Skip to main content

पाऊस हा पहिला

लेखक माहीराज यांनी मंगळवार, 28/06/2016 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस हा पहीला का असा बरसला याद तुझ्या प्रेमाची घेऊन का आला ।। धृ ।। रिमझिम ओल्या पावसात भिजताना ओढ तुझी का लागते या मनाला पावसात ओल्या पावलांच्या खुणा शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।। 1 ।। आज फुलांचे रंग ही बहरून आले अलगद मन बेधुंद जरासे झाले या फुलात आता चेहरा का तुझा शोधण्याचा मनाला छंद हा लागला ।।2।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3470
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

या फुलात आता चेहरा का तुझा शोधण्याचा मनाला छंद हा लागला..! मस्त ओळी आवडल्या. -दिलीप बिरुटे (चाफ्याच्या फुलात तिला शोधणारा)

In reply to by माहीराज

ही मीटराची पट्टी नै आवडत आपल्याला! तुमच्या एका जुन्या कवितेवर फिदा हौत आपण. मीटरला 'फूट'वल्याशिवाय खरी कविता मोजता येणार नै माहीराज! पाऊस हा पहिला, का असा बरसला? ओल्या आठवांना, का तुझ्या लगडला? ।। धृ ।। रिमझिम ओल्या, पावसात भिजताना ओढ तुझी का लागे, माझीया मनाला ओल्या पावलांच्या ओलेत्याच खुणा छंद शोधण्याचा हा लागला मनाला ।। 1 ।। बहरूनीया आले, फुलांचे रंग ओले अलवार मनही, झाले बेधुंद जरासे फुलात इथल्या, चेहरा तुझाच छंद शोधण्याचा हा लागला मनाला ।।2।। हे घ्या, तुमचीच भाजी घेऊन जरा जिऱ्या-मोहरीची फोडणी मी दिलीये. फूटपट्टी घेऊन मोजू नका लगेच!! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

मुळ कविता मस्त आहे. तिला चांदणसरांनी स्वतः मेकप केल्या मुळे चारचौघीत उठून दिसायला लागली. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अंधारातून लख्ख चांदण्यात आली.... दैनीक मिपा नाखु समाचार. धुराळी धाग्यांमध्ये शीतल"चांदण्याची" झुळुक.... दैनिक टका टाईम्स दुश्त दुश्त आठवणींना गोडुलं अंगडटोपडं मिळालं : दैनिक आत्मा का परमानंद (दैनिक आज का आनंद शी काहीही संबध नाही०) संकलक नाखु ता.क. शीतल उपमा आहे व्यक्ती नाही खुलासा संपला

Khup chan fodani. . मीटर नसलेल्या कविता लिहायलाच खरी मजा येते . पण काय करणार राव गुरूंनी मीटरच्या भानगडीत अडकवलंय मग काय करणार