Skip to main content

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 09/07/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 176986
प्रतिक्रिया 484

प्रतिक्रिया

In reply to by गंगाधर मुटे

तुमचे कार्य मात्र खचितच महान आणि लोकोपयोगी आहे हे आम्ही झाईर करु इच्छित आहे !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पळवाट शोधून पळू नका. पत्ता द्या. घरी येतो. दुवा द्या. चहाही मागणार नाही.

In reply to by गंगाधर मुटे

चहाचं म्हणत असाल तर एक चहा कट्टा करुया हवं तर...आम्ही लोकांना चहा आणि पाणी दोन्ही पाजतो ! तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धाग्यावर भेटलात...जीवन धन्य झाले...आभार !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पत्ता कधी देणार? तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला. पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.

In reply to by गंगाधर मुटे

मुटे साहेब सगळ्याचे पत्ते मागतायत मी द्यायला तयार आहे माझा पत्ता काय आहे सध्या भात लावणीसाठी गावी आलोय ते आलेतर भात लावायला मदत होईल आणि शेतीतज्ञ आहेत तर काहीतरी सल्ले पण देतील येताय का?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

किंवा मी माझा पत्ता देतो. जाण्यायेण्याचा खर्च देतो. पाहुणचार करतो. माझ्या घरी या. दुवा द्या.

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.

In reply to by अभ्या..

तुमचा प्रतिसाद पाहून मलाही सिनेमाची आठवण झाली. गुंडांच्या टोळीचा नि:पात झाल्यानंतर पिक्चरमधे सामान्य जनता जशी खुशीने नाचायला लागते, तसंच वाटलं.

In reply to by गंगाधर मुटे

अभ्या.. पार सामान्य जनतेच्या क्यातागिरीत गेला.. :) मुटे सर प्रतिसाद द्यायला परत धाग्यावर येतात, हे याची देहा पाहिले.. _/\_

In reply to by ब़जरबट्टू

सामान्यच हाय मी. त्यात काय लाजायचं. आणि मला खरच असली साउथ स्टाईल फायटिंग आवडती. एकटा हिरो लुंगी गुंडाळून सेंटरला. चारी साईडने सगळे कोयतेवाले.बाजूला कोर्पिओ, तवेरा, क्वालीस, सफाऱ्या. हे घापघीप घापघिप, नुसता धुराळा. येण्णा रासकला, मिनिस्टरा बेकू, हे घीप. शेती बेकू, हे गहिप्पप्प. पत्ता बेकू हे घीप. नुसती फायतांफाईट. पैशे वसूल.

In reply to by संदीप डांगे

संदीपाअण्णा, जस्ट आलेला वॉस्सप. . सलमाणः अपना मुवी ईदको आता है आमीरः अपना क्रिसमसको शारुखः अपना तो दिवाली को. . रजनीआन्ना: येन्ना रासकला, जिस दिन अप्ना मुवी आता है वई हॉलिडे होता है.

In reply to by अभ्या..

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कायम गहाण सारे करण्यास सातबारा बँकेसमोर झाले लाचार शेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by ब़जरबट्टू

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by अभ्या..

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली. खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.
=)) हाहाहा काकांची चौफेर फटकेबाजी चालू आहे.

In reply to by मितभाषी

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

तुम्हाला नेमकं काय साध्य करायचे आहे या सगळ्यातून.

In reply to by जावई

तुम्हाला काय म्हणायचे? की या दहावीस आयड्यांनी माझ्या धाग्यावर येऊन तमाशा करावा आंणि मी माजघरात दडावं?

In reply to by राका

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by अनुप ढेरे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी जे केले नाही ते मुटे काका मंत्री होऊन करणार आहेत असं ते म्हणतायत. पण मुळात समस्या काय आहे हेच ते सांगत नसल्याने मिपाकर विचारू पहात आहेत. हे थोडं केजरीवालांसारखं होतंय ना? निवडणुकीच्या आधी ते सुद्धा असंच बोलायचे. निवडून आल्यानंतर आनंदी आनंद झाला.

In reply to by गंगाधर मुटे

घोडा चतूर... घोडा चतूर करू नका... स्वतः कविताबाह्य उत्तरे देता आणि त्याबद्दल कुणी विचारलं की कवितेत लिहिलं आहे का म्हणून विचारता. ए नाॅय चाॅलबे...

In reply to by आदिजोशी

पुन्हा एकदा वाचा. मी स्वतःहून कविताबाह्य विषय सुरू केलेला नाही आहे. प्रतिसादावर उपप्रतिसाद देत आहे.

आता दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्य धाग्याप्रमाणे याही धाग्यावर श्री अनूप ढेरे यांचे आगमन झालेले आहे. कंपूच्या वतिने पुढील किल्ला ते लढवतील.

In reply to by गंगाधर मुटे

मिस्टर अनूप माझ्या कंपूत नाहीत. किंबहुना माझा कुठलाही कंपू नाही ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by आदिजोशी

कंपू म्हणण्यात माझी चूक झाली. कंपू नियोजित असतो. अकस्मात आलेल्या संधीत हात धुवून घ्यायला काही लोक जमावात मिसळतात. त्याला कंपू नव्हे तर झुंड म्हणतात. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल आभार!

In reply to by आदिजोशी

माझाही नाही कुठला कंपू. पण आपणाला माझा प्रतिसाद दखलपात्र वाटला याबद्दल आभारी आहे. फोटो आवडला का?

सतरंजी उचला रात्र झाली भारतात आता उरलेली करमणूक उद्या सकाळी

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो. कोण कोणास केंव्हा आणि का म्हणाले?

In reply to by सुबोध खरे

गलगले तुम्ही शांत बसा....गलगलेंची इच्छा पूर्ण झाली.... गलगले निघाले !

In reply to by बोका-ए-आझम

=))

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो. कोण कोणास केंव्हा आणि का म्हणाले?
मीच म्हणालो. पण कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. हे कळतंय ना तुम्हाला?

In reply to by सुबोध खरे

नाही तर १००० नेही नाही... तसं काय नक्की नसतं ब्वा....! आपले सेहवाग हिट विकेट झाले तर...नाही तर आज शामत आहे...

In reply to by सुबोध खरे

किती प्रतिसाद आलेत याचेशी मला काहीही देणेघेणे नाही. मात्र यानिमित्ताने आपल्या देशात, देशाच्या कोनत्या भागात कोणकोनत्या तर्‍हेचे लोकं राहतात, त्यापैकी कीती बोलघेवडे, ढोंगी, पाखंडी, चालबाज, धूर्त, वगैरे तर्‍हेचे लोक राहतात, याचा सुक्ष्मसा अंदाज यायला मदत होते.

पण मी काय म्हणतो, मुटे काका सरळ सांगून का टाकत नाहीत की कृती करणे हा माझा प्रांत नाही... मी फक्त कविता करणार. मॅटर फिनिश...

In reply to by आदिजोशी

मी काय करतो, कृती करतो की नाही हे बघायला माझ्या गावाला या. संपूर्ण पत्ता देतो. वाटल्यास जाण्यायेण्याचा खर्च देतो. या. नुसत्या तोंडाची वाफ का दवडता?

@आदिजोशी, तुमचा पत्ता माझ्याकडे आहे. पुन्हा तिकडे आलो म्हणजे तुम्ही किती कर्तबगार आहात हे शोधतो. आणि मिसळपावर धागा काढतो.

In reply to by गंगाधर मुटे

माझा पत्ता - विजय परब, ठाणे पोलीस आयुक्त आवार, फ्लॅट क्रमांक ३०२, रखवालदाराला निरोप द्या मी गेटावर येतो. सद्या काही कवींना थर्ड डीग्री देतोय.. आवाज ऐकुन पळू नका..

In reply to by खटपट्या

खटपट्या शेट असे खरे पत्ते आणि नाव देत जाउ नका.उगाच मिपाचं नातं चिकटवून सरकारी कामं करायला येतील लोक!