Skip to main content

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

लेखक संदीप ताम्हनकर यांनी गुरुवार, 21/07/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते. याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता. पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की. ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा. पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल. आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.

वाचने 65007
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच....
हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही. बाकी चालू द्या.

मूळ मुद्दा असा आहे की 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' हा कायदा काश्मिरात का आणि पुण्यात का नाही याचा जरा निरपेक्ष विचार करा उत्तर तुंम्हाला सापडेल आणि तुमचे मुद्दे किती योग्य ते तुम्ही ठरवू शकाल

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? राष्ट्रवादात पण ३०-६०-९०-क्वार्टर-हाफ-फुल अशी सिस्टम असते काय? तुम्ही लिबरल असाल अन लिबरल तत्वातच देशाच्या १२५ कोटी जनतेचे हित समाविष्ट असल्याचे तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर ते उघड मान्य करा, मोदी, डोवल वगैरे असू दे, आधी ताकाला जाऊन भांडी लपवणे सोडावेत हे सुचवतो. अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.
बाप्पु, हे तुम्हीच लिहीलेत हे बरे झाले. तसेच सैन्यावर जी पातळी सोडुन टिका आहे त्याचे पण तुम्ही खरमरीत उत्तर द्याच. काश्मीर मधे सैन्याला कीती हात बांधुन आणि पॉलिटीकली करेक्ट भुमिका घेउन ( पटत नसली तरी ) काम करावे लागते ह्या बद्दल पण लिहाच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी. +१००० काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल... काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे, (अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत, (आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत, (इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व (ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्‍या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे; अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.

हैदर चित्रपट बघा उडत पंजाब ला कात्री आणि त्याला नाही

काश्मीरातील वास्तव हे आहे की बहुसंख्य काश्मीरींना (पश्चिमी भागातल्या) स्वतंत्र होण्याची मनांतून इच्छा आहे. अगदी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, तेंव्हाही हॉटेल मालकापासून अनेकांनी, 'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का' असे आम्हाला विचारले होते. ते स्वतःला अजूनही भारताचे मानायला तयार नाहीत. पण त्याचवेळी, पाकिस्तानात जावे लागले तर, या भीतिने, त्यातले मवाळ जास्त आग्रह धरत नाहीत. पण पाकिस्तानची फूस असल्यामुळे जहालवादी हिंसक आंदोलने करतात आणि अतिरेक्यांनाही मदत करतात. सैन्यदलाकडून त्यांच्यावर काहीच अत्याचार झाले नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. पण बहुसंख्य केसेसमधे भारतीय लष्कराने त्यांना शिक्षा दिली आहे. तिथल्या विचित्र परिस्थितीला बाकीच्या राज्यांसारखे नॉर्मल वातावरण करणे, हे अतिशय कठीण काम आहे. याच काश्मीर राज्यात लेह, लडाख देखील आहे. तिथे अशी आंदोलने होत नाहीत. उलट तिथले लोक प्रत्यक्ष भेटीत खूपच शांत व चांगल्या स्वभावाचे वाटले. तिथे विकासावरही फारच अल्प खर्च केला जातो.तरीही तिथल्या लोकांना सैन्यदलाचा का बरे त्रास होत नाही, वेगळे व्हावेसे का वाटत नाही,हा प्रश्न स्वतःस विचारुन पहावा.

In reply to by तिमा

साल २०१० : सख्खे नातेवाईक जाऊन आले
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१३ : जुन्या कंपनीतील सहकारी काश्मीरला जाऊन आले त्याने थेट विचारले तुमचे उप्जीवीकेचे एक्मेव साधन काय तर पर्यटन (राहण्यास शिकार्यात होता तो कुटुंबासहीत).
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१५: नुकताच कंपनीतील एक सहकारी जाऊन आला त्यांनाही असाच अनुभव जर या शिल्लक राहिलेल्यांना (हिंदु पंडीत कधीच नेसत्या वस्त्रानिशी निर्वासीत झालेत तिथून) तर उर्वरीत भारताला का त्यांच्याबद्दल अनुकंपा/ममत्व वाटावे. उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. ता:कः खालच्या एका प्रतिसादातील उल्लेखाबद्दल धन्यवाद. पेराल तेच उगवेल यावर विश्वास असलेला नाखु

In reply to by नाखु

आपण नॉर्थ ईस्टला फिरले आहात काय? असल्यास आपण उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. हे बोलला नसतात असे म्हणू धजतो. शिलाँग (रॉक म्युझिक कॅपिटल ऑफ इंडिया) सोडून बऱ्याच ठिकाणी प्रचंड अवघड आहे सगळे, ब्लॉकेड लागले एक एक की 20 30 दिवस आयुष्य उभे राहते, बटाटे 400 रुपये किलो अन पेट्रोल 600 रुपये लिटर घ्यायला लागते, तिकडे फुटीरतावादाचा चेहरा शांत अन सटल दिसतो पण खूप भयानक असतो. अर्थात पहिल्या पेक्षा बरेच आहे तरी ते मेनस्ट्रीम मध्ये वगैरे अजिबात नसतात, इतके मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आजही नॉर्थ इस्ट वगळता उर्वरीत भारतातील रहिवासी असलेले असे केंद्र सरकार व आस्थापनातले अधिकारी यांना तिथे पोस्टिंग नको असते. त्यासाठी केंद्र सरकार व आस्थापनातील अधिकार्‍यांना बर्‍याच सवलती, जास्त पगार वगैरेचे आमिष दाखवावे लागते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड मधे आजही हा भाग अशांत टापू म्हणूनच ओळखला जातो व त्यासाठी तेथे काम करायला तयार असणार्‍यांना विशेष पॅकेज असते.

In reply to by शाम भागवत

कार्यरत असलेल्याकडून माहीती आलेली असल्याने (पुर्वांचलबाबत) आमची सपशेल माघार, तरी पण खाल्लाय घरचे वासे मोजणार्या कश्मीरीम्बाबतचे मत तेच राहिल. पुर्वांचल निसर्गसौंदर्याने नटलेले आहे असे नेहमीच पेपेरात्/मिपावरहीही वाचतो पण तिथली सामाजीक आणि अशांत बाजूबद्दल फारसे लिखाण वाचनात आले नाही म्हणून असेल. तरी सोन्याबापुंनी कळफलक धूळ झटकून एखादा प्रसंग जमल्यास मालीकाच लिहावी ही विनंती.. चू भू देणे घेणे

In reply to by नाखु

१) आजही गौहत्तीला फॅमीली न्यायला लोक तयार असतात पण मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा येथे राजधानीच्या ठिकाणी जरी पोस्टिंग असेल तरी फॅमीली न नेता एकटेच जातात. २) पण ही माणसे आपल्याकडे आली तर त्यांना कोणी भारतीय समजत नाही. नेपाळी समजतात. जर एखादी स्त्री गोरी व दिसायला चांगली व सुखवस्तू असेल तर जपानीही समजतात. काही काळा नंतर ही लोकं यालाही सरावतात पण आत मधे एक बोच राहातेच. पुण्या मुंबई सारख्या प्रगत भागात असे होत असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय होत असेल? असो. ३) भारत खूप खूप मोठा आहे. सगळ्याच बाबतीत खूपच विविधता आहे. नीट समजावून घेता आले पाहिजे. म्हणजे सगळे गुणदोष लक्षात येतात व उपाय ही सापडतात व मुख्य म्हणजे राग आवरून हे साधता येऊ शकते व जेव्हा राग आवरून उपाय योजना केली जाते तेव्हा उपायापेक्षा रोग बरा म्हणायची वेळ येत नाही. जाऊ दे. विषयांतर नको.

In reply to by शाम भागवत

http://www.misalpav.com/node/27810 हा चिगोचा लेख सहजच आठवला. ------- काश्मिर आणि सैन्याबद्दलच्या या आताच्या लेखातील मते बुद्धिभेद करणारी आहेतच. त्याचा निषेध. त्याशिवाय लेखकाने काही मिपाकरांबद्दल जे वयक्तिक शेरे मारले आहेत त्याची संपादक मंडळाने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती आणि अपेक्षा आहे.

In reply to by पैसा

वैयक्तिक शेऱ्या पेक्षाही हा लेख जास्त आक्षेपार्ह आहे

In reply to by सामान्य वाचक

+१

In reply to by टवाळ कार्टा

..देउ नये, कारण हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by विनोद१८

हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
अहो असले काहीतरी बरळणार्‍यांना हल्ली विचारवंत म्हणायची फ्याशन आहे हे माहित नाही का तुम्हाला?

In reply to by गॅरी ट्रुमन

पण यांचा बुरखा फाडणे पण जरूरी आहे,हया असल्या टीनपाट विचारवंतामुळे फुटिरतावाद्याना बळ मिळते.

कलम 370 रद्दबातल करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा रामबाण उपाय आहे. तोपर्यंत मात्र अंतरिम उपाय म्हणून सरकार व सैन्य यांनी आपल्या प्रसिद्धीतंत्रात बदल करावा. "तुम्ही भारतीय आहात" असे म्हणण्याऐवजी "आम्हीही काश्मिरी आहोत" असे मुख्य सूत्र ठेवावे.

प्रतिक्रिया देणार नव्हतो. परंतु खालील वाक्य वाचल्यानंतर,
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?
हेच लिहावेसे वाटते की वरील लेख म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.

काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही योग्य समाधान कारक उत्तरे देऊन दूर कराल अशी अपेक्षा
कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल
हे विधान कोणत्या आधारावर केले आहे काही संदर्भ नक्कीच असेल तो द्यावा. वरील परस्थिती आपण स्वतः अनुभवली आहे का की फक्त पेपर मधल्या बाटलंय/विश्लेषणे लेख लिहिला आहे ???

पुण्याचा माहित नाही काय खरं काय खोटा ह्या लेखात तो मुद्दा नव्हता आणायला पाहिजे ..बाकी काश्मीर मध्ये सिमेन्स बरोबर काम केलं आहे पण उधमपूर सोडलं की पुढच्या लोकांची इच्छा नसते भारतासोबत राहण्याची असा वाटतं ..३-३ महिने तिकडे राहिलो आहे म्हणून वाटलं बाकी चूक बरोबर डॉक खरे आणि सोन्याबापू सांगतील

Pune and Kashmir??? Kahitarich kaay Sandeep sir. Aamche nav kharab Karu nakaa ho ;) Lekh gandalay he ve saa na la

आता काश्मीर भारतात असल्याने नक्की प्रॉब्लेम काय आहे काश्मीरींचा?? भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य म्हणून रहाण्यात नक्की काय तोटा आहे त्यांचा?? सैन्याचा त्रास वगैरे पाकिस्तानींची मदत घेतल्याने ओढवून घेतलेला आहे.

३१ जानेवारी २०१२ ला साडेचार वर्षे होउन गेली. इतक्या वेळात सीएमई ची एक अक्खी बॅच पास आउट झाली असेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी ते डोवाल साहेबांना कशाला मधे आणले उगाच ? जुनाच अजेंडा किती दिवस राबवणार ?

इतकी वर्ष अ‍ॅफ्स्पा खाली कोणालाही रहायला लागू नये असं मत आहे. इंडेफिनेट अ‍ॅफ्स्पा आणि लोकशाही हे एकत्र असणं पटत नाही.

In reply to by अनुप ढेरे

अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही म्हणता ते मी मान्य करतोच, फक्त उत्तरपूर्वेतले अनुभव पाहता, आफस्पा तूर्तास तरी लेसर इव्हिल ऑफ द अव्हेलेबल इव्हिल्स वाटते मला तरी.

श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3642t

फुकाच्या कल्पना ( विस्तार ) आणि निर्बुद्धतेचे वास्तव

संदीप ताम्हनकर, तुमची दोन विधानं खासकरून पटलं नाहीत. १. >> याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील >> अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. वल्गनायुक्त पोष्टींमुळे अजित दोभाल यांचं महत्त्व जराही कमी होत नाही. कारण नसतांना कृपया त्यांना या विषयात ओढू नये. २. >> .... तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित >> असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? सैनिकांची बाजू घेणारा कुठलाही कायदा काश्मिरात अस्तित्वात नाही. उलट भारतीय सैन्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास उत्तरदायी आहे. जगात कुठल्याही देशाचं सैन्य अशा प्रकारे बांधील नाही. त्यामुळे तुमचं हे विधान म्हणजे शुद्ध दिशाभूल आहे. आ.न., -गा.पै.

विकतचे दुखणे असेच मला वाट्ते. काश्मिरला राजकिय तोडग्याची गरज आहे. कोणी चाणक्य / चंद्रगुप्त / शिवाजीच्या प्रमाणे विचार करणारा नेता जोपर्यंत भारतात होत नाही तो पर्यंत चांगला तोडगा निघणे अशक्यच आहे. काश्मिरी आपले देशबांधव आहेत असा विचार जर मनात आला तर आपोआपच नेमके काय चुकत आहे हे समजणे सोपे होईल. मोदीजी कधी मौन सोडतील आणि चांगला दूरद्रष्टी नेता शोधतील तो पर्यंत अल्ला मालिक आणि परमेश्वराची इच्छा असेच म्हणावे लागेल.

हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून उचलला आहे) http://bhautorsekar.in/काश्मिरची-समस्या-की-कांग/ ‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’ मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते. ‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले. मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे. ‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले. हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’ ‘लढाई चाललेली पाहिली.’ ‘कुणाची जीत होत आहे?’ ‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’ कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला. मग तो बोलू लागला – अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले. मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’ तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’ श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’

In reply to by मनो

मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास व्हायला आले आहेत तरीही .... "भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!! :))

In reply to by शाम भागवत

भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब बाकी ताम्हनकर साहेब विरोधी पक्षाचे तोरसेकर होऊ शकतील असे वाटते ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे बाप्पु. तोरसेकरांनी केवळ लिहिला. तरीही खीखीखी करायची असेल तर काय करणार. कदाचित दलवाई मुसलमानांचे भाऊ तोरसेकर आहेत असे ऐकायला मिळेल आता.

In reply to by मृत्युन्जय

एकतर भाऊ भाट आहेत, इतकी वर्ष मुंबई महापालिका हातात असताना सुद्धा रस्त्यावर असलेल्या खड्डयांची जबाबदारी सेनेची कशी नाही ह्यावर लेख पाडतात ते, त्यामुळे हो, भाऊंवर माझे खी खी खी मी बरबाद करणार नाही हे खरे, बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे, त्याचा इथे अस्थानी उल्लेख करायचे अन भाऊंवर खी खी खी बरबाद करणार नाही असे म्हणल्याने तुम्हाला झोम्बायचे कारण मात्र कळले नाही मृत्युंजय भाऊ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मिपावर लेख पाहुन नाही तर माणुस पाहुन प्रतिसाद पडतात असा एक आरोप नेहमी करण्यात येतो (थोडक्यात काय लिहिले आहे ते महत्वाचे नसुन कोणी लिहिले आहे ते महत्वाचे आहे असे दिसते). खरे खोटे देव जाणे. सद्यस्थितीत भाऊ तोरसेकरांबद्दलची कमेंट त्याच सदरात मोडते. पण केवळ एखादा अनुभव भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला आहे म्हणून तो हास्यास्पद होत नाही. सद्य परिस्थितीत तर अनुभव पण तोरसेकरांचा नाही. अनुभव तोरसेकरांचा असो किंवा दलवाईंचा, त्या अनुभवामागची दारुण वस्तुस्थिती काश्मिरमधली भयावह परिस्थिती विदीत करते. अश्या वेळेस त्या परिस्थितीवर हसण्यासारखे काय आहे हे मला नक्कीच उमजलेले नाही. भागवतांचा प्रतिसाद वाचा:
"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!
\ त्यावर तुमचा प्रतिसाद वाचा:
भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब
थोडक्यात म्हणजे वरचा संपुर्ण अनुभव (दलवाईंचा - तोरसेकरांनी लिहिलेला) हा हास्यास्पद आहे असे म्हणून त्या वस्तुस्थितीची कुचेष्टा करण्यामागचे कारण समजले नाही. काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या मनात काय पराकोटीचा भारतद्वेष आहे आणि तो केवळ धर्माच्या नावाखाली आहे हे त्या अनुभवातुन दिसते. ही अतिशय दारुण परिस्थिती आहे आणि त्याला अर्थातच तोरसेकर जबाबदार नाहित. असे असता त्यावर खीखीखी करुन हसण्यासारखे काही कारण मला दिसत नाही सोन्याबापु. त्यामुळेच हे अस्थायी विधान प्रचंड खटकले. इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे,
या वाक्याचा संदर्भ, मतितार्थ, आशय आणि उपयोग नाही कळाला त्यामुळे यावर प्रतिसाद देत नाही.

In reply to by मृत्युन्जय

सगळे उलगडतो, प्रथम एक विनंतीवजा मागणी पूर्ण करता आली तर पहा, ती म्हणजे, हमीद दलवाई ह्यांचा हा अनुभव त्यांच्याच फर्स्टहँड लेखनात मिळाला तर सांगा किंवा द्या (मला कल्पना नाही), मला वाचायला आवडेल, जर इतका महत्वाचा अनुभव खुद्द दलवाईंच्या लेखनात नसला तर पुढे काय? आजकाल कोणाचा भरवसा घेता? अनुभव एकाचा मांडतोय दुसरा..

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहिती नाही. तोरसेकरांना हा अनुभव कसा माहिती झाला ते माहिती नाही. पण तोरसेकरांनी धादांत खोटे लिहिले आहे असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे त्यावर शंका घ्यायचे काही कारण मला दिसत नाही. त्यांनी तद्दन भूलथापा मारल्या आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय सोन्याबापू?

In reply to by मृत्युन्जय

नाही, मला असेच म्हणायचे नाहीये, मला फक्त इतके म्हणायचे आहे की संवेदनशील विषयात पब्लिक फोरम पक्षी ब्लॉग वगैरे वर जर कोणी "हियरसे" प्रकारचे अनुभव मांडले तर त्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवू नये, ह्यात लेखक कोण आहे ह्यावर बायस असायचे कारण नाही, शिवाय भाऊंच्या विषयाला भागवतांनी आऊट ऑफ द ब्लु तोंड फोडले म्हणून मी त्या कॉमेंट संबंधित माझी मते त्याच्याखाली नोंदवली आहेत,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल प्रथम सॉरी. खरे सांगायचे तर कोणीतरी तोरसेकरांबद्दल खी.खी.खी. असे लिहिल्याचे आठवत होते. तुम्ही ते लिहिलेय हे गावीही नव्हते. तुमच्या उत्तरावरून माझी कॉमेंट तुम्हाला दुखवून गेल्याचे जाणवल्याने मी स्मायली देऊन थांबलोही होतो. असो. मला तुमच्या बद्दल आदर आहे. तसेच तुम्हाला दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता हे इथे स्पष्ट करून मी परत एकदा सॉरी म्हणतो. ओके?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच वाचला होता. पण नक्की कुठे ते आठवत नव्हते. आत्ता तोरसेकरांचा तो लेख वाचला त्यानुसार
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे.
अवांतरः मलाही तोरसेकरांची सर्व मते पटत नाहीत. पण तरीही मला त्यांच्या अनेक पोस्ट मधून विचार करण्यासारखे बरेच मुद्दे मिळाले आहेत.

In reply to by शाम भागवत

हाच संदर्भ अगोदर मिळाला असता तर पुढले अवांतर टाळता आले असते असे वाटते भागवत साहेब मला. असो झाल्यागेल्यावर मी माझ्यातर्फे पाणी टाकतो :) कसे?

In reply to by मृत्युन्जय

बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची" पिसे काढायला हिरीरीने आलात, तेव्हा खुद्द अनुभवावर काहीही मत न देता ,नुसते भाऊंच्या विरोधकांवर श्लेष करणाऱ्या भागवतांच्या कॉमेंट वर काही बोलला नाहीत ते? एकदाही नाही सांगावे वाटले का भागवतांस की बोआ तुम्ही का अनुभव सोडून लेखक-सादरकर्त्यावर घसरताय, जरा विषण्ण परिस्थितीवर बोला, बोलायचे नाही ठरवले होते पण विषय वाढवलाच आहात तर बोलतो, हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भागवतांना समज द्यावीशी वाटली नाही त्याचे कारण असे की त्यांनी तोरसेकर विरोधकांवर कुत्स्तित टिप्पणी केली होती पण त्यामुळे काश्मीर मधल्या परिस्थितीची कुचेष्टा होत नाही. तुमच्या प्रतिसादातुन तसे होत आगे. त्या अनुभवावर खीखीखी करुन हसणे किंवा
"भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब"
(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) असे म्हणुन काश्मीर मधील भयाणा परिस्थितीची कुचेष्टा करणे हे मात्र मला खटकले. जे आहे ते स्पष्तपणे त्या अनुभवात मांडले आहे. तुम्हाला तोरसेकर आवडत नाहित म्हणून तोरसेकरांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची कुचेष्टा करण्याचे काहिच कारण नाही. मिपावरील बर्‍याच आयडींचे विचार हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात जाणारे आहेत पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर अथवा धाग्यावर फक्त हेटाळणीच करायची असे काही मी करत नाही विशेषतः तसे केल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तिची, घटनेची अथवा वस्तुस्थितीची हेटाळणी होत असेल किंवा गांभीर्य कमी होत असेल तेव्हा. त्याउप्परही तोरसेकर म्हटल्यावर तुच्छतापुर्वक उल्लेखच करायचा असल्यास त्यासही माझा आक्षेप नाही कारण ते एखाद्याचे वैयक्तिक मत असु शकते मात्र तसे करण्याने विदित केलेल्या देशविघतक वस्तुस्थितीला नाकारले जात असेल, त्याची हेटाळणी होत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माझा नक्कीच आक्षेप आहे. तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist. थोडक्यात आक्षेप तोरसेकर विरोधाला नाहि. हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :) डबल स्टेंडर्ड असण्याचा प्रश्नच नाही, कारण वरती विदित केलेच आहे. स्पष्टपणे बोलुन दाखवले. त्याबद्दल नाईलाज आहे. तुम्हाला रुचले नाही याचा खेद आहे.

In reply to by मृत्युन्जय

(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो "तोरसेकर ह्यांच्यावर खर्च करण्याइतके माझे खी खी स्वस्त नाहीत" ह्यात मी कश्मीर परिस्थितीची कुचेष्टा कशी केली ते सांगा? शिवाय तोरसेकर हा माझा एकमेव सोर्स नाही काश्मीर बद्दल अभ्यास करायला, का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो तोरसेकरांबद्दलचे तुमचे मत काहिही असले तरीही त्यांनी लिहिलेल्या सत्य अनुभवावर खीखीखी करणे किंवा केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणुन खीखीखी देखील करणार नाही असे लिहिणे यातुन त्या परिस्थितीची कुचेष्टाच होते सोन्याबापु. तो शोध नाही. जाव्ईशोध तर त्याहुन नाही. तुम्ही जुनेच मत परत व्यक्त केल्याने त्या परिस्थितीत काहिही बदल होत नाही. तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणा वाटल्यास. का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण? परत एकदा लिहितो:
तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.
आधी लिहिलेले अजुन एक वाक्य वाचा
इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
वरची २ वाक्ये एवढी स्पष्ट असुनही तुम्ही तोरसेकरांना विरोध करताय म्हणुन मी हे सगळे लिहितोय असे घोडे तुम्हाला पुढे दामटायचे असेल तर तो तुमचा प्रश्न आहे सोन्याबापु. त्याबद्दल मी काहीच करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे लिहिले आहे त्यातुन जो अर्थ प्रतीत होतो आहे त्याला Theory of Deduction म्हणा अथवा syllogism म्हणा, परिस्थिती बदलणार नाही. फक्त बघण्याचे चष्मे बदलतील.

In reply to by मृत्युन्जय

भाऊ तोरसेकर????? >>>> खी खी खी → असे विधान मी केले होते,श्रीगुरूजींना उपप्रतिसाद दिला होता जाकिर नाईकांच्या धाग्यावर बहुतेक!!! तुम्ही कृपया वाद घालत बसू नका. . . . . आणखी एक राहिलचं "खी खी खी खी"