पाऊस हा पहिला
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस हा पहीला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊन का आला ।। धृ ।।
रिमझिम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला
पावसात ओल्या पावलांच्या खुणा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।। 1 ।।
आज फुलांचे रंग ही बहरून आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले
या फुलात आता चेहरा का तुझा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।।2।।
वाचने
3442
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
या फुलात आता चेहरा का तुझा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला..!
मस्त ओळी आवडल्या.
-दिलीप बिरुटे
(चाफ्याच्या फुलात तिला शोधणारा)
छान कविता...अजुन येउ द्यात
फक्त याद शब्द खटकला. हिंदी पण आहे आणि घेऊन आली हवे ना.
त्यापेक्षा आठव तुझ्या प्रेमाची असे चालेल काय?
शब्दांच्या मीटरमुळे याद हा शब्द घ्यावा लागला
In reply to शब्दांच्या मीटरमुळे याद हा by माहीराज
ही मीटराची पट्टी नै आवडत आपल्याला! तुमच्या एका जुन्या कवितेवर फिदा हौत आपण. मीटरला 'फूट'वल्याशिवाय खरी कविता मोजता येणार नै माहीराज!
पाऊस हा पहिला, का असा बरसला?
ओल्या आठवांना, का तुझ्या लगडला? ।। धृ ।।
रिमझिम ओल्या, पावसात भिजताना
ओढ तुझी का लागे, माझीया मनाला
ओल्या पावलांच्या ओलेत्याच खुणा
छंद शोधण्याचा हा लागला मनाला ।। 1 ।।
बहरूनीया आले, फुलांचे रंग ओले
अलवार मनही, झाले बेधुंद जरासे
फुलात इथल्या, चेहरा तुझाच
छंद शोधण्याचा हा लागला मनाला ।।2।।
हे घ्या, तुमचीच भाजी घेऊन जरा जिऱ्या-मोहरीची फोडणी मी दिलीये. फूटपट्टी घेऊन मोजू नका लगेच!! ;)
Sandy
In reply to काय राव! :( by चांदणे संदीप
सुरेख! मूळ कविता आणि फोडणी दोन्ही!
In reply to सुरेख! मूळ कविता आणि फोडणी by रातराणी
चांदणेबुवांना कवितांचा दांडगा अभ्यास आहे असं दिसतंय!
In reply to काय राव! :( by चांदणे संदीप
मुळ कविता मस्त आहे. तिला चांदणसरांनी स्वतः मेकप केल्या मुळे चारचौघीत उठून दिसायला लागली.
पैजारबुवा,
In reply to लै भारी.... by ज्ञानोबाचे पैजार
अंधारातून लख्ख चांदण्यात आली.... दैनीक मिपा नाखु समाचार.
धुराळी धाग्यांमध्ये शीतल"चांदण्याची" झुळुक.... दैनिक टका टाईम्स
दुश्त दुश्त आठवणींना गोडुलं अंगडटोपडं मिळालं : दैनिक आत्मा का परमानंद (दैनिक आज का आनंद शी काहीही संबध नाही०)
संकलक नाखु
ता.क. शीतल उपमा आहे व्यक्ती नाही खुलासा संपला
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker NotKhup chan fodani. .
मीटर नसलेल्या कविता लिहायलाच खरी मजा येते . पण काय करणार राव गुरूंनी मीटरच्या भानगडीत अडकवलंय मग काय करणार
छान कविता आणि फोडणी पण
छान !