घरातल्या गोष्टी-उपयुक्तता की अडगळ ?
सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं....
हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात. बरं , ज्याने आणलंय त्यांचं मनही मोडवत नाही पण तरीही हळूहळू घरातल्या कानाकोपऱ्यात एक एक करून अनावश्यक वस्तू साठत जातात आणि घराला अडगळीच्या खोलीचे रूप प्राप्त होते. मग सणावाराला आधी साफसफाई मोहीम उघडली जाते .... मुळात माणसाला इतक्या गोष्टींचा हव्यास असतोच का? आपल्या मानसिकतेचा नियम हेच सांगतो की जोपर्यन्त एखादी गोष्ट आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंतच आपल्याला तिचे आकर्षण असते... एकदा का ती आपल्या ताब्यात आली कि तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि हे सरसकट सगळ्यांनाच लागू आहे.
घरातला स्त्रीवर्ग विशेषतः ज्या गोष्टीत विशेष अडकलेला असतो ते म्हणजे जुने कपडे, भांडी, प्लास्टिकचे पदार्थ/पिशव्या आणि इतर भंगार सामान ! कधीतरी लागेल म्हणून वर्षानुवर्षे ती गोष्ट जीवापाड जपून ठेवायची ( विशेष म्हणजे ती कधीही "लागत" नाही)...या संदर्भातच मला काही प्रश्न पडले आहेत ते असे -
१) अशा जपून ठेवलेल्या गोष्टी नक्की काय आणि कधी कामाला येतात ?
२) घर सफाई मोहिमेत मध्येच घुसून घराबाहेर काढायच्या ठेवलेल्या वस्तूंवर आक्रमण करून सुरतेची लूट असल्यासारखे परत सगळे पदार्थ घराच्या आत का जातात? मग सफाई मोहिमेचे उद्दिष्ट काय असते ? फक्त धूळ हटवणे ?
३) एखादी गोष्ट आपल्याकडे होती पण आपण तिचा वापर केला नाही याची रुखरुख नेमकी किती दिवस टिकू शकते ?
४) आपले सामान ३ बीएचकेचे असून आपण १ बीएचकेमध्येच राहतो हे सत्य त्या कधी स्वीकारतात ?
५) सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अश्या गोष्टींना ज्याला बोलीभाषेत अडगळ म्हणतात त्याच्याशी भावनिक नातं असणं म्हणजे नक्की काय?
प्रतिक्रिया
बाई, बाई, बाई माझ्या
उपयुक्तता की अडगळ
उपयुक्तता की अडगळ
अजिबात कामाला न येणाऱ्या
खरंय. बरेच लोकांना उगाचच्या
क्लटर!
हीहीही!
नक्कीच!
आई शप्पत,
कुंभमेळा हाच एका समृध्द
अय्या, दादू
घरातील जी वस्तु सहा महीणे
अजया तै कॅसेट बाबतीत सेम पिंच
चैनीची वस्तू गरजेची केंव्हा
एक नंबर !!!
आमच्या वडिलांचे घर जेंव्हा
अवीण दवणे चां नविण सुविचार
तुमचा प्रतिसाद पाहून
अमेरिकेला येताना मला माझ्या
अमेरिकेला येताना..
+1
कधीतरी उपयोगाला येईल म्हणुन
लेखातले काही मुद्दे पटले.
ह्म्म्म..
किती गोड आहे पिल्लू
बॅकग्राउंड हालतीय. पॉपकॉर्न
चांगल्या विषयाला वाचा फोडलीत
तुम्ही काय गोळा केलं आहे कंकाका ?
खरय. प्रत्येक टाकावू वस्तू
माझ्या कडे
मी यावर एक उपाय शोधला आहे.
तुमची बायको, ह्यावर काही बोलली नाही...नशीबवान आहात....
सांगा की काय होते ते उत्तर.
सांगा की काय होते ते उत्तर.
त्यात भेटायचं काय इशेष ?
कमावत्या वयापासून कायम घरे
माझा मंत्र
अगदी दुखर्या नसेवर बोट
मध्ये भावाचे लग्न झाले तेव्हा
रोचक धागा....
Highly inflammable Vidhan;)
Highly inflammable Vidhan
स्थळ
घरातल्या अडगळ गोष्टी!
चांगला धागा, ज्येष्ठांच्या उल्लेखामुळे मनोरंजक चर्चाही शक्य आहे
काही जुन्या गोष्टी
स्कॉच....
पहिली जॉईंट अट्टाचमेंट गोरखा
लेख आणी प्रतिक्रिया मजेशीर आहेत.
मझ्याघरी पण खुप जुने कपडे
Pagination