सेंटिनल द्वीपचे रहस्य
आदिवासी लोकांबद्दल तशी आपल्याला बरीच माहिती आहे, त्यांची भाषा जीवनशैली त्यांचे राहणीमान,कारण त्यांचा प्रगत जगाशी बऱ्यापैकी संपर्क असतो. परंतु आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही.
दक्षिण अमेरिकेत अमेझॉन च्या घनदाट जंगलात, ब्राझील व पेरू देशांमध्ये अशा आदिवासी जमाती राहतात ज्यांच्या बद्दल इतर जगास काहीही माहिती नाही. जेंव्हा युरोपिअन लोकांनी आक्रमण करून इथे नांदत असलेल्या माया, ऍझटेच, इंका संस्कृती (civilization) नष्ट केल्या तेंव्हा जे काही लोक या विध्वंसातून वाचले व जीव वाचवून जंगलात पळून गेले हे आदिवासी त्यांचेच वंशज आहेत.
म्हणजे ते मागील ५००-६०० वर्षांपासून या जंगलात राहत आहेत. त्यांची जीवनशैली अगदी तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांची होती. हे लोक शिकार करतात व काही प्रमाणात शेती. एक स्वयंसेवी संस्था 'Survival International' त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयन्त करते. या जमतींनी बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायचा की नाही ही मर्जी पूणपणे त्या जमातींची आहे. इतकी वर्षे इतर जगापासून विभक्त राहिल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रगत जगास अनुरूप विकसित झालेली नाही,बाहेरील लोकांशी त्यांचा संबंध आल्यास त्यांना रोगांची लागण होऊ शकते, साधा सर्दीचा विषाणू देखील त्यांच्या निर्वंशास कारण होऊ शकतो. बाहेरील जगास त्यांच्यासुन दूर ठेवण्याचे काम Survival करते.
आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्यात, आग्नेय आशियात पापुआ न्यू गिनी च्या जंगलात तसेच ऑस्ट्रेलिया च्या वाळवंटात देखील अशाच काही जमातींचे लोक राहतात.
आणि असेच एक आश्चर्य आपल्या भारतात देखील आहे, जगातील सर्वांचे दूरस्थ, एकाकी व सर्वात धोकादायक जमात ही भारतातील आहे.
भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किमी दूर बंगालच्या उपसागरामध्ये एक बेट आहे 'उत्तर सेंटिनल द्वीप' या बेताचे क्षेत्रफळ ७२ sq km असून हे बेट अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा भाग आहे. निळेशार पाणी, शुभ्र वाळूचे बीच व घनदाट जंगलाचे आच्छादन असलेले हे एक प्रवाळ बेट आहे. वरवर पाहता सर्व काही शांत दिसते अगदी स्वर्गच.
परंतु इथे एका रहस्यमय आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांना सेंटिलनीज म्हणतात. ही पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जमात म्हणून ओळखली जाते. कोणीही या बेटावर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बाणांच्या व भाल्याच्या वर्षावास सामोरे जावे लागते, कोणीही या बेटाजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास हे लोक त्यांची हत्या करतात. अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत.
ब्रिटिशांच्या काळापासून यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न झाले परंतु कधीही यश आले नाही. भारत सरकारने १९६७ पासून या बेटावर संशोधन करण्याचा प्रयन्त केला परंतु विशेष काही माहिती हाती आली नाही. १९७४ साली नॅशनल जिओग्राफिक चा एक समूह या विषयावर माहितीपट बनवण्यासाठी गेला असता आदिवासींनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा दिग्दर्शकच दंडात बाण घुसल्यामुळे जखमी झाला व त्यांना प्रयत्न सोडून द्यावे लागले. एकदा तेथील खडकांवर आपटून एक जहाज निकामी झाले, जहाजावरील लोकांना त्यावरील सामान सुद्धा तसेच सोडून द्यावे लागले तेंव्हापासून ते अजूनही तसेच आहे. अगदी अलीकडे २००६ साली दोन मच्छीमार तिथे गेले असता आदिवासींनी त्यांची हत्या केली, जेंव्हा त्यांची मृत शरीरं आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले तेंव्हा या लोकांनी ते उतरू दिले नाही.
मानववंश शास्त्रज्ञ डॉ टी एन पंडित यांनी या बेटावर २० वर्षे संशोधन केले आहे, त्यांना शेती माहीत नाही कारण वरून पाहता शेतीच्या कोणत्याही खुणा या बेटांवर दिसत नाहीत, बेटांजवळ किनाऱ्यावर मिळणारे मासे खाऊन ते जगतात, त्यांना नौकायन माहीत नाही, जंगलातील फळे,कंदमुळे,नारळ व इतर वनस्पती त्याच्या आहारात असतील तसेच ते शिकार करत असतील पण याबद्दल एकही पुरावा नाही कारण या बेटावर जाताच येत नाही.
त्यांची संख्या ५० ते ४०० अशी कितीही असू शकते. संशोधनांमधून हे समोर आले आहे की, हे लोक किमान ६०,००० वर्षांपासून या बेटावर राहत आहेत त्यांचा आफ्रिकेत उगम पावलेल्या पहिल्या मानवाशी थेट संबंध आहे, ही एक अश्मयुगीन जमात आहे. आजच्या या अंतरिक्ष युगात पृथ्वीवर एक अश्मयुगीन जमात राहते याची कोणी कल्पना देखील केली असेल का. अंदमानच्या मुख्य बेटांवर 'जारवा' जमातीचे लोक राहतात या दोन्ही आदिवासींची जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. सेंटिलीनीज जारवांपासून देखील हजारो वर्षांपूर्वीच विभक्त झालेले आहेत.
भारत सरकारने १९९७ साली सेंटिनल द्वीप आणि त्यापासून आजूबाजूचा ३ किमी चा परिसर 'Exlusive Zone' म्हणून घोषित केला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. इतकेच काय नौदलाची एक बोट या बेटाभवती नियमित गस्त घालत असते. भारत सरकारच्या या धोरणाचे कौतुक वाटते हे त्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव मानणाऱ्या या लोकांना माहिती तरी असेल का की भारत सरकार आपले रक्षण करीत आहे.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
नवीन आणि रोचक
छान व वेगळा विषय
लेखन चूक
नवीच माहिती.अजून वाचायला
वेगवेगळ्या आदिवासी
नविन माहिती मिपावर
आवडता विषय. अजून येऊद्यात.
मस्त माहीती
ह्यांच्याबद्दल कुठे तरी वाचले
जर कोणीच जाऊ शकत नाही तर त्या
डॉ टी एन पंडित यांनी मानववंश
भारत सरकारने १९९७ साली
छान माहिती.
+१ मलाही. बरीच्व्ह जुळतात
रोचक माहिती..!!!
अमेझॉन जंगलातील आदिवासींचा विडिओ
अमेझॉन मधील अशा आयसोलेटेड
श्रीनगर खोऱ्याला पण असाच
जगातील सर्वात धोकादायक खोरे
सेंटीनलीज बद्दल थोडंसं ऐकलं
आवडलं
ह्म्म
कुरुक्षेत्राच्या युद्धात
अत्यंत रोचक व नविन माहीती.
लोनली प्लॅनेट - माझी आवडती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Versionइयन राइट माझा आवडत ट्रॅव्हलर
वेगळ्याच विषयावरील लेख आवडला,