✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेंटिनल द्वीपचे रहस्य

ल
लोनली प्लॅनेट यांनी
Tue, 07/19/2016 - 14:13  ·  लेख
लेख
आदिवासी लोकांबद्दल तशी आपल्याला बरीच माहिती आहे, त्यांची भाषा जीवनशैली त्यांचे राहणीमान,कारण त्यांचा प्रगत जगाशी बऱ्यापैकी संपर्क असतो. परंतु आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही. दक्षिण अमेरिकेत अमेझॉन च्या घनदाट जंगलात, ब्राझील व पेरू देशांमध्ये अशा आदिवासी जमाती राहतात ज्यांच्या बद्दल इतर जगास काहीही माहिती नाही. जेंव्हा युरोपिअन लोकांनी आक्रमण करून इथे नांदत असलेल्या माया, ऍझटेच, इंका संस्कृती (civilization) नष्ट केल्या तेंव्हा जे काही लोक या विध्वंसातून वाचले व जीव वाचवून जंगलात पळून गेले हे आदिवासी त्यांचेच वंशज आहेत. 1 2 3 म्हणजे ते मागील ५००-६०० वर्षांपासून या जंगलात राहत आहेत. त्यांची जीवनशैली अगदी तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांची होती. हे लोक शिकार करतात व काही प्रमाणात शेती. एक स्वयंसेवी संस्था 'Survival International' त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयन्त करते. या जमतींनी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायचा की नाही ही मर्जी पूणपणे त्या जमातींची आहे. इतकी वर्षे इतर जगापासून विभक्त राहिल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रगत जगास अनुरूप विकसित झालेली नाही,बाहेरील लोकांशी त्यांचा संबंध आल्यास त्यांना रोगांची लागण होऊ शकते, साधा सर्दीचा विषाणू देखील त्यांच्या निर्वंशास कारण होऊ शकतो. बाहेरील जगास त्यांच्यासुन दूर ठेवण्याचे काम Survival करते. 4 5 6 आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्यात, आग्नेय आशियात पापुआ न्यू गिनी च्या जंगलात तसेच ऑस्ट्रेलिया च्या वाळवंटात देखील अशाच काही जमातींचे लोक राहतात. आणि असेच एक आश्चर्य आपल्या भारतात देखील आहे, जगातील सर्वांचे दूरस्थ, एकाकी व सर्वात धोकादायक जमात ही भारतातील आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किमी दूर बंगालच्या उपसागरामध्ये एक बेट आहे 'उत्तर सेंटिनल द्वीप' या बेताचे क्षेत्रफळ ७२ sq km असून हे बेट अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा भाग आहे. निळेशार पाणी, शुभ्र वाळूचे बीच व घनदाट जंगलाचे आच्छादन असलेले हे एक प्रवाळ बेट आहे. वरवर पाहता सर्व काही शांत दिसते अगदी स्वर्गच. 7 8 परंतु इथे एका रहस्यमय आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांना सेंटिलनीज म्हणतात. ही पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जमात म्हणून ओळखली जाते. कोणीही या बेटावर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बाणांच्या व भाल्याच्या वर्षावास सामोरे जावे लागते, कोणीही या बेटाजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास हे लोक त्यांची हत्या करतात. अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न झाले परंतु कधीही यश आले नाही. भारत सरकारने १९६७ पासून या बेटावर संशोधन करण्याचा प्रयन्त केला परंतु विशेष काही माहिती हाती आली नाही. १९७४ साली नॅशनल जिओग्राफिक चा एक समूह या विषयावर माहितीपट बनवण्यासाठी गेला असता आदिवासींनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा दिग्दर्शकच दंडात बाण घुसल्यामुळे जखमी झाला व त्यांना प्रयत्न सोडून द्यावे लागले. एकदा तेथील खडकांवर आपटून एक जहाज निकामी झाले, जहाजावरील लोकांना त्यावरील सामान सुद्धा तसेच सोडून द्यावे लागले तेंव्हापासून ते अजूनही तसेच आहे. अगदी अलीकडे २००६ साली दोन मच्छीमार तिथे गेले असता आदिवासींनी त्यांची हत्या केली, जेंव्हा त्यांची मृत शरीरं आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले तेंव्हा या लोकांनी ते उतरू दिले नाही. 9 10 मानववंश शास्त्रज्ञ डॉ टी एन पंडित यांनी या बेटावर २० वर्षे संशोधन केले आहे, त्यांना शेती माहीत नाही कारण वरून पाहता शेतीच्या कोणत्याही खुणा या बेटांवर दिसत नाहीत, बेटांजवळ किनाऱ्यावर मिळणारे मासे खाऊन ते जगतात, त्यांना नौकायन माहीत नाही, जंगलातील फळे,कंदमुळे,नारळ व इतर वनस्पती त्याच्या आहारात असतील तसेच ते शिकार करत असतील पण याबद्दल एकही पुरावा नाही कारण या बेटावर जाताच येत नाही. त्यांची संख्या ५० ते ४०० अशी कितीही असू शकते. संशोधनांमधून हे समोर आले आहे की, हे लोक किमान ६०,००० वर्षांपासून या बेटावर राहत आहेत त्यांचा आफ्रिकेत उगम पावलेल्या पहिल्या मानवाशी थेट संबंध आहे, ही एक अश्मयुगीन जमात आहे. आजच्या या अंतरिक्ष युगात पृथ्वीवर एक अश्मयुगीन जमात राहते याची कोणी कल्पना देखील केली असेल का. अंदमानच्या मुख्य बेटांवर 'जारवा' जमातीचे लोक राहतात या दोन्ही आदिवासींची जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. सेंटिलीनीज जारवांपासून देखील हजारो वर्षांपूर्वीच विभक्त झालेले आहेत. भारत सरकारने १९९७ साली सेंटिनल द्वीप आणि त्यापासून आजूबाजूचा ३ किमी चा परिसर 'Exlusive Zone' म्हणून घोषित केला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. इतकेच काय नौदलाची एक बोट या बेटाभवती नियमित गस्त घालत असते. भारत सरकारच्या या धोरणाचे कौतुक वाटते हे त्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव मानणाऱ्या या लोकांना माहिती तरी असेल का की भारत सरकार आपले रक्षण करीत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
10640 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

नवीन आणि रोचक

स्मिता.
Tue, 07/19/2016 - 14:41 नवीन
अगदी नवीन आणी रोचक माहिती मिळाली. असे आम्हितीपर आणखी लेख येवू द्या.
  • Log in or register to post comments

छान व वेगळा विषय

गणेश उमाजी पाजवे
Tue, 07/19/2016 - 14:47 नवीन
मिपा वर तुमचे स्वागत ...या सेन्टिनालीस अद्दल एक तू-नळी ( Youtube ) चा दुवा इथे देत आहे. त्यात तुम्ही उल्लेख केलेल्या जहाजाचा देखील फोटो आहे. https://www.youtube.com/watch?v=1WqqMpGxyFQ
  • Log in or register to post comments

लेखन चूक

गणेश उमाजी पाजवे
Tue, 07/19/2016 - 14:48 नवीन
ते अद्दल नसून बद्दल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेश उमाजी पाजवे

नवीच माहिती.अजून वाचायला

अजया
Tue, 07/19/2016 - 15:51 नवीन
नवीच माहिती.अजून वाचायला आवडलं असतं.
  • Log in or register to post comments

वेगवेगळ्या आदिवासी

संत घोडेकर
Tue, 07/19/2016 - 16:01 नवीन
वेगवेगळ्या आदिवासी जमातींबद्दल विस्तृत लेखन वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

नविन माहिती मिपावर

प्रमोद देर्देकर
Tue, 07/19/2016 - 16:06 नवीन
नविन माहिती मिपावर आणल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आवडता विषय. अजून येऊद्यात.

एस
Tue, 07/19/2016 - 16:16 नवीन
आवडता विषय. अजून येऊद्यात.
  • Log in or register to post comments

मस्त माहीती

कविता१९७८
Tue, 07/19/2016 - 16:20 नवीन
मस्त माहीती
  • Log in or register to post comments

ह्यांच्याबद्दल कुठे तरी वाचले

प्रीत-मोहर
Tue, 07/19/2016 - 16:43 नवीन
ह्यांच्याबद्दल कुठे तरी वाचले होते अंदमान-स्वारीसाठी रिसर्च करताना. भारीच आहे हे
  • Log in or register to post comments

जर कोणीच जाऊ शकत नाही तर त्या

आदूबाळ
Tue, 07/19/2016 - 17:55 नवीन
जर कोणीच जाऊ शकत नाही तर त्या मानववंश शास्त्रज्ञ डॉ टी एन पंडित यांनी २० वर्षे संशोधन कसं केलं? ("तेनसिंग सुद्धा चढू शकत नाही इतक्या उंच वरती एक टांग उपर करून गुरुदेव तप करते..." हे आठवलं.)
  • Log in or register to post comments

डॉ टी एन पंडित यांनी मानववंश

लोनली प्लॅनेट
Tue, 07/19/2016 - 19:50 नवीन
डॉ टी एन पंडित यांनी मानववंश शास्त्राचा आधार घेऊन तसेच अंदमान च्या मुख्य बेटावर राहणाऱ्या जारवा जमातीचा अभ्यास करून व सेंटिनल बेटाचे केवळ निरीक्षण करून आपले निष्कर्ष मांडले. ते किनाऱ्यावर मासेमारी करतात हि एक गोष्ट सोडली तर बेटाच्या आतमध्ये ते कशा पद्धतीने जगतात हे एक रहस्यच आहे े
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भारत सरकारने १९९७ साली

मृत्युन्जय
Tue, 07/19/2016 - 19:33 नवीन
भारत सरकारने १९९७ साली सेंटिनल द्वीप आणि त्यापासून आजूबाजूचा ३ किमी चा परिसर 'Exlusive Zone' म्हणून घोषित केला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. इतकेच काय नौदलाची एक बोट या बेटाभवती नियमित गस्त घालत असते. इथे भारतीय नौदलाचा किंवा संरक्षण मंत्रालयाचा अथवा तत्सम सरकारी खात्याचा गुप्त तळ असावा याबद्दल मनात कुठलीही शंका नाही.
  • Log in or register to post comments

छान माहिती.

पिशी अबोली
Tue, 07/19/2016 - 19:39 नवीन
छान माहिती. सावरकरांच्या 'काळे पाणी' मधली वर्णने आठवली.
  • Log in or register to post comments

+१ मलाही. बरीच्व्ह जुळतात

प्रीत-मोहर
Wed, 07/20/2016 - 09:46 नवीन
+१ मलाही. बरीच्व्ह जुळतात आणिक ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

रोचक माहिती..!!!

मोदक
Tue, 07/19/2016 - 19:40 नवीन
रोचक माहिती..!!!
  • Log in or register to post comments

अमेझॉन जंगलातील आदिवासींचा विडिओ

लोनली प्लॅनेट
Tue, 07/19/2016 - 20:00 नवीन
  • Log in or register to post comments

अमेझॉन मधील अशा आयसोलेटेड

लोनली प्लॅनेट
Wed, 07/20/2016 - 10:24 नवीन
अमेझॉन मधील अशा आयसोलेटेड जमातींच्या शोधाचा पहिला व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=sLErPqqCC54
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

श्रीनगर खोऱ्याला पण असाच

प्रान्जल केलकर
Tue, 07/19/2016 - 22:01 नवीन
श्रीनगर खोऱ्याला पण असाच सेंटिनल द्विपाचा दर्जा द्यावा का?
  • Log in or register to post comments

जगातील सर्वात धोकादायक खोरे

लोनली प्लॅनेट
Wed, 07/20/2016 - 10:28 नवीन
जगातील सर्वात धोकादायक खोरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रान्जल केलकर

सेंटीनलीज बद्दल थोडंसं ऐकलं

प्रचेतस
Wed, 07/20/2016 - 07:15 नवीन
सेंटीनलीज बद्दल थोडंसं ऐकलं होतं आधी पण हे इतके आयसोलेटेड आहेत हे माहीत नव्हतं.
  • Log in or register to post comments

आवडलं

श्रीरंग_जोशी
Wed, 07/20/2016 - 10:28 नवीन
एका वेगळ्याच विषयावरचं माहितीपूर्ण लेखन आवडलं. मिपावर स्वागत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

ह्म्म

वरुण मोहिते
Wed, 07/20/2016 - 10:51 नवीन
पॉवरग्रिड सोबत अंदमान मध्ये वर्षभर काम केलाय त्यावेळी जेसीबी वर बाण मारला होता आमच्या कंपनीच्या त्या जारवा जमातीने त्याची आठवण झाली विशेष म्हणजे ही गोष्ट २०११ ची आहे
  • Log in or register to post comments

कुरुक्षेत्राच्या युद्धात

प्रसाद_१९८२
Wed, 07/20/2016 - 11:08 नवीन
कुरुक्षेत्राच्या युद्धात ज्या प्रमाणे पितामह भिष्म यांना वंदन करण्यासाठी, अर्जुनाने एक बाण त्यांच्या रथा समोरच्या जमिनीत मारला होता तसेच ह्या 'जारवा' आदीवासींनी तुमच्या जेसीबीवर बाण मारुन तुम्हाला वंदन केले असावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

अत्यंत रोचक व नविन माहीती.

राजाभाउ
Wed, 07/20/2016 - 11:01 नवीन
अत्यंत रोचक व नविन माहीती. पुलेशु
  • Log in or register to post comments

लोनली प्लॅनेट - माझी आवडती

मदनबाण
Wed, 07/20/2016 - 11:45 नवीन
लोनली प्लॅनेट - माझी आवडती मालिका ! :) लेख आवडला... असेच लिहित रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version
  • Log in or register to post comments

इयन राइट माझा आवडत ट्रॅव्हलर

लोनली प्लॅनेट
Wed, 07/20/2016 - 12:23 नवीन
इयन राइट माझा आवडत ट्रॅव्हलर त्या मालिकेचा इंट्रो आणि ते संगीत ऐकून अजूनही मन रोमांचित होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वेगळ्याच विषयावरील लेख आवडला,

नीलमोहर
Wed, 07/20/2016 - 12:39 नवीन
द्वीपाचे वर्णन वाचतांना किंगकाँग मधील स्कल आयलंड आठवत होते. जगात अशा किती रहस्यमय आणि अद्भुत गोष्टी असतील खरं, Truth is stranger than fiction..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा