Skip to main content

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/07/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥

                        - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१५/०७/२०१६
लेखनविषय:

वाचने 2194
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अभंग आवडले! मुटे सर वेल डन, कीप इट अप! :) Sandy

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? । त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
वंशद्वेष ?

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!