✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जगणे...!

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 07/31/2016 - 20:23
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

प्रतिक्रिया द्या
8415 वाचन

💬 प्रतिसाद (35)

मस्त

कविता१९७८
Sun, 07/31/2016 - 20:28 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मस्त. पण तिसरे कडवे जssरा

किसन शिंदे
Sun, 07/31/2016 - 23:30 नवीन
मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले.
  • Log in or register to post comments

तेच तर मेन सांगायला आलेत

टवाळ कार्टा
Sun, 07/31/2016 - 23:47 नवीन
तेच तर मेन सांगायला आलेत गुर्जी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बुवांनी "धाडस" केले तेव्हा तू

सतिश गावडे
Mon, 08/01/2016 - 09:21 नवीन
बुवांनी "धाडस" केले तेव्हा तू त्यांच्या संपर्कात नव्हता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सदर काव्याचा विवाहजनीत

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 09:52 नवीन
सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही. असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अच्चा अस जाल तर

सतिश गावडे
Mon, 08/01/2016 - 10:03 नवीन
अच्चा अस जाल तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ल्लुल्लुल्लुल्लु.

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 10:08 नवीन
ल्लुल्लुल्लुल्लु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हही हही हही

सतिश गावडे
Mon, 08/01/2016 - 11:09 नवीन
हही हही हही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ज्जे ब्बात!

मेघवेडा
Mon, 08/01/2016 - 00:14 नवीन
ज्जे ब्बात!
  • Log in or register to post comments

शेवटची कविता - अतृप्ताची.

कंजूस
Mon, 08/01/2016 - 07:29 नवीन
शेवटची कविता - अतृप्ताची.
  • Log in or register to post comments

अप्रतिम गझल!

एस
Mon, 08/01/2016 - 07:59 नवीन
अप्रतिम गझल!
  • Log in or register to post comments

गुरुजी

नाखु
Mon, 08/01/2016 - 09:15 नवीन
शांतरसात घुसले आणि मार्गी लागले. चान चान कवीता, आता बालगीते/बोब्बड गीते कधी? अखिल मिपा भावविश्व चाहता संघ
  • Log in or register to post comments

वाह गुरुजी. छान. एकंदरीत छान

सतिश गावडे
Mon, 08/01/2016 - 09:19 नवीन
वाह गुरुजी. छान. एकंदरीत छान चाललं आहे हे दिसतंय कवितेवरुन. आवडले.
  • Log in or register to post comments

सदर काव्याचा विवाहजनीत

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 09:54 नवीन
सदर काव्याचा विवाहजनीत गलीतगात्ररसाशी संबंध नाही. असा विणम्र खुला सा करूण आम्मी आमचे जेव्हढे भायेर आले तेवडे शब्द संपवितो! ढण्यवाड्स!
हा सदर काव्याचा ढिस्स क्लेमर समजावा. अशी इणंति!
  • Log in or register to post comments

अजून रामभौ कसा आला नाही...

चौकटराजा
Mon, 08/01/2016 - 10:25 नवीन
सर्व सम्राट यांचा जाड्या मित्र रामभाउ अजून इथे कसा टपकला नाही. असो त्याची कमेंट आताच टाकतो. "कस्सं जमतं हो तुम्हाला बुवा..... आम्हाला तुमच्या फ्यान मधी घ्या णं ! "
  • Log in or register to post comments

ह्या धडासास आता, म्हणतो

ज्योति अळवणी
Mon, 08/01/2016 - 10:43 नवीन
ह्या धडासास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! 'धाडसास की 'धडासास'? बाकी कविता अवघड वाटली पण आवडली
  • Log in or register to post comments

ऒह! चुकलं.

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 11:35 नवीन
ऒह! चुकलं. धाडसासं असच पाहिजे. चूक आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :) संपादक- प्लीज करेक्शन करा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

च्यामारी! =)) ह्यात पण

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 11:38 नवीन
च्यामारी! =)) ह्यात पण चुकलो. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

छान छान

अभ्या..
Mon, 08/01/2016 - 11:29 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

कविता खरंच छान आहे गुर्जी.

अजया
Mon, 08/01/2016 - 11:35 नवीन
कविता खरंच छान आहे गुर्जी.
  • Log in or register to post comments

वा! बुवा!

पैसा
Mon, 08/01/2016 - 11:42 नवीन
वा! बुवा! कविता, गझल आवडली. एक बदल सुचवू का? मान्य कराच असे म्हणत नाही पण पण विचार जरूर करा. तोडून समय सारा, त्यातच विझून गेलो. जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो
  • Log in or register to post comments

जाळून समय सारा, त्यातच विझून

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/01/2016 - 11:50 नवीन
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो ›› रैट्ट ! हे ही चालेल. जास्त अन्वर्थक वाट्टय . संपादक, प्लीज हा ही बदल करा. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गुरुजी कविता। कलादालन सदरातच

कंजूस
Mon, 08/01/2016 - 13:00 नवीन
गुरुजी कविता। कलादालन सदरातच लिहा.कविता तुमची एक कलाच आहे.संपादनही मिळेल.
  • Log in or register to post comments

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 08/01/2016 - 14:34 नवीन
छान. आवडली.
  • Log in or register to post comments

असा सगळा प्रकार झाला तर!!

सूड
Mon, 08/01/2016 - 15:32 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर!!
  • Log in or register to post comments

काहीही कळले नाही

स्पा
Mon, 08/01/2016 - 15:36 नवीन
काहीही कळले नाही उगा एक विडंबन मात्र सुचलेय
  • Log in or register to post comments

अजिबात नको

पैसा
Mon, 08/01/2016 - 18:11 नवीन
अजिबात नको. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वाह क्या बात, मस्त

जगप्रवासी
Mon, 08/01/2016 - 18:21 नवीन
वाह क्या बात, मस्त
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Mon, 08/01/2016 - 19:55 नवीन
:)
  • Log in or register to post comments

चला.....

मुक्त विहारि
Mon, 08/01/2016 - 21:03 नवीन
वल्लींचा प्रतिसाद आला तर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हं

चौकटराजा
Tue, 08/02/2016 - 11:18 नवीन
भटसम्राटाचा जिवलग सोडा फौण्टण॑ मित्र रामभाउ आल्याने बरे वाटले.मुठे पवने चे पाणी वहाते झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कविता काही समजली नाही...

मुक्त विहारि
Mon, 08/01/2016 - 21:03 नवीन
असो...
  • Log in or register to post comments

व्वा गुर्जी.

मितभाषी
Mon, 08/01/2016 - 21:22 नवीन
मला कवितेत ज्ञानेश्वर दिसले. आपली परवानगी असेल तर भावार्थ देतो.
  • Log in or register to post comments

गुरुजींची परवानगी ग्रुहित धरुन..

५० फक्त
Tue, 08/02/2016 - 19:37 नवीन
जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया रुळता इथे जरासे,जीव लागला फुलाया. मी वेल अमृताची, होते तरी तृषार्त , मोहरत्या नव्या क्षणांत, दु:ख लागले झुराया पाहुन वाट जेंव्हा,तो क्षण समोर आला त्या सौम्यशा धगेने, तनु लागली निवाया हा नाद घुमे कैसा, त्याची मनात दाटी समजावयास त्याला, की त्यातुनी तराया. आठवे मज आता, ती रात्र जागलेली, दिनस्वप्नांचा गुंता, घेतलेला सोडवाया. जगणे असे असावे,येथे मिळाले बघाया ...
  • Log in or register to post comments

अप्रतिम! __/\__

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/02/2016 - 19:41 नवीन
अप्रतिम! __/\__ मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा