Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हर्षल_चव्हाण on Wed, 07/13/2016 - 11:49
सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे, दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे? मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी, (पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी, "पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे, का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे? उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे... - हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 07/13/2016 - 12:26

Permalink

वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले

हरभरा.... सैल झाली नाडी आता, व्यर्थ आहे थांबणे, दोन क्षणांची प्रतिक्षा, तो वरी का कुंथणे, मी तुझ्या डब्यात माझे पाणी होते ओतले, बोट त्यात बुडवु नको तू, व्यर्थ आहे चिवडणे, शोध घेता मी डब्याचा, टिश्यु येतो सामोरी, पण मनाला आसही की, स्वच्छ निर्मळ वाटणे, अंत माळरानात वा शौचालयी आहे जरी, "उद्या पुन्हा फिरुन येरे" आहे जगाचे सांगणे का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 07/13/2016 - 12:38

In reply to वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अगं अयायायायायाया ...मेलो...

अगं अयायायायायाया ...मेलो... थांबा....जरा कुंथुन येतो...
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 07/13/2016 - 12:46

In reply to अगं अयायायायायाया ...मेलो... by चिनार

Permalink

आणि तुमचे (अर्थात सर्वांचे) गुर्जी

धन्य झाले !!!! त्यांनी या धाग्यावर पायधूळ झाडलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/13/2016 - 12:50

In reply to वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

का निघेना पाय येथुन, का

का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,
साष् टांग प्रणी पात! Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 07/13/2016 - 18:16

In reply to वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

विडंबनमाऊली.

विडंबनमाऊली. साष्टांग राह्यला होता नमस्कार. घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 07/14/2016 - 09:20

In reply to वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

पैजारबुवा __/\__

पैजारबुवा __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 07/14/2016 - 09:34

In reply to वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अरे अरे काय हे पैजार बुवा.

अरे अरे काय हे पैजार बुवा. अक्षरशः चहा सांडला ना अंगावर, ऑफिसमधले सगळे बघताहेत माझ्याकडे. साष्टांग नमस्कार. हर्षल तुमची कविताही चांगली आहे. आणि अंत देव्हा... ही ओळ क्लासच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/13/2016 - 12:52

Permalink

मूळ काव्य मात्र अव्वल आहे..

मूळ काव्य मात्र अव्वल आहे.. एकच नंबर हो- हर्षल_चव्हाण.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 07/13/2016 - 13:55

In reply to मूळ काव्य मात्र अव्वल आहे.. by अत्रुप्त आत्मा

Permalink

+१ सुरेख आहे कविता!

+१ सुरेख आहे कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on Wed, 07/13/2016 - 13:36

Permalink

बापरे...

ज्ञानोबा, धन्य आहात, तुम्ही विडंबन लिहून (की आणखी काही करून) मोकळे पण झालात ;) मला एवढ्या वेदना नव्ह्त्या झाल्या काही ... सपशेल आडवी केलीत कविता :D आत्मबंध, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 07/13/2016 - 15:18

In reply to बापरे... by हर्षल_चव्हाण

Permalink

धन्यवाद...

ह. घेतल्याबद्दल धन्यवाद हर्षल, कविता खरोखरच छान आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on Wed, 07/13/2016 - 17:50

In reply to धन्यवाद... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 07/13/2016 - 15:03

Permalink

हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)
ठिकाण राहीले की. आधी मला वाटले ही आजची हर्षलास्त किंवा हर्षलोदयाची वेळ असावी. कविता छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on Wed, 07/13/2016 - 17:53

In reply to हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००) by सतिश गावडे

Permalink

कविता लिहून पूर्ण होण्याची

कविता लिहून पूर्ण होण्याची वेळ टाकतो. कधीतरी एखादी सुचते, म्हणून... बाकी, कल्पना आवडली उदयास्ताची :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 07/13/2016 - 18:13

Permalink

आवडले रे लेखन हर्षल. अव्वल

आवडले रे लेखन हर्षल. अव्वल आहे अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on गुरुवार, 07/14/2016 - 06:57

In reply to आवडले रे लेखन हर्षल. अव्वल by अभ्या..

Permalink

धन्यवाद :)

धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 07/13/2016 - 23:53

Permalink

कविता सुंदर!

विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 07/13/2016 - 23:54

Permalink

कविता सुंदर!

विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on गुरुवार, 07/14/2016 - 06:59

In reply to कविता सुंदर! by चांदणे संदीप

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 07/14/2016 - 10:02

In reply to कविता सुंदर! by चांदणे संदीप

Permalink

छान कविता आहे संदिप.

छान कविता आहे संदिप.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 07/14/2016 - 10:08

In reply to कविता सुंदर! by चांदणे संदीप

Permalink

Sandybaba, tuzi kavita

Sandybaba, tuzi kavita aawadali.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 07/14/2016 - 10:45

In reply to Sandybaba, tuzi kavita by अभ्या..

Permalink

धन्यवाद दादानु! __/\__

कविता आवडल्याचे सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार... पण खरे श्रेय मूळ कवीला... श्री हर्षल चव्हाण यांचा झिंदाबाद! :) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/14/2016 - 06:59

Permalink

कविता आणि त्यांची दोन्ही

कविता आणि त्यांची दोन्ही विडंबने लै भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 07/14/2016 - 09:58

In reply to कविता आणि त्यांची दोन्ही by प्रचेतस

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 07/14/2016 - 08:29

Permalink

सुंदर!! आवडलीच

सुंदर!! आवडलीच
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 07/14/2016 - 08:57

Permalink

या कडव्याने

अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,
आम्हाला बुवांचा अजरामर फलक धागा आठवला. संदीपा बेष्ट लेका. नित्वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/14/2016 - 09:14

Permalink

वा!

सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 07/14/2016 - 09:18

Permalink

मी तुझ्या श्वासात माझे श्वास

मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... वाह्ह... विडंबन सुद्धा लयं भारी हायेत... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 07/14/2016 - 09:21

Permalink

कवितेचा आशय आवडला.

कवितेचा आशय आवडला. मीटर जरा गंडलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 07/14/2016 - 10:15

In reply to कवितेचा आशय आवडला. by सस्नेह

Permalink

+१

हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षल_चव्हाण on गुरुवार, 07/14/2016 - 16:38

In reply to कवितेचा आशय आवडला. by सस्नेह

Permalink

धन्यवाद :) कुठे माशी शिंकलीय,

धन्यवाद :) कुठे माशी शिंकलीय, जरा लक्षात आणून द्याल का? सुधारेन तसं...
  • Log in or register to post comments

Submitted by पेशवा भट on गुरुवार, 07/14/2016 - 09:27

Permalink

मस्तंय कविता आवडली.

मस्तंय कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 07/14/2016 - 09:50

Permalink

कविता छान विडंबन महान ;)

कविता छान विडंबन महान ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on गुरुवार, 07/14/2016 - 09:55

Permalink

वाह!!!!

तिनही कविता उत्तम.... पैजारबुवा,........ सासाटांग नमस्कार हो!!!! (नतमस्तक) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 07/14/2016 - 10:17

Permalink

व्हर्जिनल कविता, एक 'शि'डंबन

व्हर्जिनल कविता, एक 'शि'डंबन आणि एक सुडंबन सगळं आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/14/2016 - 10:53

Permalink

मुळ कविता अतिशय आवडली.

मुळ कविता अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on गुरुवार, 07/14/2016 - 11:20

Permalink

वाह

मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on गुरुवार, 07/14/2016 - 11:45

Permalink

वाह

मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5307 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com