काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
65007
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
या चर्चेतून काय निष्पन्न
In reply to माझ्यामते by अमितदादा
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to या चर्चेतून काय निष्पन्न by श्रीगुरुजी
जम्मू
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by अमितदादा
अमित दादा साहेब
In reply to जम्मू by अमितदादा
खरे साहेब, तुमच्या
In reply to अमित दादा साहेब by सुबोध खरे
काश्मीरचा प्रश्न लष्करी बळावर
In reply to खरे साहेब, तुमच्या by अमितदादा
दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: -
पटेल आंदोलन, जाट आंदोलन
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
जतीन देसाई मित्र आहेत वाटत
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
सोन्या बापू या आयडीने स्वतः
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
कलम ३७० रद्द करा ही सुद्धा
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
याच कलमामुळे काश्मिरमध्ये
In reply to कलम ३७० रद्द करा ही सुद्धा by श्रीगुरुजी
सोन्या बापू या आयडीने स्वतः
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
देव ताम्हणकरांना
In reply to सोन्या बापू या आयडीने स्वतः by मृत्युन्जय
तुम्ही म्हणाल ते मान्य करू
In reply to दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - by संदीप ताम्हनकर
सैनिकांची काळजी कोणाला आणि दहशतवाद्यांची काळजी कोणाला ....
ताम्हनकर, देव तुमचे अन ह्या
बाकी ऍड होमिनेम फाट्यावर मारून
बापुसाहेब आणि गुरुजींच्या
सोन्याबापू नावाचे आयडी
सैन्य
गंभीर विषय
इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि'
????????
In reply to इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि' by श्रीगुरुजी
खॅ खॅ खॅ खॅ
In reply to इथे 'भाऊ तोरसेकर व खि खि खि' by श्रीगुरुजी
कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा ....
तुम्ही दिलेल्या दुव्यात
In reply to कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा .... by संदीप ताम्हनकर
एक शंका
In reply to तुम्ही दिलेल्या दुव्यात by प्रसाद_१९८२
एम आय डी सी मध्ये जमीन
In reply to एक शंका by अनुप ढेरे
साहेब,
In reply to कृपया हे व्हिडीओ सुद्धा पहा .... by संदीप ताम्हनकर
शांत अशा पुण्यासारख्या
यू टू ?
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
मुनीवर
In reply to यू टू ? by कपिलमुनी
डॉक्टर साहेब तुमचे अनुभव
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
काश्मीर किंवा ईशान्य भारतात
In reply to डॉक्टर साहेब तुमचे अनुभव by अमितदादा
बरं हे अनुभव अपवाद नाही तर
In reply to काश्मीर किंवा ईशान्य भारतात by सुबोध खरे
जागा हुकली, रुटीन अनुभव
In reply to बरं हे अनुभव अपवाद नाही तर by कैलासवासी सोन्याबापु
प्रतिसाद आवडला खरे साहेब.
In reply to काश्मीर किंवा ईशान्य भारतात by सुबोध खरे
खरे साहेब, _/\_
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
...
In reply to शांत अशा पुण्यासारख्या by सुबोध खरे
जिथे तिथे पिंक टाकलीच पाहिजे
In reply to ... by चंपाबाई
...
In reply to जिथे तिथे पिंक टाकलीच पाहिजे by सुबोध खरे
...
In reply to ... by चंपाबाई
सैनिक मरायला सदैव सज्ज असतो.
In reply to ... by चंपाबाई
.
In reply to सैनिक मरायला सदैव सज्ज असतो. by गामा पैलवान
फुकट्या कोण?
In reply to . by चंपाबाई
"सैनिक फुकट लढत नसतात"
In reply to . by चंपाबाई
..
In reply to "सैनिक फुकट लढत नसतात" by सुबोध खरे
आकुपेषनल हाझार्ड
In reply to .. by चंपाबाई
सैनिक फुकट लढत नसतात
In reply to . by चंपाबाई
सैनिक फुकट लढत नसतातमाझ्या विचार आणि (अल्प)
दीड दिवस काश्मीरमध्येआणि
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
सहमत
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
...
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
...
In reply to माझ्या विचार आणि (अल्प) by सुबोध खरे
अवतार समाप्तीची वेळ झाली
In reply to ... by चंपाबाई
बायकोने दिलेल्या त्रासाचा बदला
In reply to ... by चंपाबाई
एका सैनिकाने स्थानिकांशी
काही मुद्दे
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.@संदीप ताम्हनकर तुम्हाला फक्त डेक्कन परिसलातील घटना वाचुन लिहावेसे वाटले? एक बातमी वाचली होती पुण्यात लष्करी छावणी जवळिल एका रहिवाशी इमारतीतील लोकाना लष्करातील जवान व अधिकारी याना लष्करी जागेचा वहिवाटि करु नये म्हणुन अटकाव केला. यापुढे लष्करातील जवानानी बळजबरीने त्याना बाहेर हाकलुन ( लष्करातीची ) जागा बन्दिस्त केलि ठ्ळक बाब अशी कि त्या इमारतीत एक माजी मेजर जनरल अधिकारी वास्तव करत होते. जर लष्कराने पुण्यातील सर्व ( देशातील सर्व कॅन्टोनमेन्ट मधील) लष्करी जागा बन्दिस्त केल्या व सर्व सामान्य नागरीक सुविधेसाठि कोणाला बोलवणार ( हुर्रियतला काय ??? )ईशान्य भारतात बन्डाळी भरपुर नियंत्रणात आहे. पंजाब व काश्मीर येथे सर्वसाधारण एकाच कालखंडात दहशदवाद सुरु झाला, आज पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला आहे. पण काश्मीर मध्ये सुरु आहे. जेव्हा पंजाबमधील दहशदवाद पुर्णपणे थांबला तेव्हा भाजप सरकारमध्ये पण नव्हते, मग पंजाबमधील दहशदवाद असा थांबला ???? काँग्रेसला उगाच दोष का देता ? , बर वाजपेयी लाहोरला गेले कारगिलबद्दल गाफिल राहिले वर त्याच मुशर्रफला आग्राला बोलवुन गळाभेट घेतली, याउपर मोदि लाहोरला जाऊन केक खाउन आले भाजपाने केलेले हे " मुस्लिम तुष्टीकरण " तुम्हाला दिसत नाहि का ( मी अपेक्षा करतो कि काश्मीर "इस्लाम / मुसलमान" पाकीस्तान नाते माहीत असावे. ) ????एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारेकाँग्रेसचे सरकार
कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी
लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतीलकाश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच.तुम्ही डेक्कन घटना अनुभवली कि नाही माहित नाही. पण तुम्हि काश्मीर फिरलात तुम्हि दिलेल्या टॅक्सचा हिशोब एका कर्तव्यदक्ष सैनिकाला विचारले / सांगितले फार फार आभारी आहे. हाच हिशोब भ्रष्ट्राचार करणाऱ्या नेत्याला विचारुन निदान माझ्यावर तर उपकार करा.... क्षणभर मला असे वाटले की तुम्ही हुर्रियतसाठी भरपुर काही कराल. वैतागलेले भारतीय लष्कार म्हणते भरपुर काश्मीरी खातात भारतातले आणि दुवा सीमेपलीकल्यांसाठी मागतात. तुम्ही भारतीय लष्काराला त्याच्या चुकाबद्द्ल आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन नाण्याची एक बाजु मांडली हरकत नाही . जरा शुध्दीमध्ये मला एक सांगा की तुम्ही पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल बातम्या इंटरनेट लेख यावरुन लिहिणार की प्रत्यक्ष पाकिस्तानात जाऊन अनुभवुन लिहिनार. पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल अभ्यास करा वस्तुस्थिती लिहा आणि जर खरोखर काश्मीर फिरला असाल तर छतीठोकपणे सांगा की तुम्हि पाकीस्तानातल्या मुहाजिदिन वागणुक, लष्कारशाहीबद्द्ल काश्मीरी मुसलमानांना सांगू शकाल.माझा काश्मीरवरील लेख (फेसबुकवरील)
परत एकदा नेहरू
In reply to माझा काश्मीरवरील लेख (फेसबुकवरील) by सुधीर काळे
या सगळ्यात रशियाचा आणि चीनचा
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
तुमच्या इंचाइंचाच्या धाग्यावर
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
एकत्रित प्रतिसाद
In reply to तुमच्या इंचाइंचाच्या धाग्यावर by श्रीगुरुजी
तेव्हा १९४८ मध्ये अमेरिकन
In reply to एकत्रित प्रतिसाद by गॅरी ट्रुमन
नाही
In reply to तेव्हा १९४८ मध्ये अमेरिकन by श्रीगुरुजी
बुबुडाविपुमावि म्हणजे
In reply to नाही by गॅरी ट्रुमन
+१
In reply to परत एकदा नेहरू by गॅरी ट्रुमन
लष्कर स्वतः युद्ध सुरु करत
वर या सुडो सेक्युलर आणि
In reply to लष्कर स्वतः युद्ध सुरु करत by सुबोध खरे