Skip to main content

सल्ला

सल्ला हवा : लोखंडी तवा

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी सोमवार, 23/04/2018 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी काल एक लोखंडी कढई आणि एक लोखंडी तवा विकत घेतला आहे. त्यावर "वर्जिन लोखंडाच्या पट्टीपासून तयार केलेले आहे " असे लिहिलेले आहे. वरील भांडी आणि बीड (कास्ट आयर्न) यांच्यात काय फरक आहे ? त्यावर "ते आधीच सिझन केलेले आहेत" असा कोणताही उल्लेख नाही. तरीही त्यांच्यावर काळे कोटिंग आहे. साबणाने आणि ब्रशने घासले तर काळे कोटिंग निघत आहे. हे आधीच केलेले सिझनिंग आहे का? तरीही मी एका कढईला घास-घासून, बोटाला काळे लागणार नाही इथवर आणले आहे. त्यानंतर तेल लावून गरम केले. त्या कढईत आज सकाळी पालकाची भाजी केली. इतक्या लवकर भाजी करणे योग्य आहे का?

लिहायचे आहे, पण कसे?

लेखक अनुप देशमुख यांनी बुधवार, 19/07/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे. लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला.

दहा वर्षांच्या मुलीच्या तिरळ्या डोळ्यांच्या उपचारासाठी सल्ला / उपाय / मार्गदर्शन हवे आहे

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 31/12/2016 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या परिचयातील एका मुलीला तिरळे डोळेआळशी डोळे हा त्रास आहे. फॅक्टस अँड फिगर्स:
  • मुलीचे सध्या वय: दहा वर्षे आहे. तिरळेपणाचे व आळशी डोळ्याचे पहिल्यांदा निदान पाच वर्षांपूर्वी झाले.
  • निदानानंतर, दोन डोळ्यांना वेगवेगळ्या नंबरचा चष्मा आणि तिरळा+आळशी नसलेला, चांगला डोळा झाकण्यासाठी पॅच असा उपचार सुरु केला. औषधे ड्रॉप्स इ दिलेले नव्हते.
  • उजवा डोळा सामान्य आहे आणि त्यात +१.० पॉईंट आहे.

कसे करावे?

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 26/07/2016 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही.

कोणती सायकल घ्यावी?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 19/11/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी एक मदत हवी आहे. ईयत्ता ७ वी ते बी.एस्सी. सायकल माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. साधी बी.एस.ए. सायकल, पण तिच्यावर मी रोज कॉलेजचे १० कि.मी. जायचोच. शिवाय गणेशपुरी,वज्रेश्वरी,शिर्डी , अष्टविनायक अशा कितीतरी सहली केल्या. पण ९८ साली ती सायकल चोरीला गेली आणि नंतर पुन्हा सायकल घेतलीच नाही. आता पुन्हा सायकल घ्यावीशी वाटत आहे. उपयोग - आठवड्यात २-३ वेळा ५-७ कि.मी. बजेट- १०-१२ हजार गियर-असल्यास उत्तम, पण सर्व्हिसिंग साध्या दुकानात पण झाली पाहीजे. उदा.डेकॅथलॉनमध्ये गेलो होतो.

मेडीकल कॉलेज प्रवेशाबद्दल सल्ला हवाय

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 17/06/2015 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्यात राहणार्‍या माझ्या भाचीला पीएमटीत १५४ गुण मिळालेत. तीला आज प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस निवडून अर्ज भरायचा आहे. तीने नाशिकचे एसएमबीटी मेडीकल कॉलेजबद्दल उत्सुकता दर्शवली. मी तीला मुंबईचं कोणतं कॉलेज नाही का म्हणून विचारले तर तीने तेरणा कॉलेज आहे असं सांगितले. मला मेडीकल कॉलेजबद्दल फारसं काही माहिती नाही. मला असं वाटतं तीने मुंबैत शिकावं. या क्षेत्रातले जाणकार याबद्दल अधिक मार्गदर्शन करू शकतील काय?

आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरः तातडीने माहिती हवी आहे

लेखक दिपोटी यांनी गुरुवार, 11/06/2015 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! माझा एक अत्यंत जिवलग मित्र (जो दिल्ली येथे रहातो) गेले काही महिन्यांपासून आजारी आहे व त्याच्यावर अ‍ॅलोपॅथिक उपचार चालू आहेत. मात्र अ‍ॅलोपॅथिक उपचारांनी पूर्ण बरा होण्याची हमी दिली नसल्यामुळे तो एखाद्या उत्तम आयुर्वेदिक/होमिओपाथिक वैद्य-डॉक्टरच्या शोधात आहे. त्या शोधात आपल्यापैकी कोणाची मदत होते का हे पहावे म्हणून हा धागा ... आजाराचे नाव: Myelitis आजाराची माहिती: आठेक महिन्यांपूर्वी त्याच्या spinal cordवर एक जखम (lesion) आढळून आली ज्यामुळे त्याच्या डाव्या पायातील ताकद गेली होती व चालण्यास त्रास होत होता. स्टेरॉईडस देऊन त्रास आटोक्यात आणला गेला.