✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कबाली

स
समीर_happy go lucky यांनी
Sat, 07/23/2016 - 23:36  ·  लेख
लेख
दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही. साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते. सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!! प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे. सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे. मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
9690 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

हे 'प रणजित' म्हणजे रणजित

संदीप डांगे
Sat, 07/23/2016 - 23:39 नवीन
हे 'प रणजित' म्हणजे रणजित पराडकर काय?
  • Log in or register to post comments

हाहाहा, असेलही मोठा माणूस तो

समीर_happy go lucky
Sat, 07/23/2016 - 23:45 नवीन
हाहाहा, असेलही मोठा माणूस तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काहीही कथानक नसलेला अतिशय

सतिश गावडे
Sat, 07/23/2016 - 23:41 नवीन
काहीही कथानक नसलेला अतिशय टुकार चित्रपट आहे हा. रजनीकांतचे चाहते लोकच हा चित्रपट पुर्ण पाहू शकतील.
  • Log in or register to post comments

विश्वास ठेवता येतो का...... ?

चौकटराजा
Sun, 07/24/2016 - 10:49 नवीन
मी सलमानचे फकस्त दोनच पिच्चर पायलेले आहेत. काटरिना, ऐश्वर्या, श्रीदेवी ( अपवाद फिरोज खाच्या हर किसीकी गाण्यात ) दीपिका यांचा एकही चित्रपट पाहिलेला नाही. रजनीकांत चा एक बी नाय राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे सारे आमच्या जमान्याचे.

सतिश गावडे
Tue, 07/26/2016 - 09:56 नवीन
हे सारे आमच्या जमान्याचे. तुमच्या जमान्यातील सिनेमे तुम्ही पाहीले असतीलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

'दिग्दर्शन कबालीचे आहे',

एस
Sat, 07/23/2016 - 23:42 नवीन
'दिग्दर्शन कबालीचे आहे', 'संगीत कबालीचे आहे' येथे कबालीचे की कमालीचे म्हणायचे आहे हे कळले नाही. बाकी कांद्याची उपमा आवडली.
  • Log in or register to post comments

सॉरी बॉस, टायपो असेल अन आता

समीर_happy go lucky
Sat, 07/23/2016 - 23:46 नवीन
सॉरी बॉस, टायपो असेल अन आता एडिट होत नाही पण बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मला वाटलं ते जाणून बुजुन

गणपा
Sun, 07/24/2016 - 07:55 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

रजनिकांत नव्हे रजिनिकांत.बाकी

कंजूस
Sun, 07/24/2016 - 05:39 नवीन
रजनिकांत नव्हे रजिनिकांत.बाकी त्याचे चमत्कार प्रेक्षकांना आवडत असतील तर एकूण चित्रपटावर टीकाच व्यर्थ आहे.परवा अरोरा थिएटरबाहेर जो धुमाकुळ घातलाय चाहत्यांनी तो पाहून पटेलच.चार्ली चापलिनची नक्कल करून गल्ला गोळा करणारे सुपरस्टार हिंदीत आहेतच.रजिनिला डोक्यावर घेतात तसे इथल्या कोणत्याच मराठी हिरोबद्दल होत नाही हे आपली चूक असेल अथवा हिरो कमी पडत असेल.
  • Log in or register to post comments

नुकताच अस्तू सारखा सर्वांग

चौथा कोनाडा
Sun, 07/24/2016 - 09:29 नवीन
नुकताच अस्तू सारखा सर्वांग-सुंदर संवेदनाशील सिनेमा पाह्यल्या त्यामुळे कबाली बद्दल काय मत व्यक्त करणार ? त्याचा रोबोट पाहिला होता पण त्यातली व्हीफेक्स कलाकारी सोडली तर सो-सो च वाटला. तुलनेत कमल हसन खुपच उजवा वाटतो. बाकी रजनीकांतच्या वयाचे, त्याच्या भक्त चाहत्यांचे अतिशय कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

कमल हासन अन रजनीकांत तुलना

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 07/24/2016 - 10:41 नवीन
कमल हासन अन रजनीकांत तुलना होऊ शकत नाही असे आमचे मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अभिनयाच्या पातळीवर कमल हसन

चिनार
Mon, 07/25/2016 - 10:24 नवीन
अभिनयाच्या पातळीवर कमल हसन आणि रजनीकांत यांची तुलना होऊच शकत नाही असे आमचे मत. कमल हसन बाप माणूस आहे. पण अलीकडे तोसुद्धा आशय कमी आणि मेकअप जास्त अश्या चक्रात अडकल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पूर्ण सहमत

समीर_happy go lucky
Mon, 07/25/2016 - 21:48 नवीन
पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

अस्तु चे परिक्षण द्या ना चौ

सुखी
Sat, 07/30/2016 - 11:20 नवीन
अस्तु चे परिक्षण द्या ना चौ को दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सुखी ताई\दादा

समीर_happy go lucky
Sun, 07/31/2016 - 22:27 नवीन
चौ को??? (चौकस कोल्ह्या????) समस्त कोल्हा प्रवर्गातर्फे निषेध करावा काय या विचारात पडलेला स्मायली कल्पावा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

ओ समीरआनंदीजानशीबवानभाऊ

चांदणे संदीप
Sun, 07/31/2016 - 22:45 नवीन
"चौथा कोनाडा" असा आयडी आहे! चौकस कोल्ह्या - कैच्या कै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

हाहाहाहाहा बरं बरं

समीर_happy go lucky
Sun, 07/31/2016 - 22:50 नवीन
हाहाहाहाहा बरं बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

आधी मला समजेना चौ अन को चा

समीर_happy go lucky
Sun, 07/31/2016 - 22:51 नवीन
आधी मला समजेना चौ अन को चा लॉन्गफॉर्म काय असेल ते मग हा मी जनरेट केला :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

तुम्ही जनरेट केला

चांदणे संदीप
Sun, 07/31/2016 - 22:56 नवीन
आता बघा "चौकस कोल्हा" आयडी आठेक दिवसात हजर होतोय! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

कमल हासन

तिमा
Sun, 07/24/2016 - 14:33 नवीन
कमल हासनचे 'अप्पूराजा' आणि मेयरसाब' हे दोन चित्रपट अफलातून होते. करमणूक +नावीन्य, हे दोन्ही बघायला मिळाले. त्याची तुलना रजनीकांतशी होऊच शकत नाही.
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
Sun, 07/24/2016 - 16:10 नवीन
यात "पुष्पक विमानम" हा चित्रपट ॲडवण्यास हरकत नसावी! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बालपणी अप्पूराजा बघितला आणि

मार्मिक गोडसे
Sun, 07/24/2016 - 16:41 नवीन
बालपणी अप्पूराजा बघितला आणि कमल हसनचा फॅन झालो. त्याचे जुने सिनेमे अजुनही बघतो. पुष्पक व मेयरसाब बघताना क्षणभरही कंटाळा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

विश्वरूपम पण बरा होता ,Indian

एकुलता एक डॉन
Sun, 07/24/2016 - 16:47 नवीन
विश्वरूपम पण बरा होता ,Indian
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

अगदी सही !

चौथा कोनाडा
Sun, 07/24/2016 - 17:11 नवीन
अगदी सही ! कमल हसन एदुकेलिए पासुनच आपला आवडता अभिनेता होता. पुष्पक, अप्पुराजा, मेयरसाहब या सिनेमा नंतर तो अष्टपैलूपणाची खात्री पटली ! त्याचा हिंदुस्तानी जरा पसरत होता तरी आवडला होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

कमल हसन आवडता अभिनेता .

सिरुसेरि
Tue, 07/26/2016 - 17:06 नवीन
कमल हसन आवडता अभिनेता . +१ . कमल हसनचे "विरुमंडी " ,"तेनाली" , "सागर संगम" ," स्वाती म्रुथ्यम " , "अंबे सिवम" , "विलायधु वेट्टायडु" , "मायकेल मदन कामराजन" , "१६ वयानिधे" हे चित्रपटही उल्लेखनीय आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

" स्वाती म्रुथ्यम " सुंदर

ऋतुराज चित्रे
Wed, 07/27/2016 - 12:08 नवीन
" स्वाती म्रुथ्यम " सुंदर सिनेमा आणि कमल हसनचा अभिनयही तितकाच सुंदर. सदमाही छानच होता, कमल हसनचा अभिनयही सुंदर होता, परंतू तो सिनेमा कमल हसनपेक्षा श्रीदेवीचा म्हणून ओळखला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

सदमा

तुषार काळभोर
Sun, 07/24/2016 - 18:17 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

कमल हसन च्या चाहत्यांनी

मृत्युन्जय
Fri, 07/29/2016 - 13:25 नवीन
कमल हसन च्या चाहत्यांनी विश्वरुपम आणि अभय हे दोन चित्रपट देखील चुकवु नयेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

शाहरुख खान हा अभिनेता\व्यक्ती

समीर_happy go lucky
Sun, 07/31/2016 - 23:03 नवीन
शाहरुख खान हा अभिनेता\व्यक्ती मला प्रचंड आवडतो पण माझ्या मते त्याची अन कमल हासनची तुलना होऊ शकत नाही. म्हणज बघा इंजिनियरिंग मध्ये M -3 टॉपर केला तर लगेच त्याची अन बॅकलॉग वाल्याची तुलना होऊ शकते काय?? अजिबात नाही अन करूही नये, नशीब असं पलटू शकते कि हाच बॅकलॉग वाला याच टॉपर चा बॉस बनून त्याला राबवू शकतो... तर मतितार्थ काय? तर दोघेही आपापल्या जागी ठीकाय आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही अन करूही नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आई शप्पत, सदमा ल्हायाचाच

चौथा कोनाडा
Sun, 07/24/2016 - 20:35 नवीन
आई शप्पत, सदमा ल्हायाचाच राहिला राव ! अन ' जरासी जिंदगी ' ? ( नाव नक्की नीट आठवत नाहीय आता )
  • Log in or register to post comments

समीर भाऊ..

चिनार
Mon, 07/25/2016 - 10:27 नवीन
समीर भाऊ.. कबाली वगैरे जाऊ द्या पण ह्यावेळी तुम्ही परीक्षणात जरा हात आखडता घेतलाय असा वाटते.
  • Log in or register to post comments

राव, कन्फ्युज केलं तुम्ही

समीर_happy go lucky
Mon, 07/25/2016 - 21:49 नवीन
राव, कन्फ्युज केलं तुम्ही, हे कौतुक कि उडवली??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

तस नाही भाऊ..तूमचे परीक्षण

चिनार
Mon, 07/25/2016 - 22:06 नवीन
तस नाही भाऊ..तूमचे परीक्षण उत्तम असते नेहमी...यावेळी जरा सपक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

कबाली....

महासंग्राम
Mon, 07/25/2016 - 10:41 नवीन
कबाली.... इंटर्वल पर्यंत पिच्चर ला काहीच स्टोरी नाही... पिच्चर मध्ये प्रूफ केलंय कि तुमच्या प्रगती मागे तुमचे मित्रच असता, अन तुम्हाला डुबवायला सुद्धा मित्रच कारणीभूत असतात.. एखाद्या पोरीने जर तुम्हाला जायला सांगितलं तर चूपचाप निघून जायचं,तिथं थांबल्यावर तुमच्या जीवाला धोका असतो, हे रजनीकांतला भी गोळया लागल्यावरच कळाल.. रजनीकांत अमर आहे असं मला वाटत, त्याला ४ गोळ्या लागल्या तरी त्यानं फक्त पट्ट्या लावल्या... माणूस कितीभी म्हतारा झाला तरी हँडसम दिसू शकतो हे रजनीकांत ने प्रूफ करून दाखवलं, म्हणजे मला अजून लै स्कोप आहे भारी दिसायला.... मला पहिले वाटायचं फक्त भारतातले लोकच लुना वापरता, पण मलेशिया मशे सुद्धा लुना M80 आहे... कोणतीही अनोळखी पोरगी जर तुम्हाला पप्पा म्हणली तर ती तुमची पोरगी नसते... रजनीकांत भी जोर जोरात रडतो, तर अपूण तर लै तुच्छ आहे ओ.... भारतातल्या बाया कोणालापन खुन्नस देऊ शकता, मग तुम्ही डॉन का असेना... पिच्चरात रजनीकांतची पोरगी दिसायला लै भारी होती, पण माझी शिट्टी वाजवायला काय हिम्मतच झाली नाही, भीती होती की रजनी भौ थेटर मधून बाहेर निघून मारू नये म्हणजे झालं... माय बापाच्या भांडणात पोराचा जेव्हडा रोल राहतो तेवढाच रोल फक्त राधिका आपटेचा आहे... कटप्पान बहुबलीला का मारलं पुढल्या वर्षी तरी कळण पण जर्किन वाल्यान रजनीकांतला मारलं कि नाही हे कोण सांगणार... पिच्चरची स्टोरी काय आहे विचारणाऱ्याला हाणला पाहिजे. रजनीकांत आहे पिक्चरमंदी, मग आता स्टोरी कशाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहा

समीर_happy go lucky
Mon, 07/25/2016 - 21:43 नवीन
हाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

क+बाली

योगी९००
Tue, 07/26/2016 - 08:51 नवीन
कटप्पान बहुबलीला का मारलं पुढल्या वर्षी तरी कळण पण जर्किन वाल्यान रजनीकांतला मारलं कि नाही हे कोण सांगणार... कबाली = कट्टप्पा + बाहूबली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

कबाली काय किंवा शिवाजी काय..

मराठमोळा
Tue, 07/26/2016 - 05:17 नवीन
कबाली काय किंवा शिवाजी काय.. पण अशा सिनेमांचे परीक्षण लिहिण्यात/करण्यात काय हशील? रजनीकांतच्या सिनेमातून आणखी काय अपेक्षित असते? त्याच्या सिनेमाची तुलना करण्याचही प्रयोजन समजले नाही. :)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी, आमीबी कबाली बघायला

अभ्या..
Tue, 07/26/2016 - 09:49 नवीन
अगदी अगदी, आमीबी कबाली बघायला म्हणून गेलोच नव्हतो, नवीन इ स्क्वेअर कसे आहे ते पाह्यलं. बाकी पिक्चर बोगस आहे. एक तर सगळा पिक्चर मलेशियात, तिथल्या ग्यानग्स अन पब्लिक हे अनाकलनीय सब्जेक्त. रजनीआण्णा आता लैच ओल्ड ग्रॅण्डपा झाले. मेकअप जास्त नाहीये वापराया. सो त्यांचा प्रेझेन्स काय एव्हडा भारी वाटत नाही. आपटेबाई जवळपास पूर्ण पिक्चर प्रेग्नन्ट दाखवल्यात. काबालीकाकांची पोरगी मात्र डाव आहे. म्युझिक मोरटल कॉम्बॅट प्लस डॉन चे. ते जीवा कॅरेक्टर भलतंच ऍक्टिव्ह दाखवलय. इतर काही सांगण्यासारखे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

सिनेमा बघीन न बघीन...

मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 12:38 नवीन
पण एक मात्र आहे. इतर लोकांना पब्लीक सुट्टीच्या वेळेत सिनेमा प्रदर्शित करायला लागतो, तर रजनीकांतचा सिनेमा ज्या दिवशी असतो, त्या दिवशी सुट्टी जाहीर केल्या जाते.
  • Log in or register to post comments

सुट्टी होती MNC त पण बदल्यात

समीर_happy go lucky
Wed, 07/27/2016 - 23:21 नवीन
सुट्टी होती MNC त पण बदल्यात शनिवार-रविवार दोन्हीही दिवस सहा सहा तास राबवून घेतलं अन नाईट शिफ्ट वाल्याना कोणतीही सवलत नव्हती, लोकांना काज जाते म्हणे सुट्टी होती असं म्हणायला -इति एक मित्र चेन्नई
  • Log in or register to post comments

करेक्ट.

चौथा कोनाडा
Fri, 07/29/2016 - 12:15 नवीन
करेक्ट. MNCs असल्या बाबतीत स्मार्ट अर्थातच चालू असतात. कुठली तरी क्रेझ बघुन त्या वर राईड व्हायचे, अन काही तरी मोठे दिल्याचा आव आणायचा. पिळुन वसुली करुन घेतात. इतर फालतू गोष्टीवर पैसे खर्च करतात (ज्याचा आर्थिक काही फायदा नसतो) अन कर्मचारी लोकाना स्साध्या साध्या सवलती देताना रड दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

कबाली हा सर्वार्थाने आणि

मृत्युन्जय
Fri, 07/29/2016 - 13:44 नवीन
कबाली हा सर्वार्थाने आणि परिपुर्ण असा रद्दी चित्रपट आहे. चित्रपटाला कथा नाही असे म्हणवत नाही. कथा आहेच. पण ती अतिशय रद्दी आहे आणी किमाण १०० चित्रपटांमध्ये वापरुन झाली आहे. चित्रपटाला लॉज्जिक नाहिच. चित्रपटातली सगळीच पात्रे केवळ रजनीकांतची नातेवाईक मंडळी असल्याने जिवंत राहतात अन्यथा त्यांच्या जिवंत राहण्याचे काहीही समर्थन नाही. स्वतः रजनीकांत ४ गोळ्या लागुन सुद्धा नंतर लिमलेट च्या गोळ्या खाल्ल्यासारखा निवांत बसलेला असतो. गॉडझिलाला भाले फेकुन मारल्यावर त्याला जेवढी मोठी बँडेड लावावी लागेल त्यापेक्षा थोडे छोटे बँडेज लावुन तो थोड्याच वेळात खदाखदा हसतो. तो हिरो असल्याने आणी बेसिकली तो रजनीकांत असल्याने इतपत चालुनच जायला हवे म्हणा. चित्रपट अपेक्षेप्रमाणे आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रथेला जागुन अतिशय बटबटीत आहे. शिवाय अतिशय रटाळ आणि संथ सुद्धा आहे. खरे सांगायचे तर चित्रपटात रजनीकांत वगळता काहिच नाही. अगदी राधिका आपटेला सुद्धा वाया घालवले आहे. इतकी "टॅलेंटेड"अभिनेत्री ती खरे म्हणजे पण पुर्ण निराशा करते. :) थोडक्यात केवळ "पांडु"या थाटार "रजनी"असे ओरडायचे असेल किंवा देवघरात रजनी अण्णांचा फोटो लावलेला असेल किंवा ३ तास एसीत आणी अंधारात बसुन काही करायचे असेल (म्हणजे झोप काढणे, वामकुक्षी वगैरे वगैरे) किंवा जगातले सर्वात रद्दी चित्रपट बघायचेच असा पण केला असेल किंवा पैसे खुप वर आले असतील तर चित्रपट बघण्याचा कर्मदरिद्रीपण करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

कबाली हा सर्वार्थाने आणि परिपुर्ण असा रद्दी चित्रपट आहे.

मुक्त विहारि
Sat, 07/30/2016 - 06:41 नवीन
मग एक फर्मास परिक्षण लिहू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

म्हणजे नाव चुकलंय म्हणा की..

खेडूत
Sat, 07/30/2016 - 08:21 नवीन
म्हणजे नाव चुकलंय म्हणा की...कबाडी पायजे होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

रजनीकांत म्हणजे मूर्तिमंत

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 15:41 नवीन
रजनीकांत म्हणजे मूर्तिमंत स्टार व्हॅल्यू, पिरियड.
  • Log in or register to post comments

देअर इज रजनी,

वेल्लाभट
Fri, 07/29/2016 - 16:16 नवीन
देअर इज रजनी, अँड देअर आर अदर्स. - रजनीपंखा पण बघीन की नाही ठाऊक नाही. वेळेअभावी दॅट इज. नो अदर रीजन.
  • Log in or register to post comments

रजनी चे चित्रपट थेटरमध्ये

कानडाऊ योगेशु
Sat, 07/30/2016 - 13:36 नवीन
रजनी चे चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहणे हा दाक्षिणात्यांच्या बाबतीत एक स्टेटस सिम्बॉल कम एक फॅड झाले आहे. आणि सध्याच्या मार्केटींगच्या जमान्यात अश्या प्रकाराला इवेंटमध्ये बदलावयाला बरेच कमर्शियल फॅक्टर अगदी एका पायावर तयार असतात. हेच रजनीचे फॅन टी.वीवर फ्रिमध्ये रजनीचा एकतरी चित्रपट पाहतील का ह्याची शंकाच आहे. पण त्याच चित्रपटासाठी थियटरमध्ये गर्दी नक्कीच करतील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा