दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही.
साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते.
सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!!
प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे.
सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे. मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
वाचने
9725
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे 'प रणजित' म्हणजे रणजित
हाहाहा, असेलही मोठा माणूस तो
In reply to हे 'प रणजित' म्हणजे रणजित by संदीप डांगे
काहीही कथानक नसलेला अतिशय
विश्वास ठेवता येतो का...... ?
In reply to काहीही कथानक नसलेला अतिशय by सतिश गावडे
हे सारे आमच्या जमान्याचे.
In reply to विश्वास ठेवता येतो का...... ? by चौकटराजा
'दिग्दर्शन कबालीचे आहे',
सॉरी बॉस, टायपो असेल अन आता
In reply to 'दिग्दर्शन कबालीचे आहे', by एस
मला वाटलं ते जाणून बुजुन
In reply to सॉरी बॉस, टायपो असेल अन आता by समीर_happy go lucky
रजनिकांत नव्हे रजिनिकांत.बाकी
नुकताच अस्तू सारखा सर्वांग
कमल हासन अन रजनीकांत तुलना
In reply to नुकताच अस्तू सारखा सर्वांग by चौथा कोनाडा
अभिनयाच्या पातळीवर कमल हसन
In reply to कमल हासन अन रजनीकांत तुलना by कैलासवासी सोन्याबापु
पूर्ण सहमत
In reply to अभिनयाच्या पातळीवर कमल हसन by चिनार
अस्तु चे परिक्षण द्या ना चौ
In reply to नुकताच अस्तू सारखा सर्वांग by चौथा कोनाडा
सुखी ताई\दादा
In reply to अस्तु चे परिक्षण द्या ना चौ by सुखी
ओ समीरआनंदीजानशीबवानभाऊ
In reply to सुखी ताई\दादा by समीर_happy go lucky
हाहाहाहाहा बरं बरं
In reply to ओ समीरआनंदीजानशीबवानभाऊ by चांदणे संदीप
आधी मला समजेना चौ अन को चा
In reply to हाहाहाहाहा बरं बरं by समीर_happy go lucky
तुम्ही जनरेट केला
In reply to आधी मला समजेना चौ अन को चा by समीर_happy go lucky
कमल हासन
+१
In reply to कमल हासन by तिमा
बालपणी अप्पूराजा बघितला आणि
In reply to +१ by चांदणे संदीप
विश्वरूपम पण बरा होता ,Indian
In reply to बालपणी अप्पूराजा बघितला आणि by मार्मिक गोडसे
अगदी सही !
In reply to बालपणी अप्पूराजा बघितला आणि by मार्मिक गोडसे
कमल हसन आवडता अभिनेता .
In reply to अगदी सही ! by चौथा कोनाडा
" स्वाती म्रुथ्यम " सुंदर
In reply to कमल हसन आवडता अभिनेता . by सिरुसेरि
सदमा
In reply to कमल हासन by तिमा
कमल हसन च्या चाहत्यांनी
In reply to कमल हासन by तिमा
शाहरुख खान हा अभिनेता\व्यक्ती
In reply to कमल हसन च्या चाहत्यांनी by मृत्युन्जय
आई शप्पत, सदमा ल्हायाचाच
समीर भाऊ..
राव, कन्फ्युज केलं तुम्ही
In reply to समीर भाऊ.. by चिनार
तस नाही भाऊ..तूमचे परीक्षण
In reply to राव, कन्फ्युज केलं तुम्ही by समीर_happy go lucky
कबाली....
हाहाहाहाहा
In reply to कबाली.... by महासंग्राम
क+बाली
In reply to कबाली.... by महासंग्राम
कबाली काय किंवा शिवाजी काय..
अगदी अगदी, आमीबी कबाली बघायला
In reply to कबाली काय किंवा शिवाजी काय.. by मराठमोळा
सिनेमा बघीन न बघीन...
सुट्टी होती MNC त पण बदल्यात
करेक्ट.
In reply to सुट्टी होती MNC त पण बदल्यात by समीर_happy go lucky
कबाली हा सर्वार्थाने आणि
कबाली हा सर्वार्थाने आणि परिपुर्ण असा रद्दी चित्रपट आहे.
In reply to कबाली हा सर्वार्थाने आणि by मृत्युन्जय
म्हणजे नाव चुकलंय म्हणा की..
In reply to कबाली हा सर्वार्थाने आणि by मृत्युन्जय
रजनीकांत म्हणजे मूर्तिमंत
देअर इज रजनी,
रजनी चे चित्रपट थेटरमध्ये