॥सांगा तुकारामा : अभंग-१॥
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१५/०७/२०१६
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2194
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
या आयडीने याशिवाय वेगळं लेखन
तुमचं बरूबराय पन अमुक इका
In reply to या आयडीने याशिवाय वेगळं लेखन by सूड
मस्त लिहिलय!
वंशद्वेष ?
धन्यवाद