✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतरत्न सचिन....

अ
अनिरुद्ध प्रभू यांनी
Wed, 07/20/2016 - 16:14  ·  लेख
लेख
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!! काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली... पर्रिकरांनी सचिनला फटकारलं... फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला.. तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला.. संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्‍या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्‍या तुमच्या-माझ्यासारख्यांचा?? प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26945 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

स्टारव्हॅल्यु = नवाजुद्दीन

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 11:08 नवीन
स्टारव्हॅल्यु = नवाजुद्दीन सिद्दीकी ब्रँडव्हॅल्यु = शाहरुख खान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

शब्द चुकला असेल.पण संस्थळावर

कंजूस
गुरुवार, 07/21/2016 - 08:02 नवीन
शब्द चुकला असेल.पण संस्थळावर जास्ती लिहिता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 01:11 नवीन
त्यात असं म्हटलं आहे की संजय नारंग अाणि सचिन तेंडुलकर यांच्यात सध्या कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नाहीत पण एकेकाळी होते हे तितकंच खरं आहे. संजय नारंग यांची MARS Hospitalities नावाची कंपनी आहे. जेट एअरवेज आणि जेट लाईट यांचं इन-फ्लाईट केटरिंग ते करतात आणि शिवाय त्यांची काही restaurants सुद्धा आहेत - मुंबईत Pizza by the Bay, All Stir Fry, Just around the corner आणि On Toes ही त्यांच्या मालकीची restaurants आहेत. पुण्यात एकेकाळी (असं म्हणतोय कारण आत्ता माहित नाही) ईस्क्वेअरमधलं All Stir Fry पण त्यांचंच होतं. त्यांनी कुलाब्याला गेटवे आॅफ इंडिया जवळ Tendulkar's नावाचं एक restaurant चालू केलं होतं. त्यात सचिन आणि संजय नारंग partners होते. केजरीवाल एंटरप्राईझेस नावाच्या एका Marketing Company साठी मी consulting assignment केली होती तेव्हा या सगळ्या restaurants च्या Food and Beverage Managers शी आणि सरतेशेवटी खुद्द संजय नारंग यांच्याशीही भेट झाली होती. Tendulkar's साठी आम्ही इतर restaurants पेक्षा वेगळं आणि exclusive deal द्यावं म्हणून संजय नारंग कसे अडून बसले होते ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ही साधारण २००४ ची गोष्ट आहे. त्यामुळे सचिन आणि संजय नारंग यांची फक्त मैत्री आहे यात काहीही तथ्य नाही. त्यात कुठल्यातरी स्वरूपाची business relationship असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

केजरीवाल एंटरप्राईझेस ??

हेमन्त वाघे
गुरुवार, 07/21/2016 - 12:09 नवीन
केजरीवाल एंटरप्राईझेस हि अलोक केजरीवाल ची ( कॉन्टेस्ट टु विन ) वाल्या ची कंपनी होती ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

नाही.

बोका-ए-आझम
Fri, 07/22/2016 - 13:33 नवीन
पण त्यांचं दूरचं नातं आहे. निदान मला तरी त्यांनी हे विचारल्यावर असंच सांगितलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

इकाॅनाॅमिक टाईम्समध्ये जी बातमी आहे

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/21/2016 - 01:11 नवीन
त्यात असं म्हटलं आहे की संजय नारंग अाणि सचिन तेंडुलकर यांच्यात सध्या कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नाहीत पण एकेकाळी होते हे तितकंच खरं आहे. संजय नारंग यांची MARS Hospitalities नावाची कंपनी आहे. जेट एअरवेज आणि जेट लाईट यांचं इन-फ्लाईट केटरिंग ते करतात आणि शिवाय त्यांची काही restaurants सुद्धा आहेत - मुंबईत Pizza by the Bay, All Stir Fry, Just around the corner आणि On Toes ही त्यांच्या मालकीची restaurants आहेत. पुण्यात एकेकाळी (असं म्हणतोय कारण आत्ता माहित नाही) ईस्क्वेअरमधलं All Stir Fry पण त्यांचंच होतं. त्यांनी कुलाब्याला गेटवे आॅफ इंडिया जवळ Tendulkar's नावाचं एक restaurant चालू केलं होतं. त्यात सचिन आणि संजय नारंग partners होते. केजरीवाल एंटरप्राईझेस नावाच्या एका Marketing Company साठी मी consulting assignment केली होती तेव्हा या सगळ्या restaurants च्या Food and Beverage Managers शी आणि सरतेशेवटी खुद्द संजय नारंग यांच्याशीही भेट झाली होती. Tendulkar's साठी आम्ही इतर restaurants पेक्षा वेगळं आणि exclusive deal द्यावं म्हणून संजय नारंग कसे अडून बसले होते ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ही साधारण २००४ ची गोष्ट आहे. त्यामुळे सचिन आणि संजय नारंग यांची फक्त मैत्री आहे यात काहीही तथ्य नाही. त्यात कुठल्यातरी स्वरूपाची business relationship असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

+१

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 01:16 नवीन
शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

क्रिकेट खेळणारे साहेब निवृत्त

निंजा टर्टल
गुरुवार, 07/21/2016 - 01:47 नवीन
क्रिकेट खेळणारे साहेब निवृत्त झाले. आता बास झालं की!
  • Log in or register to post comments

ओळख पटतेय हळू हळू

खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 02:13 नवीन
ओळख पटतेय हळू हळू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निंजा टर्टल

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 07/21/2016 - 09:55 नवीन
वाचतेय.
त्यावर सचिन कडून प्रत्येक सहीचे ७६ हजार घेईन असे मॅनेजरकरवी उत्तर आले होते!
मग त्यात विशेष ते काय? तो कदाचित एक लाखही सांगेल व लोक कदाचित ती बॅट्ट विकतही घेतील. सचिनच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाबाबत दुमत नकोच.क्रिकेटमधला तो एक जागतिक दर्जाचा अव्वल खेळाडू होता व असंख्य विक्रमांची नोंद त्याच्यावर आहे.मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत.त्याला भारतरत्न मिळायला नको होते.. वगैरे मुद्दे गौण आहेत. तत्कालीन सरकारला भारतरत्न द्यावेसे वाटले व त्यास कोणाही लोकप्रतिनिधीने (उघडपणे)आक्षेप घेतला नाही वा कोणत्या क्रिकेटपटूनेही नाराजी व्यक्त केली नाही. .
  • Log in or register to post comments

सचिनच्या क्रिकेटच्या

किसन शिंदे
गुरुवार, 07/21/2016 - 13:38 नवीन
सचिनच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाबाबत दुमत नकोच.क्रिकेटमधला तो एक जागतिक दर्जाचा अव्वल खेळाडू होता व असंख्य विक्रमांची नोंद त्याच्यावर आहे.
याच्याशी असंख्य वेळा सहमत.
मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत.
याच्याशीही सहमत.. एकुणात माईच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 23:02 नवीन
सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६ लाख घेतले तरी मला विशेष वाटत नाही. उलट मला तर वाटते की घ्यावेत आणि दणदणित इन्कमटॅक्स भरावा. त्यात करमाफीसाठी सरकारकडे शब्द टाकू नये. बाकी किस्सा एवढ्याकरता सांगितला की महोदयांची ब्रॅण्डवॅल्यू किती आहे ते फर्स्ट ह्याण्ड कळावे म्हणून. अनेकदा सेलेब्रिटींबद्दल 'दे आर नॉट अक्सेसिबल' असते कृत्रिम वलय तयार केलं जातं ते अशाच किमती मोजल्या जाव्यात म्हणून. अशा किमती असतात हे सर्वांना माहित आहे पण नक्की आकडा काय हे केवळ संबंधित लोकांनाच ठावूक असतं. तेवढंच सांगायचा उद्देश होता. बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात) सूचना: काहिंना वाटेल मी सचिनवर चिखलफेक करतोय किंवा तत्सम तर क्षमा असावी. काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात, सांगितल्या तरी कोणी विश्वास ठेवत नसतं. सामान्य माणसांनी असंच वागणं अपेक्षित असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हास्यास्पद

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 00:00 नवीन
एक तर तुम्ही वर जे ७६ हजार चे म्हणताय त्याला काही पुरावा नाही. आणि जरी त्याने मागितले असतील तर तुमच्या किंवा आपल्या पोटात दुखायचे काही कारण नाही. त्याने इन्कमटॅक्स भरला असेल आणि त्यासाठी कोणतीही करमाफी मागितलेली नाही. आता तुम्ही परत ते फेरारी बद्दल बोलणार असाल तर ते आता जुने झालाय , <<बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात) >> ह्यावरून तुमचा आकस सरळ सरळ दिसतोय , वर मखलाशी अशी की काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात , तुम्हाला माहीत असेल्या गोष्टी वर आम्ही का विश्वास ठेवावा ? तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव नाही.. कसं असत ना काही लोकांना जे प्रस्थापित , प्रथितयश मिळवलेल्या व्यक्ती सहन होत नाहीत. त्या मागे थोडाफार मानसिक कारण असतात ( दोन उदाहरणे देतो सगळे communist आणि केजरीवाल ) , तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गड्या अभिदेशा, एखाद्याला

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 00:13 नवीन
गड्या अभिदेशा, एखाद्याला हास्यास्पद ठरवणे आणि पुरावे मागणे खूप सोपे असते, बरे का! तुम्ही आपल्या फेफ्रातल्या बातम्या वाचित जावा आणि नंदनवनात खुश र्‍हावा. तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, माका कायबी फरक पडत नाय... बाकी, तुम्ही मानसिक कारणापर्यंत पोचलात हे बाकी भारी केलंत, ज्यातलं आपल्या काही समजत नाही, माहित नाही, कधीही माहित होऊ शकत नाही ते, जगात अन्य कुणालाही कधीच कळू शकणार नाही कारण ते अस्तित्वातच नाही असे भास ज्यात होतात तेही एखादे मानसिक कारणच असेल, नैका? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

हा हा हा

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 00:25 नवीन
तुम्ही फेफ्रातल्या बातम्या सोडून दुसरीकडे कुठे बातम्या वाचता आणि खुश होता ? आम्हालाही सांगा ना गडे... मानसिक कारण जरा जास्त मनाला लागलं वाटतं ? असू दे , असू दे ... खरं लागत नेहेमीच मनाला. ज्यातलं आपल्या काही समजत नाही, माहित नाही, तुम्ही सर्वज्ञ आहात का म्हणजे ? म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं , सगळं कळतं का ? रच्याने ... असं वाटणं हे देखील मानसिक लोच्या असू शकतो बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वत्सा, तुजप्रत कल्याण असो. ;)

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 01:02 नवीन
वत्सा, तुजप्रत कल्याण असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

धन्यवाद

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 01:07 नवीन
ब्रह्मदेवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जौ देत हो.. तुमचा दोष नाही तो

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 01:29 नवीन
जौ देत हो.. तुमचा दोष नाही तो. मज पामराचे आयुष्यच असे भन्नाट गेले आहे-जात आहे-जाणार आहे, की घाण्याच्या बैलासारख्या हयातभर रोज त्याच त्या घिरट्या मारणार्‍यांना, मी खोटं बोलतोय असंच वाटत असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

डांगे

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 03:44 नवीन
तुम्ही तुमच्यावरची मागे झालेली कारवाही विसरलात वाटतं , प्राणीवाचक शब्द वापरल्याबद्दल ? तरी पुन्हा एकदा तुम्ही तसच लिहिताय .... घाण्याच्या बैलासारख्या ??? झालेल्या चुकांमधून काही शिकण्याची तुमची इच्छा नाही हे सिद्ध झालाच आहे , तुम्हाला जर का कोणाचा प्रतिवाद सभ्य भाषेत करता येत नसेल तर लिहीत जाऊ नका . आम्ही आमची पातळी सोडू शकत नाही . त्यामुळे सध्या एवढेच "देवा ह्याला क्षमा कर , हा काय बोलतोय ते त्याला कळत नाहीये ."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्यावर.... कारवाही..?????

संदीप डांगे
Fri, 07/22/2016 - 04:18 नवीन
माझ्यावर.... कारवाही..????? कधी बुवा??? कोणत्या चुका??? झोपेतून जागे व्हा महाराज. आम्ही इथेच आहोत, कसल्याही कारवाईशिवाय. उगाच अफवा पसरवून आमचे नाव बदनाम करु नका. तुम्ही घाण्याचे बैल आहात हे मी म्हटले नाहीच तेव्हा तुम्हाला का बरे लागले??? आता तुम्हीच वर बोलला होता की "खरं लागत नेहेमीच मनाला".. ते इथे लागू करावे काय? माझे मानसिक कारण, मानसिक लोच्या इत्यादी काढण्याआधी सभ्य भाषेचा विचार तुमच्या सभ्य मनाला शिवला नाही, आधी मला दिलेले उपप्रतिसाद, त्यातली भाषा, रोख, अर्थ सगळे तपासून बघा, मग विचार करा, कोणाला कळत नाही काय बोलतोय ते. 'तुम्हाला लाख असेल सचिन प्रिय म्हणून त्याच्यासाठी तुम्ही माझा अपमान करु शकत नाही' हे एवढा साधा सभ्यतेचा संकेत सुरवातीसच पाळायला हवा होतात. पलटवार झाला तर कळवळलात होय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

बर झाल

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 06:32 नवीन
गैरसमज दूर केला ते , आम्हाला वाटले तसे . त्या पोस्ट नंतर तुम्ही गायब झालात म्हणून मी म्हटले . पण एकूणच तुम्हाला प्राणीवाचक शब्द आवडतात तर .असो .जर का तुम्ही घाण्याचे बैल , हा उल्लेख माझ्या पोस्ट ला रिप्लाय करताना वापरला होता मग तो मला नाही तर कोणाला उद्देशून केला होता ? राहिले मानसिक कारण , तर ती एक प्रकारची वृत्ती असते लोकांची , एक मानसिकता असते त्यांची. त्यांना काही लोकांची प्रसिद्धी सहन होत नाही , मग उगाच काहीतरी खुसपट काढायची , पुड्या सोडायच्या आणि आपण दुरून गम्मत बघत बसायचं . तुम्ही स्वता: सचिन वर काहीही आरोप करताय पुराव्यावाचून ही कोणती वृत्ती आहे ? आणि जाब विचारला तर स्वतःलाच कस सगळं कळत आणि बाकीचे सगळे कसे अजाण आहेत हे बोलायचं . मी जी मानसिकता म्हटलं ती हीच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हास्यास्पद

अभिदेश
Fri, 07/22/2016 - 00:05 नवीन
एक तर तुम्ही वर जे ७६ हजार चे म्हणताय त्याला काही पुरावा नाही. आणि जरी त्याने मागितले असतील तर तुमच्या किंवा आपल्या पोटात दुखायचे काही कारण नाही. त्याने इन्कमटॅक्स भरला असेल आणि त्यासाठी कोणतीही करमाफी मागितलेली नाही. आता तुम्ही परत ते फेरारी बद्दल बोलणार असाल तर ते आता जुने झालाय , बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात) ह्यावरून तुमचा आकस सरळ सरळ दिसतोय , वर मखलाशी अशी की काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात , तुम्हाला माहीत असेल्या गोष्टी वर आम्ही का विश्वास ठेवावा ? तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव नाही.. कसं असत ना काही लोकांना जे प्रस्थापित , प्रथितयश मिळवलेल्या व्यक्ती सहन होत नाहीत. त्या मागे थोडाफार मानसिक कारण असतात ( दोन उदाहरणे देतो सगळे communist आणि केजरीवाल ) , तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माई तुम्ही स्वतःचे मत

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/22/2016 - 00:13 नवीन
माई तुम्ही स्वतःचे मत सांगितलेत (जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले) ! :) मात्र, तुम्ही १००% बरोबर बोललात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग

गंम्बा
Fri, 07/22/2016 - 12:40 नवीन
मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत
अश्या वेळी भारतरत्न काढुन घेण्याची पण सोय असली पाहिजे. एका उघडकीस आलेल्या ( लपलेल्या कीतीतरी असतील ) कृतीने रत्नाचा दगड झाला हे मान्य करायला सरकार आणि भारतीय जनतेला काही हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

"some are more equal than

मराठी_माणूस
गुरुवार, 07/21/2016 - 10:26 नवीन
"some are more equal than others" हे आपल्याकडे तंतोतंत लागु आहे. त्यात काही लोकांना तो आपला हक्कच आहे असे वाटते. नियम, कायदे सामान्य लोकांसाठी असतात अशी त्यांची समजूत असते. गंमत म्हणजे सामान्य लोकच त्यांना देव वगैरे म्हणून त्यांची अशी समजुत करुन देण्यास हातभार लावतात. गुन्हेगार आहे हे माहीत असुन त्यांच्या सिनेमांना गर्दी करतात.
  • Log in or register to post comments

देव म्हणून उल्लेख करणे देखील

सुबोध खरे
गुरुवार, 07/21/2016 - 10:28 नवीन
देव म्हणून उल्लेख करणे देखील पटत नाही. बाडीस देव म्हणून घ्या, घरात देव्हाऱ्यात बसवा आणि त्याच्या पायाचे तीर्थही घ्या. कशाला? त्याचे खेळातील प्राविण्य पहा आणि सोडून द्या.उगाच त्याच्या एकंदर वागणुकीचे उदात्तीकरण करणे सोडून द्या. फेरारीवर कर लावू नका म्हणून केलेली मागणी. घरात अनधिकृत जिम बसविणे इ गोष्टींमुळे तो बाकी आयुष्यात सामान्यच आहे हे स्पष्ट होते. साडे चार वर्षाच्या राज्यसभेच्या कारकिर्दीत त्याने विचारलेले चार प्रश्न सोडता त्याने काय केले हा ही प्रश्न विचारता येईल. श्री व्यंकटेश माडगूळकर १९४६ मध्ये लिहून गेले "साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका. सचिन तेंडुलकरचे क्रिकेट पहा आणि सोडून द्या उगाच खासदार, देव, महान मानव इ बनविण्याचा फंदात पडू नये.
  • Log in or register to post comments

Exactly!!!

संदीप डांगे
गुरुवार, 07/21/2016 - 10:29 नवीन
Exactly!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत आहे.

पद्मावति
गुरुवार, 07/21/2016 - 10:46 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शब्दा शब्दाशी सहमत.

राजाभाउ
गुरुवार, 07/21/2016 - 11:19 नवीन
शब्दा शब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डाॅ खरे १०० टक्के खरे बोलले.

मितभाषी
Fri, 07/22/2016 - 19:52 नवीन
डाॅ खरे १०० टक्के खरे बोलले. लै मेहनत वाचवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे डॉक्टर,

गामा पैलवान
गुरुवार, 07/21/2016 - 11:23 नवीन
खरे डॉक्टर, >> साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका. अगदी खरं बोललेत पहा व्यंकटेश माडगूळकर. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं ते याचसाठी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मी वाचले ते

पैसा
गुरुवार, 07/21/2016 - 11:40 नवीन
मी वाचले ते नारंग हा सचिन तेंडुलकरचा बिझिनेस पार्टनर आहे असेच वाचले. http://timesofindia.indiatimes.com/india/Sachin-Tendulkar-sought-Parrikars-help-to-rescue-business-allys-resort-in-Mussoorie-Officials/articleshow/53277327.cms पर्रीकरांनी सचिनला ठाम नकार दिला असेल हे नक्कीच. आणि गोव्यातल्या कोणालाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. मुलांना कॉम्प्युटर वाटप करायचे काँट्रॅक्ट असो, की नारायण राणेंच्या चिरंजिवानी टोल बूथ फोडून तिथल्या लोकांना केलेली मारहाण असो, अशी कित्येक प्रकरणे पर्रीकरांनी ठाम राहून हाताळलेली आम्ही पाहिली आहेत. त्यांच्यावर कोणाचेही कसलेही प्रेशर येऊ शकत नाही. म्हणूनच मधे पर्रीकरांच्या जागी जेटलींना संरक्षण मंत्री करण्याची शक्यता आहे अशी बातमी वाचली तेव्हा काय हा दळभद्रीपणा असे वाटले होते.
  • Log in or register to post comments

बरोबर. पर्रीकरांसारखा

खटपट्या
गुरुवार, 07/21/2016 - 23:20 नवीन
बरोबर. पर्रीकरांसारखा मुख्यमंत्री आजपर्यंत गोव्याला मिळाला नाही आणि मिळणार नाही. आजकाल अशी माणसंच कमी होत चालली आहेत. सुरेश प्रभु, मधू दंडवते ही काही त्याच पठडीतील माणसं
  • Log in or register to post comments

शेन

हवाबाण हरडे
Fri, 07/22/2016 - 04:19 नवीन
सचिन नं नको होत कराले असं..
  • Log in or register to post comments

विवेचन

स्वीट टॉकर
Fri, 07/22/2016 - 11:11 नवीन
संदीप, स्टार व्हॅल्यू आणि ब्रॅन्ड व्हॅल्यूवर तुम्ही फारच सुरेख विवेचन दिलं आहे. धन्यवाद! बोकाभाऊंची इन्साइड इन्फर्मेशनदेखील खूपच महत्वाची आहे.
  • Log in or register to post comments

आसारामबापू आणि ब्रँड

गामा पैलवान
Fri, 07/22/2016 - 11:48 नवीन
संदीप डांगे, इथला माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. तुमची विश्लेषणाची पद्धत सुरेख आहे. अशीच पद्धती वापरून आसारामबापूंच्या ब्रँडव्हॅल्यूची चिकित्सा करता येईल का? त्यांनी हिंदू धर्माचा ज्या तडफेने प्रसार केला त्यामुळेच त्यांना अटक झालीये. आपण समजतो त्यापेक्षा ब्रँड खूप खोलवर जातो. बाबा रामदेव हेही असेच एक ब्रँड आहेत. अर्थात, धर्म सांभाळला की ब्रँड आपोआप सांभाळला जातो अशी या दोघांची धारणा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अकरावी ऑनलाइन प्रवेशातून

प्रसाद भागवत
Fri, 07/22/2016 - 12:19 नवीन
अकरावी ऑनलाइन प्रवेशातून निर्माण होत असलेल्या गोंधळामुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने हजारो विद्यार्थी व पालक नाराज आहेत.अनेक आमदारांनी प्रवेश न मिळालेल्या किंवा चुकीच्या, गैरसोयीच्या महाविद्यालयात प्रवेश दिल्याची उदाहरणे दिली. तेव्हा अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही आपल्याला दूरध्वनी आल्याचे सांगितले. त्यांच्या वाहनचालकाच्या मुलाला पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याची तक्रार तेंडुलकर यांनी शेलार यांच्याकडे केली. शेलार यांनी हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणले खरे, पण त्या मुलाला गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करून तावडे यांनी लक्ष घालण्यास चक्क नकार दिला. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-kujbuj-2-1271279/#sthash.bshQ5gi9.dpuf
  • Log in or register to post comments

सचिन असं बेकायदेशीर काही

पिलीयन रायडर
Fri, 07/22/2016 - 19:22 नवीन
सचिन असं बेकायदेशीर काही करणार नाही अशी आपली एक उगाच भाबडी समजुत आहे. केलं असेल तर चुकच आहे.. वादच नाही. ह्या विषयावर संदीप डांगेंचे प्रतिसाद खुपच आवडले. मला तरी ते कुठेही आकस आणि मत्सर वगैरे मनात ठेवुन लिहीलेत असं वाटलं नाही. म्हणजे मुळात ते असं सचिन बद्दल आकसाने लिहीतीलच कशाला असाही प्रश्न पडला. इथे बहुदा कोणते तरी जुने स्कोर सेटल होत असावेत. नाहीतर असला हास्यास्पद फाटा फुटलाच नसता.. असो.. सचिनला भारतरत्न त्याच्या खेळामुळे मिळालाय. परत घ्या काय? येडचॅपपणा.. भारतरत्नाचा इथे काही संबंध नाही..
  • Log in or register to post comments

योग्यच केले

फारएन्ड
Fri, 07/22/2016 - 19:30 नवीन
सचिनचा मी प्रचंड फॅन आहे. पण हे आवडले नाही. अर्थात बातम्या जरा अतिरंजित कराव्या लागतात बरेचदा. काही बाबतीत वरिष्ठ लोकांच्या "डिस्क्रीशन" मधे काही निर्णय असतात, त्याचा फायदा घ्यायला तो गेला असेल. तरीही नाकारले हे योग्यच होते
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Sat, 07/23/2016 - 08:57 नवीन
त्याने चूक केले आणि त्याच्या "वलयापेक्षा" आप्लया उत्तरदायीत्वात चोख राहिल्याबद्दल पर्रीकराम्चे अभिनंदन. सचिन्ला यातुन सुबुद्धी मिळो हिच अपेक्षा (राजकारणाच्या एका फटक्याने अमिताभ शहाणा झाला तसे काहीसे) सचिनचा चाहता (तरी सचिन चुकीचे वागला हे उघ्ड मान्य करणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

पत्ता चुकला कायनू

मितभाषी
Fri, 07/22/2016 - 19:48 नवीन
पत्ता चुकला कायनू
  • Log in or register to post comments

मागे एकदा भारतरत्न

हकु
Sat, 07/23/2016 - 08:05 नवीन
मागे एकदा भारतरत्न लताबाईंनीही 'आमच्या खिडकीसमोर येतो म्हणून उड्डाणपूल बनवू नका' असा काहीसा शब्द टाकला होता म्हणे सरकारकडे . त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा