Skip to main content

भारतरत्न सचिन....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी बुधवार, 20/07/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!! काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली... पर्रिकरांनी सचिनला फटकारलं... फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला.. तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला.. संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्‍या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्‍या तुमच्या-माझ्यासारख्यांचा?? प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27349
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

गैरसमज दूर केला ते , आम्हाला वाटले तसे . त्या पोस्ट नंतर तुम्ही गायब झालात म्हणून मी म्हटले . पण एकूणच तुम्हाला प्राणीवाचक शब्द आवडतात तर .असो .जर का तुम्ही घाण्याचे बैल , हा उल्लेख माझ्या पोस्ट ला रिप्लाय करताना वापरला होता मग तो मला नाही तर कोणाला उद्देशून केला होता ? राहिले मानसिक कारण , तर ती एक प्रकारची वृत्ती असते लोकांची , एक मानसिकता असते त्यांची. त्यांना काही लोकांची प्रसिद्धी सहन होत नाही , मग उगाच काहीतरी खुसपट काढायची , पुड्या सोडायच्या आणि आपण दुरून गम्मत बघत बसायचं . तुम्ही स्वता: सचिन वर काहीही आरोप करताय पुराव्यावाचून ही कोणती वृत्ती आहे ? आणि जाब विचारला तर स्वतःलाच कस सगळं कळत आणि बाकीचे सगळे कसे अजाण आहेत हे बोलायचं . मी जी मानसिकता म्हटलं ती हीच .

In reply to by संदीप डांगे

एक तर तुम्ही वर जे ७६ हजार चे म्हणताय त्याला काही पुरावा नाही. आणि जरी त्याने मागितले असतील तर तुमच्या किंवा आपल्या पोटात दुखायचे काही कारण नाही. त्याने इन्कमटॅक्स भरला असेल आणि त्यासाठी कोणतीही करमाफी मागितलेली नाही. आता तुम्ही परत ते फेरारी बद्दल बोलणार असाल तर ते आता जुने झालाय , बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात) ह्यावरून तुमचा आकस सरळ सरळ दिसतोय , वर मखलाशी अशी की काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात , तुम्हाला माहीत असेल्या गोष्टी वर आम्ही का विश्वास ठेवावा ? तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव नाही.. कसं असत ना काही लोकांना जे प्रस्थापित , प्रथितयश मिळवलेल्या व्यक्ती सहन होत नाहीत. त्या मागे थोडाफार मानसिक कारण असतात ( दोन उदाहरणे देतो सगळे communist आणि केजरीवाल ) , तूर्तास एवढेच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई तुम्ही स्वतःचे मत सांगितलेत (जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले) ! :) मात्र, तुम्ही १००% बरोबर बोललात !!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत
अश्या वेळी भारतरत्न काढुन घेण्याची पण सोय असली पाहिजे. एका उघडकीस आलेल्या ( लपलेल्या कीतीतरी असतील ) कृतीने रत्नाचा दगड झाला हे मान्य करायला सरकार आणि भारतीय जनतेला काही हरकत नसावी.

"some are more equal than others" हे आपल्याकडे तंतोतंत लागु आहे. त्यात काही लोकांना तो आपला हक्कच आहे असे वाटते. नियम, कायदे सामान्य लोकांसाठी असतात अशी त्यांची समजूत असते. गंमत म्हणजे सामान्य लोकच त्यांना देव वगैरे म्हणून त्यांची अशी समजुत करुन देण्यास हातभार लावतात. गुन्हेगार आहे हे माहीत असुन त्यांच्या सिनेमांना गर्दी करतात.

देव म्हणून उल्लेख करणे देखील पटत नाही. बाडीस देव म्हणून घ्या, घरात देव्हाऱ्यात बसवा आणि त्याच्या पायाचे तीर्थही घ्या. कशाला? त्याचे खेळातील प्राविण्य पहा आणि सोडून द्या.उगाच त्याच्या एकंदर वागणुकीचे उदात्तीकरण करणे सोडून द्या. फेरारीवर कर लावू नका म्हणून केलेली मागणी. घरात अनधिकृत जिम बसविणे इ गोष्टींमुळे तो बाकी आयुष्यात सामान्यच आहे हे स्पष्ट होते. साडे चार वर्षाच्या राज्यसभेच्या कारकिर्दीत त्याने विचारलेले चार प्रश्न सोडता त्याने काय केले हा ही प्रश्न विचारता येईल. श्री व्यंकटेश माडगूळकर १९४६ मध्ये लिहून गेले "साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका. सचिन तेंडुलकरचे क्रिकेट पहा आणि सोडून द्या उगाच खासदार, देव, महान मानव इ बनविण्याचा फंदात पडू नये.

खरे डॉक्टर, >> साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका. अगदी खरं बोललेत पहा व्यंकटेश माडगूळकर. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं ते याचसाठी. आ.न., -गा.पै.

मी वाचले ते नारंग हा सचिन तेंडुलकरचा बिझिनेस पार्टनर आहे असेच वाचले. http://timesofindia.indiatimes.com/india/Sachin-Tendulkar-sought-Parrik… पर्रीकरांनी सचिनला ठाम नकार दिला असेल हे नक्कीच. आणि गोव्यातल्या कोणालाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. मुलांना कॉम्प्युटर वाटप करायचे काँट्रॅक्ट असो, की नारायण राणेंच्या चिरंजिवानी टोल बूथ फोडून तिथल्या लोकांना केलेली मारहाण असो, अशी कित्येक प्रकरणे पर्रीकरांनी ठाम राहून हाताळलेली आम्ही पाहिली आहेत. त्यांच्यावर कोणाचेही कसलेही प्रेशर येऊ शकत नाही. म्हणूनच मधे पर्रीकरांच्या जागी जेटलींना संरक्षण मंत्री करण्याची शक्यता आहे अशी बातमी वाचली तेव्हा काय हा दळभद्रीपणा असे वाटले होते.

बरोबर. पर्रीकरांसारखा मुख्यमंत्री आजपर्यंत गोव्याला मिळाला नाही आणि मिळणार नाही. आजकाल अशी माणसंच कमी होत चालली आहेत. सुरेश प्रभु, मधू दंडवते ही काही त्याच पठडीतील माणसं

सचिन नं नको होत कराले असं..

संदीप, स्टार व्हॅल्यू आणि ब्रॅन्ड व्हॅल्यूवर तुम्ही फारच सुरेख विवेचन दिलं आहे. धन्यवाद! बोकाभाऊंची इन्साइड इन्फर्मेशनदेखील खूपच महत्वाची आहे.

संदीप डांगे, इथला माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. तुमची विश्लेषणाची पद्धत सुरेख आहे. अशीच पद्धती वापरून आसारामबापूंच्या ब्रँडव्हॅल्यूची चिकित्सा करता येईल का? त्यांनी हिंदू धर्माचा ज्या तडफेने प्रसार केला त्यामुळेच त्यांना अटक झालीये. आपण समजतो त्यापेक्षा ब्रँड खूप खोलवर जातो. बाबा रामदेव हेही असेच एक ब्रँड आहेत. अर्थात, धर्म सांभाळला की ब्रँड आपोआप सांभाळला जातो अशी या दोघांची धारणा आहे. आ.न., -गा.पै.

अकरावी ऑनलाइन प्रवेशातून निर्माण होत असलेल्या गोंधळामुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने हजारो विद्यार्थी व पालक नाराज आहेत.अनेक आमदारांनी प्रवेश न मिळालेल्या किंवा चुकीच्या, गैरसोयीच्या महाविद्यालयात प्रवेश दिल्याची उदाहरणे दिली. तेव्हा अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही आपल्याला दूरध्वनी आल्याचे सांगितले. त्यांच्या वाहनचालकाच्या मुलाला पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याची तक्रार तेंडुलकर यांनी शेलार यांच्याकडे केली. शेलार यांनी हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणले खरे, पण त्या मुलाला गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करून तावडे यांनी लक्ष घालण्यास चक्क नकार दिला. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-kujbuj-2-1271279/#sthash.b…

सचिन असं बेकायदेशीर काही करणार नाही अशी आपली एक उगाच भाबडी समजुत आहे. केलं असेल तर चुकच आहे.. वादच नाही. ह्या विषयावर संदीप डांगेंचे प्रतिसाद खुपच आवडले. मला तरी ते कुठेही आकस आणि मत्सर वगैरे मनात ठेवुन लिहीलेत असं वाटलं नाही. म्हणजे मुळात ते असं सचिन बद्दल आकसाने लिहीतीलच कशाला असाही प्रश्न पडला. इथे बहुदा कोणते तरी जुने स्कोर सेटल होत असावेत. नाहीतर असला हास्यास्पद फाटा फुटलाच नसता.. असो.. सचिनला भारतरत्न त्याच्या खेळामुळे मिळालाय. परत घ्या काय? येडचॅपपणा.. भारतरत्नाचा इथे काही संबंध नाही..

सचिनचा मी प्रचंड फॅन आहे. पण हे आवडले नाही. अर्थात बातम्या जरा अतिरंजित कराव्या लागतात बरेचदा. काही बाबतीत वरिष्ठ लोकांच्या "डिस्क्रीशन" मधे काही निर्णय असतात, त्याचा फायदा घ्यायला तो गेला असेल. तरीही नाकारले हे योग्यच होते

In reply to by फारएन्ड

त्याने चूक केले आणि त्याच्या "वलयापेक्षा" आप्लया उत्तरदायीत्वात चोख राहिल्याबद्दल पर्रीकराम्चे अभिनंदन. सचिन्ला यातुन सुबुद्धी मिळो हिच अपेक्षा (राजकारणाच्या एका फटक्याने अमिताभ शहाणा झाला तसे काहीसे) सचिनचा चाहता (तरी सचिन चुकीचे वागला हे उघ्ड मान्य करणारा)

मागे एकदा भारतरत्न लताबाईंनीही 'आमच्या खिडकीसमोर येतो म्हणून उड्डाणपूल बनवू नका' असा काहीसा शब्द टाकला होता म्हणे सरकारकडे . त्याची आठवण झाली.