Skip to main content

जीवनमान अनुभव

अनाहुत सल्ले

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 09/04/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं असतात. काही इच्छा, आकांक्षा असतात. लग्न, करिअर यासंदर्भात प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असतो. तो/ती व्यक्ती स्वतःच्या भल्यासाठी, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काही निर्णय घेते. काहीवेळेस आपण चुकीचे करिअर निवडले हे समजायला खूप वेळ जातो मग अश्यावेळी ती वाट (करिअर) बदलून दुसऱ्या कंफर्टेबल वाटेने चालायला सुरुवात होते. यासाठी काही जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा, सल्लामसलत सुद्धा होते, गरजेनुसार. हे सर्व वैयक्तिक पातळीवर चालु असतं.

योजना ब / क / ड ....

लेखक Trump यांनी शुक्रवार, 10/12/2021 या दिवशी प्रकाशित केले.
योजना ब / क / ड .... नैसगिक आपत्ती, अपघात, विसळभोळेपणा, कोणचा तरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा, चोरी, अवक्तशीरपणा इत्यादी संकटातुन कोणी चुकलेली नाही. हि संकटे एक - एक आली तर थोडे स्वता:ला संभाळण्यासाठी वेळ आणि संधी मिळते. पण जर ती एकत्र आली तर मग मात्र खरे नाही. १. साधारणतः जुन २०१४ मध्ये मला मुलाखतीला जायचे होते. ज्या ठिकाणी मी राहयला होतो ते घर बंद होते आणि माझ्याकडे किल्ली नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा बोर्‍या उडला. २. २०२१ मध्ये मी विंडोसमध्ये मायक्रोसॉफ्ट्चे खाते जोडले, पण मला परवलीचा शब्द ( पासवर्ड ) त्या खात्याचा आठवत नव्हता. संगणकने स्वतः मला न विचारता संकेताक्षर बदलले.

'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?

लेखक उपयोजक यांनी रविवार, 12/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण? तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्‍याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्‍याचं मन खट्टू करु शकते. यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का?

'कोणीतरी आहे तिथं!'

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 19/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आज सर्वपित्री! सर्वपित्री म्हटलं की आत्मे भूत यांचा विषय निघतोच! याच विषयावर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घनघोर चर्चा झाली.अनेकांनी त्यांना तसे आलेले अनुभवही सांगितले.देवाधर्माची अावड असणार्‍यांना असे अनुभव बर्‍याचदा येतात पण देवाधर्माची फारशी आवड नसणार्‍या काही लोकांनाही असे अनुभव सांगितले. काहीजणांनी असं काही नसतं.मनाचे खेळ असतात असंही म्हटलं.अर्थात प्रत्येकाचा अनुभव आणि तो सांगण्याची पध्दत निराळी!

ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम

लेखक अक्षरमित्र यांनी शुक्रवार, 07/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : चकाचक कॉफी शॉप किंवा एखादे ३/४/५ स्टार हॉटेल. वेळ : तुमच्या सवडीची पात्र : तुम्ही आणि तुमचा मित्र आणि काही अनोळखी व्यक्ती. मित्र : अरे काय म्हणतोस, किती दिवसांनी भेटतोय. ते पण मी फोन केल्यावर. मोठा माणूस झालास बाबा तु. मी : नाही रे, वेळ मिळत नाही ऑफीसच्या आणि घरच्या कामातून. बरं माझं जाऊ दे, तुझं कसं काय चाललय ? मित्र : झकास. बाकी वहिनी, मुलं बाळं बरी आहेत ना सगळे ? मी : हो, सगळे बरे आहेत. मित्र : अरे माझं पण तुझ्याच सारखं चालल होतं. पण आता नाही. सध्या मी ई कॉमर्स मधील एक संधीवर काम करतोय. आता चार पाच रिटायर होणार बुवा. नकोच ती कामाची कटकट ! मी : अरे वा !

स्साला... रोच्ची कटकट

लेखक मन यांनी रविवार, 11/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
---स्पष्टीकरण --- " रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय. ---स्पष्टीकरण समाप्त-- तर सांगायचं म्हणजे मी मनोबा. माझं टोपण नाव मनोबा. माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं. बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही. फार प्रयत्न केल्याशिवाय लेस बांधली जात नाही. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही. रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले.

घरातल्या गोष्टी-उपयुक्तता की अडगळ ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 22/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं.... हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात.

खाणं...चरणं...हादडणं...

लेखक मन यांनी रविवार, 20/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा डोक्यात खाण्याबद्दल जे काही येतय ते लिहून काढावं म्हणतोय. . . "तुझा आहार चांगलाय हां" अशी कमेंट/तारिफ(की टॉण्ट/टोमणा?) अजून एकदा ऐकायला मिळाला. कुणासोबत पंगतीला/बुफेला वगैरे बसणं झालं की अधूनमधून अशा कमेंटा मिळतातच. तरी मागील आठेक वर्षे बी एम आय बावीसेकच्या घरात आहे. वेगळा असा व्यायाम/पोहणं/जॉगिंग असंही काही करणं जमत नाही. जवळजवळ पूर्ण बंद. दिसायला जरी असं दिसत असलं की एकूणात मी बरच हादडतोय; तरी माझे खाण्याचे तसे बर्रेच नखरे आहेत. पण एकूणात काहीतरी बरोबर(किंवा निदान ठीकठाक) सुरु असणार. म्हटलं आठवून पहावं. . . मला ताजं,ओलं नारळ आवडतं.

१० अमेझिंग वेट लॉस टिप्स

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 16/09/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार या काही ट्राईड अँड टेस्टेड वेट लॉस टिप्स आहेत ज्या फार प्रभावी आहेत. वेल; माफ करा. इथे 'वेट लॉस' बद्दल काहीही नाही. पण एका 'ग्रेट लॉस' बद्दल आहे जो आपण आज ना उद्या अनुभवणार आहोत. पावसाचा लॉस; पाण्याचा लॉस, पर्यावरणाचा लॉस. 'वेट लॉस' हे शब्द वाचून ज्या तत्परतेने लोकं पुढचा मजकूर वाचतील त्या तत्परतेने इतर कुठलंही शीर्षक वाचून वाचणार नाहीत, म्हणून ही चखलाशी केली. ही बाब आपल्या प्राधान्यक्रमाविषयी बरंच काही सांगते, पण असो; इथे तो मुद्दा नाही. पाऊस गेल्यावर्षी आणि या वर्षीही वाईट झालाय. पुढेही फार होईल अशी चिन्हं नाहीत. राज्यात, देशात अनेक भागांत दुष्काळ पडलाय. शेतकरी हतबल आहे.

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 11/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली.