Skip to main content

मदत हवी आहे

फकीरा १९६३

लेखक dadabhau यांनी सोमवार, 25/08/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णाभाऊंचा मराठी चित्रपट "फकीरा"(१९६३) बराच शोधूनही मिळत नाहीये..कुणी मिपाकर हा पिक्चर फुकट किंवा विकत कसा बघता येईल यासाठी काही मदत करु शकेल तर अवश्य करावी ही नम्र विनंती.

हा प्रश्न कसा सोडवावा?

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 26/07/2017 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या म

कसे करावे?

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 26/07/2016 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही.