काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
65007
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावधान !
बाकी चालू द्या
काश्मिरात का आणि पुण्यात का नाही
उचलली जीभ अणि लावली टाळ्याला
अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे
अवांतर - डोवल
In reply to अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला
In reply to अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.+१०००काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल... काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे, (अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत, (आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत, (इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व (ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे; अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.https://www.youtube.com/watch
In reply to डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला by डॉ सुहास म्हात्रे
हैदर चित्रपट बघा
वास्तव
होय शत प्रतिशत सत्य आहे
In reply to वास्तव by तिमा
काकाश्री, नो ऑफेन्स पण,
In reply to होय शत प्रतिशत सत्य आहे by नाखु
सोन्याबापुंशी सहमत
In reply to काकाश्री, नो ऑफेन्स पण, by कैलासवासी सोन्याबापु
थेट
In reply to सोन्याबापुंशी सहमत by शाम भागवत
१) आजही गौहत्तीला फॅमीली
In reply to थेट by नाखु
ईशान्य भारत
In reply to १) आजही गौहत्तीला फॅमीली by शाम भागवत
सहमत
In reply to ईशान्य भारत by पैसा
+१
In reply to सहमत by सामान्य वाचक
संपादक मंडळाने असल्या तद्दन टुकार लेखांना परवानगी....
In reply to +१ by टवाळ कार्टा
विचारवंत
In reply to संपादक मंडळाने असल्या तद्दन टुकार लेखांना परवानगी.... by विनोद१८
गैरी भाई 100 % सहमत,
In reply to विचारवंत by गॅरी ट्रुमन
लिंक बद्दल धन्यवाद
In reply to ईशान्य भारत by पैसा
लिंक बद्दल धन्यवाद
In reply to ईशान्य भारत by पैसा
एकच उपाय
प्रतिक्रिया देणार नव्हतो.
"शांत अशा पुण्यासारख्या
In reply to प्रतिक्रिया देणार नव्हतो. by श्रीगुरुजी
आँ ???
In reply to "शांत अशा पुण्यासारख्या by पी. के.
सुरेश ????
In reply to आँ ??? by पीके
रमेश ????
In reply to सुरेश ???? by पी. के.
ए शाम जरा चिज पॉपकॉर्न लाना
दंगा
In reply to ए शाम जरा चिज पॉपकॉर्न लाना by महासंग्राम
मुनिवर्य विषय काश्मीर आहे ना,
In reply to दंगा by कपिलमुनी
लग्नाचा बाजारhttp://www
In reply to मुनिवर्य विषय काश्मीर आहे ना, by महासंग्राम
छे हो तो जरा गंभीर अन
In reply to लग्नाचा बाजारhttp://www by वाल्मिक
काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही
ओक्के
Pune and Kashmir???
अगदी बाडीस
In reply to Pune and Kashmir??? by संदीप डांगे
आता काश्मीर भारतात असल्याने
काश्मीरमध्ये आंदोलकांनी फोडले जवानाचे डोळे
३१ जानेवारी २०१२ ला साडेचार
बाकी ते डोवाल साहेबांना कशाला
In reply to ३१ जानेवारी २०१२ ला साडेचार by अप्पा जोगळेकर
इतकी वर्ष अॅफ्स्पा खाली
अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही
In reply to इतकी वर्ष अॅफ्स्पा खाली by अनुप ढेरे
श्रीनगर- बलात्काराची तक्रार
काश्मिर .....
अजित दोभाल = जेम्स बाँड ?
विकतचे दुखणे.
चंपाबाई आयडीबदले
हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ
मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास
In reply to हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ by मनो
भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत
In reply to मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास by शाम भागवत
:))
In reply to भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत by कैलासवासी सोन्याबापु
तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे
In reply to भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत by कैलासवासी सोन्याबापु
बापरे. आता काय होणार?
In reply to तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे by मृत्युन्जय
स्पष्ट बोलतो
In reply to तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे by मृत्युन्जय
मिपावर लेख पाहुन नाही तर
In reply to स्पष्ट बोलतो by कैलासवासी सोन्याबापु
सगळे उलगडतो, प्रथम एक
In reply to मिपावर लेख पाहुन नाही तर by मृत्युन्जय
माहिती नाही. तोरसेकरांना हा
In reply to सगळे उलगडतो, प्रथम एक by कैलासवासी सोन्याबापु
नाही, मला असेच म्हणायचे
In reply to माहिती नाही. तोरसेकरांना हा by मृत्युन्जय
सोन्याबापू तुम्हाला जो त्रास
In reply to नाही, मला असेच म्हणायचे by कैलासवासी सोन्याबापु
मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच
In reply to सगळे उलगडतो, प्रथम एक by कैलासवासी सोन्याबापु
हाच संदर्भ अगोदर मिळाला असता
In reply to मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच by शाम भागवत
पटलं
In reply to हाच संदर्भ अगोदर मिळाला असता by कैलासवासी सोन्याबापु
बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची
In reply to मिपावर लेख पाहुन नाही तर by मृत्युन्जय
ह्यावर काही?
In reply to बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची by कैलासवासी सोन्याबापु
भागवतांना समज द्यावीशी वाटली
In reply to बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची by कैलासवासी सोन्याबापु
(याचा अर्थ असा होतो की
In reply to भागवतांना समज द्यावीशी वाटली by मृत्युन्जय
हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी
In reply to (याचा अर्थ असा होतो की by कैलासवासी सोन्याबापु
भाऊ तोरसेकर?????
In reply to हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी by मृत्युन्जय