Skip to main content

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 18/07/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

                 - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

लेखनविषय:

वाचने 1465
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान

येऊद्या अजून! Sandy