार जरूर करा. तोडून समय सारा, त्यातच विझून गेलो. जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो

In reply to by पैसा

जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो ›› रैट्ट ! हे ही चालेल. जास्त अन्वर्थक वाट्टय . संपादक, प्लीज हा ही बदल करा. _/\_

छान. आवडली.

:)

In reply to by प्रचेतस

वल्लींचा प्रतिसाद आला तर....

In reply to by मुक्त विहारि

भटसम्राटाचा जिवलग सोडा फौण्टण॑ मित्र रामभाउ आल्याने बरे वाटले.मुठे पवने चे पाणी वहाते झाले.

मला कवितेत ज्ञानेश्वर दिसले. आपली परवानगी असेल तर भावार्थ देतो.

जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया रुळता इथे जरासे,जीव लागला फुलाया. मी वेल अमृताची, होते तरी तृषार्त , मोहरत्या नव्या क्षणांत, दु:ख लागले झुराया पाहुन वाट जेंव्हा,तो क्षण समोर आला त्या सौम्यशा धगेने, तनु लागली निवाया हा नाद घुमे कैसा, त्याची मनात दाटी समजावयास त्याला, की त्यातुनी तराया. आठवे मज आता, ती रात्र जागलेली, दिनस्वप्नांचा गुंता, घेतलेला सोडवाया. जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया ...